हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

< मला जर स्लिदरीन मधे टाकलं तर ती साइट ब्लॉक करायची की तसच पुढे जात रहायचं याचा विचार चालु आहे.. >
डु आय घेऊन नव्याने अ‍ॅडमिशन घ्यावी.

भरत, रॅवेनक्लॉ मधे मिळालं की अ‍ॅडमिशन.. क्युअर फॉर बॉइल्स च पोशन बनवतेय.. २दा बनवण्याचा प्रयत्न केला, पन दर वेळी वेळ कमी पडला... Sad

मला हफलपफमध्ये टाकलं....भ्या ssss

ग्रिफिंडर मध्ये टाकेपर्यंत भरतजी सांगतात तसं करावं काय Wink
हफलपफमध्ये राहून पुढचं काम करायला इच्छाच होईना Sad Proud

अमृता,
ग्रिफेंडर, फिनिक्स फेदर, स्नोई आउल कसं मिळवलं ?? टिप्स शेअर करा की...

मी पेट घ्यायला गेले तर तिथे स्नोई आउल सोडून आख्खी दुनिया उपलब्ध होती.

हुश्श, मी ग्रिफिंडॉरमध्ये. युनिकॉर्न वाँड
प्रत्येक हाउसचे काय काय गुण/क्वालिटीज असतात त्या वाचून बघा. (मी असं काही केलेलं नाही)

मी पेट घ्यायला गेले तर तिथे स्नोई आउल सोडून आख्खी दुनिया उपलब्ध होती.>>> +१ जिंजर कॅट घ्यावी का असाही विचार आलता एकदा.. पण मांजर मुळातच आवडत नाही..

हुश्श, मी ग्रिफिंडॉरमध्ये. युनिकॉर्न वाँड>>>>> सहीच Happy

रच्याकने मला ते पोशन्स वगैरे बनवायचा कंटाळा येतोय.. तिथे इन्ग्रेडिएन्ट्स ओळखुच येत नाहियेत.. आणि ते सगळं शोधण्यात वेळ जातो अन मग ते वेळ संपला असं दाखवतं... Sad

मी हफलपफमध्ये .... रुणुझुणू रडू नकोस... हफलपफमध्ये पण talented विझार्डस असतात.. फक्त show-off करत नाही.. Happy तिथे दिलेल्या क्वालिटीज वाचल्या ना.... Happy

सगळ्या ग्रिफिंडॉरवाल्यांसाठी.....मोठ्ठा 'जे' (७२ फॉन्ट)

मला पण सिल्वर लाइम लाकडाची युनिकॉर्न वाँड.
हफलपफ मध्ये जाऊन पडल्याने काल रात्री अगदीच बेक्कार मनस्थितीत झोपले....
काय करावं बरं ??

तशात आमच्या घरातील 'एका कट्टर मगलला' शंका आली आहे की मी लॅपटॉपसमोर बसून अभ्यास करायचं सोडून काहीतरी वेगळे उद्योग करतेय......त्याने बघायच्या आत मी पटकन विन्डो बंद केली होती...पण एकूणात पुढचं जादुई शिक्षण अवघड जाणार असं दिसतंय !

हो हो चैत्रगंधा....असलंच लेक्चर दिलं त्यांनी.
पण ग्रिफिंडॉरवर माझी जामच निष्ठा बसलीये.... दिल है के मानता नहीं...:(

हफलपफमधल्यांनी स्लिदरिनवाल्यांकडे बघून समाधान मानून घ्या Happy
रच्याकने सेड्रिक डिगोरी हफलपफमध्ये होता.

तशात आमच्या घरातील 'एका कट्टर मगलला' शंका आली आहे की मी लॅपटॉपसमोर बसून अभ्यास करायचं सोडून काहीतरी वेगळे उद्योग करतेय......त्याने बघायच्या आत मी पटकन विन्डो बंद केली होती...पण एकूणात पुढचं जादुई शिक्षण अवघड जाणार असं दिसतंय !>>>>>> Lol

हफलपफमधल्यांनी स्लिदरिनवाल्यांकडे बघून समाधान मानून घ्या>>>>> आणि स्लिदरीनवाल्यांनी आपापल्या माबो आय्डी कडे बघा म्हणजे वाईट वाटणार नाही Wink रच्याकने, काल मला पण टेंशन आलेलं सॉर्टिंगचं.. पण आता अभ्यास करायला कंटाळा येतोय... माझ्या हाउसला अगदीच शोनाहो...

तशात आमच्या घरातील 'एका कट्टर मगलला' शंका आली आहे की मी लॅपटॉपसमोर बसून अभ्यास करायचं सोडून काहीतरी वेगळे उद्योग करतेय......त्याने बघायच्या आत मी पटकन विन्डो बंद केली होती...पण एकूणात पुढचं जादुई शिक्षण अवघड जाणार असं दिसतंय >>> Lol रुणु.

मागे कोणीतरी हॉगवर्टसच्या विद्यार्थीसंख्येबद्द्ल विचारले होते... मला वाटते की एका इयत्तेच्या/वर्षीच्या मुलांची संख्या ४०-५० च्या वर नसावी.. हॅरीच्या बॅच मध्ये ग्रिफीनडोरमध्ये ५ मुले आहेत आणि ३ मुली.. (चु.भू.द्या.घ्या.)
max १० जरी धरले तर ४ हाउसेस धरून ४०.. टोटल ४०*७ = २८०. फार फार तर ३०० मुले हॉगवर्टस मध्ये असावीत..
आणि एका क्लास मधली मुले साधारणपणे १०+१० = २० असतील कारण प्रत्येक विषयाचा तास हा २ हाऊसेस मध्ये share होतो.

चिमुरी.............तु २२ पोईंट कसे घेतलेस ?>>>>>> Happy अरे ते बरच काय काय कलेक्ट करायचं त्या चॅप्टर मधे एन्टर केलं की.. पॉईण्ट्स अ‍ॅड होतात मग..

तु मला अ‍ॅड केलं का? तुलापण गिफ्ट पाठवते मग..

मला कोणीतरी पोशन कसं बनवायचं आणि स्पेल्स कसे वापरायचे ते सांगा की..

रच्याकने सेड्रिक डिगोरी हफलपफमध्ये होता >> तेवढ्यावरच समाधान मानायचं आता Proud पण तो सुद्धा जातो ना आम्हाला सोडून...

चिमुरी, रैना,
काल रात्री एक मगल आणि एक अंडरएज विझार्ड झोपल्यावर " एवढा एक टॉपिक वाचून झोपते रे " असं सांगून सॉर्टिंग सेरेमनीला उपस्थिती लावली आणि ह प हाउस मिळाल्यावर वैतागून, परत मागे जाता येतंय का ते बघण्याच्या नादात टेबलावरचं पेन खाली पडलं....तेवढ्या आवाजाने मगलने उठून "झोप आता" अशी तंबी दिली.

सकाळी उठल्यावर उलटतपासणी झाली " काय वाचलंस काल ? कुठला टॉपिक ? कितीवेळ बसलेलीस.....ब्ला ब्ला ब्ला"
खोटी उत्तरं देताना फे फे उडाली Proud

आता मला हॅरीसारखा चोरून चोरून गृहपाठ उरकयला लागणारे...

माझा आयडी SparksRain10102

रुणुझुणु, भन्नाटच.. रच्याकने तुझी पोस्ट वाचुन आमच्या इम्युनोच्या सरांची आठवण झाली.. ते अगदी हॅपॉ ची स्टोरी सांगितल्यासारखं शिकवायचे.. तु पण गोष्ट सांगत असल्यासारखंच शिकवतेस.. Wink

आमच्या घरात सगळेच मगल्स आहेत.. भाच्याचं नाव ठेवताना पप्पांनी हॅरी पॉटर नाव ठेवणार का त्याचं असं विचारलेलं Wink तोपण मगल की विझार्ड ते अजुन काही ठरलेलं नाहिये.. बघु काय होतय ते.. रच्याकने आता गिफ्ट द्यायचा ट्रेन्ड केलाय तर तो कन्टिन्यु करावा की नको हा विचार करतीय.. सगळेच यायला लागले तर माझं कठीण आहे.. Wink

मी HollyIce31578.
सध्या मी सॉर्टिंगच्या स्टुलावर बसून आहे. पुढे जायला अजिबात वेळ नाही.
त्या काय काय वस्तू उचलायच्या असतात ते अजिबात कळले नव्हते. मग एका चॅप्टरचे दार उघडत नव्हते, तेव्हा सरळ गुगलची मदत घेतली. कुठे काय उचलेगिरी करायची त्याचा व्यवस्थित ठावठिकाणा कळला. वाँड आणि सॉर्टिंगची उत्सुकता होती म्हणून शोधाशोधीत वेळ घालवायला धीर नव्हता. यापुढे मात्र नो चीटिंग Wink

पोशन कसं बनवायचं ते कळलं नाही.. मी जास्त अभ्यास न करता नुस्त्या वस्तु गोळा केल्या.. पहिलं पुस्तक संपवलं.. उदय ला ड्युएल मधे हरवलं Wink

माझं नाव - PotionStone12103.

हाऊस अजून मिळायचं आहे. पण मुळात चार घरे ज्यांच्या नावावरून जन्माला आली ते चौघेही ग्रेटच होते. प्रत्येकाची दृढ अशी तत्त्वं होती आणि अंगी अमूल्य गुण होते. सगळेच ग्रिफिंडॉर मध्ये गेले तर मजा कशी येईल? Proud

पण मुळात चार घरे ज्यांच्या नावावरून जन्माला आली ते चौघेही ग्रेटच होते. प्रत्येकाची दृढ अशी तत्त्वं होती आणि अंगी अमूल्य गुण होते. >>>> +१

सगळेच ग्रिफिंडॉर मध्ये गेले तर मजा कशी येईल?>>>>>> तरिही, हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं.. Wink

रच्याकने मी युनोहु चीच वाट बघत होते.. कोणतं हाउस मिळतय ते सांगा आता Happy

उदयन गेमच्या धाग्याकरता धन्यवाद Happy

ज्याचं जळतं <<< Lol हो, प्रत्येकालाच ग्रिफिंडॉर मिळावं असं वाटणार. कारण ग्रिफिंडॉरचा कानाकोपरा आपल्या पाठ आहे. बाकीचीं घरं म्हणजे अगदी चोरून कढवलेलं पॉलीज्यूस पोशन ढोसून पोटात होत असलेली पाकपूक कंट्रोल करत तरीही उत्सुकतेनं प्रवेश करायची ठिकाणं, असंच वाटतं..

Pages