गे पेरेंटस आणि मुलांचे संगोपन

Submitted by केदार on 14 June, 2011 - 09:56

अशातच एक मुलाखत पाहिली, त्यात मुलाखत देणारा गे होता. याला व त्याच्या पार्टनरला दोन मुलं आहेत, जुळी आहेत जी त्याने एका किरायाच्या गर्भाशया मध्ये मध्ये प्रत्येकी एकाचे स्पर्म डोनेट करून जन्माला घातली. (फॅटर्नल जुळी असा नवीन शब्द त्याने योजला)

मला गे व्यक्तींचे स्वातंत्र्य मान्य आहे, त्यामुळे तो गे वगैरे असला तरी कुठलाही सांस्कृतीक त्रास वगैरे मला नाही. रादर जेंव्हा असे विषय निघतात तेंव्हा मी प्रत्येक जण प्रत्येकाचे सेक्स ओरियंटेशन स्वतः ठरवू शकते, त्यांचे स्वातंत्र्य वगैरे असे बोलतो. त्यामुळे गे असणे हा मुद्दा नाही.

मुद्दा असा आहे की

१. ही दोन मुलं जन्माला येताना त्यांना काय माहित की पुढच्या १२-१४ वर्षात अगदी शाळेत सांगताना पासून ते अनेक गोष्टीत जिथे जिथे आईवडिल येतील तिथे आमचे दोन बाबा व एकही आई नाही (गे) असे त्यांना सांगावे लागणार त्याचा नाही म्हणला तरी मानसिक त्रास त्यांना होऊ शकतो.
इथे लोकं म्हणू शकतील की असे कुठे रोज सांगावे लागते, अनुभवावरून सांगतो की मुलं त्यांच्या आईवडिलांबद्दल शाळेत बोलतात. माझी मुलगी मला कित्येकदा तिच्या मित्रांच्या आई वडिलांविषयी सांगते. त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या नाहीतर मानसिक द्वंदाबद्दल मी बोलत आहे.

२. मुलांवर असणारे मातापित्याचे संस्कार ह्या मुलांवर नसतील तुम्ही म्हणाल मग अनाथांचे काय? पण हे अनाथ नाहीत, तर तसेच जन्माला घातलेत.

३. जाणता अजानत्या वयात पेरेंटस गे असल्यामुळे ती पण थोडी फार गे कडे वळल्या जातील का? कारण परत वातावरण. ह्यात मुलांच्या वैयक्तीक चॉईस वर अजानता तसे संस्कार होऊ शकतात.(कोणीही न लादता बंधन येऊ शकते असे वाटते) कारण अनेक लहान मुलं, जी विविध करेक्शन फॅसिलिटीत असतात ती गे होऊ शकतात / असतात. अमेरिका सोडून द्या वाटल्यास इतर देशांत अशा मुलांवर अनेकदा अत्याचार होउन गे होतात पण मुळे गे पण त्यांच्यात नसतो तर परिस्थितीमुळे तेच आवडू लागते.

अश्या विचारांमुळे गे वृत्तीला विरोध नसताना पण त्यांना मुलं असणे ह्याला समहाऊ माझा विरोध म्हणता येनार नाही, पण ते स्विकारायला थोडी अडचण वाटत आहे. (वरील मुद्यांमुळे - चुकीचे असू शकतील)

गे लग्न संस्था आताशा निर्माण झाली आहे, त्यामुळे लग्न असेल तर मुलं का नको हा प्रतिवाद होऊ शकतो, पण मी मानसिक द्वंदाबद्दल लिहितोय.

तुम्हाला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आश्चर्य आहे.. बाकी करतात ती चर्चा आणि माझे प्रश्न किंवा मुदे म्हणजे काडी कसे काय बुवा?
असो!

मी अजूनही कुणी गे असण्याच्या किंवा त्यांना मुले असण्याच्या बिलकूल विरोधात बोलत नाहीये...

अजूनही माझा मुद्दा हा नाही की जे गे आहेत त्यांनीच चर्चा करावी वगैरे!

त्यामुळे पुन्हा पुन्हा जे मी म्हणत नाही त्याबद्दल मला समज देण्यात येऊ नये! Happy

हा मुद्दा नाही, जर वाढवू द्यायची तर काय होऊ शकेल हा आहे. आणि तोपण गे परेन्ट्स बाबत. बाकी अमूकही वाढवतातच हे इथे लिहिण्यात अर्थ नाही. त्या मुलांच्या बाबतीत चांगले काय होऊ शकेल हेही लोकांनी मागे लिहिले आहे. सध्याच्या परिस्थितीत त्या पालकांची जबाबदारी वाढते हे खरे>>>>>>>
लालू , या बद्दल अनेक अनुमोदन!

बाकी अभिनन्दनाबद्दल धन्यवाद!

(स्वगतः चर्चा हा एक स्पेशल प्रान्त आहे)

--की आपण आपले लाम्बून लम्बून चर्चा करत आहोत?<<--
ह्म्म्म अता इथे कोणी प्रत्यक्षात गे नाही त्यामुळे चर्चा लाम्बूनच होणार.
पण अता अगदी जवळचा अ‍ॅन्गल आणायचा तर असे अत्ता तरी सांगता येईल की उद्या समजा आमच्या मुलांनी 'फॅड' म्हणुन म्हणा किन्वा नैसर्गिक पणे म्हणा 'गे' जीवन पद्धती स्वीकारायचे ठरवले तर अगदी खुषीने नाही तरी 'जे' आहे त्याचा स्वीकार करून त्यांच्या मताचा आदर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
(यामागे दुसरा पर्यायच नाही , हे कारणही असु शकते) अगदी 'मेरे खानदान की इज्जत मिट्टी मे मिला दी' टाईप नाटक तमाशा करून मुलांबरोबरचे संबंध तोडणार तर नक्कीच नाही. अर्थात संबंध तोडणे किन्वा धाक्दपटशा, मारहाण करणे ई. गोष्टी तशाही आपल्या सारख्या पालकांच्या आवाक्याबाहेरच्याच आहेत.
माझ्या मुलांवर माझे एव्हढे प्रेम आहे की उद्या जरी ते 'गे' बनले तरी मी त्यांच्याशी संबंध नाही तोडू शकत एव्ह्ढे नक्की.

विषयाशी संबंधित वाटणारही नाही कदाचित, पण जरूर वाचा -

http://www.insightiitb.org/2011/gayiitb-out-and-about/

http://students.iitm.ac.in/thefifthestate/2011/07/standard-deviation/

आपल्याला नक्की काय आवडतं, हे शोधण्यासाठी काही लोक समलिंगी संबंध ठेवतही असतील, पण मुळातच आकर्षण नसताना शारीरिक संबंध कोणीही ठेवू शकत नाही. त्यामुळे गे असणं हे 'फॅड' कसं, हे कळलं नाही.

मीरा१० आणि लालू ह्यांच्या पोस्टस पटल्या. मला जे काही मुद्दे मांडायचे/ सुचवायचे होते ते तुम्हाला समजले हे बघून आनंद वाटला.
चिनूक्स, तू दिलेल्या लिंक्स वाचत आहे.

मुळातच आकर्षण नसताना शारीरिक संबंध कोणीही ठेवू शकत नाही.>>>>> जगातला सगळ्यात मोठा आणि जुना व्यवसाय सुरूच झाला नसता आणि टिकलाही नसता मग तर!

<जगातला सगळ्यात मोठा आणि जुना व्यवसाय सुरूच झाला नसता आणि टिकलाही नसता मग तर!>

Are you serious?? लैंगिक आकर्षण असतं म्हणूनच वेश्यागमन केलं जातं. तसं आकर्षण नसेल तर लैंगिक संबंधच ठेवले जाणार नाहीत.

पण मुळातच आकर्षण नसताना शारीरिक संबंध कोणीही ठेवू शकत नाही.>> संपूर्ण अनुमोदन. ब्राव्हो.

सेक्शुअल ओरिएंटेशन व नर्चरिंग इन्स्टिंक्ट हे दोन पूर्ण वेगळे गुणधर्म आहेत. से. ओ. हा पूर्ण पणे वैयक्तिक, अंतरंगातून उमलणारा प्रश्न आहे. ते कसे व्यक्त होइल हे अनेक पॅरामिटर्स वर अवलंबून असते. त्याहूनही ते व्यक्त झालेच पाहिजे असे ही नाही. हेटरो व्यक्तिंच्या सापेक्ष गे लोक कमी सेल्फ सेंटर्ड असतात.( वैयक्तिक निरीक्षण - स्वीपिन्ग जनरलायजेशन नव्हे.) त्यांना आजू बाजूच्या वातावरणाची जास्त जाण व जाणीव असते. हे गूण वापरून गे लोक चांगले पालक बनू शकतात. गे ओरिएंटेशन स्वत:पाशी सुद्धा अ‍ॅक्सेप्ट करणे अवघड जाते तर ते मानून घेऊन एका पार्टनरबरोबर कमिट मेंट घेऊन शिवाय दुसर्‍या जिवाचे पालकत्व करण्याची जबाबदारी घेणे हा फार मोठा मानसिक प्रवास आहे. फॅड म्हणून ट्राय करून बघायला ते काही नवीन सीझन चा ड्रेस नव्हे.

आकर्षण म्हणजे त्या व्यक्तीबद्दलचे प्रेम नव्हे.>>> कळले... मी प्र्माबद्दल नाही पण त्याच व्यक्तीबद्दल आकर्षण .. यामुद्द्याचा विचार करत होतो!पण ते व्यक्तिबद्दल नाही तर लैंगिक आकर्षण असू शकते.. हे पटले!

गे ओरिएंटेशन स्वत:पाशी सुद्धा अ‍ॅक्सेप्ट करणे अवघड जाते तर ते मानून घेऊन एका पार्टनरबरोबर कमिट मेंट घेऊन शिवाय दुसर्‍या जिवाचे पालकत्व करण्याची जबाबदारी घेणे हा फार मोठा मानसिक प्रवास आहे.>>>>>>

खूप व्यवस्थितपणे मान्डलेला मुद्दा!

>>हा पूर्ण पणे वैयक्तिक, अंतरंगातून उमलणारा प्रश्न आहे. ते कसे व्यक्त होइल हे अनेक पॅरामिटर्स वर अवलंबून असते. त्याहूनही ते व्यक्त झालेच पाहिजे असे ही नाही. गे ओरिएंटेशन स्वत:पाशी सुद्धा अ‍ॅक्सेप्ट करणे अवघड जाते तर ते मानून घेऊन एका पार्टनरबरोबर कमिट मेंट घेऊन शिवाय दुसर्‍या जिवाचे पालकत्व करण्याची जबाबदारी घेणे हा फार मोठा मानसिक प्रवास आहे>> अमा मोदक!!!!

>>फॅड म्हणून ट्राय करून बघायला ते काही नवीन सीझन चा ड्रेस नव्हे.
बरोबर. आलाय हा मुद्दा मागे. तुम्हाला न आवडणारी, न पटणारी गोष्ट केवळ कुतूहल, पीअर प्रेशर, 'आपण कसे वेगळे' म्हणून करायची यालाच 'फॅड' म्हणतात ना? Happy तशीच ही गोष्ट काही लोक करतात. विशेषतः तरुण लोक.

दक्षिणा, हेमाशेपो. नक्की. Proud

खरे गे ओरिएंटेशन अंतरंगातून डेवलप होत होत कधीतरी चूक किंवा बरोबर क्षणी व्यक्त होते. फॅड म्हणून ट्राय करणारे आपोआप त्यांच्या बेसिक ओरिएंटेशन कडे परत जातात.

खालील लेख वाचनात आला. लेखन शैलीमुळे जास्त आवडला. पालकत्वापेक्षाही मोठी चॅलेंजेस ह्या कम्युनिटीपुढे आहेत हे जाणवले. http://www.walrusmagazine.com/articles/2011.09-society-life-after-death

बाजारात तुरी अन भट भटणीला मारी.
भटजींनी येताना बाजारात नवीन तूर आल्याचे पाहिले. घरी येऊन बायकोला सांगीतले. मग दोघांचा वाद सुरु झाला की तुरीचे काय करावे? वरण की अजून काही? वाद इतका विकोपास पोहोचला की बुवा बायकोला मारायला लागले.

दोन 'गे'नी काही तरी केले, या बद्दल तावातावाने चर्चा.

वर कडी म्हणजे ते जेंडरलेस प्रकरण. इथे मराठी घरात करा प्रयत्न. अग/अरे नक्कि काय हाक मारणार आहात आपल्या नपुंसकलिंगी अपत्यास? उगा काही तरी..

Pages