Submitted by हर्षल_चव्हाण on 8 January, 2013 - 13:07
दुलईमध्ये बिलगून निजले,
गोड गोजीरे एक तान्हुले,
स्वप्नांच्या दुनियेत हरवले,
बघ ना आई तुझे सानुले...
करीसी माया अपार त्यावर,
दुखता नख; तुज अश्रू अनावर,
सदासर्वदा त्याजपाशी,
का गं आई इतका वावर?
आज तुझ्यावर रुसलो आहे,
इथे एकटा बसलो आहे,
असे वाटते मागून छोटा;
भाऊ मी तर फसलो आहे...
जा आई मी कट्टी फू,
भेदभाव जो केला तू,
काय करू मी कळेचना,
वेळ कसा मज देशील तू?
बाबांना हे सांगून द्यावे?
नकोच भाऊ असे म्हणावे;
की आईसच बदलून घ्यावे?
कुणी सांगा ना कसे करावे...
------------------------------------------------------------------------------
हर्षल (८/१/१३-रात्री ११.३०)
------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लहानग्याच्या भावना अचूक
लहानग्याच्या भावना अचूक पकडल्या आहेत.
शेवटचे कडवे चटका लावणारे आहे.
लहानग्याला आपल्या आई-बाबांबरोबरच्या हक्काच्या वेळात आलेला एक वाटेकरी अशी भावना धाकट्या तान्हुल्याबद्दल होणे स्वाभाविक आहे. अश्या वेळी आई-बाबांना लहान मुलांच्या मनोविश्वाशी रममाण होऊन संवाद साधण्याचे कसब अंगी बाणवावे लागते.
छान्....अगदी अचूक वर्णन....
छान्....अगदी अचूक वर्णन....
पण मला वाटते शिर्षक : कुणी सांगा ना कसे करावे... हे असायला हवे होते...
सॉरी हे आवडले नसेल तर.... राहु दे.....तशीही छान आहे.
सुंदर कविता... लहानग्याचं
सुंदर कविता... लहानग्याचं भावविश्व त्याच्याच शब्दांत अचुक पकडलंय!!
छान
छान
व्वा! सुरेख! लहानग्याचं
व्वा! सुरेख!
लहानग्याचं भावविश्व त्याच्याच शब्दांत अचुक पकडलंय!!>>>>>>१००% अनुमोदन!
मस्तच
मस्तच
Ekdam achuk! Gelee 3 varshe
Ekdam achuk!
Gelee 3 varshe aaNi ajunahee mothya lekila ase vaTate!
निंबुडा : बरोबर आहे तुझं. पण
निंबुडा : बरोबर आहे तुझं. पण हे लगेच लक्षात येत नाही, मोठा असला तरी वयाने लहानच असतो तो हे विसरल्याने आणि त्याचं वागणं बदलल्याने मगच हा विषय समोर येतो.


योगुली : शीर्षक बदललंय
मानसी, रिया, शोभा, अनिल आणि वत्सला : सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार
वत्सला : खूप काळजी घ्यावी लागेल, तिला असे वाटू न देण्याबद्दल
(No subject)
छान व्यक्त झालंय... एक अबोल
छान व्यक्त झालंय... एक अबोल भावना अचूक उमटवलीत...
किती सुंदर. लहानगं आलं की
किती सुंदर. लहानगं आलं की मोठ्याला "मोठं" व्हावं लागतं... मग वय काहीही असूदे
अतिशय सुंदर शब्दांत व्यक्तं झालय, हर्शल
आया : बागेश्री : धन्यवाद
आया :


बागेश्री : धन्यवाद
दाद : धन्यवाद
आई गं खूप छान लिहीली आहे..
आई गं
खूप छान लिहीली आहे..
आताच निंबुडाचा सोनुल्याचा
आताच निंबुडाचा सोनुल्याचा धागा वाचला आणि लगेच हे.
छान शब्दात व्यक्त झालेय भावना.
वा वा वा वा अतिशय सुंदर....
वा वा वा वा अतिशय सुंदर....
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद पारिजाता, सस्मित, शशांक
सुंदर निरागस कविता. घरोघरी
सुंदर निरागस कविता. घरोघरी येणारा अनुभव आहे.
किती सुंदर शब्दात एवढा नाजूक
किती सुंदर शब्दात एवढा नाजूक पेच लहानग्यांच्या जीवनातला. अगदी खरा अन खूप सूक्ष्म विषय.
धन्यवाद प्रतिसादक, भारतीजी
धन्यवाद प्रतिसादक, भारतीजी
mastach.
mastach.
सुंदर
सुंदर