तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?

Submitted by विवेक नाईक on 25 September, 2011 - 06:33

सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?

ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.

२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.

हा मुद्दा होता, जर गावातील पाणी अश्या प्रकारे दुषीत अ सेल तर ही जनता हेच पाणी वापरून तग तरी कशी धरून आहे? जर ह्या पाण्या बद्दल जनतेला माहीती असती तर जनेतेने ते पाणी शुद्ध करण्यासाठी एका तरी treatment चा पर्याय निवडला असता. ह्या पर्यायत पाणी उकळवणे, पाणी शूद्धी करणासाथी ULTRA Violet
उपकरणाचां वापर करणे. पण ही ठरली जनता ज्यांची एका वेळेची जेवायची मारामार तेथे पाणी शूद्धीकरण
म्हणजे डोक्यावरून पाणी. ज्यांच्या घरात झीरो चा दिवा लावयला विज नाही तिथे ULTRA Violet उपकरण?

पण आमची ही सर्व्व जनता ह्या विशाणु जिवाणु ना पुरुन उरली. कशी? हा प्रश्न ह्या टीम ला पडला होता.
ह्या नंतर NATURE च्या झालेल्या संशोधन चा विषय बदलला हे तुमच्या लक्षात आले असेलच.
त्या NATURE च्या टीमने पितळेची भांडीच उचलली, पाण्या ची SAMPLES घेतली. प्रयोगशाळेत नेउन
रीतसर प्रयोग केले गेले व

निश्कर्ष असा नि घाला कि पितळे च्या भांड्यांत दुषीत पाणी २४ तासात पिण्या एवढे
शुद्ध होते, कुठलीही उर्जा न वापरता !!. कारण.... पितळे तील तांब्याचे अणु. ह्याच अणु मुळे पाणी शूद्धीकरण
होते. http://www.nature.com/news/2005/050404/full/news050404-14.html ह्या लेखात स्पष्टपणे नमूद केले आहे कि हा शोध NATURE च्या टीमने लावला व त्याचा उपयोग भारता सारख्या देशाला घ्यावयास हवा. खरं कि नाही??

आता विषय दुसरा: जस्त (ZINC) चा शोध Andreas Maggraff 1746 ला लावला. पण भारतात् जस्त (ZINC) ची निर्मीती (शूद्धीकरण) BC 400 च्या पूर्वी पा सून होतय! ह्या ZINC शूद्धीकरणाची पद्धत फक्त भारतीयांनाच अवगत होती. ह्या ZINC च्या खाणी चे अवशेष राजस्थानात अजुन ही पाहायला मिळतात. जर ZINC चे शूद्धीकरण व व्यापरी उत्पादन भारतात BC 400 पासून होत होते तर Andreas Maggraff ला ह्या शोधाच Credit कसे दिले गेले?

Zinc & Copper चे मिष्रधातू बनवणे फार मुश्कील काम, ह्याचे कारण ह्या धातूंचा Melting Temp. Copper
वितळे पर्यंत Zinc वितळून उडुन जाई. भारतीयानी एक स्पेशल प्रोसेस तयार करून Brass ला जन्म दिला.
भारत पितळेची भांडी जवळ जवळ १५००-१७०० वर्षा पासून वापरतोय. भारतातू न ही भांडी परदेशात गेली.

पितळेच्या भांड्यांपुर्वी तांब्याची भांडी भारतात उपलब्ध होतीच. मग पितळेच्या मागे का ? कारण तांब्याची
किम्मत, ती ईतकी जास्त होती कि जर तांब्या चे गुणधर्म सारखे ठेउन सर्वसाधारण जनतेला, पर्यायी धातूंची भांडी द्यावी हा च विचार ह्या मागे असला पाहीजे. त्या मुळेच देव पुजे साठी तांब्याची पण सर्व साधारण कामा साठी पितळेची हा पर्याय निघाला असावा !!!!

आता आपली जनता ही भांडी कशी वापरते ? पहेले पाण्याला जाऊन घागर पाण्या ने स्वच्छ धुते. हाती
राखुन्डी लागली तर ठीकच नाही तर माती, नारळाची किशी सुद्धा चालते. घागर मस्त चकचकीत झाली पाहीजे.
हे सर्व्वे आपली जनता परंपरेने करत आलीय. पण ह्याच भां ड्याच्या चकचकीत पणा मुळेच पाणी शूद्धीकरण
क्रिया सुरळीत होत होती.

ठोक्याचे भांडे !! तांब्या - पितळेची भांड्यांना आपण का ठोके लाउन घेत होतो ? उत्तर परत एकदा तेच, भांड्याचा चकचकीत पणा !

आताची परीस्थीती : ही तांब्या - पितळेची भां डी गेलीत अडगळीच्या खोल्यात. काही भंगारात काढली गेलीत.
त्या भांड्याची जागा आता फक्त वरुन चकचकीत दिसणार्या प्लास्टीकच्या भांड्यानी घेतलीय.

वरून चकचकीत दिसणारी प्लास्टीकची भांडी पाणी साठवुन ठेवण्या पलिकडे जाऊ शकतील ?

स्त्रोतः बरेच वर्षा पासुन मनात हा विषय घोळत होता. ह्या वि षया ची व्याप्ती फार मोठी आहे व सर्व जनतेची
ह्या विषया बद्दल जा गरुक ता करणे गरजे च आहे.
माहिती जाला वरुन,
http://www.inae.org/metallurgy/archives_pdf/smelt%20zinc.pdf

त. टि: समस्त पि तळे, तांबे परीवारांनी माफी ध्यावी !!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमोप्या....
<<<<<अशी काहीतरी शास्त्रीय निरिक्षणे लागतात, तर ती माहिती मान्य होते.. उगाच पुराणातले दाखले देऊन उपयोग नसतो.>>.>>>

Nature मधला लेख हे पुराणातले दाखले ???

वाल्या कोळी......
आज सकाळमध्ये वाचले... तांब्याच्या भांड्यात पाण्यामध्ये रात्रभर रुद्राक्ष ठेवावा. सकाळी ते पाणी प्याल्यास हायपर्टेन्शनचा त्रास कमी होतो. ( प्रयोग आपपल्या जबाबदारीवर करणे.)

हायपर्टेन्शनचा त्रास असेल तर उगाच त्रागा करून घेउ नका...., तांब्याच्या भांड्यात पाण्यामध्ये रात्रभर रुद्राक्ष
ठेवून त्याचे पाणी पिण्यापेक्षा औषध घ्या !! हायपर्टेन्शनवर मिळणारर्या सार्याच औषधाचे भंयंकर Side Effects असतात व हे माहीती असुन औषध घेतल्यास त्याची जबाबदारी तुमची स्वता:ची !!

SIDE EFFECTS OF HIGH BLOOD PRESSURE DRUGS,

http://highbloodpressurebegone.com/high-blood-pressure-medication-side-e...
http://www.mayoclinic.com/health/high-blood-pressure-and-sex/HI00091
http://www.healtharticles101.com/blood-pressure-medication-side-effects-...

एकदा एक हिंदुत्ववादी आणि एक चिनी उत्खनन करत फिरत असतात.

आधी ते चीनमध्ये जातात. तिथे उत्खननात टेलिफोम्नच्या केबलचा तुकडा मिळतो.

चिनी लगेच गर्वाने म्हणतो... बघा, प्राचीन काळी आमच्याकडे टेलिफोन होते, हे यातून सिद्ध होते.

मग दोघे भारतात येतात आणि उत्खनन करतात. तर त्याना काहीच मिळत नाही.

चिनी माणूस कुत्सितपणे म्हणतो... तुमच्याकडे तर उत्खननात केबलही नाही मिळाली....

'तेच तर... यावरुन हे सिद्ध होते की आमच्या देशात प्राचीनकाळी वायरलेस आणि मोबाईल होते..' हिंदुत्ववादी गर्वाने म्हणतो... Proud

जामोप्या, तुम्ही कोणत्याही भावनेने लिहिले असले तरी याहुन प्रगत गोष्टी होत्या. जसे की आकाशवाणी होणे, क्षणात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाता येणे, इ. फिजिक्स, जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, इ. गोष्टी फार म्हणजे फारच प्रगत होत्या. तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे पुरावा काही नाहीये, पण माझा ठाम विश्वास आहे या गोष्टींवर.

बीबी धार्मिक विभागात असला की हे एक बरे असते नै? पुरावा नसला तरी चालतो, नुस्तं विश्वास आहे म्हटलं की झालं !! Proud

तांब्याच्या कणाम्मुळे जंतुंच्या पेशीम्वर परिणाम होतो आणि ते मरतात, हे आधुनिक वैद्यकालाही माहीत आहे.. म्हनून तर कॉपर टी मध्ये तांब्याची तार असते.. त्यामुळे गर्भाशयात तांब्याचे अणू पसरतात आणि शुक्रजंतू त्यांच्या संपर्कात आल्यास मरतात.

cu.JPG

सगळी चर्चा वाचली. आपण मराठी माणसे एकदम टोकाला का जातो?

एका ने लिहिले त्या प्रमाणे आपले पूर्वज documentation मध्ये कमी पडले. पण ह्याचा अर्थ माहिती न्हवती असे नाही. कदाचित अत्ता ते पटत नसेल कारण सप्रमाण सिद्ध करायला दुर्दैवाने आपल्या कड़े रित सर documentation नाही. पण ह्याचाच अर्थ असा न्हवे की आपले पूर्वज ज्या चाली रीती पाळत असत, त्या सगळ्याच चुकीच्या आहेत. खरेतर आपल्या अनेक चाली रीती आपल्याला निसर्गात दडलेल्या अनेक गुपितांशी आपली ओळख घडवतात. त्यातला शास्त्रीय अर्थ त्या चालीरीती आखून देतांना त्यांना नक्कीच माहीत होत्या. पण प्रत्येक गोष्ट धार्मिक असे लेबल लावल्या शिवाय आपल्या पचनी पडत नाही.

प्रस्तुत लेखात तांब्या pitale च्या वस्तुं बद्दल उल्लेख आहे. पूर्वीचे लोक ( माझे आजोबा, आजी ) जेवताना तम्ब्याच्या भांड्यात पाणी पित. तसेच सठावायाचा माठ ही तम्ब्याचा होता. पण ताक, दही, दूध मात्र कधीही त्या भान्ड्यातुन पित नसत. ह्याचाच अर्थ आशा धातुन्चा उपयोग फ़क्त पाणी साठ्वायाला व्ह्यायचा. म्हणजेच त्या धातुन्च्या रासायनिक प्रक्रिये बद्दल त्यांना पक्केच माहिती होते. फ़क्त documentation नसल्याने ते शाबित करून दाखवता येत नसे.

इब्लीस म्हणाले तसे ह्या धातुन्च्या अतिरिक्त वापराने दुष्परिणाम होत ही असतील. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच.

आपले अनेक सण, अनेक चाली रीती ह्या अशाच सायंस च्या वर आधारित आहेत. उदा: सोवाल्यात जेवायला बसणे ( hygine ), जेवाय पूर्वी हात धुणे, सगळे सण श्रावणात कारण फुले पाने विपुल प्रमाणात उपलब्ध असायची, दिवाळी थंडीच्या सुरवातीला, सकाळ चा फराळ compulsary ( पचायला जड़ पदार्थ सकाळी चांगले पचतात), रात्री हलका आहार घेणे, पाण्यात तुरटी फिरवणे, समतोल आहार, जे लोक मांस मच्छी खात नाहित त्यांनी दही दूध डाळि भरपूर सेवन करणे ( प्रोटीन साठी), प्रत्येक सणा चे पदार्थ पण त्या त्या रुतु मधे पचतिल असेच, लग्न करताना नाडी पाहून लग्न करणे, मामाच्या मुलीशी विवाह योग्य पण मावशीच्या मुलीशी निशिध्ध ( जेनेटिक्स ), कुठले पिक कधी घेणे, कुठल्या मातीत काय पिकते.

वाल्या कोळी म्हणतात त्या प्रमाणे पूर्वी व्यापार फ़क्त चाहा आणि मसाले यांचाच व्ह्यायचा. >>> ज़रा गफलत वाटते. कारण पूर्वी चाहा हा चीन ची मक्तेदारी होता. अनेक शतके चाहा त्यांनी लपवून ठेवला. पण शेवटी फितूरी ने तो बाहेर आला. व्यापारी इंग्रजांनी त्याचे महत्त्व लगेच ओळखले आणि योग्य हवामानात तो दार्जिलिंग ला लावून पाहिला. म्हणजेच चाहा व्यापारी तत्वा वर आपल्या इथे फ़क्त ३५० वर्षां पूर्वी पिकवाला गेला. मसाले भारतीय जेवणात फारच पूर्वी पासून वापरात होते. आर्थात प्रथमतः ते औषधि म्हणुनच वापरले गेले. नंतर त्यांचा वापर चवी साठी होवू लागला. आपण फोडणी जी घालतो ती सगळ्या जगात फ़क्त भारतीय जेवणातच घातली जाते. ती फोडणी म्हणजे चवीची भारतीय देन.

पूर्वी भारतीय राजे अतिशय समृध्ध आणि श्रीमंतिचे जीवन जगत असत. व्यापार चाले तो मुख्य करून मसाले, नैसर्गिक साधन सामुग्री ह्यांचाच. चीन आशिया मध्ये सिल्क, चाहा, पेपर ह्यां साठी प्रसिध्ध होता. पण चीनी राजे खुपच खाजगी पणा जपणारे होते. ह्या वस्तुंचा व्यापार युरोप ला चाले तो भारताच्या वाटेने. ( सुप्रसिध्ध सिल्क रूट). भारतीय राजे ह्या merchants ना संरक्षण देत, त्या बदल्यात सिल्क ( ज्याला संस्कृत मध्ये "चिनान्कुश" म्हन्ट्लेले आहे. ), चाहा, पेपर आपल्याला मिळू लागला. भारत अजुन समृध्ध झाला.

अनेक आक्रमणे आपल्या वर होण्याचे कारण आपलि सुबत्ता !! भरतात समुद्र ओलान्दयला बन्दि न्हवति तर प्रयश्चित्त होत. कारण समुद्राला ओलान्दतान्ना अनेक जिव जन्तु मारले जातात. मरिन लाइफ ला हानि पोहोचते. कुठेतरि निसर्गाचा समतोल बिघडतो. भारतिय हे आर्य डोन्गरातुन आले. त्यान्ना समुद्र पर्यटनाचा फारसा अनुभव न्हवता. त्या मुळे ते धोका दायक हि वाटले असावे. भारत त्या काळि खन्ड होता. अफगाण, नेपळ, तिबेट, भुतान, बन्गला देश, श्रिलन्का हे सगळे भारतातच होते.

भारतिय हे आर्य डोन्गरातुन आले.

आर्य हे कुठून आलेच नाहीत, ते इथलेच , असेही म्हणतात.. आता पुन्हा त्याना डोंगरातून का यायला लावताय?

आर्य हे कुठून आलेच नाहीत, ते इथलेच , असेही म्हणतात.. आता पुन्हा त्याना डोंगरातून का यायला लावताय?>>>>>

(हशा ....टाळ्या...) आर्य जर इथलेच तर त्यान्ना नक्किच समुद्र पर्यटनाचा अनुभव न्हवता. इथे डोन्गर म्हणजे हिमालय अपेक्षित आहे.

आर्य हे हिमालयातून आले? हिमालयात ते बर्फापासून तयार झाले की काय? Proud जर ते भारताच्या भूमीवरच होते तर पुन्हा हिमालयातून कशाला येतील?

हिमालयात भ्रमण करण्याचि त्यान्ना सवय होति. पण समुद्राशी मैत्रि न्हवती.

जाउदे बोलण्या सारखे काहि नाहि. मला वाटते कि अनेक बाफ अश्या शन्का मुळे बन्द झाले असावेत.

ह्या बाफ वर काहि चान्गलि चर्चा होवु शकलि असति. जुन्या काहि चालि रिति ज्यान्ना शस्त्रिय आधार आहे त्यान्चि माहिती मिळाली असती. असो.....

कळले..

केळीच्या सालीने होणार पाणी स्वच्छ!
26 Oct 2011 01:00,
साओ पावलो : केळीची साल चांदीची भांडी किंवा शोभेच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरतात हे आपल्याला माहिती होते. मात्र, या सालींचा उपयोग पाणी स्वच्छ करण्यासाठीही होत असेल याची आपल्याला कल्पना नसेल. ब्राझिलमधील संशोधकांनी आता केळीच्या सालींच्या मदतीने पाणी स्वच्छ करण्याचे तंत्र शोधले आहे. केळीच्या सालीमधील काही घटक प्रदूषित पाणी स्वच्छ करण्यासाठी उपयूक्त आहेत. ही पद्धत अतिशय स्वस्त आणि पुन्हा पुन्हा उपयोगात आणण्यासारखी आहे. खाण काम किंवा औद्योगिक सांडपाण्यामुळे प्रदूषित होणारे पाणी या पद्धतीने स्वच्छ होऊ शकते. केळीच्या सालीत नायट्नोजन, सल्फर आणि अन्य काही ऑर्गेनिक कपौंड आढळतात. त्यांच्यामध्ये ॠण भार असलेले इलेक्ट्नॉन असतात. ते पाण्यातील शिसे किंवा तांब्यासारख्या धातूंंचे कण स्वत:कडे आकर्षित करतात. या धातूंंमध्ये धन भार असलेले इलेक्ट्नॉन असल्याने ही प्रक्रिया घडते. त्यामुळे घातक धातूंचे कण पाण्यातून दूर होऊ शकतात. ब्राझिलचे संशोधक गुस्ताव कास्त्रो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. पाणी स्वच्छ करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या अन्य सिंथेटिक मटेरियलपेक्षा हा उपाय चांगला असल्याचेत्यांचे म्हणणे आहे. केळीच्या एका सालीने सुमारे अकरा वेळा प्रदूषित पाणी स्वच्छ करता येऊ शकते. या संशोधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर पाणी स्वच्छ करण्यासाठी कसा केला जाऊ शकेल याबाबतचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. पुढारी...

http://m.newshunt.com/Pudhari/World/11532844

आता सत्यनारायण पूजेतील विज्ञान असा एक बीबी येऊ दे.. Proud

हे भारी आहे.. आधी तांब्याचे भाम्डे वापरुन पाणी शुद्ध करायचे.. मग केळीचे साल वापरुन तांबे काढून टाकून आणखी शुद्ध करायचे.. Proud

हे जे काय महान जुने ज्ञान होते ते नष्ट व्हायला 'परकीय आक्रमणे'च कशी कारणीभूत होती यावरचे तज्ञ कुठे आहेत? हा मुद्दा, मग मुस्लिमांचे लाड आणि शेवटी गांधीजींना शिव्या हे सर्व आल्याशिवाय हा धागा सुफळ-संपूर्ण व्हायचा नाय!!!

जाऊ दे ना आगावा, तू कशाला मधे पडतोयस.. गेले अनेको वर्षे रवंथ करून चावून चोथा झालेले मुद्दे घेऊन लोक स्वतःचं मनोरंजन करून घेताहेत..
<<...हा धागा सुफळ-संपूर्ण व्हायचा नाय!!!>> हे मात्र अगदी खरं Happy

>>><<<<<अशी काहीतरी शास्त्रीय निरिक्षणे लागतात, तर ती माहिती मान्य होते.. उगाच पुराणातले दाखले देऊन उपयोग नसतो.>>.>>>

>> Nature मधला लेख हे पुराणातले दाखले

निधर्मांधांना पुराणांची अ‍ॅलर्जी आहे. "पुराणा"तल्या दाखल्यांऐवजी त्यांचा "कुराणा"तल्या दाखल्यांवरच विश्वास असतो.

"कुराणा"तल्या दाखल्यांवरच विश्वास असतो.

कुराणातल्या दाखल्यांवर बिनदिक्कत भरोसा ठेवता येतो. कारण त्यांच्या लेखकाने स्वतःला शेवटचा अवतार घोषेत करुन पुस्तकात काडीचाही बदल करु नका असे स्पष्ट निक्षून सांगितले आहे.. Proud

पुराणं कुणी कधी किती वेळा लिहिली, बदलली.. सगळं चाललेलं असतं.. त्यावर भरोसा कसा ठेवणार? नमस्कार करुन देवघरात ठेवायला ठीक आहे.. पण त्याला बाकी व्यावहारीक मूल्य नाही. ( हे माझ्या मते आहे. .. मी कुणी प्रेषित नाही.. त्यामुळे माझं मत मानलच पाहिजे असे नाही. ) Proud

गेल्या २००० वर्षातील जगातील सर्वात जास्त लोकप्रिय अशा १० व्यक्तींमध्ये कुराण लिहिणार्‍याचा समावेश होतो.
जागोमोहम्मदप्यारे Happy

आणि कोणाची शामत आहे त्यात काही बदल करण्याची किंवा त्यात काही चुकीचे आहे हे सांगण्याची? असं कोणी करायला गेलं तर तो जिवंत तरी राहील का! त्याऐवजी टीका करायला, बदलायला आपली पुराणे बरी. त्यातली एकही ओळ न वाचता कितीही शिव्या दिल्या तरी भीति नाही.

त्यातली एकही ओळ न वाचता कितीही शिव्या दिल्या तरी भीति नाही.

काय करनार? आपल्या धर्मात कुणी मुंडक्याला धरुन ५ वेळा रोज धर्मग्रंथ पढवून घेत नाही.. कशाला लोक पुस्तके वाचतील ?

भारत त्या काळि खन्ड होता. अफगाण, नेपळ, तिबेट, भुतान, बन्गला देश, श्रिलन्का हे सगळे भारतातच होते.<<

बाप्रे!! असेल बुवा असेल. ब्रह्मदेव .. आप्लं ते ब्रह्मदेश सुद्धा होताका त्या खण्डात?

रशिया, युर्प हेही पूर्वी भारतातच होते म्हणे.. भारताने इतर देशाना नंतर दान दिले असनार. Proud

जामोप्या,

ते copper T बद्द्ल जे लिहलं आहेस ते तद्दन चूक आहे.

ह्या उपायात एम्ब्रियानिक डेव्हलपमेंटला जागा मिळत नाही म्हणुन गर्भधारणा होउ शकत नाही. तसेच sperm mobilityवर पण फरक पडतो.

थोडीफार माहिती इथे आहे:

http://en.wikipedia.org/wiki/Intrauterine_device

2. The presence of the T-shaped device and the copper it releases prevents the sperm and the ovum joining together and surviving in the uterus therefore prevents pregnancy.

http://qna.rediff.com/questions-and-answers/how-does-copper-t-work-as-a-...

ह्या उपायात एम्ब्रियानिक डेव्हलपमेंटला जागा मिळत नाही म्हणुन गर्भधारणा होउ शकत नाही.

असेल, हेही खरे असू शकेल.. प्रत्येक ठिकाणी मेकॅनिजम ऑफ अ‍ॅक्शन वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे.
http://www.indiaparenting.com/womens-health/166_649/copper-t.html http://www.babycenter.com/0_intrauterine-device-iud_3564.bc

@अण्णाहजारे!
>>तांब्यामध्ये आयुर्वेदिक गुण असतात.. म्हनुनच बालाजी तांब्यानी आपले आडनाव तांबे ठेवले आहे.
हहपुवा झाली.

***

@ palas | 25 November, 2011 - 04:44 नवीन
तांब्याचे अणू विषारी असतात. एम्ब्र्योला जागा मिळत नाही ही चुकिची कल्पना आहे. ऑफकोर्स, तो एक छोटा भाग आहे, पण तांबे विरघळून संपले की कॉपर टी बदलावी लागते, ती याचसाठी. नाहीतर नुसत्या प्लास्टीक टी ने काम भागले असते. ताम्बे संपत आले, की 'एक्टोपिक प्रेग्नंसी' चे प्रमाण वाढते. कारण एम्ब्रियो मरत नाही, पण गर्भाशयात जागा नसते म्हणून फॅलोपिअन नळीत रुजतो व वाढण्याचा प्रयत्न करतो.

(अवांतरः आय.यू.डी. म्हणजे इन्ट्रा युटेराईन डीव्हाइसेस ची कल्पना : लांबच्या प्रवासात वाळवंटातील काफिलेवाले लोक सांडणींच्या (सांडणी = उंटाचे स्त्रीलिंग) गर्भाशयांत दगडाचे गोटे ठेवीत. त्यामुळे प्रवासात गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच कमी होई. त्यावरून लूप, कॉपर टी इ. गर्भाशयात ठेवण्याची संततीनियमन साधने आली.)

छान

Pages