तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?

Submitted by विवेक नाईक on 25 September, 2011 - 06:33

सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?

ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.

२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.

हा मुद्दा होता, जर गावातील पाणी अश्या प्रकारे दुषीत अ सेल तर ही जनता हेच पाणी वापरून तग तरी कशी धरून आहे? जर ह्या पाण्या बद्दल जनतेला माहीती असती तर जनेतेने ते पाणी शुद्ध करण्यासाठी एका तरी treatment चा पर्याय निवडला असता. ह्या पर्यायत पाणी उकळवणे, पाणी शूद्धी करणासाथी ULTRA Violet
उपकरणाचां वापर करणे. पण ही ठरली जनता ज्यांची एका वेळेची जेवायची मारामार तेथे पाणी शूद्धीकरण
म्हणजे डोक्यावरून पाणी. ज्यांच्या घरात झीरो चा दिवा लावयला विज नाही तिथे ULTRA Violet उपकरण?

पण आमची ही सर्व्व जनता ह्या विशाणु जिवाणु ना पुरुन उरली. कशी? हा प्रश्न ह्या टीम ला पडला होता.
ह्या नंतर NATURE च्या झालेल्या संशोधन चा विषय बदलला हे तुमच्या लक्षात आले असेलच.
त्या NATURE च्या टीमने पितळेची भांडीच उचलली, पाण्या ची SAMPLES घेतली. प्रयोगशाळेत नेउन
रीतसर प्रयोग केले गेले व

निश्कर्ष असा नि घाला कि पितळे च्या भांड्यांत दुषीत पाणी २४ तासात पिण्या एवढे
शुद्ध होते, कुठलीही उर्जा न वापरता !!. कारण.... पितळे तील तांब्याचे अणु. ह्याच अणु मुळे पाणी शूद्धीकरण
होते. http://www.nature.com/news/2005/050404/full/news050404-14.html ह्या लेखात स्पष्टपणे नमूद केले आहे कि हा शोध NATURE च्या टीमने लावला व त्याचा उपयोग भारता सारख्या देशाला घ्यावयास हवा. खरं कि नाही??

आता विषय दुसरा: जस्त (ZINC) चा शोध Andreas Maggraff 1746 ला लावला. पण भारतात् जस्त (ZINC) ची निर्मीती (शूद्धीकरण) BC 400 च्या पूर्वी पा सून होतय! ह्या ZINC शूद्धीकरणाची पद्धत फक्त भारतीयांनाच अवगत होती. ह्या ZINC च्या खाणी चे अवशेष राजस्थानात अजुन ही पाहायला मिळतात. जर ZINC चे शूद्धीकरण व व्यापरी उत्पादन भारतात BC 400 पासून होत होते तर Andreas Maggraff ला ह्या शोधाच Credit कसे दिले गेले?

Zinc & Copper चे मिष्रधातू बनवणे फार मुश्कील काम, ह्याचे कारण ह्या धातूंचा Melting Temp. Copper
वितळे पर्यंत Zinc वितळून उडुन जाई. भारतीयानी एक स्पेशल प्रोसेस तयार करून Brass ला जन्म दिला.
भारत पितळेची भांडी जवळ जवळ १५००-१७०० वर्षा पासून वापरतोय. भारतातू न ही भांडी परदेशात गेली.

पितळेच्या भांड्यांपुर्वी तांब्याची भांडी भारतात उपलब्ध होतीच. मग पितळेच्या मागे का ? कारण तांब्याची
किम्मत, ती ईतकी जास्त होती कि जर तांब्या चे गुणधर्म सारखे ठेउन सर्वसाधारण जनतेला, पर्यायी धातूंची भांडी द्यावी हा च विचार ह्या मागे असला पाहीजे. त्या मुळेच देव पुजे साठी तांब्याची पण सर्व साधारण कामा साठी पितळेची हा पर्याय निघाला असावा !!!!

आता आपली जनता ही भांडी कशी वापरते ? पहेले पाण्याला जाऊन घागर पाण्या ने स्वच्छ धुते. हाती
राखुन्डी लागली तर ठीकच नाही तर माती, नारळाची किशी सुद्धा चालते. घागर मस्त चकचकीत झाली पाहीजे.
हे सर्व्वे आपली जनता परंपरेने करत आलीय. पण ह्याच भां ड्याच्या चकचकीत पणा मुळेच पाणी शूद्धीकरण
क्रिया सुरळीत होत होती.

ठोक्याचे भांडे !! तांब्या - पितळेची भांड्यांना आपण का ठोके लाउन घेत होतो ? उत्तर परत एकदा तेच, भांड्याचा चकचकीत पणा !

आताची परीस्थीती : ही तांब्या - पितळेची भां डी गेलीत अडगळीच्या खोल्यात. काही भंगारात काढली गेलीत.
त्या भांड्याची जागा आता फक्त वरुन चकचकीत दिसणार्या प्लास्टीकच्या भांड्यानी घेतलीय.

वरून चकचकीत दिसणारी प्लास्टीकची भांडी पाणी साठवुन ठेवण्या पलिकडे जाऊ शकतील ?

स्त्रोतः बरेच वर्षा पासुन मनात हा विषय घोळत होता. ह्या वि षया ची व्याप्ती फार मोठी आहे व सर्व जनतेची
ह्या विषया बद्दल जा गरुक ता करणे गरजे च आहे.
माहिती जाला वरुन,
http://www.inae.org/metallurgy/archives_pdf/smelt%20zinc.pdf

त. टि: समस्त पि तळे, तांबे परीवारांनी माफी ध्यावी !!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

तांबे आणि पितळ या धातुंवर प्राचीन काळी तपोमुनींनी संशोधन केले असावे ,त्यामुळेच आपल्या परंपरेत या धातुंचा वापर होत होता.संस्कृत भाषेत असे अनेक ग्रंथ आहेत ज्यामध्ये प्रचंड विज्ञान आहे.

दोन्ही बाजूंनी झालेली समग्र चर्चा वाचली
पिण्याच्या पाण्याबाबत जागृती व्हायला हवी,येणाऱ्या काळात तो अति-महत्त्वाचा प्रश्न आहे
मला वाटते भारतात पाण्याचे नैसर्गिक स्रोत इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असूनही केवळ गैर-व्यवस्थापना मुळे सगळच मुसळ केरात जातंय
असो
या बाबतीत अरबी देशांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे
मला वाटते water de-salination plants ही काळाची गरज आहे
समुद्राचे पाणी शुद्ध करून ते जनतेला शेती आणि इतर उपयोगासाठी ,तसेच औद्योगिक वापरासाठी उपलब्ध करून द्यायचे
हे न केल्यास पाण्यावरून लढाया सुद्धा होतील .............................
आवर्जून पहा----------Water - letter written in 2070
http://www.youtube.com/watch?v=txWYhWTz9QM&feature=fvst

आजच्या आधुनिक विज्ञानाचा विकास प्राचीन भारतीय ग्रंथांच्याआधारे युरोपियनांनी केला, आपले ग्रंथ तिकडे नेऊन. आपले बुप्रा मात्र त्या गोर्या लोकांचीच तळी उचलतात. तळपद नावाच्या भारतीय व्यक्तीने प्राचीन ग्रंथांच्या आधारे प्रथम विमान बनवले, आपल्या ग्रंथांमध्ये पुंजविज्ञान ,सापेक्षता जिनोमचे विस्तृत वर्णन आहे. विष्ण देवाचे अवतार म्हणजे उत्क्रांतीचे टप्पेच आहेत.

बरं. पण पाश्चात्यांनी हे सगळं विज्ञान म्हणून समोर मांडायच्या आधी बुप्रा नसलेल्या भारतीयांनी तसे का नाही केले? आताही कोणताही वैज्ञानिक शोध लागला की तो आमच्या प्राचीन ग्रंथात आधीच आहे, असं सांगत बसण्यापेक्षा, तसे सांगणार्‍यांनी त्याच प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून सध्या माहीत नसलेल्या गोष्टी प्रकाशात आणायला काय हरकत आहे?

मयेकर, जाउद्यात ना... सध्या हे वाद थांबलेत आणि माबोवर शांतता आहे हे या आयडीला बघवत नाहीये बहुदा म्हणून सगळे जुने 'वादग्रस्त' बाफ परत वरती काढायचा प्रकार चालू आहे. अनुल्लेख हा सगळ्यात उत्तम उपाय Happy

आजच्या आधुनिक विज्ञानाचा विकास प्राचीन भारतीय ग्रंथांच्याआधारे युरोपियनांनी केला, आपले ग्रंथ तिकडे नेऊन.

Biggrin

Rofl

Proud

>>> आजच्या आधुनिक विज्ञानाचा विकास प्राचीन भारतीय ग्रंथांच्याआधारे युरोपियनांनी केला, आपले ग्रंथ तिकडे नेऊन. आपले बुप्रा मात्र त्या गोर्या लोकांचीच तळी उचलतात. तळपद नावाच्या भारतीय व्यक्तीने प्राचीन ग्रंथांच्या आधारे प्रथम विमान बनवले, आपल्या ग्रंथांमध्ये पुंजविज्ञान ,सापेक्षता जिनोमचे विस्तृत वर्णन आहे. विष्ण देवाचे अवतार म्हणजे उत्क्रांतीचे टप्पेच आहेत.

यात नवीन काय आहे? या गोष्टी सर्वश्रृत व सर्वमान्य आहेत. नवीन काहीतरी सांगा.

भरत मयेकर,

>> बरं. पण पाश्चात्यांनी हे सगळं विज्ञान म्हणून समोर मांडायच्या आधी बुप्रा नसलेल्या भारतीयांनी तसे का नाही
>> केले? आताही कोणताही वैज्ञानिक शोध लागला की तो आमच्या प्राचीन ग्रंथात आधीच आहे, असं सांगत
>> बसण्यापेक्षा, तसे सांगणार्‍यांनी त्याच प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून सध्या माहीत नसलेल्या गोष्टी प्रकाशात
>> आणायला काय हरकत आहे?

अगदी अचूक प्रश्न! प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी तश्या प्रकारची राजकीय दृष्टी लागते. भारतावर अडाणी आणि अंगठाछाप लोकांचं राज्य आहे. प. वि. वर्तक या डॉक्टरांना संस्कृत ग्रंथांच्या आधारे त्वचारोपणाचं नवीन संशोधन करायचं होतं. त्याला सरकारी मठ्ठांनी कशा वाटण्याच्या अक्षता लावल्या ते इथे सापडेल (१० पानी पीडीएफ धारिका. पान क्र.३ वा 'Rhinoplasty' हुडकावा).

आ.न.,
-गा.पै.

डॉ. प वि वर्तक सूक्ष्मदेहाने मंगळावर फिरुन यायचे.... मग सर्जरी करायला त्याना कुठल्या परवानगईची गरजच काय? Proud तशीच सूक्ष्मदेहाने गुप्तरुपाने सर्जरी करायची की ! अ‍ॅलोपथीच्या पुस्तकात जर सुश्रुताचा रेफ्रन्स नसेल तर त्याच्या सिनियरने कशाला परवानगी द्यायची? भारतीय शास्त्राचा एवढा जर उदोउदो वर्तकाना करायचा होता तर ते एम एस का झाले? आयुर्वेदिक डिग्री का नाही घेतली? पोटासाठी अ‍ॅलोपथीचीच डिग्री घ्यायची, पैसाही मिळवायचा आणि कुठल्या तरी एका सस्र्जरीला परवानगी मिळालई नाही तर लगेच आमच्या शास्त्रावर परकीयानी दडपशाही केली म्हणून आक्रोशही करायचा ! Proud गंमतच की !

र्हायनोप्लास्टीच कशाला, मूळव्याधीवरदेखील अ‍ॅलोपथीत, आयुर्वेदात वेगळ्या वेगळ्या सर्जरी आहेत.. ज्यानी त्यानी आपापल्या शिक्षणानुसार जी ती सर्जरी करावी.. आयुर्वेदिक सर्जनना त्यांच्या पद्धतीने सर्जरी करायची परवानगी आहे.

भाजलेल्या जखमांवरदेखील मध लावणे, पपईचा गर लावणे, असे उपचार आयुर्वेदिकवाले करत असतात. ( हे मी स्वतः बर्न वॉर्डात पाहिले आहे..) पण हे फक्त त्या डॉकटारानाच अलाउड आहे.. अ‍ॅलोपथीच्या पुस्तकात असले कुठे विधी नसल्याने त्यानी आपल्या पुस्तकात जे आहे ते फॉलो करावे.
कुणी कुणावर दडपशाही करतो म्हणून फुकाचा आक्रोश करु नये.

सोळाव्या शतकात रानटी असलेले इंग्रज अचानक प्रगत कसे झाले? याचे खरे कारण आपला प्राचीन ग्रंथठेवा, ज्यात आपल्या साधुंपुरषांचे वैज्ञानिक व अध्यात्मीक ज्ञान भरुन ठेवले आहे.या ग्रंथाचा वापर त्यांनी केला व आपल्यावर राज्य केले. जामोप्या आदि बौद्धिक गुलामांना हे मान्य होणार नाही.

हो का? मग इंग्रज येण्यापूर्वी भारतीय रानटीच कसे होते? तेंव्हा तुमचे अगाध ज्ञान वापरुन तुम्ही प्रगत का नाही झालात?

>>> याचे खरे कारण आपला प्राचीन ग्रंथठेवा, ज्यात आपल्या साधुंपुरषांचे वैज्ञानिक व अध्यात्मीक ज्ञान भरुन ठेवले आहे.या ग्रंथाचा वापर त्यांनी केला व आपल्यावर राज्य केले.

'पिकतं तिथं विकत नाही' अशी एक म्हण आहेच

ज्ञान खुप होते, लिखित स्वरूपात देखील होते, पण वैदिक संस्कृतीच्या विरोधात असलेल्या लोकांनी ते नष्ट केले. तक्षशिला, नालंदा सारख्या विद्यापीठांमधे असलेली मोठमोठी ग्रंथालये अनेक महिने जळत होती.

जामोप्या,

१.
>> भारतीय शास्त्राचा एवढा जर उदोउदो वर्तकाना करायचा होता तर ते एम एस का झाले? आयुर्वेदिक डिग्री का
>> नाही घेतली? पोटासाठी अ‍ॅलोपथीचीच डिग्री घ्यायची, पैसाही मिळवायचा आणि कुठल्या तरी एका सस्र्जरीला
>> परवानगी मिळालई नाही तर लगेच आमच्या शास्त्रावर परकीयानी दडपशाही केली म्हणून आक्रोशही करायचा !

भरत मयेकारांना एक प्रश्न पडला होता. त्याचं उत्तर मी दिलंय. डॉक्टर वर्तकांची घटना ही प्रातिनिधिक मनोवृत्ती आहे. त्यामुळे संशोधनाची हानी कशी होते ते दाखवून दिलंय. मात्र आपल्या प्रतिसादातून या वृत्तीला पायबंद कसा घालावा ते दिसंत नाही. वर्तकांनी काय करायला हवं होतं याचा सल्ला तुम्हाला विचारला नव्हता.

तरीपण फुकटची सल्लेबाजी केल्याबद्दल आपले आभार मानावेसे वाटतात. कारण त्याचमुळे मॅकॉलेच्या कारकुंड्यांची बुद्धी कशी चालते याचं एक नितांतसुंदर उदाहरण पाहायला मिळालं. अशीच अक्कल वेळोवेळी चालवीत जा. म्हणजे आम्हाला विरोधनिरासन्यायायोगे आमचे मुद्दे स्पष्ट करता येतील.

२.
>> डॉ. प वि वर्तक सूक्ष्मदेहाने मंगळावर फिरुन यायचे.... मग सर्जरी करायला त्याना कुठल्या परवानगईची
>> गरजच काय? फिदीफिदी तशीच सूक्ष्मदेहाने गुप्तरुपाने सर्जरी करायची की !

सूक्ष्म शरीराने सूक्ष्म शरीरावर शल्यकर्म करायचे असते, तर स्थूल शरीराने स्थूल शरीरावर! एव्हढी साधी गोष्ट मॅकॉलेच्या शिक्षणात शिकवली नाही की काय तुम्हाला?

आ.न.,
-गा.पै.

सूक्ष्म शरीराने सूक्ष्म शरीरावर शल्यकर्म करायचे असते, तर स्थूल शरीराने स्थूल शरीरावर!

Proud

चुंबक,

मी केव्हाच नाद सोडलाय! Happy

पण काय आहे की, म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो.

आ.न.,
-गा.पै.

असे अतिउत्साही लोक इतरही धर्मात आहेत. कुराणातील काही आयतांची अशीच पुनाओकी ओढाताण करून big bang , embryology वगैरे आधुनिक कल्पना कुराणात आहेत असा दावा ते करतात.

दोन्ही बाजूंनी झालेली समग्र चर्चा वाचली
पिण्याच्या पाण्याबाबत जागृती व्हायला हवी,येणाऱ्या काळात तो अति-महत्त्वाचा प्रश्न आहे
मला वाटते भारतात पाण्याचे नैसर्गिक स्रोत इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असूनही केवळ गैर-व्यवस्थापना मुळे सगळच मुसळ केरात जातंय
असो
या बाबतीत अरबी देशांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे
मला वाटते water de-salination plants ही काळाची गरज आहे
समुद्राचे पाणी शुद्ध करून ते जनतेला शेती आणि इतर उपयोगासाठी ,तसेच औद्योगिक वापरासाठी उपलब्ध करून द्यायचे
हे न केल्यास पाण्यावरून लढाया सुद्धा होतील .............................
आवर्जून पहा----------Water - letter written in 2070
http://www.youtube.com/watch?v=txWYhWTz9QM&feature=fvst

आपण मातीच्या घरात का राहात होतो? आपण जाते का वापरत होतो ?बैलगाडिला बेअरींग का नव्हते? ईंग्रज गोरे तर आपण काळे का होतो? बाराव्या शतकात किती विद्यापीठे होती? मंत्रोच्चाराने रोग बरे होत होते तर आपले मंत्र युरोपीयनांनी का पळवले नाहीत? ..... Wink Proud

बॉक्साइट खनिज असुन दगड- माती यासारखे असते... त्याच्यापासून भांडे , सिंहमहाराज, तुमच्या बापाने तरी केले होते का?

Pages