लॅपटॉपशी संबंधीत समस्या

Submitted by गजानन on 18 September, 2011 - 08:41

माझा लॅपटॉप मधल्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत फारसा वापरात नव्हता. अधूनमधून वापरायचो तेव्हा नीट चालायचा.

पण हल्ली प्रत्येकवेळी सुरू होताना अखंड बीप-बीप असा आवाज करतो, पडद्यावर काहीच दिसत नाही. Esc key दाबल्यावर नेहमीसारखा चालू होतो. पासवर्ड टाकायच्या बॉक्समध्ये आधीच बर्‍याच फुल्या दिसतात. यावरून कोणती तरी कळ (key) दबलेली राहतेय असे वाटतेय. चालू झाल्यावर ० ते ९ या अंकापैकी २ आणि ८ या कळा चालत नाहीयत.

आताच असं आढळलं की k आणि i ही बटनं दाबल्यावर त्याबरोबर (लॉजिकली) शून्य हे बटन आपोआप दाबलं जातंय आणि जो पर्यंत Esc key दाबत नाही तोपर्यंत शून्य उमटत राहतोय. काय झाले असावे? दुरुस्तीला घेऊन जावे का? HP चा आहे. कृपया उपाय सुचवा. धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस, धन्यवाद.
फोटोंमधे जीव अडकलाय. बाकी काही नाही. Happy
आधी तर तो ड्राइव्ह अस्तित्वात नसल्यासारखा कुठेच दिसत नव्हता. कमांड प्रॉम्प्ट वरूनही अ‍ॅक्सेस होत नव्हता. तिथे असणार्‍या काही फाईल्सच्या शॉर्टकटवर क्लिक केले असता नॉट अ‍ॅक्सेसिबल म्हणून मेसेज येत होता. बराच सव्यापसव्य करून आता दिसतोय तरी पण डेटा अ‍ॅक्सेस होत नाहीये. बघते जमेल का.

ऑस चा बॅक अप नाही घेता येत. तुम्ही एखाद्या पीडीवर वा एच्डीडी वर शॅडो कॉपी करून घेऊ शकता. ती तुमच्या करंट सिस्टीम ची ईमेज असते. म्हणजेच शॅडो कॉपी करतेवेळेस जे प्रोग्रॅम्स ईन्स्टान्ल केलेले असतील, जे सेटिग्ज असतील, जेवढे युजर अकाऊन्ट असतील सगळंच बॅकअप होईल. त्यात हवं तेव्हढ सिलेक्ट नाही करता येणार बहुधा त्यामुळे त्याची साईज पण बरीच मोठी राहील.

दुसरा ओप्शन - विन्डोज बॅक अप. यात जे हव ते बॅक अप करता येते. हे एखाद्या एच्डीडी वर करता यील.

शक्यतो कुठलीही बॅक अप कॉपी ईन्क्रिप्ट करू नका, खरच जेव्हा ते वापरायची वेळ येते तेव्हा आपणच दिलेला कॉम्प्लेक्स पासवर्ड आठवत नाही अन कहर होतो. त्यातही जर विंडोज फोर्मॅट केलेल्या असतील तर मग पासवर्ड + जुन्या विंडोज चे क्रिडेन्शेअल्स चा घोळ्च होतो. बर्यापैकी अनुभव असेल तरच श्क्यतो ईन्क्रिप्शन च्या वाटेस जावे.

माझ्याकडे जेंव्हा डेस्कटॉप अ‍ॅक्टीव्ह होता तेंव्हाही माझ्याकडे ही समस्या होती, आजही आहे:

डेस्कटॉप घेतला तेंव्हा सोबत क्रिएटीव्ह चे स्पीकर्स घेतले होते. काही दिवस ते स्पीकर्स चांगले चालले. पण नंतर मात्र त्यांचा लहरीपणा सुरू झाला. लहरीपणा म्हणजे कधी त्यातून व्यवस्थित आवाज येणार तर कधी एखाद्या लांब गुहेतून आल्यासारखा आवाज येणार. तर कधी अगदी त्या स्पीकरचा गळा कोणीतरी दाबून धरल्याप्रमाणे आवाज येणार. कधी कधी खोलीतली ट्युबलाईट लावल्यावर (किंवा बंद करून चालू केल्यावर) स्पीकरचा बिघडलेला आवाज अचानक ठीक होणार. कधी ठिकठाक चाललेला आवाज त्याच्या पिनच्या वायरला किंचित धक्का लागल्यामुळे बंद होणार. आणि एकदा आवाज बंद झाला तर किंवा बिघडला तर अक्षरशः नशीब जोरावर तरच तो चालू होईल. नाहीतर तुमचा गाणी ऐकायचा मूड व्यवस्थित जळून खाक होणार. मला आधी वाटायचे की माझ्या संगणकाचे इनपुट खराब असावे. पण त्यात दुसरे स्पीकर (हेडफोन वगैरे) लागल्यावर व्यवस्थित चालते. आता मी नुकतेच काही महिन्यांपूर्वी नवीन स्पीकर्स घेतले होते. लॅपटॉपला जोडण्यासाठी. पण तेही आता हीच लक्षणे दाखवायला लागले आहेत. लॅपटॉपला मोबाईलचे हेडफोन लावल्यावर व्यवस्थित चालतात. त्यावरून प्रॉब्लेम स्पीकर्चाच असणार.

स्पीकर्सचे आयुष्य सर्वसाधारण असेच असते की माझ्याकडे काही प्रॉब्लेम होतोय?

मला नाही वाटत यात स्पिकर चा दोष असेल म्हणून. काही दुसरे कारण आहे असं वाटतय.
वोल्टेज ईश्यू, खराब वायरिंग. लूज कनेक्शन्स.

स्पिकरला युपीएस ची पावर देऊन पहा. एकदा वोल्टेज ईश्यू, खराब वायरिंग. लूज कनेक्शन्स, हेही नीट तपासा.

योकु, धन्यवाद. युपीएस तर घरी नाहीय. सध्या मी थेट भिंतीतल्या इलेक्ट्रिक खोबणीत लावतो हे स्पीकर्स. त्याऐवजी आता स्पाईक गार्डच्या खोबणीत लावून बघतो. (जिथे मी मोडेम, लॅपटॉप इ. लावतो आणि ते व्यवस्थित चालतात.)

व्होल्टेज ईश्यू वगैरे असतील तर त्याने कळेल का?

गजानन, ear cleaning bud, acetone मधे बुडवुन audio out च्या socket मधे घालुन साफ करुन पहा.

मिलिंदा, audio out म्हणजे लॅपटॉपचे ना?
(तेच असेल तर, त्यात प्रोब्लेम असता तर मोबाईलचे हेडफोनही चालायला नको होते ना?)

acetone कुठे मिळेल?

व्होल्टेज ईश्यू वगैरे असतील तर त्याने कळेल का? >>> नाही.

त्यातही जर स्पाईक गार्ड जुनं असेल तर माझा त्यावर कधीच भरवसा नाही.
बेस्ट म्हणजे, कंप्युटर / लॅपटॉप घेतानाच २.५ ते ३ हजाराचं बजेट जास्त ठेवून यूपीएस घ्यावाच.

३० ते ५० हजाराची वस्तू टिकवायला एवढे पैसे जास्त नाहीत. शक्यतो सगळ्याच कंप्युटर कंपोन्ट्सला त्यातून पॉवर मिळाली तर सहसा प्रॉब्लेम्स नाही येत.

गजानन,

मला वाटतं की तुमच्या तारांमध्ये किंवा स्पीकर्समध्ये कार्बन साठला आहे. याची इंग्रजी संज्ञा ठाऊक नाही. Sad यावर एक उपाय म्हणजे एखाद्या तत्ज्ञ माणसाकडे स्पीकर्स घेऊन जाणे आणि चाचणी करणे.

आ.न.,
-गा.पै.

गजानन,
ही स्पीकर सिस्टीम २.१ वाली आहे का?
जर असेल तर
१. सॅटेलाईट स्पीकरची अ‍ॅव्प्लीफायर बरोबर ची कनेक्शन्स चेक करा.
२. जास्त करुन एसी इन्पुट चा इश्यु वाटतो आहे मोस्टली लूज कनेक्शन
३. असल्या स्पीकर्स चे अ‍ॅडॅप्टर भलतेच जड असतात आणि एसीटुएसी असतात.

भ्रमर म्हणाला तेच मी म्हणेन...ऑडिओ आउटपूट सॉकेट साफ करून पाहा.
स्पीकरचे असे वागणे हे कैक वेळेला व्हॉल्यूम कंट्रोलमुळेही होते...त्यात धूळ गेल्यामुळे किंवा त्याचा कार्बन ट्रॅक नियमित वापरामुळे खराब होतो आणि मग तो खरखर निर्माण करतो,आवाज कमी होतो, स्टिरिओचा मोनो वाजायला लागतो(एकाच स्पीकरमधून आवाज) असं बरेच काही वेगवेगळे त्रास सुरु होतात...व्हॉल्यूम कंट्रोलमध्ये एक थेंब स्विच क्लिनिंग ऑईल किंवा अगदी घरातील कोणतेही तेल(अर्धा ते एक थेंब) घालून तात्पुरते काम होईलही...पण ह्याचाही उपयोग न झाल्यास नवीन स्पीकर्सच घेणं उत्तम!

मझ्याकडे झेनिथ कंपनीचे स्पीकर्स आहेत.१९९९ मध्येसेझेनिथ ब्र्यान्डचा डेस्क्टॉप घेतला होता त्यासोबत आलेले. त्यावर दोन तीनदा देस्क्टॉप अपग्रेड केला पण स्पीकर उत्तम चालताहेत त्यामुळे अ‍ॅन्टिक पीस म्हणून तेच वापरतोय. १४ वर्षे झाली Happy

गजानन,

तुमच्या स्पीकरची साऊंड आणि पॉवर कनेक्शनस dry solder झाली आहेत असे प्रथमदर्शनी वाटते. Soldering gun असल्यास सगळे points नव्याने solder करून पहा.

अ‍ॅसिटोन.. = नेल पेंट रीमुव्हर.
देवकाका म्हणतांत तसं व्होल्युम कंट्रोल्मधे तेलाऐवजी अ‍ॅसिटोनचा थेंब टाकुन फिरव. तिथे कार्बन असेल (खरं तर oxidized) तर निघुन जाईल.

भ्रमर, व्हॉल्यूमकंट्रोल म्हणजे एक व्हेरिएबल असा कार्बन रेझिस्टर असतो..म्हणून त्यात कोणतेही अल्कोहलिक द्रव्य टाकू नये...त्याने तो कार्बन ट्रॅक(हाच रेझिस्टर) खंडित होऊ शकतो....म्हणून केवळ धूळ साचली असेल तर तेलाच्या थेंबाने ती वाहून जाऊन व्हॉकं नीट काम करायला लागतो असा अनुभव आहे...इतकं करून नाहीच झालं तर ?
तर व्हॉकं बदलावा लागतो...पण हल्ली ही असली छोटी कामं कुणी करत नाहीत...सरळ स्पीकरसेट बदलून टाकतात. Happy

लॅपटॉपच्या टचपॅडचे स्क्रोलिंग बंद पडलेय अचानक. काय करावे?
या लॅपटॉपवर काहीही खर्च करणार नाहीये तेव्हा 'अमुक ठिकाणच्या तमुक फोल्डरमधे ढमुकवर क्लिक करून गमुक ऑप्शन बंद/चालू करणे' यापासून 'आता हे असेच चालायचे. धकव थोडे दिवस' इथपर्यंत या रेंजमधले उपाय सांगा Happy

टचपॅडवरच शेजारी स्क्रॉल लॉक बटन असेल तर चुकून दाबले गेलेले नाही, हे तपासून पाहा.
नॉर्मली ते दाबले तर तसे दर्शवणारी छोटी लाईट लागते. नेहमी न दिसणारी अशी एखादी लाईट दिसतेय का कळफलकावर हे पाहा.

कुठल्याही कंप्यूटर दुकानातून १००/१५०/- चा यूसबी माऊस घे अन वापर. तो उंदीर नंतर जेव्हा केव्हा नवा लॅपी घेशील तेव्हाही वापरता येईल...

सिस्टीम ट्रे (स्क्रिन च्या बॉटम-राईट कॉर्नर ला असलेले आय्कॉन्स) मधे pointing device च्या आय्कॉनवर क्लिक करुन स्क्रोलिंग ऑप्शन enable आहेत का याची खात्री करा.

टचपॅडवरच शेजारी स्क्रॉल लॉक बटन असेल तर चुकून दाबले गेलेले नाही, << नाहीये माझ्या टचपॅडला.
नुसतं टचपॅड ऑन ऑफ आहे. की नुसतं कीबोर्डच्या इथलं स्क्रोल लॉक बघायचं?

योग्या, एसरचे टचपॅड चालू ठेवले की टायपिंग करताना हाताने आपोआप स्क्रोल होते त्यामुळे मी बहुतेकदा माऊसच वापरते पण फिरतीवर वगैरे माऊस शक्य नसतो आणि सगळीकडे माऊससाठी सरफेसही नसतो.
आणि मुळात लॅपी हा माऊसशिवाय वापरता येण्यासाठी असतो.

कोल्डकॉफी, >> pointing device च्या आय्कॉनवर <<
हा आयकॉन म्हणजे आयताकृती ग्रे कलरचा पडदा असतो का ज्यावर टचपॅडवर बोट फिरवले असता हिरव्या रंगाने आपल्या हालचालीची दिशा दिसते? तर तो आयकॉनच दिसेनासा झालाय.

नीधप >>
right click anywhere on your desktop, on meun click on "Personalization", click on "Mouse Pointers", it will bring up mouse properties box, there is a tab " xxx Touchpad" click on the picture of touchpad, it will bring up touchpad box, look down at the bottom on the left side and check mark " Display icon on Task Bar"

टॅबलेटच्या स्क्रीनला स्कॅच गेला आहे. आता ऑपरेट होत नाही. तर पुण्यात दुरुस्तीला कुठे न्यावे. आणि साधारण किती खर्च येइल Uhoh

लॅपटॉप मधे आधी explore.exe नावाने popup येत होता आता लॅपटॉप बन्द आहे

explore.exe बद्दल गुगुलु न पाहिल्या वर हिड्डन फाईल्स माहिती येत आहे

Pages