मी पोहे खाल्ले नाही..

Submitted by रीया on 16 February, 2012 - 01:35

मी पोहे खाल्ले नाही

संदीप खरे ची क्षमा मागून .....माझे केरळ मधले अनुभव

मी पोहे खाल्ले नाही,शिरा ही खाल्ला नाही
किती दिवस झाले, साधा चहा ही प्याले नाही

भवताली पार्टी चाले, ती विस्फारून बघताना
कुणी इडली कुस्करताना कुणी रस्सम ओरपताना
मी ताट घेऊन बसले जेवणाकरीता जेंव्हा
एका पोळीसाठी देखील कुणी मला विचारले नाही

भुकेला माझा चेहरा, सुटलेली घाबरगुंडी
सांबार न् भात पाहता भर उन्हात वाजे थंडी
मी coconut oil खाल्ले, काही उपाय नव्हता तेंव्हा
पण उपीट-केळे खाणे मला कधीच जमले नाही

अव्यक्त फार मी आहे मूळ लुंगी जिथल्या तेथे
नानकटाईत खाल्ले दाणे नि भवती 'चेची-चेटे'
भाषेमध्येही कुठला ओळखीचा शब्द नाही
मल्याळम ऐकुन थकले पण शिकले अजून ही नाही

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते
मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता ही साऊथ ला येणार नाही

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

गुलमोहर: 

अग अग रिया.... तुझ्याशिवाय अश्या झक्कास विडंबन कविता कोण लिहीणार..... तु विडंबन क्विन शोभतेस...... बाकी ते केरळचे १०१% खरे लिहीलेस बघ..... आम्ही केरळला १० दिवसांसाठी गेलो होतो.... चांगल्या हॉटेलमध्ये सोय होती तरी तिथे नाश्ट्याचे दोनच पर्याय.... एक साउथ इंडियन व दुसरी कॉन्टिनेंटल ,रोज सकाळ संध्याकाळ फक्त इडली,डोसा,अप्पम, ब्रेड्,जॅम,बटर , इतका कंटाळा आला होता कधी घरी येउन आपल्या इथला चटपटीत नाश्ता करते असे झाले होते

ताई, Happy

सगळ्या प्रतिसादकांचे आभार!
कविता तेंव्हा खुप मागे गेलेली तेंव्हा स्वतःहुन वर नको काढायला म्हणून प्रतिसाद दिले नव्हते Happy
आज भारतीताईमुळे कविता वर आलीच आहे तर तेवढ्यात आभार मानुन घेते Wink

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते
मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता ही साऊथ ला येणार नाही

मस्तच ...!!

रिया .. आता मी याच फेज मधे आहे ..
न्यु जर्सी नाही तर टिपीकल साउथ इंडियात राहतेय असं वाटतयं .. तेलगु/ तामिळ्/मल्याळम .. सगळी भेळ!

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते
मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता ही साऊथ ला येणार नाही >>> हे भारी जमलंय Lol

कस्लं भारी आहे हे! मी मिस केले होते बहुतेक..
मस्त चालीत बसतायत सगळ्या ओळी.
उपीट केळे काय प्रकार आहे? उपीटात तर केळेनसते ना? :|

बस्कु, अगं तिकडे लोकं उपिटात केळं मिक्स करुन खातात Uhoh
मिक्स करुन म्हणजे अक्षरशः कालवुन Sad

थँक्स ऑल Happy

माबोवर पोस्ट केलेली ही पहिली कविता. आत्ता प्रत्येक प्रतिसादावरचे माझे प्रतिसाद वाचुन हसायला येतय Lol

बी, दाक्षिणात्य जेवण बऱ्याच जणांना आवडतं पण अधे मधेना, तिला तिथे रोज तेच तेच बघायला लागलं असणार आणि उप्पीट-केळ मिक्स हे जरा अतीचना.

पण तू म्हणत आहेस ते खरे आहे. रोज रोज दाक्षिणात्य खाऊन खाऊन मराठी जेवण नक्कीच नजरेसमोर भिरभिर दिसत असेल.

ओके बी. प्रसादाचा शिरा गोड असतोना त्यात केळ सुंदर लागतं पण उप्पीट तिखट असेलना त्यात मला नाही आवडणार. ठीक आहे रे, मी सहज तू लिहिल्यावर लिहिले. आवडू शकतं ना तुला. त्यात काय पसंद अपनी अपनी.

बी, एकदा खाऊन बघ Happy
उपिट नारळाच्या तेलातच बनवलेल असलं पाहिजे ही कंडिशन Wink

अन्विता, अगं!

Pages