हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीदेखील पॉटर-मोअरमध्ये कधीचा प्रवेश घेतलाय. पण संपूर्ण पुस्तक तिथे परत वाचायचा कंटाळा आला. त्यामुळे काहीच केलेले नाही. अविकुमार, काही शॉर्टकट आहे का?

मी ही लगेच पॉटरमोअरवर नाव नोंदवलंय. मला अजून सॉर्ट नाही केलं. मी पहिल्या चॅप्टरवरच आहे म्हणून की काय? हॉगवर्टस पर्यंत पोचल्यावर सॉर्ट करतील का?

अमृता, ग्रिफेंडर ?? वॉवच की! Happy

अगं आणि वाँड पण फिनिक्स फेदरचा Happy जुई जाम खुश. तिने पेट पण स्नोई आउलच घेतलाय.

भरत, काही शॉर्ट्कट नाही दिसला. Sad

अगं आणि वाँड पण फिनिक्स फेदरचा स्मित जुई जाम खुश. तिने पेट पण स्नोई आउलच घेतलाय.>>>>>>> सहीच... Happy पण हे सगळं कधी मिळतं??? चॅप्टर वाचायला चालु केल्यावर अधे मधे का???

जुई खुश होईल नाहीतर काय? तुम्ही लोक्म हॅरीच्या पाऊलखुणांवर चालताय की!

हो, हे सगळं कधी, कुठे मिळतं ते सांगण्याचे करावे.

पण हे सगळं कधी मिळतं??? चॅप्टर वाचायला चालु केल्यावर अधे मधे का??? >> +१००

प्लीजच सांगा.
मला अजून कायबी कळेना.
अजून आमचं सॉर्टिंग पण नाही झालं.
अमृता,
ग्रिफिंडर, फिनिक्स फेदर, स्नोई आउल.......वॉव !!

पण हे सगळं कधी मिळतं??? चॅप्टर वाचायला चालु केल्यावर अधे मधे का??? >> +१०० >>> हे प्रश्नांकरता होतं होय.. मला वाटलं की हो म्हणायच्या ऐवजी +१०० लिहिलय Wink

रच्याकने, पॉटरमोअर सारख्या साइट्स केमिस्ट्रीकरता बनवायला पाहिजेत..

होय बायांनो होय. पहिलं पुस्तक वाचु लागा. सगळ हळू हळू ओपन होत जाइल. Happy

पॉटरमोअर सारख्या साइट्स केमिस्ट्रीकरता बनवायला पाहिजेत. >> +१ Happy

होय बायांनो होय. पहिलं पुस्तक वाचु लागा. सगळ हळू हळू ओपन होत जाइल.>>>>>>> ओक्के.. म्हणजे आता ऑफिसचं काम बोंबलणार.. कोणाकडे टाइम टर्नर असेल तर द्या मला पाठवुन Happy

पण संपूर्ण पुस्तक तिथे परत वाचायचा कंटाळा आला. त्यामुळे काहीच केलेले नाही. अविकुमार, काही शॉर्टकट आहे का? >> भरत, असं पण पुर्ण पुस्तक नाहीये वाचायला. अगदी प्रत्येक चॅप्टरच्या ४,५ लाईन्स असतात आणि चित्र असतं. मधे मधे अ‍ॅक्टीविटिज करायच्या असतात. जस की डायागॉन अ‍ॅलीमधे शॉपिंग, सॉर्टींग, पोशन मेकिंग इ.

रोज एक एक चॅप्टर करावा असं म्हणतीय.. रच्याकने समजा मला एखादा क्लु कळलाच नाही अन छडी वगैरे मला मिळालीच नाही असं काही झालं तर वो?? एखादी हेल्पलाइन काढावी काय याकरता?? Wink

छडी मिळतेच ग. सॉर्टींगसाठी, छडीसाठी काही प्रश्न विचारतात, त्याच्या उत्तरांवरुन आपल्याला काय मिळणार ते ठरतं. Happy

पॉटर मोअरवाल्यानी मला स्लीदरिनमधे टाकलं. (त्याआधी ही टीम किती ग्रेट आहे याचे एक छोटेसे लेक्चर पण दिले) Proud

दुसरे पुस्तक चालू झाले का तिथे? मी गेलेच नाही कित्येक दिवसात.

SYCAMORE WITH UNICORN CORE, TWELVE AND A QUARTER INCHES, SURPRISINGLY SWISHY ही माझी छडी.. चांगली वाईट माहित नाही...

आणि मला ब्राउन घुबड मिळालं...

हायला, आता झपाटल्यासारखं तिकडे चकरा होणार....टाइमटर्नर मला पण हवा.

रच्याकने समजा मला एखादा क्लु कळलाच नाही अन छडी वगैरे मला मिळालीच नाही असं काही झालं तर वो??>> Lol पहिल्या वर्षाच्या मुलांसारखं अगदी खरं खरं टेन्शन येतंय ना !

जेवढे चॅप्टर्स सोनेरी झालेले दिसतात तेवढेच उघडू शकतो ना आपण ?

पहिल्या वर्षाच्या मुलांसारखं अगदी खरं खरं टेन्शन येतंय ना !>>>>>>> अगदी अगदी.. मला जर स्लिदरीन मधे टाकलं तर ती साइट ब्लॉक करायची की तसच पुढे जात रहायचं याचा विचार चालु आहे..

जेवढे चॅप्टर्स सोनेरी झालेले दिसतात तेवढेच उघडू शकतो ना आपण ?>>>>>> मला नाही दिसले कुठे सोनेरी चॅप्टर्स

ग्रेट..प्रचंड प्रमाणात धन्यवाद..! यु मेड माय डे..>>>>>>>> मला वाटतं मागच्या ३र्‍या पानावर होती ही लिंक .. अन सुरुवातीलाच कोणीतरी हीच दिली पण होती.

माझ्या इथे सॉर्टिंग झाल्यावर पुढे जायला काहीच दाखवत नाहिये.. कोणी मदत करु शकेल का? पॉईंट्स कसे मिळवायचे? पोशन्स वगैरे आपले आपण बनवायला चालु करायचं का?

MoonBlood24605
.
.
इथे छडी कशी घ्यायची ?
To ensure we find the perfect wand for you, it's very important that you answer the following questions honestly. First of all, would you describe yourself as..
.
.
आता मधल्याला सिलेक्ट केले ..........तरी पुढे काही जात नाही आ हे Sad
.
.
.लवकर सांगा

APPLE WITH PHOENIX FEATHER CORE, TWELVE AND A QUARTER INCHES, RIGID.
.
.
भेटली एकदाची छाडी

Pages