Submitted by गजानन on 18 September, 2011 - 08:41
माझा लॅपटॉप मधल्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत फारसा वापरात नव्हता. अधूनमधून वापरायचो तेव्हा नीट चालायचा.
पण हल्ली प्रत्येकवेळी सुरू होताना अखंड बीप-बीप असा आवाज करतो, पडद्यावर काहीच दिसत नाही. Esc key दाबल्यावर नेहमीसारखा चालू होतो. पासवर्ड टाकायच्या बॉक्समध्ये आधीच बर्याच फुल्या दिसतात. यावरून कोणती तरी कळ (key) दबलेली राहतेय असे वाटतेय. चालू झाल्यावर ० ते ९ या अंकापैकी २ आणि ८ या कळा चालत नाहीयत.
आताच असं आढळलं की k आणि i ही बटनं दाबल्यावर त्याबरोबर (लॉजिकली) शून्य हे बटन आपोआप दाबलं जातंय आणि जो पर्यंत Esc key दाबत नाही तोपर्यंत शून्य उमटत राहतोय. काय झाले असावे? दुरुस्तीला घेऊन जावे का? HP चा आहे. कृपया उपाय सुचवा. धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भ्रमा तुला फोन करू का?
भ्रमा तुला फोन करू का?
मला रंगीत प्रिंटर घ्यायचा
मला रंगीत प्रिंटर घ्यायचा आहे. कमी खर्चात जास्तित जास्त प्रिंट देणारा हवा...
नीधप. खालिल लिंकचा काहि उपयोग
नीधप.
खालिल लिंकचा काहि उपयोग होतो का ते पहा.
http://www.dummies.com/how-to/content/how-to-change-shared-folder-permis...
<<< मला हल्ली मी मराठीवर
<<< मला हल्ली मी मराठीवर डेलीमोशनचे व्हिडिओ लहान साईझ मध्ये दिसतात पण मोठ्या साईझ मध्ये फक्त आवाज ऐकु येतो पण चित्र काही दिसत नाही , असं का होत असावं, आधी वाटलं होतं की व्हिडिओ लोड व्हायला वेळ लागत असेल पण हे नेहमीच होतयं. काय करावं लागेल ? >>> कोणी सांगु शकेल का ह्या विषयी ?
भ्रमा, सॉरी सांगायचेच
भ्रमा, सॉरी सांगायचेच राह्यले. जे करायचे होते ते जमलेतुझ्या पद्धतीने. पण मग नंतर बरेच घोळ होतायत. उदाहरणार्थ असिस्टंटसना अॅक्सेस दिलेल्या फोल्डरमधल्या आधीच्या कुठल्याच फाइल त्यांना डिलीट करता येत नाहीयेत.
माझ्या प्रोफाइलमधून गेल्यावर मला पण काही फोल्डर्सना अॅक्सेस डिनाईड येतोय.
दर वेळेला मी सगळी प्रोसिजर परत करतेय. रीबूट आणि परत सगळी प्रोसिजर एवढ्याने सध्या सॉल्व्ह होतोय प्रॉब्लेम.
सॉल्व्ह होईनासे झाले तर मात्र माझ्या बुद्धीबाहेरचे.
स्वलेकर, माझ्याकडे विंडोज ७
स्वलेकर, माझ्याकडे विंडोज ७ नाहीये. अजून XP च आहे.
माझ्याकडे एसरचा लॅपटॉप आहे तो
माझ्याकडे एसरचा लॅपटॉप आहे
तो मी दोन वर्षांपुर्वी घेतलेला. पुर्वी (वर्षभर) एकदा फूल चार्जिंग केला की तो किमान ६-७ तास चालायचा, आता तो फूल चार्ज केला की अडिच तास (मॅक्स) चालतो...
सर्विस सेंटरवाले म्हणतयेत हे बरोबर आहे...वर्ष-दोन वर्ष चालवल्यावर लॅपी इतकाच चालतो.
हे बरोबर आहे का?
आणि बरोबर असेल तर मग जसे दिवस वाढत जाणार तस अजुन चार्जिंग लागणार का?
रिया.- Yes, this is normal
रिया.-
Yes, this is normal with Windows laptops. Maazhyaa Vaio cha pan ha issue hotach. Pahilya warshee 3-3.5 taas chalaayachaa pan nantar faar faar tar 2 taas.
योगेश पण ३.३० तासाचे २ तास
योगेश पण ३.३० तासाचे २ तास होणं ठिक आहे
पण ५-६ तासाचे एकदम २ तास?????
आणि मग असच होतं रहाणार का?
काही वर्षांनी मला माझा लॅपी डेस्कटॉपसारखा (चार्जर लावूनच) वापरावा लागणार का?
बॅटरी बदला की रिया ताई.. हा
बॅटरी बदला की रिया ताई.. हा विंडोजचा प्रॉब्लेम नसून वापरल्या जाणार्या बॅटरीचा प्रॉब्लेम आहे.. कालांतराने बॅटरीचे लाईफ कमी होते त्यामुळे त्यात स्टोअर होणारा चार्ज कमी होतो आणि मग बॅटरीवर लॅपटॉप कमी वेळ चालतो... नवीन बॅटरी टाकली की परत व्यवस्थित चालेल.
असिस्टंटसना अॅक्सेस दिलेल्या
असिस्टंटसना अॅक्सेस दिलेल्या फोल्डरमधल्या आधीच्या कुठल्याच फाइल त्यांना डिलीट करता येत नाहीयेत.>>> त्या फोल्डरला त्यांच्या युजरसाठी full access दे.
सगळं झालं करून. काही फाइल
सगळं झालं करून. काही फाइल डिलिट करता येतात तर काही करता येत नाहीत. हे कॉन्स्टंट आहे.
मला अॅक्सेस असायला हवा अशीही काही फोल्डर्स मला ओपन करता येत नव्हती. अॅक्सेस डिनाइड येत होता. फुल अॅक्सेस करूनही.
मग मी दुसरी प्रोफाइल डिलीट केली. माझा पासवर्ड काढून टाकला. सिंपल शेअरींग ओके केलं. रिबूट केला आणि मग परत सिंपल शेअरींग काढून सगळी प्रोसेस परत केली. आता माझ्या मला तरी ओपन होतायत.
अरेरे तुला त्रास झाला
अरेरे
तुला त्रास झाला 
छे त्रास कुठे? मला इतपत जमलं
छे त्रास कुठे?

मला इतपत जमलं हेच खूप आहे आणि जे काय घोळ झाले त्यात माझा डेटा हरवला नाही मधल्यामधे हे अजून खूप.
पण माझ्याच प्रोफाइलला काही फोल्डर आणि फाइल्सना मला अॅक्सेस डिनाइड येते ते कसे काय? आणि मलाच जर अॅक्सेस डिनाइड असेल तर मग कुणाला अॅक्सेस असेल? माझी प्रोफाइल कॉम्प अॅडमिनिस्ट्रेटर प्रोफाइलच आहे तरी मग एक अॅडमिन प्रोफाइल दिसते Folder >> Right Click >> sharing & Security >> Security इथे पोचल्यावर ती कोणाची? तिथे कसे पोचायचे?
असे बरेच प्रश्न पडलेले आहेत. कधीतरी डोके खाणार तुझे याबद्दल.
हिम्स बॅटरी महाग आहे पण
हिम्स

बॅटरी महाग आहे
पण सगळ्याच लॅपटॉपच असं होतं का?
नॉर्मल आहे म्हणजे हे...
है ना?
नी, त्यापेक्षा तुझ्या
नी, त्यापेक्षा तुझ्या लॅपटॉपचा रीमोट अॅक्सेस घेईन मी , तुला आणि मला वेळ असेल तेव्हा.
रिया. , Acer साठी १ वर्ष वॉरंटी सहित बॅटरी १६०० ला मिळु शकेल. (मॉडेलनुसार किंमत बदलते)
लॅपटॉपच्या वयोमानानुसार बॅटरी खंगत जाते हे अगदी नॉर्मल आहे. नवीन बॅटरी घातल्यावर १५ दिवसांतुन एकदातरी बॅटरी फुल्ल डिसचार्ज करत जा, यामुळे बॅटरीचे वयोमान वाढु शकेल.
ओके मी जिथे चौकशी केली तिने
ओके

मी जिथे चौकशी केली तिने मला बॅटरीची किंमत ५००० सांगितली
पहाते अजुन चौकशी करून....
थँक्स!
काही वर्षांनी मला माझा लॅपी
काही वर्षांनी मला माझा लॅपी डेस्कटॉपसारखा (चार्जर लावूनच) वापरावा लागणार का?
<<
हो.
माझी ब्याटरी फ़क्त ७ ते ८ मिनट देते.
रिया, तोच लॅपी किती वर्ष
रिया, तोच लॅपी किती वर्ष चालवायचाय तुला?
टॉप एन्ड कॉन्फिगरेशन्स सुद्धा ३-४ वर्षांनी एन्शन्ट वगैरे म्हणता येईल अशी मागास होतात.
आम्ही एक लॅप्टॉप २००७ पासून
आम्ही एक लॅप्टॉप २००७ पासून चालवला, गेल्या महिन्यात साफच गेला तो. मग आता डेस्क्टॉप घेतला आहे.
भ्रमा, त्या लॅपटॉपमधील हार्ड डिस्कमधला डेटा आता काढून घ्यायचा झाल्यास कसा काढायचा?
नंदिनी, २५०-३५० रु. पर्यंत
नंदिनी, २५०-३५० रु. पर्यंत USB hard disk casing मिळते. त्यात तुझ्या जुन्या लॅपटॉपची डिस्क लाव आणि डेटा काढुन घे. नंतर तुला ती as a backup drive म्हणुन देखिल वापरता येईल.फक्त जुनी डिस्क SATA or IDE (PATA) ते पाहुन मगच casing घे.
पिंपरीत शगुन चौकात एक
पिंपरीत शगुन चौकात एक फटाक्याचे दुकान आहे तिथे बॅटरी एकदम स्वस्त मिळेल ..... फटाके नाही मिळत.. पण बोर्ड तोच आहे.
बॅटरीतुन फटाके नाही ना वाजत ?
बॅटरीतुन फटाके नाही ना वाजत ?
श्री शक्यता नाकारता येत नाही.
श्री

शक्यता नाकारता येत नाही.
रिया, रिचार्जेबल ब्याटरी
रिया, रिचार्जेबल ब्याटरी कोनतीही असो म्हणजे रिचार्जेबल सेल्ल, मोबईल ब्याटरी, लॅपीची बॅटरी , टॉर्च ची वगैरे त्याचे चार्जिन्ग सायकल्सची संख्या अंदाजे ठरलेली असते . तेवढी सायकल्स झाली की बॅटरीची चार्जिन्ग कप्यासिटी कमी होऊ लागते. बर्याचदा आपण अर्धी बॅतरी शिल्लक असताना पुन्हा चार्जिंगला लावतो , विशेषतः मोबाईल व लॅप , त्यामुळे एक सायकल खर्ची पडते. म्हणून सर्वत्र बॅटरी पूर्ण ड्रेन होऊ द्या असा सल्ला दिलेला असतो. नन्तर बॅटरी चार्जे व्हायची थाम्बते व मेन्सवर लॅप चालवावा लागतो. मोबाईलच्या बाबतीत तर तेही शक्य होत नाही. लॅपच्या बाबतीत दीड दोन वर्षात बॅटरीची चार्जिंग कपॅसिटी सम्पते व नवी बॅटरी जी ५-६ हजारात वरिजिनल मिळते. त्यातही सिक्स सेल व नाईन सेल असे प्रकार असतात अर्थात किमती त्यानुसार वाढतात. तेव्हा ६ सेल की ९ सेल पाहून घ्यावे.बॅटरी एकसंध दिसत असली तरी त्यात आत सेल असतात पण बॅतरीच्या आकारावरून कळते. लॅपटॉप हे रिकरिंग एक्ष्पेन्डिचरचे प्रकरण आहे. मी माझ्या लॅपीची ३ बॅट्र्या बदलल्या आहेत
बहुतांश वेळ लॅपटॉप जर
बहुतांश वेळ लॅपटॉप जर चार्जींग अवस्थेतच वापरला जात असला तर या सायकलांची बचत होते का?
इलेक्ट्रॉनिक गार्बेज (पेन्सिल
इलेक्ट्रॉनिक गार्बेज (पेन्सिल सेल्स, लॅपटॉप बॅटरी, लॅपटॉपचा किबोर्ड)ची आपल्याकडे विल्हेवाट कशी लावायची? या गोष्टी नेहमीच्या कचर्यात टाकणं योग्य वाटत नाही.
हे वाचा -
हे वाचा - http://www.apple.com/batteries/
हेच टेक्निक सगळ्याच ब्याटर्यांना लागू होतं. या लिंक मधे चार्ज सायकल पण सांगीतली आहे.
आजकाल सगळीकडेच लिथिअम आयन बॅटरीज वापरतात. ह्या बॅट्रीज पूर्ण डीसचार्ज न करता रीचार्ज केल्यात तरी चालतात.
वरच्या पोस्टीत जे सांगितलंय ते निकेल कॅडमिअम बॅटरीज ना लागू होत असे. उदा. नोकिया ३३१०/३३१५.
होय योगेश
होय योगेश
नी, मला अगदी दर वर्षी नवा
नी, मला अगदी दर वर्षी नवा लॅपी घ्यावासा वाटतो ग पण आई बाबांना कोण समजवणार हे सगळं
इन्शॉर्ट आणखी १,२ वर्षात मला बॅटरी नाही तर लॅपटॉप बदलावाच लागेल

डेस्कटॉपच बेस्ट की मग
Pages