पंजा माझा

Submitted by चायवाला on 29 November, 2013 - 02:00

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा खूप भिववतो
वर्षानुवर्ष विश्वासलो ज्यावर
तोच हल्ली घाबरवतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा खिसा कापतो
दोन भा़ज्या जास्त खातोस रे हावरटा
असे म्हणून धमकावतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा चिडवतो
गाडी घेतलीस काय रे साल्या म्हणून
हळुच इंधनाचे दर वाढवतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा हिणवतो
९५ टक्के मिळाले का रे तुझ्या पोरांना म्हणत
५०% वाल्याला डोक्यावर बसवतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा गंध पुसू पाहतो
नारळ फोडतोस का रे भाड्या म्हणत
लगेच अंधश्रद्धेचे लेबल लावतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा गळफास लावतो
कधी शेतावर तर कधी शहरात
आत्महत्या करायला लावतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा वस्त्र फेडतो
दिवस-रात्र-जात-धर्म निरपेक्ष
अब्रूहीन जगायला लावतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा फितुर होतो
कधी स्वकीयांवर अत्याचार
तर कधी परक्यांना 'आधार' देतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वत:चाच पंजा माझा इतिहास पुसतो
माझी तलवार म्यान करुन
इतरांची दाढी कुरवाळतो

हल्ली स्वतःच्याच हाताकडे बघायला भीती वाटते
हल्ली स्वतःचाच पंजा धमकावतो
ताई माई अक्का म्हणत म्हणत
दर पाच वर्षांनी फसवतो

---------------------------------------------------

पण आता नाही घाबरणार
पंजाला नाही जुमानणार
निरुपयोगी अन् त्रासदायक अपेंडिक्ससारखे
त्याला कापून काढणार

---------------------------------------------------
- गप्पिष्ठ
कार्तिक कृ. ११
शके १९३५

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रामाणिकपणे सांगतो की वाचायला सुरुवात केली तेव्हा कंटाळवाणी असेल असे वाटले होते, पण प्रत्येक चार चार ओळीत चांगले मुद्दे आवश्यक तितक्या गंभीरपणे नोंदवले गेलेले पाहून आनंद झाला. काही ओळी पुन्हा पुन्हा येणे हे जरासेच बाळबोध वाटले. बाकी कविता म्हणून काहीही म्हंटली जावो, प्रामाणिक कानपिचक्या मात्र उत्तम आहेत.

प्रामाणिकपणे सांगतो की वाचायला सुरुवात केली तेव्हा कंटाळवाणी असेल असे वाटले होते, पण प्रत्येक चार चार ओळीत चांगले मुद्दे आवश्यक तितक्या गंभीरपणे नोंदवले गेलेले पाहून आनंद झाला. काही ओळी पुन्हा पुन्हा येणे हे जरासेच बाळबोध वाटले. बाकी कविता म्हणून काहीही म्हंटली जावो, प्रामाणिक कानपिचक्या मात्र उत्तम आहेत.>>>> अनुमोदन

मस्तच..........

पंजा आणि तुझा ???????? अरे वा............ शेवटी पंजाने कमळाला उपटलेच Biggrin

छान आहे
अगदी सत्य!
काही ओळी पुन्हा पुन्हा येणे हे जरासेच बाळबोध वाटले
>>
मला नाही वाटलं उलटं पंज्याबद्दल जे म्हणायचं आहे ते आणखी ठासुन सांगितल्या सारखं वाटलं!

वाह! वास्तव अगदी हुबेहुब आलय कवितेत, छान >> +१
काही ओळी पुन्हा पुन्हा येणे हे जरासेच बाळबोध वाटले. बाकी कविता म्हणून काहीही म्हंटली जावो, प्रामाणिक कानपिचक्या मात्र उत्तम आहेत.>>>> अनुमोदन

Pages