मायबोली गणेशोत्सव २०११ घोषणा

Submitted by रूनी पॉटर on 28 July, 2011 - 16:53

मायबोली गणेशोत्सव २०११ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी संयोजक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे, त्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल. तसेच ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांनी अवश्य मंडळात सहभागी व्हावे.
धन्यवाद.
*****
मायबोली गणेशोत्सव २०११ संयोजक मंडळ तयार झाले आहे.
मुख्य संयोजक - मामी
संयोजक मंडळ - लाजो, प्रज्ञा९, वैद्यबुवा, प्रमोद देव.
सगळेजण पहिल्यांदाच काम करत आहेत. सर्व संयोजक मंडळाचे अभिनंदन व कार्यास भरघोस शुभेच्छा.
मोरया!!!
*****

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, आलं का मंडळ! Happy
शुभेच्छा!
मोरया!!

(आमच्या मागण्या आणि फु. स. कुठे लिहायचे?)

संयोजन मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार. मदत हवी तर हक्काने मागणारच. तुमच्या सदिच्छा आणि सहकार्य आम्हाला खरंच उपयोगी पडेल.

Pages