सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

Submitted by जागोमोहनप्यारे on 14 March, 2012 - 05:47

सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

हा बीबी खास अशा प्रकारच्या सिनेमांसाठी.. आपल्याला आवडलेले असे सिनेमे असतील तर त्याची चर्चा करा.. सिनेमाचे नाव, त्यातले कलाकार अशी माहिती दिल्यास चित्रपट यु ट्युबवर शोधता येईल.

चकवा मराठी फिल्म.. http://www.youtube.com/watch?v=S9IdqqUGXuM&feature=related
भूमिका अतुल कुलकर्णी... साधारण अर्धा झाला की प्रेडिक्टेबल आहे. साधारणपणे उग्र चेहर्‍याचा आणि क्रुर हसणारा माणुस खलनायक असतो, हा नियम इथे पाळला गेलाय, त्यामुळे तो कोण हे लगेच समजते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जामोप्या: मस्त धागा!

शायनिंग् (१९८०)

कोलोराडोच्या बर्फाळ डोंगरात एक मस्त मोठ्ठ रिसॉर्ट असत. हिवाळ्यामध्ये ते बंद असत आणि त्याची देखभाल करण्याकरता एक गरम डोक्याचा, नोकरी गमावलेला, होतकरू लेखक आपल्या बायको-मुलासह केअर्-टेकर म्हणून रुजू होतो.

प्रमुख भूमिका- जॅक निकलसन (फक्त डोळ्यासमोर आणा..नको सिनेमाच बघा!)

हे दोन भयपट नाहीत, तरीही हे चित्रपट बघताना शेजारी बसलेली मुले घाबरलेली (किंवा घाबरण्याचा अभिनय करीत असलेली) पाहिली आहेत.
ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा सोसायटीतल्या एखाद दुसर्‍याच घरी टीव्ही असायचे आणि सगळ्या सोसायटीतली मुलं शनिवार रविवार त्या घराचे सिनेमा हॉल करून टाकायचे.
बाळा गाउ कशी अंगाई या सिनेमात शेवटी आशा काळे आत्महत्या करतात आणि त्यांचे भूत मुलाला शेवटचे भेटण्यासाठी येते. या दृश्याच्या वेळी बर्‍याच मुलांनी डोळ्यांवर हात ठेवले होते आणि बघणार्‍या धीत मुलांना किंवा मोठ्यांना 'गेली का ती, गेली का ती?' असे विचारत होती. आमची पिढी किती निरागस होती नाही?(अजूनही असेल कदाचित Wink

दुसरा अशाच शेवटचा उषा किरणचा बाळा जो जो रे

रामगोपाल वर्माचा "रात" प्रचंड आवडलेला सिनेमा. रेवतीची अ‍ॅक्टींग आणि एकंदरच सगळी वातावरण निर्मिती... भट्टी मस्त जमून गेलीये. "कौन" आणि "भूत" पण उर्मिलाच्या अ‍ॅक्टींगसाठी आवडलेले सिनेमे.

मराठीत "माफीचा साक्षीदार". कथा माहित असूनसुद्धा प्रत्येक वेळी बघताना थंड डोक्याचा नाना पाटेकर घाबरवून जातो. रच्याकने झी टॉकीजवर आठवड्यातून किमान एकदा माफीचा सिनेमा सध्या लावतायत Happy

अक्रीत चा उल्लेख कसा नाही केला अजून कोणी.

मती गुंग करणारे कथानक आणि त्याला साजेसा अभिनय चित्रा पालेकर, अमोल पालेकर... अगदी दिलीप कुलकर्णी वगैरे पण रोल छोटा असला तरी

कुणी खोज सिनेमा बद्दल लिहिले नाही. छान कथा आणि सादरीकरण. ऋषी कपूर, कीमी काटकर , नासिरुद्दीन शाह. पहिल्यांदा पाहताना रहस्याचा शेवट पर्यंत पत्ता लागला नव्ह्ता. अर्थात खूपच लहान असताना पाहिलेला सिनेमा आहे. त्याच विशयावर केस नं. ९९ अशा काहीतरी नावाचे मराठी नाटकही आले होते. त्यातले कलाकार आठवत नाहीत आता.

रामुचा भुत आवडला होता.
शामलनचा व्हिलेज, सिक्स्थ सेन्स आणि साइन्स (ह्याचे चित्रपट पुर्ण शांततेत पहायला पाहिजेत. बॅकग्राउन्ड म्युजिकचं महत्व कळतं)

खोज मधे डॅनी आहे ना ???
>>
चर्च च्या पाद्रीच्या भुमिकेत डॅन आहे की नासिर?? आता मलाही वाटतेय की बहुधा डॅनीच असावा.

आता मलाही वाटतेय की बहुधा डॅनीच असावा.>> डॅनीच आहे. कधी काळी पाहिलेला आहे हा चित्रपट.
चांगला होता.
जुन्या चित्रपटातील सस्पेन्स थ्रिलर म्हणुन मला ज्वेलथीफ आणि गुमनाम दोन्ही आवडले होते.
गुमनाम मधील ते विमान लॅन्डिन्गचा प्रसंग पाहुन त्या शाळकरी वयात देखील हसलो होतो मी. खेळण्यातले विमान लगेच कळालं होतं. Happy

मायबोलिकरांनी विद्या बालनचा नविन कहानी हा सिनेमा पाहिला नाही का? अतिशय उत्तम सस्पेंस त्यात आहे.शेवटपर्यंत विद्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.सहकलाकारांची कामे पण उत्तम आहेत.

आक्रोश सही ! नसिरुद्दीन शहा रात्रीचा एकटाच घरी चाललेला असतो, त्याला मारायला काही माणसे त्याच्या मागावर असतात. त्यातलाच एक जण रस्त्यात बंद न पडलेली सायकल दुरुस्त करण्याचे नाटक करीत अस्तो. नसीर त्याला मदत करु का विचारतो. मग त्यानंतर जे घडते, ते पाहून बोबडीच वळते.

सर्वात आवडलेले suspense हिंदी सिनेमे: तिसरी मंझिल, ज्वेल थीफ. तिसरी मंझिलच्या रहस्यात फारसा दम नव्हता पण सादरिकरण जबरदस्त होते. ज्वेल थीफचा सस्पेन्सच सही होता.

राखीचा धुआँ, ऋषी कपुरचा खोज हे Chase Crooked Shadow ची कॉपी आहेत. ह्याच विषयावर "हॅण्ड्स अप" नावाचे भक्ती बर्वे, सदाशिव अमरापुरकर आणि अविनाश मसुरेकर असलेले मराठी नाटक होते.

Murder Mysteryमध्ये हल्लेच पाहिलेला Vanishing हा फ्रेंच सिनेमा छान आहे. माणूस आपली हुशारी वाईट कामाला कशी वापरतो हे पाहिले की भयंकर वाटते. अगदी परवा पाहिलेला "What Happenned to Aunt Alice?" पण थोडासा असाच आहे. यात एक वयस्क बाई आपल्या स्वार्थासाठी खुनी बनते. दोन्ही सिनेमा खुन असा दाखवलेला नाही पण तरी उत्कंठावर्धक आहेत.

मोस्ट थ्रिलिंग अमेरिकन टीवी सिरिअल्स
१)24 (twenty four)- बेस्ट थ्रिल
२) होमलँड
३) प्रिझन ब्रेक
आतापर्यन्त खूप आवडलेले

जामोप्या, २००९ साली आलेला 'स्टुअर्ट हॅझल्डाईन'चा 'एग्झाम' पण मस्त थ्रिलर होता.

एका मोठ्या कंपनीच्या मुलाखतींमधुन एक योग्य उमेदवार निवडला जाणार असतो. शेवटच्या लेखी परीक्षेसाठी आठ बुद्धीमान उमेदवार निवडले जातात, त्यातुन शेवटी एक निवडला जाणार असतो. त्यांना एका खोलीत बंद केले जाते. खोलीला साधी खिडकीही नाही. ते आठजण आणि एक सशस्त्र रक्षक. एकुण वेळ असतो ऐशी मिनीटांचा. परिक्षक त्यांना तीन नियम सांगतो..
१. त्याच्याशी किंवा त्या सशस्त्र रक्षकाशी बोलायचे नाही
२. उत्तरपत्रिकेवर काहीही चुकीचे खरडायचे नाही. काहीही चुकीचे किंवा विषयबाह्य लिहील्यास ती व्यक्ती तत्क्षणी बाद
३. कुठल्याही परिस्थितीत खोलीबाहेर जायचे नाही
टाईम्क्लॉक सुरू करुन तो निघून जातो...

उत्तरपत्रिका बघताना उमेदवारांच्या लक्षात येते की त्याने आपल्याला प्रश्नपत्रिका दिलेलीच नाही किंवा कुठला प्रश्नही सांगितलेला नाही. मग आपल्याला कुठल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचेय इथुन सुरुवात होते.

अफाट चित्रपट आहे. नक्की बघाच..........

exam.jpg

विशाल 'एक्झाम' पाहिला आहे मी. कल्पना भन्नाटच आहे, त्यातही प्रश्नपत्रिका 'ज्यावेळी' सापडते तो प्रसंग तर इतका छान ताणलाय की, त्या उमेदवारांपेक्षा आपल्यालाच तो कधी एकदाचा मिळतो त्याची जास्त काळजी वाटते.

एकाच खोलीत (आय मीन क्लासरूममध्ये) घडणारी घटना; पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ही दिग्दर्शकाची ताकद.

स्केरी मूव्हीबद्दल लिहिले नाही का कुणी? ज्याना हॉरर मूव्हीज बघायला आवडतात त्यानाच त्यातले बहुतांश पंचेस समजतात. Happy

'गुमनाम' हा माझा सर्वात आवडता उत्कंठापट.
आणखी एक इंग्लिश चित्रपट पाहिला होता, त्याची कथा साधारणपणे 'गुमनाम'सारखीच होती. पण शेवट जरा वेगळा होता. खरेतर वेगवेगळे शेवट होते. म्ह्णजे पहिला [!] शेवट होतो, हॉटेलमध्ये झालेल्या खुनांचा खुनी तिथला वेटर शोधून काढतो आणि प्रेक्षकांना पटवून देतो. श्रेयनामावली यायला लागते; तेवढ्यात वेटर ती थांबवतो, घटनांचा परत मागोवा घेतो आणि आपल्याला पटवून देतो की हे सारे खून दुसर्‍या पात्राने केलेले असू शकतात. परत श्रेयनामावली यायला लागते; वेटर ती परत थांबवतो आणि खूनी तिसरा व्यक्ती असू शकेल हे पटवून देतो. Happy थोडक्यात, खरा खूनी कोण असू शकेल ह्याचं कोडं आपल्यालाच घालून चित्रपट संपतो.
[चित्रपटाचे नाव लक्षात नाही. Sad ८ वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये असताना एका चॅनलवर (dubbed version) पाहीला होता.]

हॉलीवूडचा ग्रज कुणी पाहीलाय का?

अजून एक. याच नाव आठवत नाही पण याचे दोन्ही भाग पाहताना भिती वाटते. हॉरर + सस्पेन्स असा हॉलीवूडपट आहे.
एक विडिवो टेप असते आणि ती टेप पाहीली कि पाहणारांचा काही काळाने मृत्यू/खून होतो.

टिव्ही मधूनच पाणी, मुलीच भुत बाहेर येत, वगैरे.
नायिकाने तो विडिवो पाहीला असतो पण तिने तो कॉपी केलेला असतो,त्यामूळे तिला काही इजा होत नाही.
समंथा (बहुतेक) नावाच्या मुलीच भुत असतं.

कुणाला माहीत आहे का हा चित्रपट?

Pages