सणांचे नैवेद्य आणि फराळ ३) गोकुळ अष्टमी - तांदळाचे/कुरमुर्‍याचे/कुटयाचे लाडू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 August, 2011 - 15:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

तांदूळ
गुळ
वेलची, जायफळ पुड
ड्राय फ्रुट्स आवडीनुसार
तुप
मिठ
थोड सुक खोबर किसुन भाजुन

डिटेल प्रमाण पाककृतीत देत आहे.

क्रमवार पाककृती: 

साधारण १ किलो किंवा आपल्या गरजेनुसार तांदुळ घेउन ते रात्री धुवुन पाणी व थोडे मिठ घालुन भिजत घाला.

सकाळी हे तांदुळ निथळवा.

आता लगेच निथळवलेले तांदुळ भांड्यात मिडीयम गॅसवर खरपुस तांबुस रंग येईपर्यंत परतवा. करपु देउ नका.

तांदुळ जर जास्त प्रमाणात असतील तर गिरणीत चरट दळून आणा. जर कमी असतील तर मिक्सरमध्येच पिठ करा. मिक्सरमध्ये एकदम पिठ होत नाही जरा रवाळच राहत.

आता थोडे पिठ बाजुला काढुन ठेवा. हे चहात टाकुन किंवा दुधात साखर घालुन फुगवुन खायला छान लागत. लहान मुलांना फेव्हरेट व पौष्टिक होउन जात. त्याचा खमंग वासच एक प्रकारची चव आणते.

आता हवे तेवढ हे पिठ एका भांड्यात घ्या.

जेवढ पिठ घेतल असेल त्याच्या अर्धा गुळ सुरीने बारीक चिरुन घ्या. सुक खोबर कुस्करुन घ्या. थोडी वेलची व जायफळ पुड घ्या. पिठाच्या पाव पट तुप वितळवुन घ्या.

आता सगळे जिन्नस एकत्र करुन गुळाच्या गुठळ्या हातावर मोडा. (हेच मिश्रण मोठ्या खलबत्यात कुटून कुटुनही केले जाते. त्याची एक वेगळीच चव येते.)

सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन लाडू वळायला घ्या. जर लाडू वळायला त्रास होत असेल तर अजुन थोडे तुप मिसळा व लाडू वळा.

तयार आहेत खमंग कुरमुर्‍याचे उर्फ कुट्याचे उर्फ तांदळाचे लाडू.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एकावेळी १. दिवसातुन तुम्ही किती खाल त्याच्यावर गणना करायला लागेल.
अधिक टिपा: 

गोकुळ अष्ट्मिला हे लाडू नैवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा आहे.

पुर्वी हे लाडूचे मिश्रण खलबत्त्यात कुटून कुटुन केले जात म्हणून त्याला कुट्याचे लाडू म्हणत.
ओले तांदूळ भाजुन घेतल्यावर ते मस्त कुडकुडीत होतात. तेच नुसते खाल्ले जातात.
पिठी साखर घालुनही हे करता येतात.
वर उल्लेख केल्याप्रमाणे ह्या लाडूचे पिठ चहात व दुधात साखर घालुन खातात. दोन चमचे एका कपात पण खुप होतात. लगेच पिठ फुगुन येत.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे रेसिपी. मला तांदळाच्या पिठीचे लाडू अजिबात आवडत नाहीत. हे कधी तरी करुन बघेन Happy

मस्त रेसिपी.
सगळ्याच नैवेद्यातल्या रेसिप्या छान!
कितीजणांनी कितीदा महान म्हणायचं जागूला Happy !

वॉव कसले मस्त लाडू आहेत. पहिल्यांदाच पाहिले असे लाडू.
लेकीची मज्जा आहे गं, आई असले छान छान खाऊ करुन देते. Happy

जागू मस्त दिसताहेत लाडू :)...मला हा प्रकार माहित नव्हता.नाचणीच्या लाडवाची कृती माहित आहे का तुला?

जागु, आम्ही लहानपणि ते पीठ चहात भिजवून खायचो. गावाहून आ़जी डबाभर बनवून देत असे. त्या पीठाचे लाडू बनतात हे माहित नव्हते. चहाबरोबर खाण्यासाठी थोडे पीठ बनवणार विकांतामध्ये.

रैनाला जोरदार अनुमोदन. तेवढंच पुण्य गाठीला, नाहीतर स्वत: इतके वैविध्यपूर्ण पदार्थ बनवून पुण्य कमावण्याची काहीच शक्यता नाहीये! Proud

रचु, सिंडरेला, मो, बिल्वा, मानुषी, कौषी, लजो, सावली, दिपा, आशुतोष, अश्विनीमामी धन्यवाद.

पुर्वा, रोचिन काही दिवसांत देते तुम्हाला तांबीच, नाचणीच्या लाडूची रेसिपी.

दिनेशदा गावठी तांदळाची चव तर खासच असते. पण मी बाजारातलेच वापरले आहेत.

अमी फक्त तुलाच माहीत आहे हे पिठ Happy

रैना, वर्षा, मेघना लाजवु नका ग. काहीतरीच काय. मी तुमच्यासारखीच आहे. फक्त घरचे काही रितिरिवाज आवडीने वेळ काढून थोडेफार करते. शिवाय तुमच्या सगळ्यांचे उत्तेजन, आशिर्वादही पाठीशी आहेत.

दक्षे पुण्यात येउ का ग कुकरी क्लास उघडायला ? की तु माझ्याकडे येशिल ?

धन्य आहेस गं बाई तू ! सगळं करणंही किती अचाट? (एकत्र कुटुंबामुळे Happy ) एक किलोशिवाय बातच नाही !

जागूच्या पदार्थांचे फोटो, तयारीचे फोटो पाहून झाले की मी मनातल्या मनात पदार्थ स्वत्;च करुन पाहिल्यासारखं वा.. सुंदर, मस्त झालाय, चवही काय छान म्हणते आणि समाधान मानते Proud

नक्की करून पाहणार.
माझा वर्षभराचा मुक्काम नक्की. Happy
तू आणि दिनेशदादा ने गणेशोत्सवात, पाककृती स्पर्धेत (असलिच तर) आजिबात भाग घ्यायचा नाही बरं का. ह्याना जज करून टाकावं. Happy

शर्मिला, मेघना ही आयडीय चांगली आहे.

तू आणि दिनेशदादा ने गणेशोत्सवात, पाककृती स्पर्धेत (असलिच तर) आजिबात भाग घ्यायचा नाही बरं का. ह्याना जज करून टाकावं.
हा अन्याय आहे. Lol

वर्षू धन्स.

Pages