रविवार ब्रेकफास्ट गटग...

Submitted by नीधप on 17 August, 2011 - 08:05
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, पुणे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुलासमोर.

गटगचे म्हणलं तर निमित्त आहे म्हणलं तर नाही.
फारेण्ड, केदार आणि मनीष हे 'परतोनि' आलेले आहेत त्यांचे स्वागत करायचे राह्यलेलेच आहे बहुतेक.
शैलजा आणि स्वाती मोठ्ठा ट्रेक करून परत आल्यात त्या बद्दल त्यांच्याकडून ऐकायचंय. फोटोही बघायचेत जमल्यास.
आणि मी पण पुण्यात आलेली आहे.. Proud

तर रविवारी ब्रेकफास्ट किंवा सकाळची न्याहरी हादडायला गंधर्व हॉटेलात भेटूया. सकाळी ८:३० वाजता. १०:३० पर्यंत तरी असू तिथे. म्हणजे १०:३० ला कटलेच पाहिजे असे नाही.

भेटू तर मग.

माहितीचा स्रोत: 
पुपुकर :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 20, 2011 - 23:00 to रविवार, August 21, 2011 - 00:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोमणांच्या किर्तीप्रमाणेचा मार्ग आयत्या वेळेस अवलंबू शकतो. >>>>>>>> सोमणांची किर्ती पण येणार आहे का गटग ला ??????????? Happy

>>वरती नोंदणी कर
एवढ्या लवकर ??? :भिती:
नक्की नाय त्यामुळे त्या कोण एक बाई आहेत त्यांच्याप्रमाणे आमी पण ऐनवेळी धडकू.

मंजे, मयुरेश Lol

सोमणांच्या किर्तीप्रमाणेचा मार्ग आयत्या वेळेस अवलंबू शकतो. >>> किरु, खबरदार ऐनवेळी कॅन्सललंस तर... तुझ्याबरोबर यायचं म्हणून मी माझं परतीचं बुकिंग केलेलं नाहीये.

त्यामुळे त्या कोण एक बाई आहेत त्यांच्याप्रमाणे आमी पण ऐनवेळी धडकू.>>>>>>>>> Sad म्हणजे मी बाई आहे पण बाई म्हणायलाच पाहिजे का अगदी ? Proud

अमा, हैद्राबादहुन ५.५५ ला फ्लाईट निघते. गंधर्व मध्ये तुम्ही ८ पर्यंत याल. मग संध्याकाळी परत. सगळ्या भाचरांसाठी येऊन जा.

बोनस : (दुरून केलेल्या रेकीत बुक्के देता येत नाहीत, एखाद्या चुकलेल्या भाच्याला बुक्का मारता येईल.)

are vaa!! mee paN jamalM tar yeIn ravivaaree.. >>>>>>>>>> अरे बापरे, बडी पण धडकणार का ????????????? Lol

हो ना येताना बावर्ची किंवा पॅराडाईजची बिर्याणी पण आणता येईल. >>>>>>> आणि कराचीवाल्याकडची बिस्किटे सुद्धा ................ Happy

तुमच्या भाचरांच्या अपेक्षा जास्तच वाढत चालल्यात >>>>>>>> यावर एक उपाय म्हणजे असंच एखादं गटग हैदराबादेत करणं ............. Happy
खादाडीसाठी प्रचंड वाद आहे तिथे ................. Happy

>>म्हणजे मी बाई आहे पण बाई म्हणायलाच पाहिजे का अगदी ?
गेला माधव कुणीकडे मधला विनय येडेकर आठवला, तो फोनवर म्हणतो हे बघा प्रमिलाबाई...
तर ती किंचाळते, ईSSS मी बाई नाहीये काही, त्यावर हा अफलातुन चेहेरा करून म्हणतो,
बाई नाहीये ? आवाज तर बाईचाच वाटतोय. Lol
मग ती म्हणते मी एक अल्लड तरूणी आहे. Happy

केदार आणि मनिष दोघेही असल्यामुळे यंदाही पाण्याचे ग्लास उपडे होतीलच आणि प्रचंड जनसंख्या हजर राहिल्यामुळे टेबलही बदलावे लागेलच Proud तरी, मजा करा लोक्स.

Pages