आमच्या घरचा गणपती

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 08:09

गणपती एकच असला तरी घरोघरी त्याचं रूप वेगवेगळं असतं, त्याच्या स्वागताचा थाट वेगळा असतो, त्याची सजावट वेगळी असते.

आपल्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सारे उत्सुक आहोत. इथे आपण आम्हाला आपल्या घरी बसवलेल्या गणपतीचे दर्शन फोटोद्वारे देऊ शकता. सजावट कशी केली आहे, त्यामागील उद्दिष्ट, कल्पना, उत्सव कसा साजरा करता इ. सर्व काही आम्हाला ऐकायला आवडेल.

Lajojee Ganpati 0831.jpg

(लाजोच्या घरचा यंदाचा गणपतीबाप्पा)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैतन्य/पराग- मूर्ती सुंदर आहेत. तुमचे कौतुक वाटले.
मनी- फुलांची सजावट सुरेख आहे.
आरती- छान साधे आणि परिणामकारक. खूप आवडले.

वत्सला +१

हा आमचा सावंतवाडीचा गणपती. आधिच्या काळात चलचित्रे असत. पण आता नुसत शेवाळाने सजावट केली जाते.
DSCN0433.jpg

ह्या हरतालीका
DSCN0418.jpg

पुजेची सगळी तयारी
DSCN0424.jpg

माझ्या माहेरचा गणपती. स्थळ चोकुळ (आंबोली पासुन ११ कि.मी.). गणपतिच वेगळ घरच आहे इथे. वरती पारंपारीक माटोळी लावलेली दिसेल.
DSCN0491.jpg

माटोळी म्हणजे तेच ना सुपार्‍या, कवंडळं, आंब्याचा टाळा लावलेलं असतं ते?? आमच्याकडे त्याला मंडपी म्हणतात.

हा आमचा गेल्यावर्षीचा बाप्पा, या वर्षीचा प्रचि अजुन काढला नाही... उद्या गावाला गेलो की गणपती अन माटोळी दोघांचाही प्रचि काढेन अन डकविन...

हा आमच्या घरचा पगडी घातलेला हँडमेड -eco गणपती...

मूर्ती डोळस साजिरी...
IMG_2185.JPGIMG_2192.JPG

उंदीरमामा - बाप्पाला मोदकाचा आग्रह करताना
IMG_2196.JPG

मूर्ती तयार होताना:
IMG_2103.JPG

रंगवताना:
IMG_2109.JPG

गणपती बाप्पा मोरया!
IMG_2185.JPG

बाप्पांची सगळीच रुपं साजिरी आणि सजावटीही देखण्या आहेत सगळ्यांकडच्याच.
पण ज्यांनी स्वतः मूर्ती घडवली आहे त्या सर्वांचं फार म्हणजे फारच कौतुक वाटलं Happy

Martand Ganesh 7.jpg
मार्तंड गणेश
मार्तंड गणेश रूप दिसे सुंदर
पित वस्त्रालंकार शोभे अंगावर
कृपादृष्टी तयाची सर्व भक्तांवर
त्रिलोकी पूजती तयाला सुरवर l
हिरे माणके रत्न झळके मुकुटी
भंडार भूषणे शोभे लल्लाटी
मार्तंड गणेश मोहक माझा
शोभतो क-हेपठारचा राजा l
-
श्रीखंडोबा आणि जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा
www.jejuri.in
आपला अभिप्राय संकेतस्थळावर नोंदविण्याची कृपा करावी.

Pages