अशातच एक मुलाखत पाहिली, त्यात मुलाखत देणारा गे होता. याला व त्याच्या पार्टनरला दोन मुलं आहेत, जुळी आहेत जी त्याने एका किरायाच्या गर्भाशया मध्ये मध्ये प्रत्येकी एकाचे स्पर्म डोनेट करून जन्माला घातली. (फॅटर्नल जुळी असा नवीन शब्द त्याने योजला)
मला गे व्यक्तींचे स्वातंत्र्य मान्य आहे, त्यामुळे तो गे वगैरे असला तरी कुठलाही सांस्कृतीक त्रास वगैरे मला नाही. रादर जेंव्हा असे विषय निघतात तेंव्हा मी प्रत्येक जण प्रत्येकाचे सेक्स ओरियंटेशन स्वतः ठरवू शकते, त्यांचे स्वातंत्र्य वगैरे असे बोलतो. त्यामुळे गे असणे हा मुद्दा नाही.
मुद्दा असा आहे की
१. ही दोन मुलं जन्माला येताना त्यांना काय माहित की पुढच्या १२-१४ वर्षात अगदी शाळेत सांगताना पासून ते अनेक गोष्टीत जिथे जिथे आईवडिल येतील तिथे आमचे दोन बाबा व एकही आई नाही (गे) असे त्यांना सांगावे लागणार त्याचा नाही म्हणला तरी मानसिक त्रास त्यांना होऊ शकतो.
इथे लोकं म्हणू शकतील की असे कुठे रोज सांगावे लागते, अनुभवावरून सांगतो की मुलं त्यांच्या आईवडिलांबद्दल शाळेत बोलतात. माझी मुलगी मला कित्येकदा तिच्या मित्रांच्या आई वडिलांविषयी सांगते. त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या नाहीतर मानसिक द्वंदाबद्दल मी बोलत आहे.
२. मुलांवर असणारे मातापित्याचे संस्कार ह्या मुलांवर नसतील तुम्ही म्हणाल मग अनाथांचे काय? पण हे अनाथ नाहीत, तर तसेच जन्माला घातलेत.
३. जाणता अजानत्या वयात पेरेंटस गे असल्यामुळे ती पण थोडी फार गे कडे वळल्या जातील का? कारण परत वातावरण. ह्यात मुलांच्या वैयक्तीक चॉईस वर अजानता तसे संस्कार होऊ शकतात.(कोणीही न लादता बंधन येऊ शकते असे वाटते) कारण अनेक लहान मुलं, जी विविध करेक्शन फॅसिलिटीत असतात ती गे होऊ शकतात / असतात. अमेरिका सोडून द्या वाटल्यास इतर देशांत अशा मुलांवर अनेकदा अत्याचार होउन गे होतात पण मुळे गे पण त्यांच्यात नसतो तर परिस्थितीमुळे तेच आवडू लागते.
अश्या विचारांमुळे गे वृत्तीला विरोध नसताना पण त्यांना मुलं असणे ह्याला समहाऊ माझा विरोध म्हणता येनार नाही, पण ते स्विकारायला थोडी अडचण वाटत आहे. (वरील मुद्यांमुळे - चुकीचे असू शकतील)
गे लग्न संस्था आताशा निर्माण झाली आहे, त्यामुळे लग्न असेल तर मुलं का नको हा प्रतिवाद होऊ शकतो, पण मी मानसिक द्वंदाबद्दल लिहितोय.
तुम्हाला काय वाटते?
रीकी मार्टीन हा पॉपस्टार
रीकी मार्टीन हा पॉपस्टार सुद्धा गे पॅरेन्ट आहे. एका मुलाखतीत पाहिले होते, त्याची जुळी मुले अतिशय गोंडस आहेत. ती अगदी लहान असताना तो स्वतःच्या कामातून सुट्टी घेऊन इतर कोणाच्याही मदतीशिवाय 24x7 त्या मुलांची काळजी घेत होता म्हणे. दुध, डायपर बदलणे, अंघोळ घालणे ई सर्व तोच करायचा. अजुनही तो मुलांना खूप वेळ देतो. मलातरी तो एकदम मस्त डॅड वाटला.
चर्चेमध्ये भाग घेणार सगळं
चर्चेमध्ये भाग घेणार सगळं दुरूनच बोलताहेत असे वाटतेय!
जसे काहीजण फ्याड म्हणूनपण ही जीवनशैली अंगिकारत असतिल तसेच केवळ फ्याड आणि उदारमतवादी आहोत हे दाखवण्यासाठीपण बरीच पब्लिक या प्रकाराला सपोर्ट करत असतिल.
गे असणारे वगैरे कुणी आहेत का?
म्हणजे ही चर्चा हायपोथेटीकल वगैरे न होता ज्यांच्याबद्दल बोलणे चालू आहे त्याच्याशी डायरेक्ट रिलेट होईल.
मग चर्चाच नको. कारण ज्यांना
मग चर्चाच नको. कारण ज्यांना गे पेरेंटसनि मुलं अॅडॉप्ट करणं चुकीचं वाटत नाहीये ते केवळ फ्याड किंवा उदारमतवाद दाखवायचा म्हणूनच ना.
बाकी अश्या आणि वरतीही आलेल्या काही विचारांच्या प्रदर्शनानंतर इथे कोणी उघडपणे गे असल्याचे मान्य करावे ही अपेक्षाच बिनबुडाची आहे.
बाकी अश्या आणि वरतीही आलेल्या
बाकी अश्या आणि वरतीही आलेल्या काही विचारांच्या प्रदर्शनानंतर इथे कोणी उघडपणे गे असल्याचे मान्य करावे ही अपेक्षाच बिनबुडाची आहे. >> अनुमोदन
बाकी अश्या आणि वरतीही आलेल्या
बाकी अश्या आणि वरतीही आलेल्या काही विचारांच्या प्रदर्शनानंतर इथे कोणी उघडपणे गे असल्याचे मान्य करावे ही अपेक्षाच बिनबुडाची आहे.>>>>>
का म्हणे असे???
आम्ही बुरसटलेल्या विचारांचे आहोत हे माहीत आसूनही आम्ही ते मान्य करतोच आहोत ना!!!
मग गे असलेल्यांना ते मान्य करण्यात अडचण ती काय?
असो... हा उगीच पुढे आलेला मुद्दा झाला.
मुळात माझा मुद्दा हा होता की जी चर्चा चालू आहे त्यावर ज्यांच्याबद्दल चर्चा आहे त्यांचे काय मत आहे?....
की आपण आपले लाम्बून लम्बून चर्चा करत आहोत?
रीकी मार्टीन हा पॉपस्टार सुद्धा गे पॅरेन्ट आहे.....मलातरी तो एकदम मस्त डॅड वाटला.>>>>> रिकी मार्टीनबद्दल काही म्हणायचे नाही पण अश्या सेलेब्रिटी प्रसिद्धीसाठी काय काय करतिल हे माहीत असतांनाही पेजथ्री वरचे गोसिप किती उचलून धरायचे हे ठरवायला हवेच!
कोणीही जनरलाईज केलेले नाही,
कोणीही जनरलाईज केलेले नाही, तरी तसं केल्यासारखं लिहितायत सगळे.
जसे काहीजण फ्याड म्हणूनपण ही जीवनशैली अंगिकारत असतिल तसेच केवळ फ्याड आणि उदारमतवादी आहोत हे दाखवण्यासाठीपण बरीच पब्लिक या प्रकाराला सपोर्ट करत असतिल
गिरीराज, याला आणि पुढच्या पोस्टलाही अनुमोदन.
आम्ही बुरसटलेल्या विचारांचे
आम्ही बुरसटलेल्या विचारांचे आहोत हे माहीत आसूनही आम्ही ते मान्य करतोच आहोत ना!!!<<<
आता तुम्हीच म्हणालात स्वतःला बुरसटलेले.
बाकी तुमचे नुसते विचार हो.
एखाद्याची प्रामाणिक जीवनशैली तुम्ही फ्याड म्हणून निकालात काढणार जसं आमच्या विचारांना उदारमतवाद दाखवायचा सोस म्हणालात त्याप्रमाणे मग कोण कशाला इथे सांगेल तसं?
मुळात माझा मुद्दा हा होता की जी चर्चा चालू आहे त्यावर ज्यांच्याबद्दल चर्चा आहे त्यांचे काय मत आहे?....
की आपण आपले लाम्बून लम्बून चर्चा करत आहोत?<<<
धागाकर्त्याचा मुद्दाही लांबून बघताना काय वाटतं हाच होता असं वाटतं.
बाकी कुठल्याही गोष्टीसंदर्भात चर्चा करताना त्या संदर्भातल्या व्यक्तींनीच करावी असे तुमचे मत असेल तर खरंतर तुम्ही तरी का बोलताय ना. की तुमचं उदारमतवादाचं फॅड नाही म्हणून?
सेलेब्रिटी प्रसिद्धीसाठी काय काय करतिल हे माहीत असतांनाही पेजथ्री वरचे गोसिप किती उचलून धरायचे हे ठरवायला हवेच!<<<
आता याला जनरलायझेशन नाही तर कशाला म्हणायचं अजून? एक गे पिता आपल्या दोन जुळ्या बाळांना प्रेमाने खेळवतो याला सेलेब्रिटी-प्रसिद्धी स्टंट- पेजथ्री-गॉसिप म्हणायचं हे पण आपण किती संस्कृतीनिष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी फ्याड म्हणून म्हणल्यासारखे वाटते.
हा उगीच पुढे आलेला मुद्दा
हा उगीच पुढे आलेला मुद्दा झाला.>>>>>>>>>>>>>>>> हे जे मी म्हटले त्याला खूप जास्त महत्व आहे त्याच्या आधीच्या चार वाक्यांपेक्षा!
त्या संदर्भातल्या व्यक्तींनीच करावी >>>> 'च' बद्दल काही'च' म्हटले नाहीये मी.
बाकीचे का चर्चा करतात याबदलही एक अवाक्षरही नाही काढले!
ज्यांच्यासंदर्भात चालू आहे त्यांचे मत काय हे जाणून घ्यावेसे वाटले.
जिथे बच्चनसाहेबांनी आपल्या चित्रपटाच्या बरोब्बर रिलीजच्या वेळी आजोबा होण्याची बातमी ज्या पद्धतीने उघड केली त्यावरून "सेलेब्रिटी-प्रसिद्धी स्टंट- पेजथ्री-गॉसिप" हे कुठल्या थराला जऊ शकते आणि ते खरंच किती गंभीरपणे घ्यावं हे खरोखरच ठरवून घ्यावे प्रत्येकाने!
बाकी वैयक्तिक घेण्याची गरज नाही!
>>एखाद्याची प्रामाणिक
>>एखाद्याची प्रामाणिक जीवनशैली तुम्ही फ्याड म्हणून निकालात काढणार
पुन्हा तेच! ती फॅड आहे की नाही हे ज्याने ती स्वीकारली आहे त्याने तपासून पहावे.
>>आता याला जनरलायझेशन नाही तर कशाला म्हणायचं
सेलेब्रिटींचे वागणे हा धाग्याचा विषय नाही. गे लोकांच्या बाबतीत कोणीही जनरलाईज केलेले नाही.
ती जीवनपद्धती स्वीकारणारे काहीजण फॅड म्हणून स्वीकारतात, काही लोक फॅड म्हणून सपोर्ट करतात, काही जण फॅड म्हणून विरोध करतात इ इ..
धन्यवाद.
जसे काहीजण फ्याड म्हणूनपण ही
जसे काहीजण फ्याड म्हणूनपण ही जीवनशैली अंगिकारत असतिल तसेच केवळ फ्याड आणि उदारमतवादी आहोत हे दाखवण्यासाठीपण बरीच पब्लिक या प्रकाराला सपोर्ट करत असतिल >>>>>
हे कशावरून म्हणत आहात गिरीराज? जर मला कुणाचं 'गे' असणं हा वैयक्तिक चॉईस वाटला - मग ते नविन काहीतरी 'फॅड' म्हणून का असेना - आणि यात काही चुकीचं वाटलं नाही तर लगेच मी उदारमतवादी आहे हा 'दाखवण्याचा' प्रयत्न होतो का? मग मतस्वातंत्र्य म्हणजे काय हो? आणि या बाबतची मतं फक्त गे लोकांनीच मांडावी हे लॉजिक कळलं नाही. आपल्याकडे अजून तरी गे लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन निकोप नाही त्यामुळे अशा पब्लिक फोरमवर कोणीही लिहीण्याची शक्यता जवळ जवळ शून्य आहे. काही वर्षांपूर्वी मिसळपाववर एका आयडी ने उघडपणे, खर्या नावाने गे असणं मान्य केलं होतं आणि त्यावर लिहीलं होतं. मला वाटत आधीच्या पानांवर कुणीतरी त्याची लिंक दिली आहे
जर रस्त्यावर रहाणार्या लोकांना, इथे अमेरीकेत ड्रग्ज अॅडिक्टसना मुलं होण्याचा 'अधिकार' आहे तर बाकी सर्व नॉर्मल आयुष्य जगणार्या आणि मुलांना एक परीपूर्ण आयुष्य देऊ शकणार्या पण सेक्शुअल चॉईस वेगळा असणार्या लोकांना मुलं होण्याचा अथवा दत्तक घेण्याचा अधिकार नसावा?
शेवटी काय चूक आणि काय बरोबर हे आपण ठरवणारे कोण? हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का?
धन्यवाद
>>उदारमतवादी आहोत हे
>>उदारमतवादी आहोत हे दाखवण्यासाठीपण बरीच पब्लिक या प्रकाराला सपोर्ट करत असतिल
अंजली, यात राजकारणी लोक येतात.
'फक्त' त्यांनी मांडावी असं कोण म्हणतंय?
सोहाच्या पोस्ट्पासून पुन्हा वाचा म्हणजे तेच तेच मुद्दे येणार नाहीत.
मिपा कशाला, इथेही लिहिलेले ना कोणीतरी..
जर मला कुणाचं 'गे' असणं हा
जर मला कुणाचं 'गे' असणं हा वैयक्तिक चॉईस वाटला - मग ते नविन काहीतरी 'फॅड' म्हणून का असेना
<<< अंजली सगळ्याच पोस्ट्स ना, या वाक्याला तर प्रचंड अनुमोदन !
फॅशन, खाणे-पिणे यातले फॅड
फॅशन, खाणे-पिणे यातले फॅड म्हणून ट्राय करण्याइतकी ही साधी गोष्ट नसेल कदाचित. अंदाजच फक्त. म्हणून गिरीराज च्या 'आपण सगळे लांबूनच बोलतोय' ला पुन्हा अनुमोदन.
हेमाशेपो.
लालू, राजकारण आणि राजकारणी या
लालू,
राजकारण आणि राजकारणी या गोष्टी आल्या की कुठल्याही विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्याची व्यापकता, त्या विषयाचा अर्थ, व्याप्ती बदलते हे खरं.माझं म्हणणं मी 'पब्लिक' च्या दृष्टीकोनातून मांडलं आहे.
सेलेब्रिटी आले तरीही तेच
सेलेब्रिटी आले तरीही तेच होतं...
'पब्लिक' त्यांचं अनुकरण करतं.. सर्वसामान्य लोक तसे नाहीतच असं म्हणण्याला अर्थ नाही.
हेमाशेपो + १
हेमाशेपो + १>>> 'पब्लिक'
हेमाशेपो + १>>>
'पब्लिक' त्यांचं अनुकरण करतं>>> म्हणून जर एखाद्या सेलेब्रिटीची 'गे' असणं ही खरीखुरी भावना असेल आणि त्या व्यक्तीला खरच मातृत्वाचा / पितृत्वाचा अनुभव घ्यायचा असेल, तो /ती मुलांचं उत्तम संगोपन करू शकत असतील तर 'लोकांचा' विचार करून मुलांबाबतचा निर्णय घ्यायचा का?
सामान्य लोक तसे नाहीतच असं म्हणण्याला अर्थ नाही.>>> म्हणजे कसे?
'पब्लिक' त्यांचं अनुकरण
'पब्लिक' त्यांचं अनुकरण करतं.. सर्वसामान्य लोक तसे नाहीतच असं म्हणण्याला अर्थ नाही.
<<<
तेच न पुन्हा अनुकरण करणे/ न करणे पर्सनल चॉइस आहे
बरेच उप मुद्दे निघालेत बीबी वर.
पण या सगळ्यामुळे गे कपल आयडिअल पेरेंट्स होउ शकत नाहीत , ते मुलांचं संगोपन चांगले करणार नाहीत हे काही सिध्द होत नाही/ पटत नाही..
>>म्हणजे कसे? फॅड
>>म्हणजे कसे?
फॅड वाले.
त्यावरचा पॅरा तेच तेच उगाळलंय, म्हणून उत्तर देत नाही. जनरलाईज केलेलं नाही हे लाख वेळा सांगितलंय वर!
डीजे, 'चॉइस' शब्दाला खूप अर्थ आहे. त्यात 'समजून उमजून' हा भाग येतो. (माझ्या मते)
धन्यवाद!
हेमाशेपो. + २
हेमाशेपो. + २ <<<
हेमाशेपो. + २
<<<
जनरलाईज केलेलं नाही हे लाख
जनरलाईज केलेलं नाही हे लाख वेळा सांगितलंय वर!>>> बरं
हेमाशेपो. + २>>>
बाकी ... जाउ दे ....
भिकार्यांच्या जीवन जगण्याच्या
भिकार्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्या मुलांना त्रास होऊ शकतो. पण भिकार्याला त्याची जीवनपद्धती बदलायची मनापसून इच्छा असते. त्याला श्रीमंत व्हायला नक्कीच आवडेल.
हे गे पेरेंटसच्या बाबतीत शक्य नाही. त्यांना हेटरो होणं आवडेलच असं नाही.
अॅब्युसिव्ह पेरेंटसमुळे मुलांना त्रास होऊ शकतो. पण पोलिसांच्या किंवा सरकारच्या लक्षात आलं की असा काही त्रास होतोय तर ते त्या मुलांना ताबडतोब पालकांपासून दूर करतात.
मुळात चाईल्ड अॅब्युस ही एक मानसिक विक्रुती आहे. हे सगळेच मान्य करतात.
हे सुद्धा गे पेरेंटसच्या बाबतीत लागू होत नाही.
तात्पर्यः गे पेरेंटस असल्यामुळे समाजात किंवा घरातही त्या मुलाचा जो काही मानसिक कोंडमारा होऊ शकतो त्यावर काही ठोस उपाय सध्या तरी दिसत नाहीत.
मानसिक कोंडमारा अनेक कारणांमुळे होऊ शकतो. समाजाकडून हेटाळणी. वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आईची किंवा वडिलांची गरज भासणे.
बाकी सगळी जीवनपद्ध्ती (कपडे, घर, खेळणी, छंद) सारखीच असली तरी आपल्या घरात २ आई/ २ बाबा का? हा प्रश्न नक्कीच पडणार.
???????? सर्व प्रथम गे
????????
सर्व प्रथम गे पेरेंटसच्या मुलांच्या मनावर परिणाम होतो(च) आणि तो वाईट(च) असतो असं म्हणाताय का तुम्ही हे स्पष्ट कराल का? कारण तुमच्या पोस्टीतून तसा अर्थ निघतोय.
भिकार्याला त्याची जीवनपद्धती बदलायची मनापसून इच्छा असते. >>> हे कशावरून म्हणताय तुम्ही? तसं असेल तर प्रत्येक भिकारी कष्ट करताना, स्वतःची परीस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करताना दिसला असता. समाजात तर याच्या बरोबर उलट चित्र दिसत आहे. या बाबतीत गे पेरेंटसची तुलना समजू शकली नाही.
हेटरो होणं आवडेलच असं नाही.>>>
अॅब्युसिव्ह पेरेंटसमुळे मुलांना त्रास होऊ शकतो. पण पोलिसांच्या किंवा सरकारच्या लक्षात आलं की असा काही त्रास होतोय तर ते त्या मुलांना ताबडतोब पालकांपासून दूर करतात.>>> त्यानं त्या मुलांचे प्रॉब्लेम्स संपतात असं वाटतंय का तुम्हाला? या अब्युसिव्ह मुलांच्या मनावर काय परिणाम होतात आणि त्यातून निर्माण झालेले प्रॉब्लेम्स बद्दल तुम्ही वाचलं आहेत का? का असं म्हणायचं आहे हे प्रॉब्लेम्स चालतील पण गे पालकांच्या मुलांच्या मनावर परिणाम होणारच हे गृहित धरून होणारे परिणाम अत्यंत वाईट असतील असं समजायचं?
इथे अमिरीकेत तरी समाजाकडून हेटाळणी वगैरे पाहिलेली नाही. अशा मुलांना स्विकारण्याचा कल वाढतोय. मुलं पूर्णपणे नॉर्मल असतात.
अजून बरच काही लिहायचं होतं पण माझा उत्साह संपलाय ;).
वरची उदाहरणं नाही पटली सोहानी
वरची उदाहरणं नाही पटली सोहानी दिलेली

मानसिक कोंडमारा ? प्रश्नं ??
समाजाला काय उत्तर द्यायचं , मुलांना समजाऊन सांगायला इतर नॉर्मल पेरेंट्स सारखे गे पेरेंट्स समर्थ नसतील असं का गृहित धरताय ?
असे विचित्रं प्रश्न नॉर्मल पेरेंट्स ना वेगळ्या सिचुएशन मधे विचारले जातात तेंव्हा नॉर्मल पेरेंट्स काय करतात ? समजाऊन सांगत नाहीत का ?
( उदा. सिंगल पेरेंट्स ना , डिव्होर्स होताना , अनवेड मॉम्स ना सुध्दा समाजाच्या नेहेमीच्या चालीरितीं पेक्षा काही वेगळं दिसलं तर मुलं असे प्रश्न विचारतच असतील कि)
जर नॉर्मल पेरेंट्स उत्तर देउ शकतात तर गे पेरेंट्स पण समजावून सांगु शकत नाहीत का मुलांना सिचुएशन ?
२ आई २ बाबा वगैरे प्रश्न काय आयुष्य भर पडणारेत का ?
अजुन एक बरेचदा मुद्दा येतोय कि त्यांची मुलं पण वातावरणामुळे गे झाली तर ?
वेल, पर्सनल चॉइस पुन्हा एकदा, समाजाला खरच काय प्रॉब्लेम आहे त्यांची मुलं पण गे झाली तर
>> मानसिक कोंडमारा अनेक
>> मानसिक कोंडमारा अनेक कारणांमुळे होऊ शकतो. समाजाकडून हेटाळणी.
'एकाने खाल्लं की शेण आणि चारजणांनी खाल्लं की श्रावणी' अशी एक म्हण आहे त्याची आठवण झाली.
>> मुळात चाईल्ड अॅब्युस ही एक मानसिक विक्रुती आहे. हे सगळेच मान्य करतात. हे सुद्धा गे पेरेंटसच्या बाबतीत लागू होत नाही.
मग तुमच्या मते ही विकृती आहे का? यावर मानसोपचार करायला हवेत का? डावखुर्या मुलांना हट्टाने/धाकदपटशाने उजव्या हाताने कामं करायला लावतात तसं काही करायला हवं का? त्यांना मुलं होऊ देण्यावर / दत्तक घेऊ देण्यावर बंदी घालायला हवी का?
याच न्यायाने अपंग व्यक्तींनी मुलं वाढवण्यावरही बंदी घालावी का? हृद्रोगी? दमेकरी? लठठ? स्मोकर्स? अल्कोहोलिक्स? वर्कोहोलिक्स? शॉपोहोलिक्स? हाता/पायाला सहा बोटे असणारे?
कोणाला मुलं वाढवू द्यावीत आणि कोणाला नाहीत याची रेग्युलेशन्सच तयार करावीत आता.
चारचौघांपेक्षा निराळं म्हणजे ते अनैतिक तरी किंवा विकृत तरी - हे काय तर्कशास्त्र आहे?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
- फार्फार लांबून (दगडाला बांधलेल्या कागदावर लिहून) भिरकावलेली पोस्ट.
केदार, #१ सहमत. #२.
केदार,
#१ सहमत.
#२. संस्काराची वाख्या हि खूपच रीलेटीव आहे सध्याच्या काळात. उत्तर देणे अवघड.
#३. इथे एकच अनुभव सांगू शकते, ७-१२ ग्रूपच्या वयांच्या मुलांच्या शाळेत काम केल्याचा जी मोडलेल्या घरातून(डिवोर्स्ड पालक, दारुडे आई-वडील, एकटे पालक, मनोरुग्ण पालक, लग्न न करता झालेली मुले).
मुले 'तशी' नॉर्मल होती पण
प्रत्येक मूल इतके वेगवेगळ्या प्रश्णांनी व कुतुहलाने भरलेले होते किंबुहुना गोंधळलेले होते. त्यांची मानसिक स्थिती हि पुर्णपणे वातावरणाचा परीणाम होती. कारण ह्या शाळेत येण्यापुर्वी ती 'रेग्युलर' शाळेत जात असत व तोच एक प्रॉबलेम होता. कारण मनाची तुलना होत असे. कारण प्रत्येक मुल बाहेर्/शाळेत आपल्या आई वडीलांविषयी बोलतेच मित्र/मैत्रीणीबरोबर.
मग त्यांचे प्रश्ण असत की मला आई का नाही?(हे एकटे पालक्त्व असलेल्याच्या मुलांस) अथवा माझे आई वडील वेगळे रहातात?का? अबक चे का नाही.
सांगायचा हेतू हाच की मुलांना आत व बाहेर दोन भिन्न वातावरणाशी जुळवून वा समजवून घ्यायला लागले तर ताण पडतो.
इथील एका ७ वर्षाच्या मुलीच्या आईचे म्हणणे होते की ती मुलीला काही कमी पडू देत नाही पण तिचे काही प्रश्णांची उत्तर दिला ह्या वयात देवु शकत नाही वा समजवून शकत नाही मग मुलगी उदास रहाते म्हणून ह्या ग्रूपमध्ये आणले डॉकच्या सल्ल्याने. ही बाई सिंगल पेरेंटींग करत होती.
मुद्दा हाच की लहान मुलांना सगळ्याच गोष्टी समजवाणे त्या त्या वयात सांगणे कठीण असते पण घरात व बाहेर असे फरक त्यांना समजावून नाही दिले वा नीट नाही समजले तर ते मानसिक ताणातून जावू शकतात व तसेच त्यांच्या बुद्धीनुसार मिळालेल्या समजुतीला(perception) बरोबर धरून चालतात. शेवटी 'गोंधळलेली' अशी सुद्धा होवु शकतात व हि शक्यता ज्यास्त गे च्या बाबतीत सुद्धा कारण गे अॅडॉपशन अजून "standard" म्ह्णून स्विकारणे बाकी आहे समाजात व आजूबाजूला अशी मिक्स्ड उदाहरणे असतील तर गोंधळ उडु 'शकतो'.
पण भिकार्याला त्याची
पण भिकार्याला त्याची जीवनपद्धती बदलायची मनापसून इच्छा असते. त्याला श्रीमंत व्हायला नक्कीच आवडेल.<<< गुड जोक.
बाकी सोहाची ती आख्खी पोस्टच विनोदी आहे. (माझ्यामते आहे. ती विनोदी नाही हे लाखवेळा सांगून मला ती कमी विनोदी वाटणार नाहीये. तेव्हा सांगण्याचे कष्ट नाही घेतले तरी चालतील.)
गिरीराज, बर्या चाललेल्या चर्चेत कुजके शेरे मारत टाकलेल्या काडीबद्दल अभिनंदन.
मीराधा, शेवटच्या पॅरॅला
मीराधा, शेवटच्या पॅरॅला अनुमोदन.
>>कोणाला मुलं वाढवू द्यावीत आणि कोणाला नाहीत
>>विकृत, अनैतिक
हा मुद्दा नाही, जर वाढवू द्यायची तर काय होऊ शकेल हा आहे. आणि तोपण गे परेन्ट्स बाबत. बाकी अमूकही वाढवतातच हे इथे लिहिण्यात अर्थ नाही. त्या मुलांच्या बाबतीत चांगले काय होऊ शकेल हेही लोकांनी मागे लिहिले आहे. सध्याच्या परिस्थितीत त्या पालकांची जबाबदारी वाढते हे खरे. पुढेमागे हे कॉमन झाले तर ती कमी होईल.
आतापर्यंत चर्चा वाचतेय.
आतापर्यंत चर्चा वाचतेय. चांगली चर्चा भरकटतेय असं वाटले.
नीधप, स्वाती, अमाच्या सर्व पोस्टसना अनुमोदन.
सोहा मुळात गे आणि भिकारी यांची तुलनाच कशी करता येईल????
केवळ गे असणं या व्यतिरिक्त ती व्यक्ती सुजाण सुंस्कारित नसू शकते का?
आणि जीवन जगण्याची पध्दती म्हणजे नक्की काय?? केवळ श्रीमंतीने मुलांचे संगोपन नीट होतं का?
चर्चा भरकटत चालली आहे,
चर्चा भरकटत चालली आहे, त्यामुळे प्रतिक्रिया काय द्यावी

तेच उमगत नाहिये.
आणि लालू हेमाशेपो+३ लिहायला विसरलीस का?

<<तात्पर्यः गे पेरेंटस
<<तात्पर्यः गे पेरेंटस असल्यामुळे समाजात किंवा घरातही त्या मुलाचा जो काही मानसिक कोंडमारा होऊ शकतो त्यावर काही ठोस उपाय सध्या तरी दिसत नाहीत.
>>
स्ट्रेट_पॅरंट्समुळे,समाजातील_स्ट्रेट_लोकांमुळे,गे_मुलांचा_जो_मानसिक कोंडमारा_होतो_त्याचं_कायः)
Pages