मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल तो बच्चा है जी गाण्यामधे
एका कडव्यात बिवि से टकरा रहे है आहे का? नासिर तर सडाफटिंग दाखवलाय चित्रपटात....???

मानसीचा "चित्रकार" तो

ऐवजी

मानसीचा "पत्रकार " तो Sad

[माझा मुलगा लहानपणी हे गाण असंच म्हणायचा , टीव्हीमुळे पत्रकार हा शब्द ऐकुन माहीत होप्ता पण चित्रकार माहितच नव्हता Sad ]

समझोता "समोसे" करलो...

तुम आ गये हो "मूड" आ गया है... हे गाणं फक्त मीच नाही तर माझी एक मैत्रिण पण असंच ऐकायची.

मनिषा त्या गाण्यामुळे जुन्या मायबोलीवरचे आठवले. कोणीतरी लिहीले होते :
"मानसीचा चित्रकार तो .. तुझे मी नंतर चित्र काढतो!" Rofl Lol

हे एक गाणं चुकीचे ऐकू नाही यायचे पण चुकीचे कळायचे
"शादी के लिये रजामंद कर ली, मैने एक लडकी पसंद कर ली"
यात त्याला लडकी पटवल्यापेक्षा लग्ना साठी रजा मिळाल्याचा आनंद जास्त होतोय असे रजामंद शब्दाचा अर्थ तेव्हा माहीत नसल्याने वाटायचे Happy

बाई माझी करंगळी मोडली यात ती बाई चिडून विहिरीत का पडते असे माझ्या मित्राने मला विचारले.

मी चिडले
इरीस पडले
वनमाळ तोडली...असेच आहे ना ते?

परवा दशावतार पाहीला थोडा, असिनवर चित्रीत केलेलं गाणं ' मुकुंदा मुकुंदा कृष्णा , मुकुंदा मुकुंदा मुझे दान मे दे दे मिरिंडा मिरिंडा ' असे ऐकले Uhoh नक्की काय शब्द आहेत ते?

इम्रान खानची कोकची जाहीरात आहे त्यात ती मुलगी त्याला खोटा कोक देते.. मला ते गाणे 'थम्स अप मिल गये हम... ' असे एकु येते...:)

"परवा दशावतार पाहीला थोडा, असिनवर चित्रीत केलेलं गाणं ' मुकुंदा मुकुंदा कृष्णा , मुकुंदा मुकुंदा मुझे दान मे दे दे मिरिंडा मिरिंडा ' असे ऐकले नक्की काय शब्द आहेत ते?"
दक्षिणेतले चित्रपट हिंदीत डब करतात त्यातल्या गाण्यातले शब्द कधी कधी अजिबात कळत नाहीत, आणि कधी कधी कळले तर नसते कळले तर बरे झाले असते असे वाटते. टेलिफोन धुन मे हसनेवाली बिन जल मछली (पुढे काय ते?).हा पण कमल हसनचाच चित्रपट ना?

मिरिंडा मिरिंडा'>>> असेल असेल तसेच असेल,असिन मिरींडाची ब्रँड अंबॅसिडर आहे ना!
टेलिफोन धुन में हसने वाली,मेलबॉर्न मछली मचलनेवाली,
डीजिट में सूर है तराशा, मॅडोना है या नताशा,
झाकिर हुसेन तबला तू है क्या?
सोना सोना तेरा झलके रुप सलोना, कंप्यूटर को लेके ब्रह्मा ने रचाया क्या?
आधुनिक आणि पौराणीक, देशी आणि विदेशी, गद्य आणि सांगितिक जाणीवांचा असा प्रगल्भ,गूढगर्भ,व्यामिश्र संगम याआधी कुठल्या काव्यात दिसला होता काय?

टशन मधले "छप्पन तारें तोड नाचनु.....दिल हारा रे.." ह्या गाण्यात "बनके आवारा मैं किस रस्तेपे पहुंच गया हुं..." अशी एक ओळ आहे. माझा नवरा ती अशी म्हणतो - "बनके आवारा मैं चष्मे लेके पहुंच गया हुं..." Wink

"ये मौसम क जादू है मितवा"....या HAHK च्या गाण्यात मुखड्याच्या शेवटी "नजारा वो हरसू है मितवा.." अशी ओळ आहे..........हे "हरसू" काय आहे बुवा?......कामसू, पिपासू असे "सू"कारान्त शब्द माहीत आहेत. पण "हरसू" बद्दल काही idea नाही.

खेळ मांडला गाण्यातली "वणवा ह्यो उरी पेटला" ही ओळ मला "मन वायु उरी पेटला" अशी ऐकु यायची. आताच दिपुर्झा यांच्या व्यक्तीरेखेत डोकावल्यावर खरी ओळ कळली Happy

"मूड" आ गया है, खुपच भारी Lol

एक फूल.... मन वायु उरी पेटला...... Lol वायू उदान, अपान की व्यान? आणि पेटला....... लय भारी!!!! Proud

खेळ मांडला गाण्यातली "वणवा ह्यो उरी पेटला" ही ओळ मला "मन वायु उरी पेटला" अशी ऐकु यायची>>>>>>> मी पण अजुन सुद्धा हेच गुणगुणत होतो Sad

>>>>>>>>बनके आवारा मैं किस रस्तेपे पहुंच गया हुं...

ते "किस मेलेमें पहुंच गया हूं" आहे<<<<<<<<<
हो! बरोबर्!....चूक झाल्याबद्दल क्षमस्व!

अरुन्धती, योगेश,
Happy
अजुन एक सांगते..जरा कायच्या काय वाटेल, पण खरंयः
होशवालों को खबर मध्ली एक ओळ "और वो समझे नही ये खामोशी क्या चीज है" अशी आहे ना..मी मारे मन लावून गात होते "और मौसम धीरे धीरे खामोशी क्या चीज है.. हाहाहा..मित्र्-मैत्रिणी तर हसुन हसुन लोळू लागले..कुणाला इतकंही कसं विचित्र ऐकु येउ शकतं आणि आलं तरी अर्थ तरी लागतोय का बघायचं नाही का? पण नाही.. Lol Lol

झुबी डुबी झुबी डुबी पम्पारा झुबी डुबी परमपम
झुबी डुबी झुबी डुबी नाचे क्यूं पागल सुलेमान हा इथे सुलेमान कुठुन आला? Uhoh

बरोबर्!....चूक झाल्याबद्दल क्षमस्व!
>>
ई... त्यात क्षमस्व कसचं...
चुकीची ऐकू आलेली गाणी असाच बीबी आहे... Wink

झुबी डुबी पंपारा -जनरल शब्द आहेत, टॅणटढॅण कसा आहे?- तसे Happy त्याला काही अर्थ नाही, प्रेमात पडलेलं युगुल मजेत काहीतरी गुणगुणतंय, इतकाच अर्थ.

दक्षिणा, सुलेमान!!! Lol ते 'पागल स्टुपिड मन' आहे Happy

मंजे तु एक नविन बीबी उघड आता, मला दिसलेली चुकिची गाणी असा.. Lol
गधडे मी तेच लिहिलंय जे तु लिहिलयंस.. येडप्पा... Rofl
सुलेमान चाच घोळ होता मला.

Pages