रविवार ब्रेकफास्ट गटग...

Submitted by नीधप on 17 August, 2011 - 08:05
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, पुणे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुलासमोर.

गटगचे म्हणलं तर निमित्त आहे म्हणलं तर नाही.
फारेण्ड, केदार आणि मनीष हे 'परतोनि' आलेले आहेत त्यांचे स्वागत करायचे राह्यलेलेच आहे बहुतेक.
शैलजा आणि स्वाती मोठ्ठा ट्रेक करून परत आल्यात त्या बद्दल त्यांच्याकडून ऐकायचंय. फोटोही बघायचेत जमल्यास.
आणि मी पण पुण्यात आलेली आहे.. Proud

तर रविवारी ब्रेकफास्ट किंवा सकाळची न्याहरी हादडायला गंधर्व हॉटेलात भेटूया. सकाळी ८:३० वाजता. १०:३० पर्यंत तरी असू तिथे. म्हणजे १०:३० ला कटलेच पाहिजे असे नाही.

भेटू तर मग.

माहितीचा स्रोत: 
पुपुकर :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 20, 2011 - 23:00 to रविवार, August 21, 2011 - 00:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तारीख/वेळ:
20 August, 2011 - 23:00 - 21 August, 2011 - 00:30
>>>>> ब्रेकफास्टसाठी ईतक्या रात्री भेटणार ? scratch-head01-idea-animated-animation-smiley-emoticon-000414-large.gif

प्रसिक विचार करतोय की हे ब्रेक्फास्ट गटग आहे की इफ्तार पार्टी Proud
प्रसिक, तू सेट केलेल्या टाईम झोन प्रमाणे तुला वेळ दिसेल. तुझा टाईम झोन चेक कर.

भारताच्या सकाळी भेटलो होतो. आता इतर देशांच्यात तेव्हा इफ्तार पार्टी चालू होती की अजून याच्याशी आम्हाला काय करायचंय.. Happy

मस्त झालं गटग! मज्जा आली! Happy
नीरजा, हे गटग आयोजित करुन तू एक पुण्य संपादनाचं काम केलंस हो बाकी Wink नंतर किती वेळ बसला होतात?
सगळ्यांना भेटून एकदम मस्त वाटलं.

वृत्तांत लिहा आता. Happy किती पाण्याचे ग्लास उपडे झाले, कितीवेळा चहा सांडला.... भारी उत्सुकता लागून राहिली हो Proud

धरणार, धरणार आज मान धरणार तोषादादा Happy
गटगच्या फोटोंसाठी बाबुला धरा. आलेल्यांनाच पाठवा हो फोटो Proud

गटग संयोजकांनी मनाने,मणाने,मणामणाने,मेणाने उपस्थित माबोकरांना फोटो पाठवण्याची तसदी घ्यावी. Happy

संयोजकांना फोटो मिळाले की मग हे मनाचे, मणाचे, मेणाचे असे विभाग पाडण्यात येतील आणि मग योग्य तिथे फोटो भिरकावणी करणेत येईल.. Proud

कोण कोण आले होते ते समजले नाही. >>. कसे समजणार, जर तुम्ही फक्त पाहूनच जाणार होतात त्यामुळे प्रश्न गैरलागू. Happy

बाराच्या बशीतून (पक्षी इंडिकातून) भाई आले होते! मुंबईकरांनी अनपेक्षीत (म्हणजे मला) येऊन धक्का दिला. एकुण २०-२५ जण होते. मजा आली. नीरजा धन्यवाद.

हो मजा आली काल. बर्‍याच जणांना पहिल्यांदाच भेटलो. खास करून मुंबईच्या लोकांना आवर्जून धन्यवाद या कार्यक्रमासाठी थांबल्याबद्दल.

आणि उसगाव-गोवा सफरीत मधे हॉल्ट घेतलेले उसगावकरमेम्बर Happy ही भेट गुप्त होती का हे माहीत नसल्याने त्यांनीच जाहीर करावे Happy

फोटो कोणी अपलोड केले असतील तर मलाही लिन्क द्या.

नीरजा - हे आयोजित केल्याबद्दल धन्यवाद!

तूच... पहिल्यापासून शेवट पर्यंत तूच उपस्थित होतीस त्यामुळे...

रच्याकने काल बाराकरांची उपस्थिती टोटल सरप्राईज होतं... बारा गटगमधे कसे प्रत्येक वेळेस सरप्राईज पाहूणे असतात तशी हजेरी काल बाराकरांनी लावली होती..

Pages