अवेळी निरोप ( विडंबन )

Submitted by वर्षा_म on 5 October, 2012 - 05:14

कौतुकचा मान राखुन Happy

वर्षा_म यांची माफी मागुन Proud
http://www.maayboli.com/node/38378

================================
अचानक जाग आली
कुशीवर वळायला गेलो
तर जाणवला फरक
दगडासारखं जड झालय शरीर....

डोळे किलकिले करुन
कानात सगळी शक्ती एकवटून
अंदाज घेतला...
हे काय? केवढा जनसमुदाय जमलाय !

अरेरे... किती घाण वास येत आहेत
इतका त्रास कुणाला बरे झाला असे?

हळुच उठलो अंथरुणातुन
तर जाणवले कुणीतरी माझे
झोपेत असतानाच जोडे काढले होते
तोंडही पुसले होते

मागे पाहिले तर मला माझी
बॅग दिसली माझ्या कॉटशेजारी
खटकले मनाला.. पण आलो तरी बाहेर

माझे नावडते शेजारी जमलेत
कुणी रिकाम्या बाटल्या मोजतय
कुणी सिगारेटचे ब्रॅन्ड न्याहाळतोय
आणि जो-तो फक्त मलाच शिव्या देतोय

मी बोलायला गेलो तर
माझ्याकडे तुच्छ कटाक्ष..

माझी हसतमुख आईही
अश्रु थांबवण्याच्या प्रयत्नात

जाऊन बिलगलो तिला
पण का कुणास ठाऊक
तिनेही झिडकारले मला

इतक्यात कुणीतरी म्हणाले
चला निघुयात....
व्यसनमुक्ती केंद्र बंद व्हायला नको

आणि आतून माझ्या बॅगा, अंथरुन
आणले कुणीतरी...

हम्म.. आत्ता प्रकाश पडला
पापाचा घडा पुर्ण भरलाय तर...

आपणच तर अतिरेक केला
म्हनूणच आईवर वेळ आली
अवेळी निरोप देण्याची...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षे तुला विडंबनिया झालाय. आता स्वतःच्या कवितांचं सुद्धा विंडबन करायला लागलीस. ए हिला विडंबनमुक्ती केंद्रात हलवा लवकर..

Lol

वर्षे तुला विडंबनिया झालाय. आता स्वतःच्या कवितांचं सुद्धा विंडबन करायला लागलीस. ए हिला विडंबनमुक्ती केंद्रात हलवा लवकर.. >>>> येस्स

तो आय डी बदला नाही तर.....

वर्षा_म ऐवजी विडंबन्_गं

विडंबनिया >>> Lol
ए हिला विडंबनमुक्ती केंद्रात हलवा लवकर.. >> दक्षे Rofl

धन्यवाद सगळ्यांना Happy

वर्षे, विडंबन सुंदरच! Happy
(पण मी कशी पाहिली नाही ही कविता? मी नक्की होते कुठे? Uhoh :फिदी:)
विडंबनिया >>>>> Rofl
ए हिला विडंबनमुक्ती केंद्रात हलवा लवकर..:हाहा: