तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?

Submitted by विवेक नाईक on 25 September, 2011 - 06:33

सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?

ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.

२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.

हा मुद्दा होता, जर गावातील पाणी अश्या प्रकारे दुषीत अ सेल तर ही जनता हेच पाणी वापरून तग तरी कशी धरून आहे? जर ह्या पाण्या बद्दल जनतेला माहीती असती तर जनेतेने ते पाणी शुद्ध करण्यासाठी एका तरी treatment चा पर्याय निवडला असता. ह्या पर्यायत पाणी उकळवणे, पाणी शूद्धी करणासाथी ULTRA Violet
उपकरणाचां वापर करणे. पण ही ठरली जनता ज्यांची एका वेळेची जेवायची मारामार तेथे पाणी शूद्धीकरण
म्हणजे डोक्यावरून पाणी. ज्यांच्या घरात झीरो चा दिवा लावयला विज नाही तिथे ULTRA Violet उपकरण?

पण आमची ही सर्व्व जनता ह्या विशाणु जिवाणु ना पुरुन उरली. कशी? हा प्रश्न ह्या टीम ला पडला होता.
ह्या नंतर NATURE च्या झालेल्या संशोधन चा विषय बदलला हे तुमच्या लक्षात आले असेलच.
त्या NATURE च्या टीमने पितळेची भांडीच उचलली, पाण्या ची SAMPLES घेतली. प्रयोगशाळेत नेउन
रीतसर प्रयोग केले गेले व

निश्कर्ष असा नि घाला कि पितळे च्या भांड्यांत दुषीत पाणी २४ तासात पिण्या एवढे
शुद्ध होते, कुठलीही उर्जा न वापरता !!. कारण.... पितळे तील तांब्याचे अणु. ह्याच अणु मुळे पाणी शूद्धीकरण
होते. http://www.nature.com/news/2005/050404/full/news050404-14.html ह्या लेखात स्पष्टपणे नमूद केले आहे कि हा शोध NATURE च्या टीमने लावला व त्याचा उपयोग भारता सारख्या देशाला घ्यावयास हवा. खरं कि नाही??

आता विषय दुसरा: जस्त (ZINC) चा शोध Andreas Maggraff 1746 ला लावला. पण भारतात् जस्त (ZINC) ची निर्मीती (शूद्धीकरण) BC 400 च्या पूर्वी पा सून होतय! ह्या ZINC शूद्धीकरणाची पद्धत फक्त भारतीयांनाच अवगत होती. ह्या ZINC च्या खाणी चे अवशेष राजस्थानात अजुन ही पाहायला मिळतात. जर ZINC चे शूद्धीकरण व व्यापरी उत्पादन भारतात BC 400 पासून होत होते तर Andreas Maggraff ला ह्या शोधाच Credit कसे दिले गेले?

Zinc & Copper चे मिष्रधातू बनवणे फार मुश्कील काम, ह्याचे कारण ह्या धातूंचा Melting Temp. Copper
वितळे पर्यंत Zinc वितळून उडुन जाई. भारतीयानी एक स्पेशल प्रोसेस तयार करून Brass ला जन्म दिला.
भारत पितळेची भांडी जवळ जवळ १५००-१७०० वर्षा पासून वापरतोय. भारतातू न ही भांडी परदेशात गेली.

पितळेच्या भांड्यांपुर्वी तांब्याची भांडी भारतात उपलब्ध होतीच. मग पितळेच्या मागे का ? कारण तांब्याची
किम्मत, ती ईतकी जास्त होती कि जर तांब्या चे गुणधर्म सारखे ठेउन सर्वसाधारण जनतेला, पर्यायी धातूंची भांडी द्यावी हा च विचार ह्या मागे असला पाहीजे. त्या मुळेच देव पुजे साठी तांब्याची पण सर्व साधारण कामा साठी पितळेची हा पर्याय निघाला असावा !!!!

आता आपली जनता ही भांडी कशी वापरते ? पहेले पाण्याला जाऊन घागर पाण्या ने स्वच्छ धुते. हाती
राखुन्डी लागली तर ठीकच नाही तर माती, नारळाची किशी सुद्धा चालते. घागर मस्त चकचकीत झाली पाहीजे.
हे सर्व्वे आपली जनता परंपरेने करत आलीय. पण ह्याच भां ड्याच्या चकचकीत पणा मुळेच पाणी शूद्धीकरण
क्रिया सुरळीत होत होती.

ठोक्याचे भांडे !! तांब्या - पितळेची भांड्यांना आपण का ठोके लाउन घेत होतो ? उत्तर परत एकदा तेच, भांड्याचा चकचकीत पणा !

आताची परीस्थीती : ही तांब्या - पितळेची भां डी गेलीत अडगळीच्या खोल्यात. काही भंगारात काढली गेलीत.
त्या भांड्याची जागा आता फक्त वरुन चकचकीत दिसणार्या प्लास्टीकच्या भांड्यानी घेतलीय.

वरून चकचकीत दिसणारी प्लास्टीकची भांडी पाणी साठवुन ठेवण्या पलिकडे जाऊ शकतील ?

स्त्रोतः बरेच वर्षा पासुन मनात हा विषय घोळत होता. ह्या वि षया ची व्याप्ती फार मोठी आहे व सर्व जनतेची
ह्या विषया बद्दल जा गरुक ता करणे गरजे च आहे.
माहिती जाला वरुन,
http://www.inae.org/metallurgy/archives_pdf/smelt%20zinc.pdf

त. टि: समस्त पि तळे, तांबे परीवारांनी माफी ध्यावी !!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तशा बर्‍याच गोष्टी आहेत, नमुन्यादाखल खालील लिन्क पहा.
http://web.mit.edu/varun_ag/www/bose_real_inventor.pdf
जी खुपच अलिकडची आहे, तसे तर वराहमिहिर - सुर्यसिद्धांत; चरक/सुश्रुत - सर्जरी; इ. जुन्या गोष्टी पण आहेत, पण आजकाल माहिती करून घ्यायला आणि अभिमान बाळगायला वेळ कुणाला आहे

मार्कोनी-बोस आणि पारंपरिक ज्ञान यांचा संबंध कळला नाही. शिवाय तुम्ही उल्लेखलेले ग्रंथ भारतात उपलब्ध आहेत. पाश्चिमात्यांनी ते चोरून वगैरे नेले नाहीत.

सांगायचा मुद्दा हा आहे की आपले ज्ञान नेऊन (अगदी सगळेच्या सगळे चोरून नेले आणि आपल्याकडे राहिलेच नाही असा रोख नव्हता) सार्‍या जगाला ते स्वतःचे आहे हे दाखविले गेले आहे अनेक बाबतीत.

तसेच जे काही लिखित स्वरूपात होते ते बाह्य आक्रमणांमधे नष्ट झाले आणि बरेचसे चोरीला गेले. यातल्या चोरलेल्या गोष्टी आमच्या आहेत असे पाश्चिमात्त्य जगाने जाहिर करून स्वतःची वाहवा करून घेतली.

Proud Proud

नेमकं कुठलं संशोधन? आणि परदेशातल्या लोकानी आक्रमण करुन भारतातील पुस्तके जरी नेली तरी ती काहीच नेली असणार ना? का सगळ्या भारतातील पुस्तके एकदमच नेली? मग भारतातल्या लोकानी त्या उरलेल्या पुस्तकांचा वापर करुन स्वतःचा विकास का नाही साधला? आपले पूर्वज फार महान होते आणि त्यांचे ज्ञान इतरानी चोरले या भ्रामातून हिंदुत्ववाले क्धी बाहेर येणार आहेत कुणास ठाऊक! रावण विमानातून फिरत होता.. ब्रह्मास्त्र म्हणजे अणुबॉब, शिवलिंगाचा आकार अणुभट्टीसारखा असतो..... हिंदुत्ववाल्यांची स्वप्नं महान असतात ! तांब्या पितळेचा जंतूवरील परिणाम या विषयावरचा धागही धार्मिक विभागात काढला, यातच सगळे आले ! Rofl

<ह्या अद्यावत तंत्रज्ञानाची किमान पात्रता खालील पात्रता खालील प्रमाणे असावी.

१. हे उपकरण इतके स्वस्त असावे कि जन सामान्याना परवडू शकेल.
२. हे उपकरण कुठल्याही उर्जे शिवाय चालावे.
३. हे उपकरण हाताळायला सोप्पे असावे. अगदी अशिक्षित सुद्धा याचा वापर करू शकावेत. >

आहे, आणि आम्हीच तयार केलं आहे.

येस, मी बाजारात पाहिलेय अनेकदा Happy

मार्कोनी-बोस

असे बर्‍याच वेळेला घडतं.. एकच संशोध न अनेक लोक करत असतात.... पण जो मनुष्य आधी आपलं संशोधन किंवा पुस्तक प्रसिद्ध करतो, ते संशोध्न त्याचे मानले जाते. उत्क्रांतीवादावरही डार्विन आणि वॅलेस एकाच वेळी पण स्वतंत्रपणे काम करत होते. पण डार्विनचे संशोधन आधी प्रकाशित झाले.

असे प्रकाशनही ख्यातनाम नियतकालिकात असावे लागते.. मित्राला लिहिलेले पत्र, टागोराना लिहिलेल्या पत्राचा चिटोरा, बायकोला लिहिलेले लव लेटर, मोलकरणीच्या खाजगी डायरीतील पाने.. ... असल्या गोष्टी नंतर फारश्या कन्सिडर होत नाहीत. Proud ज्ञानाचे योग्य वेळी प्रकाशन आणि स्टँडर्डायझेशन याबाबत हिंदुत्ववाले पिढ्यान्पिढ्या कमीच पडत आलेले आहेत.. Proud

जर ZINC चे शूद्धीकरण व व्यापरी उत्पादन भारतात BC 400 पासून होत होते तर Andreas Maggraff ला ह्या शोधाच Credit कसे दिले गेले? याचं आता पुन्हा वेगळं उत्तर कशाला द्यायचं? स्टँडर्डायजेशन आणि प्रॉपर डॉक्युमेंटेशन यांचा अभाव.. Andreas Maggraff हा स्वतंत्रपणे जस्तावर संशोधन करत होता.. तो काही राजस्तानात येऊन इथली पुस्तके चोरून तर गेला नव्हता ना? त्याने संशोधन केले आणि ते व्य्वस्थित प्र्काशित केले.... त्यालाच क्रेडिट मिळणार ना?

>>ज्ञानाचे योग्य वेळी प्रकाशन आणि स्टँडर्डायझेशन याबाबत हिंदुत्ववाले पिढ्यान्पिढ्या कमीच पडत आलेले आहेत.
आता यात कसले आले आहे हिंदुत्व ? इथे भारत म्हणा की...
आपले लोक डॉक्युमेन्टेशन आणि स्वतःची जाहिरात करणे यामधे कमी पडतात हे खरे आहे.
आता यात जरा बदल होत असावा.

आता यात कसले आले आहे हिंदुत्व ?

धार्मिक विभागात धागा काढलाय हा ! इथे भारत हा शब्द वापरला तर हिंदुत्ववाले मला सेक्युलर म्हणतील की ! Proud

तुम्हीच म्हणालातना जाहीरात केल्या शिवाय जगा च्या लक्षात येत नाही ? हेच उदाहरण बघा !!

तांब्या पितळेची भांडी धागा धार्मिक विभाग ४० प्रतिसाद लोक अगदि तुटुन पडले. पान खायची संस्क्रुती धागा संस्क्रुती विभाग फक्त ८ प्रतिसाद.

लोक काही म्हणोत. दिल्याने ज्ञान वाढते अशी भारतीयांची फार पूर्वी पासून धारणा आहे आणी म्हणूनच
जगात ज्ञान पसरावे अशी संताची शिकवण आहे.

अगदी आदिवासी महीला घरात आणलेल्या मांसावर, माश्यावर हळद पेरते. ह्या हळदीचा वापरांने खाद्य पदार्थांच्या चवीत काहीच फरक पडत नाही. तरी सुद्धा भारतातल्या कुठल्याही समाजा मध्ये हळद ही जेवणात
हमखास वापरली जातेच. आता घरातल शेंबड पोर सुद्धा सांगु शकेल की हळद ही antiseptic आहे वैगेरे आणी हे आपल्या तेंव्हा महीलांना आणी आता माहीती होत का?

काही काळा पूर्वी हीच हळद अमेरीकेत पेटंट होण्याच्या मार्गावर असताना अचानक भारत सरकारला जाग आली व माशेलकरांनी त्वरीत पाउले उचलली. का ? भारताचा काय संबध ?

जर भारतात काहीच नव्हते, तर ईराणी, मोघल, पर्शीयन, तुर्की, अफघाणी, ईंग्लंड, पोर्तूगीझ, फ्रेंच, लोकांनी
भारतावर आक्रमण करण्याच प्रयोजन काय? बर त्यांनी ईथे यायला खूप खटाटोप केला होता.

भारताचा रोमन राज्याशी BC 400 वर्षा पासून व्यापारी संबध होता अस इतीहास सांगतो. जर भारताकडे
काहीच नव्हत तर ते विकायला रोम पर्यंत जाण्याची गरजच काय? आणी रोमन ही भारतीयांना
(व्यापारांना) कुठलीही गोष्ठ काही फुकटात देत नसावेत म्हणजे च भारतीय जी काही वस्तू
रोमनाकडूंन घेत असावेत त्याचा मोबदला दिल्यावरच.

मी पुर्वी म्हंटल्या प्रमाणे तुम्हा सर्वांचा आक्षेप हा पितेळेची भांडी जंतूनाशक आहेत का यावरच आहे. नेचरने
संशोधन केल्या प्रमांणे जर कदाचीत पितेळेची भांडी जंतूनाशक नसतीलही !
पण आता जनता प्लास्टीकची भांडी वापरू लागलीय ही तर खरी बाब आहे व ही प्लास्टीकची भांडी आरोग्याला
उपायकारक नक्कीच नाहीत व ती दुरांन्वये ही जंतूनाशक नाहीत. ह्या माझ्या मूळ मुद्द्या कडेच तुम्ही सर्वांनी दुर्लक्ष केलय.

वर तुमच चालु द्या !! .

--आहे, आणि आम्हीच तयार केलं आहे.
येस, मी बाजारात पाहिलेय अनेकदा ---

चिनूक्स /साधना , हे कोणते उपकरण आहे ते सांगणार का प्लीज.

आणी रोमन ही भारतीयांना
(व्यापारांना) कुठलीही गोष्ठ काही फुकटात देत नसावेत म्हणजे च भारतीय जी काही वस्तू
रोमनाकडूंन घेत असावेत त्याचा मोबदला दिल्यावरच.

तुमचा ग्रे मॅटर जरा ठिकाणावर आहे का ते तपासून घ्या.. कधी म्हणताय परकीयानी आपले ज्ञान चोरले.. कधी म्हणताय आपल्याच देशातल्या लोकानी मोबदला घेऊन ते विकले.. ! परदेशी लोक भारतात यायचे ते मसाल्याच्या पदार्थांसाठी. युरोपमध्ये थंडेच्या वेळी काही पिकायचे नाही.. अशा वेळी मांसाशिवाय त्याना काही मिळायचे नाही. आणि ते टिकवून धरायला त्याना मसाले लागायचे ते भारतासारख्या उष्ण देशाममध्ये.. भारतातून मसाल्याची झाडे नेउण ञ्त्यानी लावून पाहिली, पण ती जगली नाहीत. त्यामुळे त्याना ते मसाले न्यायला भारताशी संबंध ठेवायलाच लागायचे... चार पैसे देऊन ते मसाले खरेदी करायचे.. पितळ कसे करावे, अणुभट्ट्ञा कशा उभ्या कराव्यात.. असल्या ज्ञानाची पुस्तके त्याना भारत विकत नव्हता, तर फक्त मसाले आणि इतर काही वस्तू जसे कापड, नीळ, चहा वगैरे विकायचा..

आणि परदेशी लोक भारतात यायचे कारण त्याना व्यापाराची व पैसा मिळवायची आवड होती म्हणून.. भारतीय लोक आळशी आणि महामूर्ख होते. ( तसे ते आजही आहेत.) म्हणून ते दुसर्‍या कुठल्या देशात फारसे जात नव्हते. समुद्र ओलांडले की पाप लागते अशी हिंदु धर्मियांची श्रद्धा होती.

दिल्याने ज्ञान वाढते अशी भारतीयांची फार पूर्वी पासून धारणा आहे आणी म्हणूनच
जगात ज्ञान पसरावे अशी संताची शिकवण आहे.

आता हे आणि काय नवीन? कधी इतर लोकानी ज्ञान चोरले म्हणून आरडाओरड.. तर कधी दुसर्‍याना ज्ञान द्यावे ही आमचीच महानता आहे, असे म्हणून स्वतःचेच कौतुक!!! कुठले ज्ञान कुणाला अणि कधी दिलेत ते तरी आधी सिद्ध करा.

अगदी पक्के हिंदुत्ववादी दिसताय! Proud

वाल्या कोळी,

<<<<<भारतातून मसाल्याची झाडे नेउण ञ्त्यानी लावून पाहिली, पण ती जगली नाहीत. त्यामुळे त्याना ते मसाले न्यायला भारताशी संबंध ठेवायलाच लागायचे... चार पैसे देऊन ते मसाले खरेदी करायचे>>>

तुम्ही ईतकी authentic माहीती दिल्या बद्द्ल आभार !!! मसाल्याची झाडे लावतांना प्रत्य़क्ष होता वाट्त
तिथे,

<<<<<भारतीय लोक आळशी आणि महामूर्ख होते. ( तसे ते आजही आहेत.)>>>>>> त्या भारतींयामध्ये तुमचा नंबर पण आहे बर का !! तुम्ही स्वता: कदाचीत भारतीय म्हणवून घेवू ईच्छीत नसाल पण काय करणार ईलाज नाही.

माझ ग्रे मॅटर ठीकाणावर नाही पण तुमच आहे का ?

भारता ने कुठले ज्ञान कोणाला दिले ? अगदी अलिकडचे उदाहरण....

आज जगात ग्वाटेमालाची वेलची प्रसीद्ध आहे. वेलची उत्पादनात ग्वाटेमालाचा जगात पहीला नंबर लागतो. ह्या पुर्वी भारताचा लागत होता. मग ग्वाटेमाला कुठून आला वेलची उत्पादनात? भारतानेच ग्वाटेमालाला
दोन देशाच्या कररा नुसार वेलची उत्पादना बाबत शिकवले. ग्वाटेमाला मध्ये उत्पादीलेली वेलची ही
भारतीय वेलची पेक्षा रतिने, स्वादात सरस निघाली व तिने जागतिक बाजारपेठ काबीज केली.

तुम्ही ईतकी authentic माहीती दिल्या बद्द्ल आभार

स्वतःचे धागे सोडून इतरांचे धागेही वाचायची सवय लावून घ्या.. ही माहिती मायबोलीवरच उपलब्ध आहे.. ( अन्न वै प्राणम सिरियल वाचा..) Proud

भारतानेच ग्वाटेमालाला
दोन देशाच्या कररा नुसार वेलची उत्पादना बाबत शिकवले

आता दोन देशांचा करार झाला तर त्यानुसार भारतालाही काहीतरी मिळाले असेल की ! का उगाच्च फुकट शिकवले? तुम्ही नव्हता वाटतं कराराच्यावेळी.. Proud मग वेलचीचे ज्ञान विकून त्याच्याबदल्यात जे ज्ञान मिळाले, त्याचे फुडे काय झाले? त्या ज्ञानाचा वापर करुन भारतही कुठल्या तरी क्षेत्रात पहिला यायला हवा होता... पण आळशी आणि मूर्ख लोक असल्यावर दुसरं काय होणार? ग्वाटेमालाला आपण ज्ञान दिले म्हणून शंख वाजवत बसणार आयुष्यभर.. Proud

ग्वाटेमाला कडून ज्ञान ?? सही है बॉस !!

<<<<<<दुसर्‍या कुठल्या देशात फारसे जात नव्हते. समुद्र ओलांडले की पाप लागते अशी हिंदु धर्मियांची श्रद्धा होती>>>>

स्वता: वाल्या कोळी पण हे माहीती नाही की रामाने रावणावर व लंका विजयासाठी समुद्र ओलांडला होता.

हिंदु धर्मियांविरूद्ध फक्त ओरड !!

रामाने बायकोला आणायला समुद्र ओलांडला, व्यापार करायला नव्हे! सीतेला पळवले नसते तर रामानेही समुद्र नसता ओलांडला. Proud ग्वाटेमालाकडून ज्ञान न मिळायला काय झाले? किंवा मोबदला हा अन्य स्वरुपातही असू शकतो.. उगाच जगाला मोफत ज्ञान वाटत असल्याचा आव का आणायचा?

जननी जन्मभूमिष्च स्वर्गादपि गरियसि.... हा रामायणातलाच श्लोक आहे ! ( हे नेपाळचे राष्ट्रीय ध्येयवाक्य आहे. जसे आपले सत्यमेव जयते आहे तसे. नेपाळ्याना रामायण वाचून हे वाक्य मिळाले का त्यांचे त्यानी संस्कृतात तयार केले हे मला तर माहीत नाही. भारतीय रामायणाने नेपाळ्याना श्लोक दिला म्हणून तुम्हाला डांगोरा पिटायचा असला तर तुम्ही पिटू शकता ! Proud ) आणि त्याकाळी लंका हा जंबुद्वीपाचाच भाग होता.

दुसर्‍या कुठल्या देशात फारसे जात नव्हते. समुद्र ओलांडले की पाप लागते अशी हिंदु धर्मियांची श्रद्धा होती >>>>

हा बाफ पण आता हिंदूत्व आणि हिंदूवर आला का?

भारताचा व्यापर समुद्रामार्गे अनेक देशांसोबत होता. लोथल, कालीबंगण सारखे प्रगत बंदर भारतात इ स पूर्व २००० मध्ये ही होते. आणि हे मी हिंदू बढाई मारायला नाही तर आर्कियालॉजीचे पुरावे घेऊन सांगत आहे.

एकुण मायबोली कंटाळवाणी झाली आहे आता. जिकते तिकडे हिंदू अन तत्सम. बर निट माहितीही नाही. अर्धवट माहितीवर द्यायचे ठोकून.

भारताचा व्यापर समुद्रामार्गे अनेक देशांसोबत होता. लोथल, कालीबंगण सारखे प्रगत बंदर भारतात इ स पूर्व २००० मध्ये ही होते.

आम्ही कुठे नाही म्हणतोय? भारताला समुद्र आहे , बंदरेही होती.. पण तिथे फक्त इनकमिंग असायचे.. Proud . तिथे आउटगोइंग होते का? ( परदेशातून लोक यायचे, पण आपले लोक बाहेर जात होते का? )

हा बाफ पण आता हिंदूत्व आणि हिंदूवर आला का?

हा बाफ जन्माला आला तेंव्हापासूनच हिंदुअ धर्मावर होता... म्हनून तर धार्मिक विभागात हा बीबी आहे.. तांबे, पितळ, पाणीशुद्धीकरण, ई कोलि, नेचर मासिक..... एवढा सगळा पसारा असून बिचार्‍याला धार्मिक विभागात का घातले कुणास ठाऊक !

आणि पूर्वी बंदरे आणि नावा होत्या तर रामाने सेतू का बांधला? लंकेला जायला कुठली बोट आणि तशी सोय असलेले बंदर नव्हते का?

र रामाने सेतू का बांधला? लंकेला जायला कुठली बोट आणि तशी सोय असलेले बंदर नव्हते का? >>> विमानाचे विसरलात!

जुने, हिंदू आणि भारतीय म्हणले की सर्व वाईटच का? की सर्वच कथोलकल्पीत. वाईट तर वाईट असतेच पण अहो ज्या गोष्टी चांगल्या होत्या त्या स्विकारायला काय हरकत? आधी म्हणे हिंदू बाहेर जात नाही, पुढे दाखले दिले की रामायण. बाबरी पण येईल आता. कशास कशाचा पोच नाही. सुतावरून स्वर्ग म्हणजे हाच.

साधारण जुलै महिन्याचा एका मिड डे च्या अंकात (पुणे मुंबई प्रवासात मिळाला होता ) केवळ ९९ रुपयात पाणी शुद्ध करणारे उपकरण, या विषयी माहिती होती. ताडपत्री, पॉलिथीन सारखे सहज उपलब्ध असणारे घटक वापरुन हि पिशवी तयार केली होती, जी सहज डोक्यावर ठेवता येते. सूर्यकिरणांच्या मदतीने त्यातले पाणी शुद्ध होते. शुद्ध पाणी बाहेर काढण्यासाठी तिला एक छोटी तोटी पण बसवलेली होती.
तो पेपर कुठे सापडला तर आणखी माहिती लिहीन इथे.

<<<<<आहे, आणि आम्हीच तयार केलं आहे.>>>

पहा तुम्हीच. टाटा-स्वच्छ TSRF Technology uses Nano size Silver particles to kill bacteria cells. The candle is made of Rice Ash embedded with Nano Size Silver Particles that produces the structural changes in bacterial cell membranes and interacts with nucleic acids.

म्हणजे तेच ( तांब्या पितळेचे) बेसीक तंत्रज्ञान पण नाव "TSRF Technology"

Source:
http://en.wikipedia.org/wiki/Tata_Swach#TSRF_technology

आता कोणी म्हणतय का कि ह्या TSRF तंत्रज्ञानावर संशोधन झाले पाहीजे व त्याची खात्री करून घ्यायला
पाहीजे वैगेरे वैगेरे.

आज सकाळमध्ये वाचले... तांब्याच्या भांड्यात पाण्यामध्ये रात्रभर रुद्राक्ष ठेवावा. सकाळी ते पाणी प्याल्यास हायपर्टेन्शनचा त्रास कमी होतो. ( प्रयोग आपपल्या जबाबदारीवर करणे.)

आता कोणी म्हणतय का कि ह्या TSRF तंत्रज्ञानावर संशोधन झाले पाहीजे व त्याची खात्री करून घ्यायला

त्याची गरज नसते... तुम्ही कंपनीत जाऊन विचारले तर ते त्यांचा डेटा तुम्हाला देतील.

परीक्षणों से यह भी साबित हुआ है कि सामान्य तापमान में तांबा सिर्फ चार घंटे ई-कोली जैसे हानिकारक जीवाणुओं को मार डालता है।

अशी काहीतरी शास्त्रीय निरिक्षणे लागतात, तर ती माहिती मान्य होते.. उगाच पुराणातले दाखले देऊन उपयोग नसतो... http://www.patrika.com/article.aspx?id=12836

तांबे पुरातन काळात फक्त भारतातच नव्हे तर सगळीकडे वापरले जात होते. http://www.kandmool.com/Health/Relaxation-Products/Copper-Jug-for-Drinki...

http://www.sensitiveplanet.com/category.jhtm?cid=137
copper vessel at room temperature can kill them in just four hours.

untitled.JPG

आता रोज तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायचे ठरवले आहे. Proud

Human body can not synthesize copper and to carry out normal metabolic functions copper intake is essential. Average intake of 1.2 mg/day (trace amounts) is recommended for adults. In a copper jug, copper intake is only in trace amounts that can’t be toxic

Pages