लॅपटॉपशी संबंधीत समस्या

Submitted by गजानन on 18 September, 2011 - 08:41

माझा लॅपटॉप मधल्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत फारसा वापरात नव्हता. अधूनमधून वापरायचो तेव्हा नीट चालायचा.

पण हल्ली प्रत्येकवेळी सुरू होताना अखंड बीप-बीप असा आवाज करतो, पडद्यावर काहीच दिसत नाही. Esc key दाबल्यावर नेहमीसारखा चालू होतो. पासवर्ड टाकायच्या बॉक्समध्ये आधीच बर्‍याच फुल्या दिसतात. यावरून कोणती तरी कळ (key) दबलेली राहतेय असे वाटतेय. चालू झाल्यावर ० ते ९ या अंकापैकी २ आणि ८ या कळा चालत नाहीयत.

आताच असं आढळलं की k आणि i ही बटनं दाबल्यावर त्याबरोबर (लॉजिकली) शून्य हे बटन आपोआप दाबलं जातंय आणि जो पर्यंत Esc key दाबत नाही तोपर्यंत शून्य उमटत राहतोय. काय झाले असावे? दुरुस्तीला घेऊन जावे का? HP चा आहे. कृपया उपाय सुचवा. धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयबॉल चे सर्विस सेंटर डिटेल्स -

Pune
Trunal Enterprises
Shop no 34, Amar Samruddhi
building, Akashwani, Hadapsar
(Pune) - 411028

&

Pune
Sidhdhakala Services
CTS no - 1170,Shop no - 8,
Manisha chambers,
Opp.Mahalaxmi
market,Budhwar peth Pune -
411002

आयबॉलसाठीच्या बाकी सपोर्ट करता इथे पाहा...

धन्स योकु Happy
आत्ताच आलेल्या माहितीनुसार टिळकरोड च्या जवळ सर्विस सेंटरला दाखवला तर ६५० रुपये खर्च सांगितला आहे.

explore.exe = व्हायराळलाय तुमचा काम्पुटर. किडे मारायला हवेत. >>> आत्ता कुठला अ‍ॅन्टिव्हायरस वापरता आहात? एक्सपायर झालाय का?
रिसेंटली कुठून .exe फाईल घेतली होती का? पेन ड्राईव वा नेटवरून?

एक अ‍ॅन्टिव्हायरस सुचवतो - मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी इसेन्शिअल. गूगल करा सापडेल. मायक्रोसॉफ्टचाच असल्यानी काही प्रॉब्लेम होणार नाही.

योकु,
क्लीन बूटसकट, किडे मारण्याची प्रक्रिया त्यांना नीट समजवून सांगा. अन्यथा, त्याच कॉम्प्युटरवरती अँटीव्हायरस डालो करतील अन मग तो व्हायरस मरणार नाही.

सकाळपासुन लंचब्रेकपर्यंत लॅपटॉपवर काम करत असताना माऊस ठीक काम करत होता, पण आत्ता अचानकच त्याने असहकार पुकारलायं. कलिगच्या लॅपटॉपवर ट्राय करून पाहील तर तिथे व्यवस्थित काम करतोय लेकाचा.

काय प्रॉब्लेम असु शकेल ??

माझ्या याहू मेलने भरपूर दारू ढोसली असावी.
इन्बॉक्स मधे मेल येण्या ऐवजी दुसर्‍याच फोल्डरमधे जाते. शिवाय स्पॅम मार्क केलेले इ-मेलपण परत परत येतच रहातात.
असे काही आहे का की सर्व फोल्डर्स कुठेतरी बॅक अप करून ठेवता येतील नि नंतर आत्ताच याहू मेल डिलिट करून नवीन पुनः डाऊनलोड करता येईल नि सर्व फोल्डर्स परत नवीन याहू मधे. किंवा आयडि बदलून नविन आय डी च्या मेलमधे जुने फोल्डर्स कॉपी करता येतील??

काय करावे सुचत नाही. काही माहितीहि नाही.

शेवटी स्थानिक कारागिराकडून एकदाचा लॅपटॉपाचा कळफलक नवा बसवून घेतला. बटनांचा स्पर्श वेगळा वाटतोय. ओरिजिनल आहे की नाही देव जाणे. पण युएसबी कीबोर्डाचा पदर सुटला हेच खूप. आता जेवढे दिवस काढेल तेवढे काढेल!

समस्या म्हणता येणार नाही, शंका म्हणा हवे तर. स्क्रीन्शॉट मधे दाखवल्याप्रमाणे ५०० जिबी पैकी १८५ जीबी हार्डडिस्क स्पेस वापरात नाहीये असे दिसतेय. तर प्रश्न आहे की १८५ जीबीचा वेगळा ड्राईव्ह करावा लागेल का? हो, तर कसे?
Capture.JPG

हा नवीन १८५ चा ड्राईव्ह दिसतो आहे तो फॉरमॅट केलात की नवीन ड्राईव्ह दिसेल.. राईट क्लिक केलेत की पर्यार दिसतील..

एक्टर्नल हार्ड ड्राईव्ह वर डेटा कॉपी करताना प्रचंड वेळ लागतोय. बहुतेकदा रद्द करावे लागतेय (९९% वेळा).
मॅनेज मध्ये जाऊन optimize for performance करून पाहिले.
USB ला जोडलेली इतर उपकरणे काढून ठेवली.
अँटीव्हायरस बंद करून पाहिला.
शेवटी सेफ मोड मध्ये लॅपटॉप चालू केला.
हा ड्राईव्ह चेकींग नीडेड म्हणून मॅसेज आला.
ते होत असताना बॅड सेक्टर्स काढून टाकले वगैरे मॅसेजेस आले.
नंतर अमुक folder is entirely unreadable. Folder entry removed. असे एकापाठोपाठ मॅसेज दिसू लागलेत.

हे काय चालू आहे? Sad

सगळा डेटा छू मंतर होणार की काय?

Dell Inspiron 15r n5110 हा माझा लॅपटॉप आहे.
कालच डिस्प्ले गेला (तुटला/क्रॅक ). Angry Uhoh
1 पुण्यात बदलवण्यासाठी काही पर्याय आहेत का?
2 साधारण खर्च किती येईल?
3 हे करताना जास्त resulution (ओरिजिनालपेक्षा) मिळवता येईल का?

जाणकारांनी मार्गदर्शन करा, धन्यवाद.

HP Pavilion dv4 series Notebook लॅपटॉप (windows 7) मध्ये अचानक खालील समस्या उद्भवल्या आहेत, काय करता येईल ?
** अचानक कर्सर / page scroll down होते
** Esc key दाबल्याशिवाय माऊसपॅड / कळफलक सुरू होत नाही ( सुरू केल्यावर लगेच )
** एक shift key आणि backspace key चालत नाही
** कालपासून consider replacing your battery असे सूचित करतोय. बॅटरीच्या चिन्हावर लाल फुली आहे. चार्जिंग लेव्हल पॉवर सप्लाय सुरू असताना १००% दिसला तरी बंद केल्यावर ८०-८५% च दाखवतो.
बॅटरी तातडीने बदलणे गरजेचे आहे का? काही काळ तसाच वापरला तर बाकीच्या यंत्रणेला काही धोका / ईजा होऊ शकतो का?

कारवी, ऑथोराईज्ड अ‍ॅन्टीवायरस नी एकदा संपूर्ण काँप स्कॅन करा.
नंतर बॅटरी आणि पॉवर सप्लाय काढून टाका आणि लॅपटॉपचं पॉवर बटन ३० सेकंद प्रेस + होल्ड करा.
यानंतर नेहेमीप्रमाणे चालू करून पाहा. कीबोर्ड आणि कर्सर रिलेटेड सॉल्व्ह व्हायला हवे.

कीबोर्ड ब्रश नी साफ करून पाहा. स्पेशली ज्या कीज चालत नाहीत त्या.

जर पॉवर कट होत नसेल तर बॅटरी न लावता डायरेक्ट एसी इन वर काँप चालवता येतो. Though, it isn't recommended.
बॅटरी एक्स्चेंज प्रोग्राम् मध्ये नव्या बॅटरी वर बर्‍यापैकी सूट मिळू शकेल.

@ योकु, तुम्ही सुचवल्याप्रमाणे,
अ‍ॅन्टीवायरस स्कॅन + पॉवर बटन ३० सेकंद प्रेस + होल्ड करून पाहिले. चुकले काही तर म्हणून २दा केले. फरक नाही पडला.
हे करण्यापूर्वी काही कीज आपल्या आपण चालू झाल्या मध्येच आणि आता पुन्हा बंद आहेत (shift, backspace, down arrow)
बहुतेक साफ करून घ्यावा लागेल. मी उघडला नाही कधी, बाहेरून करून घेणे योग्य ठरेल ना?

बॅटरी एक्स्चेंज प्रोग्राम् मध्ये नव्या बॅटरी वर बर्‍यापैकी सूट मिळू शकेल. >>>> हे ऑनलाईन खरेदीसाठी / एचपी ऑथॉराईज्ड डीलरकडे / कुठल्याही अ‍ॅक्सेसरी स्टोअरमध्ये?

एक प्रॉब्लेम अजून आहे, २-३ वर्षापूर्वी असेच छोटे प्रॉब्लेम होऊन मग काही दिवसानी लॅपटॉप अचानक बंद पडला. पॉवर बटन दाबल्यावर सुरू न होता, scroll बटनच्या (F12 च्या बाजुला) वर एक निळा दिवा ब्लिंक व्हायचा. लॅपटॉप चालू नसल्याने इथे विचारता आले नाही / प्रतिसादातून माहिती घेता आली नाही.
रिपेअरवाल्यानी सांगितलेल्यावर विश्वास ठेवून मदरबोर्ड बदलून घेतला आणि बॅटरी पण. बॅटरी मात्र एचपी ओरिजीनल न घेता, साधी equivalent घेतली. ते चुकले बहुतेक माझे. चांगल्या मशीनची माझ्या हाताने वाट लावली.

हेच सर्व पुन्हा करायला न लागता, काही काळ हाच लॅपटॉप सुस्थितीत ठेवायला काय क रता येईल?

>>हे करण्यापूर्वी काही कीज आपल्या आपण चालू झाल्या मध्येच आणि आता पुन्हा बंद आहेत<<
वर योकुने म्हटल्याप्रमाणे किज साफ करा; एयर डस्टर्/स्प्रे ने करा जमल्यास.

>> scroll बटनच्या (F12 च्या बाजुला) वर एक निळा दिवा ब्लिंक व्हायचा.<<
तुमच्या लॅपटॉपच्या मॉडेलवर अवलंबुन आहे पण तो निळा ब्लिंकिंग दिवा वाय-फाय चालु/बंद्/सिग्नलचा किंवा डिस्क अ‍ॅक्सेस्चा असु शकतो...

लॅपटॉप सतत पॉवरवर वापरणे शक्य असेल तर बॅटरी रिप्लेस करण्याची आवश्यकता नाहि.

माझ्यामते बदललेला मदरबोर्ड प्रॉब्लेम देत असावा; रीप्लेस केलेला मदरबोर्ड ओरिजिनल/जेन्युईन एचपी चा आहे का?
बॅटरी काढून ठेवा आणि तसाच वापरा डायरेक्ट पॉवर वर. किंवा जुनी बॅटरी लावून मग वापरा.

किती जुना आहे लॅपटॉप? खर्चाचा अंदाज घ्या, फार जास्त लागत असेल तर सरळ नवीन घ्या. जुना लॅपटॉप एक्स्चेंज/कॅशिफाय वगैरे सारख्या ठिकाणी बर्‍यापैकी किंमतीत विकल्या जाईल.

धन्यवाद, राज आणि योकु,

वर योकुने म्हटल्याप्रमाणे किज साफ करा; एयर डस्टर्/स्प्रे ने करा जमल्यास. >>>> कीज साफ करते. एयर डस्टर्/स्प्रे ने घरी करता येईल? की बाहेर रिपेअर करतात ते करून देतील? मी मागे एका अल्ट कीचे डोके उचकटून ठेवले साफ करताना. त्यामुळे धीर होत नाही
आतील डस्ट पण साफ करावी लागेल ना उघडून? एयर डस्टर्/स्प्रे कुठे मिळतो?

निळा ब्लिंकिंग दिवा वाय-फाय चालु/बंद्/सिग्नलचा किंवा डिस्क अ‍ॅक्सेस्चा असु शकतो... >>> मी वाय-फाय वापरत नाही. डिसेबल केलेले आहे. तो दिवा लॅपटॉप जेव्हा नेहमीसारखा सुरू न होता बंदच राहतो पॉवर ऑन केल्यावर तेव्हाच ब्लिंकतो, एरव्ही कायम बंद असतो.

लॅपटॉप सतत पॉवरवर वापरणे शक्य असेल तर बॅटरी रिप्लेस करण्याची आवश्यकता नाहि. >>>> हो शक्य आहे, पण मला भीती अशी होती की
रिप्लेस करायच्या योग्यतेची बॅटरी तशीच भारतीय स्टाईलने रेटली तर पूर्ण मशीन / हार्ड्वेअरला काही नुकसान होईल.

**********************
माझ्यामते बदललेला मदरबोर्ड प्रॉब्लेम देत असावा; रीप्लेस केलेला मदरबोर्ड ओरिजिनल/जेन्युईन एचपी चा आहे का?
बॅटरी काढून ठेवा आणि तसाच वापरा डायरेक्ट पॉवर वर. किंवा जुनी बॅटरी लावून मग वापरा. >>> बदललेला मदरबोर्ड तीनेक वर्ष चाललाय. माहीत नाही कुठला आहे. मी विचारले तरी त्याने सांगितले नव्हते..... एनीवे सांगून तुम्हा बायकाना टेक्निकल बाबी काय कळणार अशा अविर्भावात. काढलेला मला परत हवाय सांगूनही दिला नाही. मेरे भरोसे ले जाओ.... इतकेच.

जुनी बॅटरी लावून बघते. तिलाही असाच consider replacing msg आला म्हणून बदलली होती.

किती जुना आहे लॅपटॉप? खर्चाचा अंदाज घ्या, >>>> मे २०१० ला घेतला. मदरबोर्ड मे २०१५ला ९ हजारात बदलला. बॅटरी तेव्हा ओरिजीनल ४-५ हजार आणि equivalent हजार-बाराशे होती. आता वाढले असतील. नवा एचपी ४०-६० च्या रेंजमध्ये आहे.

त्यामुळेच यालाच शक्यतो बरा करून वापरायचा आहे. तुम्ही सुचवलेले एक एक करून बघते.

***********
अजून एक, नेमके काय बिघाड झाले की हार्डवेअर इंजिनीअर मदरबोर्ड बदलावा लागेल असा निर्णय घेतो?
आणि हे नेहमीच्या वापरात येणारे छोटे छोटे प्रॉब्लेम्स, त्यामागच्या विविध शक्यता आणि आपल्याला स्वतःला साधारण काय बिघाड असू शकेल याचा अंदाज लावता येईल ही माहिती देणारे पुस्तक आहे का? की maintenance repair course करावा लागेल?
किंवा तुम्ही अशी लेखमाला सुरू करू शकाल का?

Pages