लॅपटॉपशी संबंधीत समस्या

Submitted by गजानन on 18 September, 2011 - 08:41

माझा लॅपटॉप मधल्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत फारसा वापरात नव्हता. अधूनमधून वापरायचो तेव्हा नीट चालायचा.

पण हल्ली प्रत्येकवेळी सुरू होताना अखंड बीप-बीप असा आवाज करतो, पडद्यावर काहीच दिसत नाही. Esc key दाबल्यावर नेहमीसारखा चालू होतो. पासवर्ड टाकायच्या बॉक्समध्ये आधीच बर्‍याच फुल्या दिसतात. यावरून कोणती तरी कळ (key) दबलेली राहतेय असे वाटतेय. चालू झाल्यावर ० ते ९ या अंकापैकी २ आणि ८ या कळा चालत नाहीयत.

आताच असं आढळलं की k आणि i ही बटनं दाबल्यावर त्याबरोबर (लॉजिकली) शून्य हे बटन आपोआप दाबलं जातंय आणि जो पर्यंत Esc key दाबत नाही तोपर्यंत शून्य उमटत राहतोय. काय झाले असावे? दुरुस्तीला घेऊन जावे का? HP चा आहे. कृपया उपाय सुचवा. धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काल ओ एस अपडेट केली. विंडोज ७ ला वायरस आला होता आणि ते पायरेटेड असल्याने बदलायचेच होते.

विंडोज ८ टाकली आहे, (रू. ७४०० पडले.) पण आता टाईप करताना मला त्रास होत आहे. टाईप करताना मधेच शब्द इकडे तिक्डे होणे वगैरे चालू आहे. आय ई, क्रोम, फायरफॉक्स, वर्ड, एक्सेल सर्वत्र हा प्रॉब्लेम आहे. कीबोर्ड सेटिंगमधे काही बदलायला हवे का?

अनुडोन धन्यवाद.

Compatibility View button appears in the Address bar. पण त्यावर क्लिक करून किंवा टूल्स मधे जाऊन
Compatibility View सेटिंग्स बदलून, साइट्स ची नावे त्या यादीत घालून पाहिले पण जमत नाही,

मरू दे. जे काय बघायचे आहे ते जिथे कुठे दिसेल तिथे जाऊन बघेन.
सौ. चा लॅपटॉप छान चालतो. ती घरी नसताना तिचा लॅपटॉप वापरीन.

टाईप करताना मधेच शब्द इकडे तिक्डे होणे वगैरे चालू आहे. आय ई, क्रोम, फायरफॉक्स, वर्ड, एक्सेल सर्वत्र हा प्रॉब्लेम आहे. कीबोर्ड सेटिंगमधे काही बदलायला हवे का?

कर्सर मधेच टुणकन उडी मारून इकडून तिकडे जातो. नीट बघितले नाही तर मज्जाच मज्जा. विशेषतः मी कीबोर्ड कडे बघून एक दोन बोटांनीच टाईप करत असल्याने असे काही झालेले पटकन कळत नाही.

मायबोलीकरांना हे वरदानच. कारण त्यामुळे मी मायबोलीवर लिहायचे टाळतो.

हे माझ्या वृद्धत्वामुळे, किंवा कुठेतरी माउस सेन्सिटिव्हिटीचे सेटिंग बरोबर नसल्याने होत असावे. विशेषतः क्रोमवर ही अडचण जास्त आडवी येते.

असू दे झाले. माझे काही ९०, ९५ वर्षाचे मित्र आहेत, त्यांच्या घरी काँप्युटरच नाही! नि त्यांना नकोच आहे. आता मी पण तसाच होईन.

पण सर्वांना धन्यवाद.

झक्की, हे बघा जमतंय का? आय ई अनइन्स्टॉल करताना ते प्रॉग्रॅम्स मध्ये दिसत नाही इन्स्टॉल्ड अपडेट्स मध्ये दिसते. http://answers.microsoft.com/en-us/ie/forum/ie10-windows_7/how-do-i-remo...

टाईप करताना मधेच शब्द इकडे तिक्डे होणे वगैरे चालू आहे. आय ई, क्रोम, फायरफॉक्स, वर्ड, एक्सेल सर्वत्र हा प्रॉब्लेम आहे. कीबोर्ड सेटिंगमधे काही बदलायला हवे का?

कर्सर मधेच टुणकन उडी मारून इकडून तिकडे जातो. नीट बघितले नाही तर मज्जाच मज्जा. विशेषतः मी कीबोर्ड कडे बघून एक दोन बोटांनीच टाईप करत असल्याने असे काही झालेले पटकन कळत >>

सेम प्रॉब्लेम.

नंदिनी, माझ्या मते ही समस्या Windows 8 ची नसुन Laptop Tochpad's Drivers ची असावी. जर Touchpad Off करण्याची सोय असेल तर तसे करुन मग टायपिंग करुन पहा. जर व्यवस्थित चालले तर ड्रायवर्स अपडेट कर.

काय होते ते ईथे कळव. Happy

नाही तो प्रॉब्लेम सॉफ्ट्वेअरचाच आहे. ऑफिसात विन ८ एकानी केलंय अपग्रेड विन ७ वरून, त्यालाही सेम प्रॉब्लेम आहेच. लॅपटॉप फार जूना नाहिये २ महिनेच झालेत घेऊन. बाकी मला ऑफिसात विन एक्स्पी आय ७/८, क्रोम, फाफॉ नो ईश्यूज. घरी सफारीत (मॅक) पण काहीही प्रॉब्लेम नाही...

योगेश, हा माझा प्रॉब्लेम टचपॅडचाच आहे. आधी पण मला असाच प्रॉब्लेम आला होता, तेव्हा बंधुराजांनी हेच केलं होतं. (आणि टिच्चून तीनशे रूपये घेतले होते माझ्याकडून. Happy ) मी टाईप करताना हात सहजरीत्या टचपॅडवर जातो, त्यामुळे टचपॅड ऑफ करून ठेवते कायम.

आता जमलं बघ फटाफट टाईप करायला. विन्डोज ८ चा लूक मस्त आहे पण>

आज दोनशे रुपयांचा ब्लूटूथ डाँगल आणला. मग माऊस चालला. धन्यवाद सगळ्यांना.

पण या ब्लूटूथ माऊसचे कळत नाही.... प्रत्येक वेळी लॅपटॉप चालू केल्यावर त्याला पहिल्या वेळेसारखे इन्स्टॉल करायला लागते. ब्लूटूथ चालू असल्यावर त्या डिव्हाईस लिस्टमध्ये दिसतो पण चालत नाही. एकदा लिस्ट्मधून काढून टाकून मग पुन्हा घातल्यावर चालतो. Uhoh

अगदीच बेसिक असेल हे कदाचित.
माझा लॅपटॉप आता असिस्टंटसनाही कामाला वापरावा लागतो.
माझ्या लॅपीवर माझा, कंपनीचा काही डेटा आहे जो मला असिस्टंटसनी बघायला नकोय.
लॅपटॉप मधे वेगळे यूजर अकाउंट तयार केले. ते लिमिटेड ठेवले जेणेकरून त्या अकाउंटमधून कोणी कुठलेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकणार नाही वगैरे.
माझ्या अकाउंटला पासवर्ड टाकला. माझे अकाऊंट अ‍ॅडमिन अकाउंट आहे.

पण मला केवळ ठराविक फाइल्सचा अ‍ॅक्सेस देवून बाकीच्या फाइल्स/ फोल्डर्स त्या अकाऊंटमधून दिसणार नाही असे करायचेय. ते कुठून करायचे?
हे पूर्वी एकदा केलं होतं मी. केवळ प्रोजेक्टचं वर्किंग फोल्डर ओपन ठेवलं होतं. पण आता ते कसं करायचं सापडत नाहीये.

Folder >> Right Click >> sharing & Security >> Security >>> Add >> Advanced >> Find Now.. It will display all user accounts. select the one which you do not want give access to..

Press OK . Highlight that user and click on 'Deny' check box next to Full Control.

ब्लूटूथ चालू असल्यावर वायफायला काही होतो का? मी तीनचार वेळा असं बघितलंय की नेट वारंवार डिस्कनेक्ट होतं. ब्लूटूथ बंद केल्यावर व्यवस्थित चालतं.

ब्लूटूथ चालू असल्यावर वायफायला काही होतो का? मी तीनचार वेळा असं बघितलंय की नेट वारंवार डिस्कनेक्ट होतं. ब्लूटूथ बंद केल्यावर व्यवस्थित चालतं. >>>
मी तरी केधीच असं नाही पाहिलं Sad
आता आयम्याकावर तर कीबोर्ड अन माऊस दोन्ही ब्लूटूथ वरच आहेत... (स्टँडर्ड सेटअप).

बाकी मित्र सुद्धा विंडोज लॅपटॉप वर वायरलेस ब्लूटूथ माऊस वापरतात, त्यांना पण काही अडथळे नाहीत...

मला हल्ली मी मराठीवर डेलीमोशनचे व्हिडिओ लहान साईझ मध्ये दिसतात पण मोठ्या साईझ मध्ये फक्त आवाज ऐकु येतो पण चित्र काही दिसत नाही , असं का होत असावं, आधी वाटलं होतं की व्हिडिओ लोड व्हायला वेळ लागत असेल पण हे नेहमीच होतयं. काय करावं लागेल ? काही प्लग इन मिसिंग असावेत का ?

गजानन...प्रॉब्लेम ब्ल्यू-टूथ आणि लॅपटॉपचा कॉम्बिनेशनचा आहे ..काही ब्ल्यू-टूथ डिव्हाईस वाय-फाय सिग्नल ब्लॉक करतात...पण हा प्रॉब्लेम फक्ट ठराविल लॅपटोप मध्येच येतो.

मॅकबूक प्रो मध्ये पण हा बग आहे. Sad

Folder >> Right Click >> sharing & Security >> Security >>> Add >> Advanced >> Find Now

या क्रमामधे मला शेअरींग आणि सिक्युरिटी मधे गेल्यावर सिक्युरिटी हा सेक्शनच मिळत नाहीये. Sad

नी,

open My Computer >> Tools>> Options>> View >> Advanced Settings >>> clear the checkmark on "Use simple file sharing".

Also your drve needs to be NTFS. You can verify ... Right Click on Drive letter >> Properties >> Verify if File System is NTFS. If it's FAT, security won't work.

ओके हे जमले. NTFS च आहे.
आता मी सिक्युरिटीमधे पोचलेय. पण तिथे मला वेगळ्याच युजर प्रोफाइल्स दिसतायत. administrator, creater owner, s-1-5-21 अशी सुरू होणारे एक, सिस्टीम आणि युजर्स
त्यांचं काय करायचं मला समजत नाहीये. त्या s-1-5-21 ला क्वेश्चन मार्क आहे.
सॉरी भ्रमा तुला जरा जास्तच पिडतीये.

नीधप,
तुमच्या लॅपटॉपवर अ‍ॅडमिन अकांऊट एकच असेल. युजर व गेस्ट अकाऊंट्स आहेत का? ती असतील तरच फोल्डरवाईज सेक्युरिटी एनेबल होईल. अ‍ॅडमिन हा एकच युजर एक्स्क्लुजिव असेल तर मेन पासवर्ड हेच प्रोटेक्शन आहे..

नी, तु जो युजर बनवला असशील (तुझ्या मदतनीसाकरता) तो दिसत नाहिये कां???

त्या प्रोफाईल्स च्या खाली Add >> Advanced >> Find Now.. It will display all user accounts. select the one which you do not want give access to..

Press OK . Highlight that user and click on 'Deny' check box next to Full Control.

Pages