भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
>>> आणि आज ऑसीज का नाही
>>> आणि आज ऑसीज का नाही जिंकले ते सांग.
आज ऑस्ट्रेलियाने ३४ वे षटक संपायच्या आतच टॉपचे ६ गडी गमावले होते व उरलेल्यांमध्ये फक्त डेव्हिड हसी हा एकमेव मुख्य फलंदाज शिल्लक होता. याउलट त्या सामन्यात ४० षटकात आपले टॉपचे फक्त ४ जणच बाद झाले होते व धोनी, गंभीर व जडेजा असे तीन मुख्य फलंदाज अजून शिल्लक होते.
तसेच, आजच्या सामन्याचा काहीही निकाल लागला असता तरी मालिकेत फरक पडत नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पेटून उठण्याची शक्यता नव्हती आणि तशी गरजही नव्हती. याउलट सर्व मार्ग बंद झाल्याने भारत आपल्या शेवटच्या सामन्यात कसा पेटला होता ते आठव.
>> इतक्या चांगल्या
>> इतक्या चांगल्या परिस्थितीतून सामना न जिंकल्याची इतिहासातील एकूण किती उदाहरणे आहेत तुझ्याकडे? एकतरी असेल का?
खूप आहेत. सध्या दोनच देतो.
मॅच वि ऑस्ट्रेलिया २००९/१०. सचिनने १७५ केल्या होत्या ती. तेव्हा आपल्याला ४८ चेंडूत ५२ धावा हव्या होत्या ६ विकेटी होत्या. पण झालं काय? सचिनने विकेट फेकली ४७ की कुठल्या तरी ओव्हरीत तेव्हा १८ बॉल मधे १९ रन्स हव्या होत्या.
इथे पहा.. http://www.espncricinfo.com/indvaus2009/engine/match/416240.html
अजून एक जरा जुनी (ही माझ्या डोक्यात घट्ट बसली आहे म्हणून शोधली)
वि. वेस्ट इंडिज ८९/९०
आपल्याला ४५ ओव्हरीत १९६ करायच्या होत्या. सुमारे ३० ओव्हरी नंतर आपला स्कोअर ४ आउट ११५ होता. म्हणजे १२० चेंडूत ८० च्या आसपास धावा करायच्या होत्या पण रिचर्डसला मारण्याच्या नादात आपण ६ विकेटी घालवल्या. त्या नंतर श्रीकांत म्हणाला (तो कॅप्टन होता) वी हॅड नो बिझनेस टू लूज.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65922.html
तुझ्या वरील उदाहरणातील
तुझ्या वरील उदाहरणातील सामन्यांची व या सामन्याची तुलना होऊ शकत नाही.
वरील उदाहरणातील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात ३५१ धावांच्या प्रचंड लक्ष्याचा आपण पाठलाग करत होतो व जिंकण्याची सुरवातीपासूनच अजिबात शक्यता नव्हती. सुरवातीच्या विकेट्सही फारश्या टिकल्या नव्हत्या. त्यामुळे सुरवातीपासून हमखास हरण्याच्या स्थितीत असलेला सामना केवळ सचिनच्या १७५ धावांमुळे जिंकण्याच्या जवळ आला होता. पण एकदा तो बाद झाल्यावर (तो ७ वा किंवा ८ बाद झाला) खाली खेळायला कोणी शिल्लकच नव्हते. असे अजून २ सामने आठवतात. पाकड्यांविरूद्ध २००४ मध्ये (भारत ३४९ व पाकडे ३४४) आणि श्रीलंकेविरूद्ध २००९ मध्ये (भारत ४१४ व श्रीलंका ४११). इतक्या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात पाठलाग करणारा संघ कधीच जिंकण्याच्या परिस्थितीत नसतो. पण एखाद्या खेळाडूच्या अफलातून खेळीमुळे तो विजयाच्या जवळ काही काळ जाऊ शकतो किंवा क्वचित जिंकूही शकतो. पण अशा मोठ्या धावसंख्येचे ९९ टक्क्यांहून अधिक सामने प्रथम फलंदाजी करणार्या संघानेच जिंकलेले आहेत.
विंडीजविरूद्धचा सामना गोलंदाजीला अतिशय अनुकूल असलेल्या खेळपट्टीवरचा व लो स्कोअरिंगच होता व अशा गोलंदाजीला अनुकूल असलेल्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना समान संधी असते. (उदा. १९८५ मधला पाकड्यांविरूद्धचा सामना. भारत सर्वबाद १२५ आणि पाकडे सर्वबाद ८७).
पण ह्या विशिष्ट सामन्यात आपण सुरवातीपासून तब्बल ४० व्या षटकापर्यंत सहज जिंकण्याच्या परिस्थितीत होतो. खेळपट्टी व गोलंदाजी फारशी अवघड नव्हती. विजय अगदी जवळ आलेला होता. बरेच फलंदाज शिल्लक होते (धोनी, गंभीर, जडेजा, अश्विन व पठाण). तरीसुद्धा संथ फलंदाजीमुळे विजय मिळविता आला नाही.
मास्तुरे ह्या सगळ्या जर तर
मास्तुरे ह्या सगळ्या जर तर च्या गोष्टी आहेत. चाळीस कशाला, पंचविसाव्या over नंतरच सोडून द्यायला हवी होती मॅच मग कारण अशा परिस्थिती मधे कोणी हरत नसते तर ? . Its game of glorious uncertainity असे म्हणतात ते उगीच का ? उगाच stastitical probability च्या मागे लागून तुम्ही खेळातील comebacks चा उपमर्द करताहात असे मला वाटते.
आपण खरच विश्वचषक जिंकला
आपण खरच विश्वचषक जिंकला का..?
की ते स्वप्न होते..?
.
.
.
.
.
जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगा ....धोनी...
बरं "फिक्स थिअरी" वाल्यांचे
बरं "फिक्स थिअरी" वाल्यांचे काय मत आहे सध्या? भारताला फायनल ला पोहोचवणे ज्यांना त्यातून आर्थिक लाभ आहे अशा सर्वांच्या फायद्याचे होते ना? मग त्यांनी कसे श्रीलंकेला जाऊ दिले?
भारताला फायनल ला पोहोचवणे
भारताला फायनल ला पोहोचवणे ज्यांना त्यातून आर्थिक लाभ आहे अशा सर्वांच्या फायद्याचे होते ना? मग त्यांनी कसे श्रीलंकेला जाऊ दिले?
जुगारात देशप्रम वगैरे काही नसते. भारतीय असूनहि, जर श्रीलंका फायनलमधे गेल्यास जास्त पैसे मिळतील अशी शक्यता ज्यांना वाटली, त्यांनी तसे फिक्सिंग केले.
खेळात जिंकणे हरणे हे जिथे खुद्द खेळाडू मनावर घेत नाहीत तिथे इतर लोक कशाला मनावर घेतील, बोलून चालून त्यांचा उद्देश फक्त पैसे मिळवण्याचा!
बरं "फिक्स थिअरी" वाल्यांचे
बरं "फिक्स थिअरी" वाल्यांचे काय मत आहे सध्या? भारताला फायनल ला पोहोचवणे ज्यांना त्यातून आर्थिक लाभ आहे अशा सर्वांच्या फायद्याचे होते ना? मग त्यांनी कसे श्रीलंकेला जाऊ दिले? >>>>>>>
कमवायचे होते ते भारत - श्रीलंकेच्या सामन्यातुन कमवुन घेतले की
>>> बरं "फिक्स थिअरी"
>>> बरं "फिक्स थिअरी" वाल्यांचे काय मत आहे सध्या? भारताला फायनल ला पोहोचवणे ज्यांना त्यातून आर्थिक लाभ आहे अशा सर्वांच्या फायद्याचे होते ना? मग त्यांनी कसे श्रीलंकेला जाऊ दिले?
फिक्स थिअरीवाल्या जनू बांडांना भारतातल्या बुकींची चांगली माहिती आहे. त्यामुळे विश्वचषकातला प्रत्येक सामना फिक्स होता हे त्यांना लगेच समजले. त्यांना ऑस्ट्रेलियातल्या बुकींची फारशी माहिती नसल्याने ते सध्या जरा गप्प आहेत.
धन्य ती श्रीलंका, धन्य ती
धन्य ती श्रीलंका, धन्य ती ऑस्ट्रेलिया!
वार्नर पेटला होता. कुलसेखरा, थरंगा, प्रसाद, काय पण खेळले आहेत!
पहाटे उठून बघितले तर श्रीलंका १४४/६. म्हंटले गेले आता हे बाराच्या भावात. सवय अशी की बीसीसी आयचे लोक जसे पहिले चार पाच जण बाद झाले की कधी एकदा सामना संपवून बीअर प्यायला जातो, असे खेळतात, तसेच होईल. पण श्रीलंका वाल्यांचे काही वेगळेच.
आता वॉटसन म्हणेल क्लार्कने उगाचच सामना लांबवला, ३० ओव्हर्स मधे ६ बाद झाल्यावर, आणखी तीन ओव्हर्समधे शेवटच्या फलंदाजांना गुंडाळायचे, तर उगाच खेळत बसला. जसे सेहवाग ने धोनीबद्दल म्हंटले तसेच!! पण बहुतेक असे उगाच काहीतरी बोलणे त्याला येत नसावे. काही दिवस मायबोलीवर यायला पाहिजे त्याने, म्हणजे त्याला कळेल, उगाच वटवट कशी करायची. मग आपण त्याला वटवट्या वॉटसन म्हणू.
असो, चांगला झाला सामना.

छान झाला सामना!
छान झाला सामना! ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीनंतर हा सामना एकतर्फी होईल असे वाटत होते. नंतर श्रीलंका ६ बाद १४४ झाल्यावर तशी जवळपास खात्रीच झाली. पण थरंगा, कुलसेकरा व धम्मिका प्रसादच्या झुंझार फलंदाजीने आशा निर्माण झाल्या होत्या. श्रीलंकेने चांगलीच झुंज दिली. महिला जयवर्देना आपल्या कर्णधारपदाच्या दुसर्या इनिंगमध्ये चांगले नेतृत्व करत आहे.
>> इतक्या मोठ्या
>> इतक्या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात पाठलाग करणारा संघ कधीच जिंकण्याच्या परिस्थितीत नसतो.
मुद्दा काय आहे की आपल्याला ४८ चेंडूत ५२ धावा हव्या होत्या व हातात ६ विकेटी होत्या. मग सुरुवातीला ३५० करायच्या होत्या की ३५०० त्यानं काय फरक पडतो? शक्यतो लॉजिकल बोल रे जरा! मी दिलेल्या सिच्युएशन्स अगदी योग्य आहेत माझा मुद्दा पटवून द्यायला.. तो असा की.. शेवटच्या काही ओव्हरी शिल्लक, रन अ बॉल धावगतीची आवश्यकता आणि हातात ६ विकेट्स ही तुला वाटतेय तितकी कन्फर्टेबल पोझिशन नाहीये. हातात ६ विकेटस या मुद्याला तसा काही अर्थ नाहीये कारण एखादी विकेट पडली की डायरेक्ट थोडा फार बॅटिंग करू शकणारा तळच समोर येतो. नवीन फलंदाजाला त्या परिस्थितीत पटकन प्रत्येक बॉलला स्ट्राईक दुसर्या बॅटसमनला देणं जमत नाही. पर्यायाने रन रेट वाढायला लागतो. त्या परिस्थितीत टिकलेला एकमेव फलंदाज वेडावाकडा फटका मारून आउट झाला की सगळं संपतं. त्यामुळे लक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ जाणे (त्यामुळे प्रतिपक्षाचं पण टेन्शन वाढायला लागतं व त्यांच्याही चुका होण्याची शक्यता वाढते) आणि सर्व फटकेबाजी शेवटच्या २ ओव्हरीत करणे हा सेन्सिबल गेम प्लॅन आहे, आणि धोनीला त्याची योग्य जाण आहे.
>>> त्या परिस्थितीत टिकलेला
>>> त्या परिस्थितीत टिकलेला एकमेव फलंदाज वेडावाकडा फटका मारून आउट झाला की सगळं संपतं.
एकमेव फलंदाज? त्यावेळी गंभीर, धोनी, जडेजा, अश्विन आणि पठाण असे तब्बल ५ फलंदाज शिल्लक होते. अश्विन आणि जडेजा यांनी तर आधीच्याच सामन्यात नाबाद ३०, ३० धावा करून सामना जिंकून दिला होता.
>>> तो असा की.. शेवटच्या काही ओव्हरी शिल्लक, रन अ बॉल धावगतीची आवश्यकता आणि हातात ६ विकेट्स ही तुला वाटतेय तितकी कन्फर्टेबल पोझिशन नाहीये.
रन अ बॉल आवश्यक फक्त १० षटकांसाठी (पूर्ण ५० षटकांसाठी नव्हे), जुना झालेला चेंडू, हातात ६ विकेट्स आणि चांगली फलंदाजी करू शकणारे ५ फलंदाज शिल्लक, गोलंदाजीला अनुकूल नसलेली खेळपट्टी, एक ९२ वर सेट झालेला फलंदाज . . . अरे अजून किती कम्फर्टेबल पोझिशन हवी? का तुला १०० चेंडूत ५ धावा हव्यात आणि १० विकेट्स हातात अशी पोझिशन हवी?
>>> हातात ६ विकेटस या मुद्याला तसा काही अर्थ नाहीये कारण एखादी विकेट पडली की डायरेक्ट थोडा फार बॅटिंग करू शकणारा तळच समोर येतो.
वर लिहिल्याप्रमाणे, एखादी विकेट पडली असती तरी फक्त ५९ धावा करण्यासाठी या तळात चांगली फलंदाजी करू शकणारे अजून ४ फलंदाज शिल्लक होते.
>> एकमेव फलंदाज? तू शक्यतो
>> एकमेव फलंदाज?
तू शक्यतो पूर्ण वाच! "त्या परिस्थितीत टिकलेला एकमेव फलंदाज वेडावाकडा फटका मारून आउट झाला की सगळं संपतं." हे स्टेटमेंट "हातात ६ विकेटस या मुद्याला तसा काही अर्थ नाहीये कारण एखादी विकेट पडली की डायरेक्ट थोडा फार बॅटिंग करू शकणारा तळच समोर येतो. नवीन फलंदाजाला त्या परिस्थितीत पटकन प्रत्येक बॉलला स्ट्राईक दुसर्या बॅटसमनला देणं जमत नाही." या नंतर आलेलं आहे. मी मुद्दाम तुला न समजलेले शब्द बोल्ड केलेले आहेत. त्या सर्व वाक्यांचा एकत्रित अर्थ असा होतो.... जरी गंभीर धोनी खेळत होते, तरी एखादी विकेट पडली की (जी गंभीरची पडलीच) थोडा फार बॅटिंग करू शकणारा तळ (म्हणजे अश्विन, जडेजा इ. इ.) समोर येतो (तो आलाच). मग अश्विन, जडेजांनी मागचा सामना जिंकून दिला होता तर का नाही हा पण जिंकला?
तुझाच मुद्दा तुझ्यावर उलटवायचा झाला तर सचिन १७५ वाल्या मॅचमधे पण ५२ रन्स करायच्या होत्या आणि दस्तुर खुद्द सचिन (१५० च्या वर त्याचा स्कोअर होता), रैना (५० च्या आसपास स्कोअर), हरभजन, जडेजा आणि प्रवीणकुमार इतके सगळे बॅटसमन होते. पण नाही जमलं ना! तुझ्या मते असलेल्या आवश्यक सगळ्या गोष्टी होत्या.... "रन अ बॉल आवश्यक फक्त ८ षटकांसाठी (पूर्ण ५० षटकांसाठी नव्हे), जुना झालेला चेंडू, हातात ६ विकेट्स आणि चांगली फलंदाजी करू शकणारे ५ फलंदाज शिल्लक, गोलंदाजीला अनुकूल नसलेली खेळपट्टी, एक १५० वर सेट झालेला फलंदाज, एक ५० वर सेट झालेला फलंदाज.अरे अजून किती कम्फर्टेबल पोझिशन हवी?"
कारण ते मॅथ्स नाहीये.. ते तत्वचि वेगळे
कावळा काळा हागतो पांढरा
तो काय दहिभात खातो?
नव्हे नव्हे ते तत्वचि वेगळे!
तू काहीही उपमा दे. पूर्ण ६
तू काहीही उपमा दे. पूर्ण ६ विकेट्स हातात असताना व अनेक चांगले फलंदाज शिल्लक असताना तब्बल ६० चेंडूत फक्त ५९ धावा करणे हे अत्यंत सोपे काम होते. भारताने पूर्वी यापेक्षा जास्त धावा करून सामने जिंकलेले आहेत. इतर कोणत्याही देशाने इतका सोपा सामना हातचा घालविला नसता. पण तो सामना विशेषतः धोनीच्या संथ खेळामुळे अवघड होऊन शेवटी भारताला जिंकता आला नाही व तो निकाल अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने महागात पडला ही वस्तुस्थिती आहे. ६० चेंडूत भारताला ५९ धावा करून सामना जिंकता येत नसेल, तर भारताने यापुढे फक्त केनया, झिंबाब्वे, कॅनडा इ. देशांशीच खेळावे. कारण त्यांच्याशी खेळताना ६० चेंडूत १५-२० धावा अशी कम्फर्टेबल पोझिशन असेल.
भारताने कुणाशी खेळावे हे
भारताने कुणाशी खेळावे हे सांगण्यापेक्षा सचिनने विकेट (१८ बॉल मधे १९ रन्स आणि ४ विकेट हातात असताना) फेकून ती मॅच घालवली हे कबूल कर ना! आणि भारत कुणाशीही खेळला तरी ६० बॉल ५९ रन्स आणि ६ विकेटस हातात या पोझिशन मधे हरू शकतो!
आणि भारत कुणाशीही खेळला तरी
आणि भारत कुणाशीही खेळला तरी ६० बॉल ५९ रन्स आणि ६ विकेटस हातात या पोझिशन मधे हरू शकतो!
काय पण जबरदस्त आत्मविश्वास आहे! व्वा!! धन्य!
या विधानाला कुणि विरोध करू नका, नाहीतर स्वाभिमानी बीसीसीआयचे खेळाडू, आपलेच म्हणणे खरे करण्यासाठी मुद्दाम दहा वेळा लागोपाठ हरून दाखवतील!!
अहो आम्हाला इतके पैसे मिळतात, आम्ही इतके श्रीमंत, आमच्या म्हणण्याला विरोध? शक्य नाही!!
खेळ, जिंकणे, गेले खड्ड्यात.
>>> भारताने कुणाशी खेळावे हे
>>> भारताने कुणाशी खेळावे हे सांगण्यापेक्षा सचिनने विकेट (१८ बॉल मधे १९ रन्स आणि ४ विकेट हातात असताना) फेकून ती मॅच घालवली हे कबूल कर ना!
३५१ टारगेट असलेली ती मॅच जिंकणे अशक्यच होते. अपवाद म्हणून इतिहासात फक्त एकदाच ३२७ पेक्षा अधिक धावांचे टारगेट असलेली मॅच पाठलाग करून जिंकलेली आहे. ३२७ पेक्षा अधिक टारगेट असलेल्या उरलेल्या सर्व मॅच पाठलाग करणार्या संघाला जिंकता आलेल्या नाहीत. त्यामुळे ही मॅच हरली त्यात धक्कादायक असे काहीही नाही. पण सचिनने जबरदस्त खेळी करून ती जिंकायला पूर्णपणे अशक्य असलेली विजयाच्या जवळ आणून दिली होती व जिंकण्याचा आशा प्रज्वलित केल्या होत्या. पण तो गेल्यावर ती संधी इतरांनी घालविली.
पण ही श्रीलंकेविरूद्धची अत्यंत सोपी मॅच इतरांनी विजयाच्या व्यवस्थित जवळ आणून दिली होती. ती मॅच अजिबात मारामारी न करता, कोणतीही रिस्क न घेता आरामात जिंकता आली असती. पण ती धोनीने संथ फलंदाजी करून व दोघांना धावबाद करून हातची घालविली.
>>> आणि भारत कुणाशीही खेळला तरी ६० बॉल ५९ रन्स आणि ६ विकेटस हातात या पोझिशन मधे हरू शकतो!
पण अशा पोझिशनमध्ये आणि अशा पिचवर इतर कोणताही संघ जिंकल्याशिवाय राहणार नाही (केनया, कॅनडा इ. लिंबूटिंबू संघ अपवाद).
भारताने सुद्धा अशा परिस्थितीतले बहुसंख्य सामने जिंकलेले आहेत. पण त्या सामन्यासारखा धोनी उगाचच संथ खेळला तर भारत हरण्याची शक्यता जास्तच असणार (या मालिकेतला पहिला ट-२० सामना आठव. धोनी ९ व्या षटकांत आला तेव्हा रिक्वायर्ड रनरेट ट-२० सामन्याला साजेसा ९ च्या आसपास होता. पण धोनीने संथ फलंदाजी केल्यामुळे शेवटच्या ५ षटकांसाठी तोच रेट १५.४० इतका अशक्य झाला आणि शेवटी तो सामना भारत हरला.).
क्रिकेट सामन्यात, विशेषतः
क्रिकेट सामन्यात, विशेषतः मर्यादित षटकांच्या सामन्यात, स्वतःच्या संघाच्या कुवतीचा, विरुद्ध संघाच्या शक्तीस्थळांचा इ.इ. विचार करून कॅप्टन स्वानुभवाच्या आधारे डावपेच रचतो. ते १००% यशस्वी होतीलच याची खात्री कधी नसतेच. धोनीला जर असं ठामपणे वाटत असेल कीं [ आपलं 'शेपूट' पहातां] हातांत विकेट असतील तरच शेवटच्या कांही षटकातही लक्ष्य गाठण्यासाठी ८-१० च्या सरासरीनेही धांवा काढतां येतात - व त्याच्यापुरतं तरी त्याने हें सिद्धही करून दाखवलंय- मग तेवढं तरी श्रेय त्याला कां देऊं नये ? बाकी , मला नाही वाटत याबाबत कांही सर्वमान्य 'फूल-प्रूफ फॉर्मुला' आहे किंवा असावा !
>> ३५१ टारगेट असलेली ती मॅच
>> ३५१ टारगेट असलेली ती मॅच जिंकणे अशक्यच होते.
असा सचिनने पण विचार केला म्हणून विकेट फेकली. हो ना? १७५ तरी कशाला करत बसला, कोण जाणे!
या घे अजून मॅचेस
ऑ. वि लंका (२००३/०४, लंकेच्या २४५ धावा ५० ओव्हर्समधे) http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64871.html
ऑ. ला हेडन आउट झाल्यावर ५८ बॉल मधे ५६ रन्स हव्या होत्या हातात ६ विकेटी होत्या. त्या पण गिलख्रिस्ट, सायमंडस, बेव्हन अशा श्रेष्ठ लोकांच्या. तरी हरले १ रनने!
इंग्लंड वि पाकीस्तान (२००१, पा.च्या २४२ धावा ५० ओव्हर्समधे) http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66277.html
इंग्लंडला ५९ बॉलमधे ४७ रन्स हव्या होत्या आणि ६ विकेटस हातात होत्या. इंग्लंड २ रन्सने हरलं होमपीचवर खेळत असून व ट्रेस्कोथिक (त्याची सेंचरी झाली) चांगला सेट असून.
इंग्लंड वि. भारत (२००१, इं.च्या २७१ धावा ५० ओव्हर्समधे) http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64743.html
आपल्याला ५९ बॉलमधे ६१ रन्स करायच्या होत्या ६ विकेट्स हातात होत्या. तरीही हरलो.
लंका वि भारत( २००६/०७, लंकेच्या २५७ धावा ५० ओव्हर्समधे) http://www.espncricinfo.com/ci/engine/match/267712.html
आपल्याला १२० बॉलमधे ८९ करायच्या होत्या व ६ विकेट्स हातात होत्या. ५ वी विकेट पडली तेव्हा २३ रन्स २६ बॉलमधे करायच्या होत्या. तेव्हा धोनी, कुंबळे, हरभजन इ. शिल्लक होते. तरीही हरलो.
तरी तू ते स्लो पीच होते, किंवा त्यांची जिंकण्याची मनस्थिती नव्हती अशी बाळबोध कारणे देशीलच.
अजून उदाहरणं हवी असतील तर सांग हो!
३५१ टारगेट असलेली ती मॅच
३५१ टारगेट असलेली ती मॅच जिंकणे अशक्यच होते. अपवाद म्हणून इतिहासात फक्त एकदाच ३२७ पेक्षा अधिक धावांचे टारगेट असलेली मॅच पाठलाग करून जिंकलेली आहे. >> ३२७ हा आकडा मॅजिकल नसेल असे धरून चालतोय. साधारणतः ३००च्या आसपास किंवा पलीकडे असलेली कुठलिही धावसंख्या असे म्हणायचे आहे असे धरून असे नमूद करु इच्छितो कि ३०० च्या वरच्या भरपूर मॅचेस आपण गेल्या दहा वर्षांमधे सहज जिंकल्या आहेत. त्यामधे एक किंवा दोन खेळाडू सामील नसून जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी तरी हातभार लावलेला आहे (सचिनपासून रैनापर्यंत सगळे). ह्यातल्या बहुतेक sub continental pitches वर जिंकल्या आहेत.
शेवटच्या कांही षटकातही लक्ष्य गाठण्यासाठी ८-१० च्या सरासरीनेही धांवा काढतां येतात - व त्याच्यापुरतं तरी त्याने हें सिद्धही करून दाखवलंय- मग तेवढं तरी श्रेय त्याला कां देऊं नये ? बाकी , मला नाही वाटत याबाबत कांही सर्वमान्य 'फूल-प्रूफ फॉर्मुला' आहे किंवा असावा ! >> +१
चिमण, तू वर दिलेल्या
चिमण,
तू वर दिलेल्या लिंक्सपैकी पहिला सामना जिंकायला हवा होता. पण उरलेल्या तीन्ही सामन्यात १५-२० रन्सच्या अवधीत ५-६ विकेट्स गेल्याने पाठलाग करणार्या संघाला ते सामने जिंकता आले नव्हते. आपल्या बाबतीत तसा डाव कोसळलाच नव्हता.
>>> अजून उदाहरणं हवी असतील तर सांग हो!
अशा परिस्थितीत सामने जिंकल्याची उदाहरणे दे ना! तुला मोजता येणार नाहीत इतकी जास्त उदाहरणे असतील ती.
>>>> ३२७ हा आकडा मॅजिकल नसेल असे धरून चालतोय. साधारणतः ३००च्या आसपास किंवा पलीकडे असलेली कुठलिही धावसंख्या असे म्हणायचे आहे असे धरून असे नमूद करु इच्छितो कि ३०० च्या वरच्या भरपूर मॅचेस आपण गेल्या दहा वर्षांमधे सहज जिंकल्या आहेत. त्यामधे एक किंवा दोन खेळाडू सामील नसून जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी तरी हातभार लावलेला आहे (सचिनपासून रैनापर्यंत सगळे). ह्यातल्या बहुतेक sub continental pitches वर जिंकल्या आहेत.
मागच्या वर्षी आयर्लँडने इंग्लडला ३२७ धावांचा पाठलाग करून हरवले होते. त्यापेक्षा जास्त म्हणजे ४३४ धावांचा पाठलाग करून जिंकलेला एकमेव सामना इतिहासात आहे. म्हणून ३२७ हा मॅजिक आकडा मी दिला. ३०० ते ३२७ दरम्यानच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केल्याची प्रत्येक देशाची काही उदाहरणे आहेत.
भारताची तशी भरपूर उदाहरणे नाहीत. भारताने ४-५ वेळा असा यशस्वी पाठलाग केलेला आहे. १९९८ मध्ये पाकड्यांविरूद्ध ३१२, २००१ मध्ये इंग्लंडविरूद्ध ३२५, २००२ मध्ये विंडीजविरूद्ध ३२५ आणि २०१२ मध्ये लंकेविरूद्ध ३२० धावांचा यशस्वी पाठलाग, हे मोजकेच सामने मला आठवतात. अजून १-२ असू शकतील. पण असे सामने मोजकेच आहेत.
श्रीलंका आज जबरी जिंकण्याचा
श्रीलंका आज जबरी जिंकण्याचा अवस्थेत आहे. ऑसीज २७१, श्रीलंका २७ ओव्हर्समध्ये नाबाद १७९.
>> पण उरलेल्या तीन्ही
>> पण उरलेल्या तीन्ही सामन्यात १५-२० रन्सच्या अवधीत ५-६ विकेट्स गेल्याने पाठलाग करणार्या संघाला ते सामने जिंकता आले नव्हते. आपल्या बाबतीत तसा डाव कोसळलाच नव्हता.
विकेट गेल्या? फेकल्या म्हण फेकल्या! आपली आधीची टीम मधल्या गांगुलीसारख्या बॅटसमनांना (काही सन्माननीय अपवाद वगळता) फारसा धोका न पत्करता सिंगल्स किंवा डबल्स काढून प्रतिपक्षाच्या धावसंखेच्या जास्तीत जास्त जवळ जाणे अपमानास्पद वाटायचं. त्यांना फक्त चौकार षटकार मारूनच मॅच जिंकता येते असं वाटायचं. आपण इंग्लंडशी हरलो तेव्हा जाईल्सला मारण्याच्या नादात ५ विकेटी घालवल्या आहेत, त्या सगळ्या ४१-५० ओव्हरीतच! विंडीजविरुद्ध १९६ करायच्या वेळेला रिचर्डसला बहाल केल्या.
आपल्या पण दोन विकेट्स फाटक्न गेल्या होत्या महाराज! पहिली गंभीरची विकेट (१७८ वर ४०.३ ओव्हर्स) नंतर जडेजा (१८४ वर ४३.३ ओव्हर्स). तूच वरती दिलेला धावफलक पाहण्याचे कष्ट घेतलेस तर कळेल.
शिवाय, असा डाव कोसळू नये म्हणूनच सिंगल्स किंवा डबल्स वर जास्त भर द्यायचा असतो, योग्य चेंडूंवरच फटके मारायचे असतात. तरीही डाव कोसळू शकतो.. त्यामुळे जिंकण्याची १००% खात्री नसते.
>> अशा परिस्थितीत सामने जिंकल्याची उदाहरणे दे ना!
मी तुला सामने हरल्याची अर्धा डझन उदाहरणं दिली. तू तुझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यापेक्षा जास्त दे, मग मी माझा मुद्दा सिद्ध करायला अजून शोधेन.
तुला हवी होती.. "इतक्या चांगल्या परिस्थितीतून सामना न जिंकल्याची इतिहासातील एकूण किती उदाहरणे आहेत तुझ्याकडे?".. ती मी दिली. माझा मुद्दा सिद्ध केला, तो असा... "शेवटच्या काही ओव्हरी शिल्लक, रन अ बॉल धावगतीची आवश्यकता आणि हातात ६ विकेट्स ही वाटते तितकी कन्फर्टेबल पोझिशन नाहीये."
मी असं अजिबात म्हणत नाहीये की सामना जिंकता येतच नाही. मी म्हणत होतो की असल्या सिच्युएशनमधे मॅथेमॅटिकल प्रिसिजनने काही सांगता येत नाही.
भारताची तशी भरपूर उदाहरणे
भारताची तशी भरपूर उदाहरणे नाहीत. भारताने ४-५ वेळा असा यशस्वी पाठलाग केलेला आहे.>>
मास्तुरे पाच नाहि बारा मॅचेस जिंकल्या आहेत १९९० नंतर ३००+ chase करून
http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?batting_fieldin...
आता तू म्हणशील कि १२२ म्हणजे फार मोठा आकडा नव्हे तर तसे बरोबर ठरेल जर तो आकडा absolute बघितला तर पण ह्याच काळात तब्बल तीन World Cup जिंकणार्या Austrilia ने असे चारच सामने जिंकले आहेत. तेव्हढेच RSA ने. लंकेने ७ जिंकले आहेत तर पाकिस्तानने ५. म्हणजे आपण दुसर्या नि तिसर्या क्रमांकाच्या संघाच्या बेरजेएव्हढे जिंकले आहेत. Its not small achievement.
>>> आपल्या पण दोन विकेट्स
>>> आपल्या पण दोन विकेट्स फाटक्न गेल्या होत्या महाराज! पहिली गंभीरची विकेट (१७८ वर ४०.३ ओव्हर्स) नंतर जडेजा (१८४ वर ४३.३ ओव्हर्स). तूच वरती दिलेला धावफलक पाहण्याचे कष्ट घेतलेस तर कळेल.
अरे २ विकेट्स जाणे आणि ४-५ जाणे यात फरक नाही का रे?
>>> शिवाय, असा डाव कोसळू नये म्हणूनच सिंगल्स किंवा डबल्स वर जास्त भर द्यायचा असतो, योग्य चेंडूंवरच फटके मारायचे असतात.
एक्झॅक्टली! म्हणून तर तो सामना आपल्याला जिंकता आला नाही. त्या सामन्यातल्या ओव्हर क्र. ४१ ते ४५ बघ आणि किती बॉल वाया घालविले ते बघ. ४१ ओव्हर तर चक्क मेडन खेळून काढली होती.
>> अशा परिस्थितीत सामने जिंकल्याची उदाहरणे दे ना!
>> मी तुला सामने हरल्याची अर्धा डझन उदाहरणं दिली. तू तुझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यापेक्षा जास्त दे, मग मी माझा मुद्दा सिद्ध करायला अजून शोधेन.
जरा दुपारपासून बाहेर होतो. आता सापडवून देतो. जरा थांब.
>>> भारताची तशी भरपूर उदाहरणे नाहीत. भारताने ४-५ वेळा असा यशस्वी पाठलाग केलेला आहे.>>
मास्तुरे पाच नाहि बारा मॅचेस जिंकल्या आहेत १९९० नंतर ३००+ chase करून
मला सगळ्या आठवत नव्हत्या. ज्या चटकन आठवल्या त्या लिहिल्या. पण १२ म्हणजे मोठा आकडा आहे.
>>> म्हणजे आपण दुसर्या नि तिसर्या क्रमांकाच्या संघाच्या बेरजेएव्हढे जिंकले आहेत. Its not small achievement.
सहमत
(No subject)
>>> मी तुला सामने हरल्याची
>>> मी तुला सामने हरल्याची अर्धा डझन उदाहरणं दिली. तू तुझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यापेक्षा जास्त दे, मग मी माझा मुद्दा सिद्ध करायला अजून शोधेन.
अरे, तू फारच सिरियसली घेतोस. आपले प्लेअर्ससुद्धा सामने इतके सिरियसली घेत नाहीत. त्या सामन्यात आपल्याला ६० चेंडूत ५९ हव्या होत्या आणि ४ बाद झाले होते. पण जिंकलो नाही. बरं, हे घे रन अ बॉल किंवा त्यापेक्षा जास्त धावगती आवश्यक असलेले आणि जिंकलेले डझनभर सामने.
६० मध्ये ५६ हव्यात, ८ बाद झालेले - http://www.espncricinfo.com/ci/engine/match/433585.html
६० मध्ये ८५ हव्यात, ५ बाद झालेले - http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64850.html
६० चेंडूत ६९ हव्यात आणि ३ बाद झालेले - http://www.espncricinfo.com/west-indies-v-south-africa-2010/engine/match...
६० चेंडूत ६२ हव्यात आणि ५ बाद झालेले - http://www.espncricinfo.com/west-indies-v-south-africa-2010/engine/match...
६० चेंडूत ८६ हव्या आणि ३ बाद झालेले - http://www.espncricinfo.com/zim-tri2010/engine/match/452146.html
६० मध्ये ५८ हव्यात, ५ बाद झालेले - http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64873.html
६० मध्ये ८७ हव्यात आणि ४ बाद झालेले - http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64893.html
६० मध्ये ७० हव्यात, ३ बाद झालेले -
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66384.html
६० मध्ये ६३ हव्यात, ३ बाद झालेले - http://www.espncricinfo.com/asia2010/engine/match/455234.html
६० मध्ये ७४ हव्यात, ३ बाद झालेले - http://www.espncricinfo.com/england-v-pakistan-2010/engine/match/426429....
६० मध्ये ६४ हव्यात,५ बाद झालेले - http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66368.html
६० मध्ये ८२ हव्यात, ३ बाद झालेले - http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64866.html
६० मध्ये ७० हव्यात, ३ बाद झालेले - http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66384.html
भाऊ, श्रीलंका पुन्हा फॉर्मात
भाऊ,
श्रीलंका पुन्हा फॉर्मात आले आहेत. आशिया कप तेच जिंकणार बहुतेक.
भाऊ - ती चहावरची ("देश उबल
भाऊ - ती चहावरची ("देश उबल रहा है") जाहिरात आहे त्यावरून हे बेतले आहे का? जबरी जमले आहे
मास्तुरे एवढ्या लिन्क्स कोठून शोधल्या - Statsguru query, की तुमच्या आठवणीत काही मॅचेस होत्या त्यावरून की आणखी काही?
Pages