Submitted by गजानन on 18 September, 2011 - 08:41
माझा लॅपटॉप मधल्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत फारसा वापरात नव्हता. अधूनमधून वापरायचो तेव्हा नीट चालायचा.
पण हल्ली प्रत्येकवेळी सुरू होताना अखंड बीप-बीप असा आवाज करतो, पडद्यावर काहीच दिसत नाही. Esc key दाबल्यावर नेहमीसारखा चालू होतो. पासवर्ड टाकायच्या बॉक्समध्ये आधीच बर्याच फुल्या दिसतात. यावरून कोणती तरी कळ (key) दबलेली राहतेय असे वाटतेय. चालू झाल्यावर ० ते ९ या अंकापैकी २ आणि ८ या कळा चालत नाहीयत.
आताच असं आढळलं की k आणि i ही बटनं दाबल्यावर त्याबरोबर (लॉजिकली) शून्य हे बटन आपोआप दाबलं जातंय आणि जो पर्यंत Esc key दाबत नाही तोपर्यंत शून्य उमटत राहतोय. काय झाले असावे? दुरुस्तीला घेऊन जावे का? HP चा आहे. कृपया उपाय सुचवा. धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्स लोक्स
धन्स लोक्स
लॅपटॉप अपग्रेड करता येत नाही
लॅपटॉप अपग्रेड करता येत नाही हा त्याचा एक दोष...
रॉबिन, मी घेतला माझा सोनी
रॉबिन, मी घेतला माझा सोनी अपग्रेड करुन. १ टीबी डिस्क आणी ४ जिबी मेमरी. विन्डोज ७ चालत आहे झकास ...
तेवढेच करता येते. प्रोसेसर
तेवढेच करता येते. प्रोसेसर वगैरे नाही
आजकाल सगळीकडेच लिथिअम आयन
आजकाल सगळीकडेच लिथिअम आयन बॅटरीज वापरतात. ह्या बॅट्रीज पूर्ण डीसचार्ज न करता रीचार्ज केल्यात तरी चालतात. <<< योगेश, ओके. धन्यवाद.
लॅपीची यू एस बी पोर्टस बदलता
लॅपीची यू एस बी पोर्टस बदलता येतात का?
आणि पीसीची बदलता येतात का?
पेन ड्राइव्ह, एक्स्टर्नल हार्ड डीस्क, कॅमेरा, डेटा डाँगल, फोन, श्री लिपीचे यूएसबी लॉक काहीही वापरायचे तर कनेक्ट न होणे, झाले तर थोड्यावेळाने हँग होणे, मधेच नॉट कनेक्टेड होणे असं बरंच काय काय होतंय. दोन्ही मशिन्सवर.
वेगळ्या नवीन मशिनला लावून पाह्यल्यावर ह्या सगळ्या गोष्टी सुतासारख्या सरळ चालतायत त्यामुळे हे सगळेच सामूहिकरित्या बिघडले नसावे..
सामुहिक व्हायरस अस्ण्याची
सामुहिक व्हायरस अस्ण्याची शक्यता जास्त.
भ्रमा, तू सांगू शकशील का?
भ्रमा, तू सांगू शकशील का?
नी, व्हायरसकरता स्कॅन करुन
नी, व्हायरसकरता स्कॅन करुन बघ.
ते सगळं झालंय. पिसीच्या
ते सगळं झालंय. पिसीच्या सीपीयू टॉवरचे फ्रंट यू एस बी पोर्टस बोंबललेत. मागचे नीट चालतायत.
लॅपीच्या ३ पैकी एक अजिबात चालत नाही. बाकीचे दोन मूड के अनुसार.
माझ्या माहितीनुसार जनरली पीसी
माझ्या माहितीनुसार जनरली पीसी चे समोरचे यूएसबी पोर्ट्स लवकर गंडतात. त्यामानानी मागचे जवळजवळ लाईफलाँग चालतात.
कारण - मागचे पोर्टस डायरेक्ट मदरबोर्ड वर असतात. पुढचे मात्र काही केबल वा तत्सम वापरून टाकलेले असतात. पीसी चा मदरबोर्ड पाहिल्यावर हे लगेच लक्षात येतं.
नं.२ - अन बहुधा हाच प्रॉब्लेम असतो तो म्हणजे धूळ. पोर्टच्या आतली धूळ झटकून मग ट्राय कर.
नीधप | 26 September, 2013 -
नीधप | 26 September, 2013 - 03:21
ते सगळं झालंय. पिसीच्या सीपीयू टॉवरचे फ्रंट यू एस बी पोर्टस बोंबललेत. मागचे नीट चालतायत.
लॅपीच्या ३ पैकी एक अजिबात चालत नाही. बाकीचे दोन मूड के अनुसार.
>>
१) PC चालु करताना F2 दाबुन USB interface ON आहे का पहा.
२) तो प्रॉब्लेम नसेल तर ९९% तुझ्या पेरिफेरल्सना पॉवर कमी पडते आहे.
http://www.tomshardware.com/answers/id-1662149/usb-ports-give-power.html
कॉमन प्रॉब्लेम आहे हा.
एक जुनीच समस्या - इन्टरनेट
एक जुनीच समस्या - इन्टरनेट एक्स्प्लोरर १०, किंवा ९ काहीच धड चालत नाही, म्हणून एक दोनदा uninstal, install करून पाहिले, काही फरक नाही. आता ते uninstal करायचे तर कुठे आहे तेच सापडत नाही. प्रोग्रॅमच्या यादीत नाही, अॅड ऑन मधे नाही.
बरे गूगल क्रोम वर मायबोली वर लिहायला अनेक समस्या - यादी लांबलचक, मुख्यतः कंट्रोल \ करून इंग्रजी लिहावे तर ते होतच नाही!!! मायबोलीवर होते. पण तिथे भारतीय सिनेमे, TV बघता येत नाहीत!
तर मायबोलीवर लिहीता येत नाही हे तुम्हाला एक वरदानच आहे, पण मला इतर अनेक गोष्टी करायच्या असतात त्यासाठी तरी काही मार्ग सुचवा.
firefox वापरा. adblock
firefox वापरा.
adblock extension install करा त्याच्यावर नाहितर भलतीसलतीकडे क्लिक कराल नि नंतर आम्हालच म्हणाल
इंटरनेट एक्स्प्लोरर १०
इंटरनेट एक्स्प्लोरर १० साठी
Select "Turn Windows features on or off"
You will get a message "Do you want to allow, etc............YES
UNCHECK the box next to Internet Explorer 10
OK
restart your computer for the change to take effect.
नीधप, जो चालतोय त्याला
नीधप, जो चालतोय त्याला युएस्बी हब जोडता येईल. असा किंवा तत्सम
http://www.bestbuy.com/site/rocketfish-153-4-port-usb-2-0-hub/9775443.p?...
नुकताच HP Pavilion laptop
नुकताच HP Pavilion laptop घेतला आहे. त्यात Windows 8 व IE 10 आहेत.
मी गमभन उघडल्यावर New Document किंवा View वर क्लिक केले की आधी मधल्या खिडकीत मराठी टाईप करता यायचे. आता येत नाही. The center window becomes blank but it is not editable i.e., I cannot type there at all.
मी Compatibility mode ON केला आहे. त्यामुळे मराठी संकेतस्थळांवर मराठी टंकलेखन करता येते पण gamabhana मधे नाही.
काय करावे?
मला PowerShot A2000 IS या
मला PowerShot A2000 IS या कॅमेर्यातून व्हिडिओ शूट केलेल्या फाईली माझ्या लॅपटॉपवर उघडता येत नाहीत. आधी येत होत्या. नंतर लॅपटॉप फॉरमॅट झाला. त्यानंतर या फाईली उघडता येत नाहीत. कॅमेर्यासंबंधीत सॉफ्टवेअर
टाकावे लागेल असे वाटले होते. म्हणून CameraWindow DC 8.8 for Windows टाकून पाहिले पण तरीही उपयोग झाला नाही. काय करावे लागेल कोणी सांगू शकेल का?
विंडोज ८ ......... अत्यंत
विंडोज ८ ......... अत्यंत डोकेफिरी नावाचा प्रकार आहे....
सुरुवात कुठुन करावी हे शोधावे लागते........त्यात टचस्क्रिन नसेल तर अजुन वैतागवाडी......... शटडाउन कुठुन करावे हे शोधण्याकरीता कंम्पुटर गावभर केला........
विन ८ सुपर फ्लॉप गेलय. आणि
विन ८ सुपर फ्लॉप गेलय. आणि अॅपलची नवी ओएस १० मॅव्हरिक्स फुक्कट मिळ्तेय...
ओएस १० मॅव्हरिक्स फुक्कट
ओएस १० मॅव्हरिक्स फुक्कट मिळ्तेय>>> कोणी केलीय काय? लुक्स एकदम झकास दिसताहेत. मग फुकट का देताहेत? अॅपलवाले काहितरी फुकट देताहेत
टेस्टींग आहे की क्काय? 
नोप. मी केली २२ तारखेलाच. ~
नोप.
मी केली २२ तारखेलाच. ~ ५.५ जीबी चं डाऊन्लोड करावं लागलं. अग्दीच सोप्पं आहे ईन्सटालेशन. ओवरऑल मस्तच आहे. सगळ्यात जास्त आवडलेलं म्हणजे फाईंडर / एक्स्प्लोरर टॅब्स. कलर टॅग्स. आता आयवर्क (पेजेस = वर्ड , कीनोट = पॉवरपॉईंट , नंबर्स = एक्सेल) हे फ्री मिळताहेत. आयबुक्स अन मॅप्स चं अॅप पण मस्तच आहे.
जवळ जवळ सगळेच जुने अॅप कंपॅटिबल आहेत. एकही अॅप वेगळं अप्डेट/ रीईंन्सटाल नाही करावं लागल.
बाकी बॅटरी वर किती फरक पडतो ते नाही कळालं अजून.
आता हे सगळे फिचर्स येतील पाठोपाठ विंडोज ला...
हे मॅव्हरिक्स ईंटेल बेस्ड
हे मॅव्हरिक्स ईंटेल बेस्ड सिस्टीमवर होईल का ईंस्टाल?
बाकी बॅटरी वर किती फरक पडतो
बाकी बॅटरी वर किती फरक पडतो ते नाही कळालं अजून.>>> तेच शोधत होतो. या आठवड्यात करेन अपडेट. अपदेट करायच्या अगोदर आय वर्क देताहेत का? सध्या मायक्रोसॉफ्टच वापरत आहे पण आय वर्क वापरायची खुप इच्छा आहे.
अनेक धन्यवाद.
साडे पाच जीबी??? फक्त ऑस??
साडे पाच जीबी??? फक्त ऑस?? भारीये
गौतम, माझा आयमॅक ईंटेल
गौतम, माझा आयमॅक ईंटेल बेस्ड्च आहे.
ईब्लीस, विन ७ ची डीवीडी पण जवळ जवळ ४.५ जीबी आहेच ़की! अन ईन्स्टाल झाली की १२/१५ जीबी जातेच ना ड्राईव वर.
मॅक वर पूर्ण हार्डड्राईव वापरता येते. ५०० जीबी असेल तर पूर्ण ५०० जीबी वापरायला मिळ्ते सेम विथ पेन्ड्राईव.
निपा- आयवर्क बहुधा ऑस अप्ग्रेड नंतर फ्री आहे. नवीन आयवर्क लईच सोपं आहे. आताच एकाला फोनून विचारलं, ब्याटरी जरा जास्तवेळ जातेय म्हणाला. त्याचा मागच्या वर्षी घेतलेला मॅबु एअर आहे
नाही मी आजच विन 7 खरेदी केले
नाही मी आजच विन 7 खरेदी केले वेबसाईट वरून 1.2 जीबी आहे फक्त
लॅपटॉप बंद करताना प्रत्येक
लॅपटॉप बंद करताना प्रत्येक वेळी ''फोर्स शट डाउन'' करावे लागत आहे, कोणतेही टास्क चालु नसताना !!! .टास्क मॅनेजर पण एंपटी दिसतो तरीही बंद करताना फोर्स शटडाउन करावे लागते.साधारण दोन-तिन महीन्यांपासुन असे होत आहे. असे का होते आहे हे कुणी सांगेल का ?
इनअॅक्सेसिबल हार्ड
इनअॅक्सेसिबल हार्ड ड्राइव्हमधला डेटा रिकव्हर करण्यासाठी चांगले टुल कोणाला माहित आहे का?
लॅपटॉपचा एक ड्राइव्ह अॅक्सेस होत नाहीये. फॉर्मॅट करा म्हणतोय. त्यात काही महत्त्वाचे डॉक्स आणि खुप सारे फोटो आहेत. काय करावे? ओएस विन७ आहे.
माधवी. फॉर्मॅट करा म्हणतोय
माधवी.
फॉर्मॅट करा म्हणतोय म्हणजे प्रॉब्लेम मोठा असावा. जाणकार माहिती देतीलच.
मी कोणे एके काळी डेटा रिकवरीसाठी १० हजार रुपये मोजलेत. त्याकाळचा एक पगार. नंतर रिट्रोस्पेक्टिवली लक्षात आलं, की तितकं महत्वाचं नसतंय ते.
शेवटी तुमचा दृष्टीकोण आहे. मी माझा अनुभव नोंदलाय फक्त.
Pages