सणांचे नैवेद्य आणि फराळ ३) गोकुळ अष्टमी - तांदळाचे/कुरमुर्‍याचे/कुटयाचे लाडू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 August, 2011 - 15:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

तांदूळ
गुळ
वेलची, जायफळ पुड
ड्राय फ्रुट्स आवडीनुसार
तुप
मिठ
थोड सुक खोबर किसुन भाजुन

डिटेल प्रमाण पाककृतीत देत आहे.

क्रमवार पाककृती: 

साधारण १ किलो किंवा आपल्या गरजेनुसार तांदुळ घेउन ते रात्री धुवुन पाणी व थोडे मिठ घालुन भिजत घाला.

सकाळी हे तांदुळ निथळवा.

आता लगेच निथळवलेले तांदुळ भांड्यात मिडीयम गॅसवर खरपुस तांबुस रंग येईपर्यंत परतवा. करपु देउ नका.

तांदुळ जर जास्त प्रमाणात असतील तर गिरणीत चरट दळून आणा. जर कमी असतील तर मिक्सरमध्येच पिठ करा. मिक्सरमध्ये एकदम पिठ होत नाही जरा रवाळच राहत.

आता थोडे पिठ बाजुला काढुन ठेवा. हे चहात टाकुन किंवा दुधात साखर घालुन फुगवुन खायला छान लागत. लहान मुलांना फेव्हरेट व पौष्टिक होउन जात. त्याचा खमंग वासच एक प्रकारची चव आणते.

आता हवे तेवढ हे पिठ एका भांड्यात घ्या.

जेवढ पिठ घेतल असेल त्याच्या अर्धा गुळ सुरीने बारीक चिरुन घ्या. सुक खोबर कुस्करुन घ्या. थोडी वेलची व जायफळ पुड घ्या. पिठाच्या पाव पट तुप वितळवुन घ्या.

आता सगळे जिन्नस एकत्र करुन गुळाच्या गुठळ्या हातावर मोडा. (हेच मिश्रण मोठ्या खलबत्यात कुटून कुटुनही केले जाते. त्याची एक वेगळीच चव येते.)

सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन लाडू वळायला घ्या. जर लाडू वळायला त्रास होत असेल तर अजुन थोडे तुप मिसळा व लाडू वळा.

तयार आहेत खमंग कुरमुर्‍याचे उर्फ कुट्याचे उर्फ तांदळाचे लाडू.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एकावेळी १. दिवसातुन तुम्ही किती खाल त्याच्यावर गणना करायला लागेल.
अधिक टिपा: 

गोकुळ अष्ट्मिला हे लाडू नैवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा आहे.

पुर्वी हे लाडूचे मिश्रण खलबत्त्यात कुटून कुटुन केले जात म्हणून त्याला कुट्याचे लाडू म्हणत.
ओले तांदूळ भाजुन घेतल्यावर ते मस्त कुडकुडीत होतात. तेच नुसते खाल्ले जातात.
पिठी साखर घालुनही हे करता येतात.
वर उल्लेख केल्याप्रमाणे ह्या लाडूचे पिठ चहात व दुधात साखर घालुन खातात. दोन चमचे एका कपात पण खुप होतात. लगेच पिठ फुगुन येत.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू
तुमचे सर्वच पदार्थ खूप नीटनेटके , निगुतीने केलेले असतात.
१ विनंती - त्या त्या सणा च्या थोडे आधी ते ते पारंपारीक पदार्थ टाकता येतील का?
म्हणजे ज्यांना करायचा आहे त्यांना त्या त्या सणादिवशी तो पदार्थ करता येईल.

जागू, मी माबोची सदस्य व्हायच्या आधीपासून तुझी प्रचंड चाहती आहे. Happy विविध शाकाहारी, मांसाहारी पाककृती टाकताना त्या पाककृतीबाबतची प्रत्येक टप्प्याची सोप्या भाषेतील लाजवाब सचित्र माहिती तु ईतक्या सहज देतेस की एखादा नवशिखा/नवशिखीही ती पाककृती उत्तम करू शकेल !........ अन्नपूर्णा देवी तर नाही ना आली तुझ्या रुपात पृथ्वीतलावर?.............

मस्त आहेत लाडु, मी पण पहिल्यांदाच ऐकले.
जागु, आधिचा पदार्थ करुन होत नाही तर तु दुसरा टाकतेस Happy
गोपाळ्काला पण टाक ना, मला " ऑथेंटीक " पद्धत हवी आहे.

माशा वनराई खुप खुप धन्यवाद तुमच्या स्पेशल प्रतिसादासाठी.

जागोमोहन तांबीटाचे लाडू वेगळे असतात.

आरती गोपाळकाला म्हणजे मी ऐकले नाही कधी पदार्थाचे नाव.

भाऊ होतात कुठे इतके दिवस ? माझ्या बर्‍याचशा रेसिपीजवर तुमचे प्रतिसाद नाहीत. आत्ताच मेल करणार होते तर तुमची पोस्ट पाहीली. धन्यवाद.

गोपाळकाल्यासाठी लाह्या, पोहे, चिरमुरे मिसलून ताकात कालवतात. मग त्यावर हिरव्या मिरच्यांची फोडणी घालतात. त्यात हळद नसते. त्यात लोणच्याच्या फोडी कालवतात. http://www.manogat.com/node/7489

तंबिट बहुदा कणकेचे भाजून करातत आणि त्यात गूळ घालतात

जागू, गोपाळ्काला गोकुळष्टमीलाच केला जातो.

धन्यवाद जामोप्या Happy

आज केले लाडु, पण वळताना बांधावे लागले, डिंकाच्या लाडवा सारखे. Happy गुळ काळा असल्याने रंग पण थोडा बदलला. बाकी मस्त Happy

पिहु, अवल धन्यवाद.

जागोमोहन धन्यवाद रेसिपीबद्दल ही ऐकलीहोती पण मी कधी केली नाही. आता करुन बघेन. आम्ही फक्त पोहे गुळात कालवुन त्याचा प्रसाद वाटतो.

आरती अग काळा गुळ चांगला ग. रंगापेक्षा गुण त्यातील सत्व महत्वाचे. थोडे अजुन तुप घातले असतेस तर लाडू बांधण्याचा त्रास नसता झाला. आणि फोटो कुठे आहे ?

कुरमुर्‍याचं पीठ आम्ही दूध गूळ घालून खातो म्हणजे खायचो. कोकणातली ऐश आहे ती. इथे मिळत नाही. पण हे लाडू करून पाहिले पाहिजेत. मस्त लागत असतील. कोरडेपणामुळे मला बांधता येतील की नाही ती शंका आहे.

जागू तुझे लाडु तर एकदम देखणे झाले आहेत.

<< माझ्या बर्‍याचशा रेसिपीजवर तुमचे प्रतिसाद नाहीत. >> अहो, कांही दिव्य वाचल, पाहिलं कीं माणूस अवाक होतोच ना ! Wink
पण सिरीयसली, तुमच्यावर अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे परत परत सांगायलाच हवं !

आमच्या कडे गोपाळकाला मध्ये ज्वारीच्या लाह्या, पोहे ,कुरमुरे, दहि ,लिम्बाचे गोड लोणचे, खाराची मीरची ,कैरीचे लोणचे व खार ,गुळ, साख्रर, ताम्बडे तिखट, केळे, पेरु,काकडी, डाळे घालतात . पोहे लाह्या थोड्या पाण्यातुन काढुन निथळुन घ्याव्या. हे सर्व परास्पर भीन्न चवीचे पदार्थ एकत्र केल्याने गोपाळकालाचि चव अपुर्व असते.

Pages