मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थन्क्स राजसी, ....... "आप जैसा कोई मेरी जिन्दगी मे आये, और वापस जाये "
ह्या गाण्याची आणि माझी काय दुष्मनी आहे कळत नाही.....काहीतरी घोळ होतच असतो!!

शास्त्रीय संगीतातले पण इथे चालते का? ... ए री आली पिया बिन... सखी कलन परत मोहे गगरी कल छिनी.......... नेमके काय आहेत हे बोल?

मी हे आधी लिहिलं असेल, आठवत नाही. "जो जिता वही सिकंदर" मध्ये एक गाणं आहे "रूठके मुझसे कही जब चले जाओगे तुम". त्यात एक ओ़ळ अशी ऐकू येते, अजूनही - "बातो, कभी लातोंसे भी मारा है तुम्हे". आता हे "बातो, कभी हातोंसे भी मारा है तुम्हे" असं आहे का अजून काय आहे? Happy

>>'परदेसी परदेसी गाना नही मुझे छोड दे मुझे छोड दे'

Happy ह्यातलं 'परदेसी परदेसी' सोडलं तर बाकी हिमेश रेशमियाला अचूक लागू आहे. Happy

हिमेश रेशमिया फार वाइट गातो असे मला वाटत नाही.त्याची व्हर्साटॅलिटी कमी आहे. आणि त्याची एक पट्टी ठरलेली आहे .एवढेच. तशी तर सर्वच प्रथितयश गायकानी ऐकवणार नाहीत इतकी रटाळ गाणी गायली आहेत.त्याच्या नाकात गाण्याबद्दल म्हणायचे असेल तर मुकेशने काय केले. ?मनहर, वगैरे.... विशेष्तः तो एक चांगला संगीतकार आहे. त्याच्या स्वतःच्या भूमिका असलेल्या चित्रपटात्च त्याने भिकार गायन केले आहे. त्याची बहुसंख्य गाणी रिपीटीशन नन्तर 'कानवळणी' पडतात. एके काळी असेच आरोप आर डी बर्मनवरही होत असत.

मी नुकतच ३ idiots मधले एक गाणे एकले आहे - झुबी डुबी झुबी डुबी नाचे ये पागल सुलेमन Happy ... te actually पागल stupid मन असे आहे . आणि माझा एकले हा शब्द दुरुस्त करा कोणीतरी ....

घुँघट कि आड से दिलबर का.........
हे गाणं माझी भाची... गोंगाट कि आड से दिल धडका....असं म्हणायची

वैभव Rofl

विनय...
एक काम कर - 'मला चुकीची ऐकू आलेली गाणी - वादावादी' नावाचे नविन पान सुरु करून ठेव....

आजा आजा दिल निचोडे, लक की मटकी फोडे , कोई गुडलक निकाले.........
हे गाणं माझा ४ वर्षाचा मुलगा असं गातो ,,,,
अज्या अज्या दिल्ली छोडे, राज की मटकी फोडे, कोई मुबलक निखारे, आज पुरा रस्ता तोडे... किल किल कारा मिरा केळीका तेल, चोरीचोरी पैसा पैसा पैसे का तेल (आणि मग डायरेक्ट) ढँण टॅ ढँण ........ढँण टॅ ढँण.......ढँण टॅ ढँण

म्हणुन तर आम्हाला हसण्याचा मुड आला की, आम्ही त्याला हे गाणं गायला सांगतो.......आणि तो पण बिचारा प्रत्येक शब्द खणखणीत आणि आत्मविश्वासाने गातो....त्याला माहितच नसतं की तो चुकलाय म्हणुन आम्ही हसतोय ते.....

<आजा आजा दिल निचोडे, लक की मटकी फोडे , कोई गुडलक निकाले.........
हे गाणं माझा ४ वर्षाचा मुलगा असं गातो ,,,,
अज्या अज्या दिल्ली छोडे, राज की मटकी फोडे, कोई मुबलक निखारे, आज पुरा रस्ता तोडे... किल किल कारा मिरा केळीका तेल, चोरीचोरी पैसा पैसा पैसे का तेल (आणि मग डायरेक्ट) ढँण टॅ ढँण ........ढँण टॅ ढँण.......ढँण टॅ ढँ<>
अय्या अस आहे हे गाण. मि पण तुमचा मुलगा गातो तसच साधारण गायचे.
===================
अलिकड्च्या एका चित्रपटातल एक सोनु निगमच पण गाण आहे. ते पण काहितरि भलतच एकु येत. पण आठवत नाहि नक्कि कोणत ते.

किशोरच्या "ओ मेरे दिल के चैन" ह्या गाण्यातील एक कडवे मला अजुनहि समजत नाहि Sad
युं तो अकेला भी अक्सर गिर के संभल सकता हु मैं,
तुम जो पकड लो हाथ मेरा दुनिया बदल सकत हू मैं,
मांगा है तुम्हे दुनिया के लिए,
अब खुद हि सनम फैसला किजिए |

त्याने तिला दुनिया के लिए क्यो मांगा है Sad

योगेश, ती मिळाली तर तो दुनिया बदलू शकेल. म्हणून दुनियेचं कल्याण करायला त्याला ती हवी आहे. वैयक्तिक हेतू काहीही नाही Happy ती मिळाली तर ग्लोबल वॉर्मिंग, अल काईदा आणि इतर दहशतवादी, पाणीटंचाई, गरीबी, युध्द, वांशिक आणि धार्मिक मतभेद, बेरोजगारी अश्या सगळ्या जागतिक समस्या तो चुटकीसरशी सोडवेल. Wink

Pages