आमच्या घरचा गणपती

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 08:09

गणपती एकच असला तरी घरोघरी त्याचं रूप वेगवेगळं असतं, त्याच्या स्वागताचा थाट वेगळा असतो, त्याची सजावट वेगळी असते.

आपल्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सारे उत्सुक आहोत. इथे आपण आम्हाला आपल्या घरी बसवलेल्या गणपतीचे दर्शन फोटोद्वारे देऊ शकता. सजावट कशी केली आहे, त्यामागील उद्दिष्ट, कल्पना, उत्सव कसा साजरा करता इ. सर्व काही आम्हाला ऐकायला आवडेल.

Lajojee Ganpati 0831.jpg

(लाजोच्या घरचा यंदाचा गणपतीबाप्पा)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या घरचा गणपती बाप्पा!!

मखर आणि मूर्ती फक्त 'निवडण्यात' माझा सहभाग, बाकी घरी जोडणी करण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाहीये. मूर्ती पेणची शाडूची आहे (असे सांगितले होते खरे). जास्वंदीचे फुल खरे आहे. Happy

ॐ गं गणपतये नमः

DSC01073a.JPGDSC01126a.JPGIMG_2142a.jpg

हा आमच्या घरातला गणपती.. किमान ५० वर्षा पेक्षा जास्त वर्षे झाली आहे..
मखर....सुट्टी एकच दिवस मिळाल्याने... एका दिवसात सगळे डिझाईन काटकुट वगैरे सगळे करावे लागले...रात्री २.३० ला सगळी तयारी पुर्ण झाल्यावर आधी फोटो काढला...

makhar.JPG

हा गणपतीचा.............

ganpati 2.JPG

गणपती बाप्पा मोरया........

यंदा ईकोफ्रेंडली मखर आणला. सजावट नवरोबा अन दिरोबा यानी केली. मोदक आणि बेसनलाडू साबांच्या मदतीने बनवलेत.

आमच्या घरचे बाप्पा!
नेहमीप्रमाणे घरीच तयार केले !
From Bappa

From Bappa

खासच आहेत बाप्पा सगळ्यांकडचे. सजावटी पण मस्त. मी ज............रा निवांत दाखवीन माझ्याकडच्या बाप्पाचे फोटो. सध्या गौरीच्या तयारीतून थो...........डीशी विश्रांती घेऊन आले श्रमपरिहार करायला. Happy खूपच छान वाटलं. आणि खूप सारी शक्तीही मिळाली कामं करायला.

चैतन्य मस्त आहे मुर्ती, मुर्ती घडवण्याचा क्रमाचा फोटो आणि माहिती अपेक्षीत आहे. धन्यवाद...

लाजो, स_सा, अरूंधती,
धन्यवाद!

क्रमवार फोटो काढले नाहियेत. त्यामुळे सचित्र माहिती देता येणार नाही.
मूर्ती शाडूच्या मातीपासून तयार केली आहे.
पुढच्या वर्षीची मूर्ती करताना क्रमवार फोटो काढून माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

रंगवण्यापूर्वीवा फोटो-
From Bappa

रंगवण्यापूर्वीचा (पांढरा रंग दिलेला) फोटो-
From Bappa

गणपती बाप्पा मोरया!!
सगळे बाप्पा प्रसन्न दिसताहेत.
चैतन्य,सुंदर मूर्ती!! बारकावे अगदी रेखीव आले आहेत.
उदयवन,मखर छान झाले आहे.
पूनम, मला रंगसंगती फार आवडली.पुढच्यावेळी ल़क्षात ठेवेन Happy

वा! चैतन्य... सुरेख रे! पुढच्या वर्षी अगदी डिटेलवार स्टेप बाय स्टेप मूर्ती कशी घडवली, रंगवली ते लिहिशील का?

हे आमच्या घरचे बाप्पा :

मूर्ती तयार होत असताना :

रंगरंगोटी झालेली मूर्ती :

मखरात बसवून पूजा झाल्यावर :

आरास :

हे आमचे गणपती बाप्पा Happy

[ गणपती बसवायचा अगदी आयत्या वेळेला ठरल्याने घरात उपलब्ध असलेल्या वस्तू वापरुनच सजावट केली आहे. ]

1.jpg2.jpg

Pages