सणांचे नैवेद्य आणि फराळ ३) गोकुळ अष्टमी - तांदळाचे/कुरमुर्‍याचे/कुटयाचे लाडू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 August, 2011 - 15:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

तांदूळ
गुळ
वेलची, जायफळ पुड
ड्राय फ्रुट्स आवडीनुसार
तुप
मिठ
थोड सुक खोबर किसुन भाजुन

डिटेल प्रमाण पाककृतीत देत आहे.

क्रमवार पाककृती: 

साधारण १ किलो किंवा आपल्या गरजेनुसार तांदुळ घेउन ते रात्री धुवुन पाणी व थोडे मिठ घालुन भिजत घाला.

सकाळी हे तांदुळ निथळवा.

आता लगेच निथळवलेले तांदुळ भांड्यात मिडीयम गॅसवर खरपुस तांबुस रंग येईपर्यंत परतवा. करपु देउ नका.

तांदुळ जर जास्त प्रमाणात असतील तर गिरणीत चरट दळून आणा. जर कमी असतील तर मिक्सरमध्येच पिठ करा. मिक्सरमध्ये एकदम पिठ होत नाही जरा रवाळच राहत.

आता थोडे पिठ बाजुला काढुन ठेवा. हे चहात टाकुन किंवा दुधात साखर घालुन फुगवुन खायला छान लागत. लहान मुलांना फेव्हरेट व पौष्टिक होउन जात. त्याचा खमंग वासच एक प्रकारची चव आणते.

आता हवे तेवढ हे पिठ एका भांड्यात घ्या.

जेवढ पिठ घेतल असेल त्याच्या अर्धा गुळ सुरीने बारीक चिरुन घ्या. सुक खोबर कुस्करुन घ्या. थोडी वेलची व जायफळ पुड घ्या. पिठाच्या पाव पट तुप वितळवुन घ्या.

आता सगळे जिन्नस एकत्र करुन गुळाच्या गुठळ्या हातावर मोडा. (हेच मिश्रण मोठ्या खलबत्यात कुटून कुटुनही केले जाते. त्याची एक वेगळीच चव येते.)

सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन लाडू वळायला घ्या. जर लाडू वळायला त्रास होत असेल तर अजुन थोडे तुप मिसळा व लाडू वळा.

तयार आहेत खमंग कुरमुर्‍याचे उर्फ कुट्याचे उर्फ तांदळाचे लाडू.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एकावेळी १. दिवसातुन तुम्ही किती खाल त्याच्यावर गणना करायला लागेल.
अधिक टिपा: 

गोकुळ अष्ट्मिला हे लाडू नैवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा आहे.

पुर्वी हे लाडूचे मिश्रण खलबत्त्यात कुटून कुटुन केले जात म्हणून त्याला कुट्याचे लाडू म्हणत.
ओले तांदूळ भाजुन घेतल्यावर ते मस्त कुडकुडीत होतात. तेच नुसते खाल्ले जातात.
पिठी साखर घालुनही हे करता येतात.
वर उल्लेख केल्याप्रमाणे ह्या लाडूचे पिठ चहात व दुधात साखर घालुन खातात. दोन चमचे एका कपात पण खुप होतात. लगेच पिठ फुगुन येत.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही आताच काही वेळापुर्वी ऑफिसात सॅम्पल चाखायला मिळाले. त्यात काळे तीळ घातले होते. छान लागतात. भाजलेले पोहे आणि गुळ यांची एकत्र टेस्ट इमॅजिन करा, तशी टेस्ट आहे.

हो अमी साधारण तशीच टेस्ट पण त्यापेक्षा अजुन खमंग.

अमी हल्ली तांदळाचा व्याप कमी करण्यासाठी पोह्याचेच लाडू बनवतात.

जागु, तुझ्या व्हेज रेसेपी पण जबरी आहेतच.:स्मित: मी फार लाडुप्रेमी आहे, आता हा प्रकार पण करुन बघीतलाच पाहीजे, खूप छान व सोपा आहे.

अरे हे पाहिलच नव्हतं. हे तर माझ्या आजीचे पीठाचे लाडु. Happy या लाडवांची रेसीपी म्हंजे माझ्यासाठी गोड आश्चर्याचा धक्काच आहे Happy पण जागु गाववाली आमची म्हंजे शक्य आहे Happy

दरवर्षी गावी गेलो का आजी हे लाडु बनवित असे. तांदुळ धुऊन, भाजुन ती जात्यावर दळत असे. मी पण तिला यात मदत करायची Happy पीठ तयार झाले की आजी आम्हाला ते चहात खायला देत असे. आम्ही हावरटासारखे अजुन मागुन घ्यायचो मग ते फुगुन एव्हढ जास्त व्हायचे की संपत नसे. Proud
आजी तुप न घालता ती ते लाडु वळत असे मुळात या लाडवांत तुप घालतात हे मला आताच समजलं. कदाचित परिस्थितीमुळे आजीकडे तुप वैगरे लाड नसतील. तुपाशिवाय लाडु वळणार कसे त्यामुळे मी अजुन ते बनवायच्या भानगडीत पडले नाही. नाहीतर रोज चहा-पीठ खावे लागेल : फिदी:
पीठ,गुळ आणि सुके खोबरे या तीनच जिन्नसांमध्ये आजी इतके चवदार लाडु बनवायची की त्याची चव अजुनही जीभेवर आहे. आजीच्या हातचा शेवटचा लाडु खाऊन १२-१३ वर्षे झाली असतील. आजी थकल्यामुळे मी मध्यंतरी एकदा आईला, एकदा आत्याला तर एकदा मैत्रीणीच्या आईला हे लाडु बनवायला सांगितले होते पण छे 'आजीच्या हाताची चव' काय आली नाही.

जागु, छान दिसतायत लाडु. आता तुझ्या रेसीपीप्रमाणे करुन बघते एकदा.

Jaagu d he pith lahanpani gavi gelo ki nashtyala khaycho.....ata he banvnara koni Nai. Thanks tujhamule recipe kalli....

निल्सन वा किती छान वाटल. हा प्रकार जास्त कोणाला माहीतच नाही. पण आमच्याइथेही हे गोकुळ अष्ट्मीला नैवेद्यासाठी दाखविले जातात.

मनी ओलेच भाजायचे. चाळणीत निथळवून घ्यायचे आणि लगेच तव्यावर.

अनिश्का, अंजू धन्यवाद.

प्रिय जागू, (खुप छान पदार्थ दिलाय म्हणुन प्रिय म्हणायचा मोह आवरला नाहि ! )
भल्तेच सुन्दर दिसताहेत हे लाडू. मला नवीन पण पारम्परिक . आरोग्यालाहि छान.
नक्किच करुन पाहणार. किति दिवस टिकते हे पीठ? आणि लाडू?

मी बनवून पाहीले हे लाडू, पण माझा तांदूळ सोनामसुरी होता, तो काही खास नव्हता तर भाजताना ही भाजका सुगंध पसरला नाही आणि लाडू वळलेच गेले नाही, मिश्रण भरभरित झालं पण वाटीत घेऊन ही खाता येतंय.

Pages