रविवार ब्रेकफास्ट गटग...

Submitted by नीधप on 17 August, 2011 - 08:05
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, पुणे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुलासमोर.

गटगचे म्हणलं तर निमित्त आहे म्हणलं तर नाही.
फारेण्ड, केदार आणि मनीष हे 'परतोनि' आलेले आहेत त्यांचे स्वागत करायचे राह्यलेलेच आहे बहुतेक.
शैलजा आणि स्वाती मोठ्ठा ट्रेक करून परत आल्यात त्या बद्दल त्यांच्याकडून ऐकायचंय. फोटोही बघायचेत जमल्यास.
आणि मी पण पुण्यात आलेली आहे.. Proud

तर रविवारी ब्रेकफास्ट किंवा सकाळची न्याहरी हादडायला गंधर्व हॉटेलात भेटूया. सकाळी ८:३० वाजता. १०:३० पर्यंत तरी असू तिथे. म्हणजे १०:३० ला कटलेच पाहिजे असे नाही.

भेटू तर मग.

माहितीचा स्रोत: 
पुपुकर :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 20, 2011 - 23:00 to रविवार, August 21, 2011 - 00:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल एकदम जोरदार गटग पार पडलं. बरेच सरप्राइज (माझ्यासाठी तरी) माबोकर आले होते.

मी खरंच परत आलोय हे सिद्ध झालं.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल अजिबात सांडा-सांडी झाली नाही (वैनी प्लीज नोट Happy ). साजिरा नसल्यामुळं सांडा-सांडी झाली नाही असं कोणितरी म्हणालं Wink

मी खरंच परत आलोय हे सिद्ध झालं. >> Lol अशा प्रकारे, 'परतोनि पाहे' हे एक तर प्रचंड अविश्वसनीय किंवा मग थेट अतिवास्तववादी असते, हे सिद्ध झाले. Proud

माझा चा आदल्याच दिवशी टिस्माच्या अंगणात सांडून झाला होता, त्यामुळे गटगला यायची गरजच राहिली नाही. Proud

मंजिरी वैभवच्या कार्यक्रमाला होती??
ललीच्या मागे मागे "ताई..ताई" करत कुणी फिरत नव्हतं काय?>>>>>>>>>>>>>>>

होते तsssssssर! स्वयंसेवकाचा भलामोठा बिल्ला लाऊन प्रेक्षागृहाच्या दाराशीच तर उभी होते सुरूवातीला, मग माझी शाळेतली सख्खी मैत्रिण जशी दाखल झाली तिथे तसा मी तो बिल्ला हळूच काढून पर्शीत टाकला आणि कार्यक्रम सुरू झाल्यावर गपचुप तिच्याबरोबर एका सुरक्षित ठिकाणी स्थानापन्न होऊन कार्यक्रम अथ पासून इति पर्यंत पाहिला..... किसीको कानोकान खबर नही हुई! प्रोग्रॅम संपल्यावर जेव्हा सर्व माबोकरांचं टोळकं उभं होतं तिथे ललिता_प्रीति गोल कडं करून उभ्या असलेल्या माबोकरांमधे मुसंडी मारून शिरली आणि हा कोण तो कोण करू लागली तेव्हा तिच्या मागे ताई ताई करायला जायच्यावेळीच नेमका माझा भ्रमणध्वनी वाजू लागल्याकारणाने मला ओळखपरेड मधे सामिल होता आलं नाही...... तरी नंतर चिनूक्स चा ललिता शी बराच वेळ वार्तालाप चालू असताना मी तिची पाठराखण करू शकले Proud

तरी नंतर चिनूक्स चा ललिता शी बराच वेळ वार्तालाप चालू असताना मी तिची पाठराखण करू शकले >>> चिनूक्स मारकुटा नाहिये गं Lol

अमितला पकडावे. त्याने सेटिंग्ज अशी केलीयेत की मी तुला लिंक पाठवली तरी ती उघडणार नाहीत.

Pages