आमच्या घरचा गणपती

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 08:09

गणपती एकच असला तरी घरोघरी त्याचं रूप वेगवेगळं असतं, त्याच्या स्वागताचा थाट वेगळा असतो, त्याची सजावट वेगळी असते.

आपल्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सारे उत्सुक आहोत. इथे आपण आम्हाला आपल्या घरी बसवलेल्या गणपतीचे दर्शन फोटोद्वारे देऊ शकता. सजावट कशी केली आहे, त्यामागील उद्दिष्ट, कल्पना, उत्सव कसा साजरा करता इ. सर्व काही आम्हाला ऐकायला आवडेल.

Lajojee Ganpati 0831.jpg

(लाजोच्या घरचा यंदाचा गणपतीबाप्पा)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानचं ग लाजो Happy सुंदर केलियेस सजावट. मागचे कोयर्‍यांचे कापड्/साडी फारचं आवड्ली.
दोन्ही मोठाल्या समया पण सुंदर दिसतायेत.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
श्रीगणेश चतुर्थी निमित्त सर्वांना शुभेच्छा.

सुंदर सजावट Happy

प्रणम्य शिरसा देव् म गौरीपुत्र म विनायकम
श्रीगणेश चतुर्थी निमित्त सर्वांना शुभेच्छा.
सुंदर सजावट खूप आवड्ली

सगळ्यांचे गणपती सुरेख.
लालू, मागची प्रभावळ घरीच केली का ? कशी केलीस ते वाचायला आवडेल ( अगदीच सोप्पी पद्धत असल्यास करून बघणेत येईल )

घरीच केली आहे. 'पोस्टर बोर्ड'चा सोनेरी रंगाचा कागद आहे. त्यावर फुलं, खडे चिकटवलेत. फॅब्रिकवर लावायला मिळतात तसले. तो कागद जाड असतो पण पुठ्ठ्यावरही लावता येईल.

सगळ्यांचे बाप्पा मस्तच
लालू ते बाप्पासमोरचे केवड्याचे पान सोन्याचे आहे का? की तू तयार केलेस घरी मागच्या प्रभावळीसारखे.

लाजो मस्त सजावट.
लालूच्या बाप्पाचे दर्शन कधी होतेय त्याची दरवर्षी वाट बघतो.
(आता प्रसादाची पण वाट बघणार !)

रुनी, ते मी तयार केले नाही. सोन्याचे नाही, चांदीवर पाणी असावे. मला मैत्रिणीने भेट दिले आहे.
दिनेश, संध्याकाळपर्यंत थांबावे लागणार. बाप्पालाही. इकडचे सगळे आज ऑफिसमध्ये आहेत.

सगळ्यांचे बाप्पा सुरेख!!

गेल्या २ वर्षांप्रमाणे यंदाही मूर्ती घरी बनवली.
हे आमचे बाप्पा
पुजेसाठी तयार
ganpati_0.jpg
पुजा झाल्यावर
Dscn0077.jpg

गणपती बाप्पा मोरया !! सगळ्यांचे बाप्पा खूप छान आहेत. Happy

हा आमचा बाप्पा. दरवर्षी प्रमाणे घरीच बनवला.

Ganesh(Closup1).jpgGanesh(Closup2).jpgGanesh(Full).jpg

Pages