गे पेरेंटस आणि मुलांचे संगोपन

Submitted by केदार on 14 June, 2011 - 09:56

अशातच एक मुलाखत पाहिली, त्यात मुलाखत देणारा गे होता. याला व त्याच्या पार्टनरला दोन मुलं आहेत, जुळी आहेत जी त्याने एका किरायाच्या गर्भाशया मध्ये मध्ये प्रत्येकी एकाचे स्पर्म डोनेट करून जन्माला घातली. (फॅटर्नल जुळी असा नवीन शब्द त्याने योजला)

मला गे व्यक्तींचे स्वातंत्र्य मान्य आहे, त्यामुळे तो गे वगैरे असला तरी कुठलाही सांस्कृतीक त्रास वगैरे मला नाही. रादर जेंव्हा असे विषय निघतात तेंव्हा मी प्रत्येक जण प्रत्येकाचे सेक्स ओरियंटेशन स्वतः ठरवू शकते, त्यांचे स्वातंत्र्य वगैरे असे बोलतो. त्यामुळे गे असणे हा मुद्दा नाही.

मुद्दा असा आहे की

१. ही दोन मुलं जन्माला येताना त्यांना काय माहित की पुढच्या १२-१४ वर्षात अगदी शाळेत सांगताना पासून ते अनेक गोष्टीत जिथे जिथे आईवडिल येतील तिथे आमचे दोन बाबा व एकही आई नाही (गे) असे त्यांना सांगावे लागणार त्याचा नाही म्हणला तरी मानसिक त्रास त्यांना होऊ शकतो.
इथे लोकं म्हणू शकतील की असे कुठे रोज सांगावे लागते, अनुभवावरून सांगतो की मुलं त्यांच्या आईवडिलांबद्दल शाळेत बोलतात. माझी मुलगी मला कित्येकदा तिच्या मित्रांच्या आई वडिलांविषयी सांगते. त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या नाहीतर मानसिक द्वंदाबद्दल मी बोलत आहे.

२. मुलांवर असणारे मातापित्याचे संस्कार ह्या मुलांवर नसतील तुम्ही म्हणाल मग अनाथांचे काय? पण हे अनाथ नाहीत, तर तसेच जन्माला घातलेत.

३. जाणता अजानत्या वयात पेरेंटस गे असल्यामुळे ती पण थोडी फार गे कडे वळल्या जातील का? कारण परत वातावरण. ह्यात मुलांच्या वैयक्तीक चॉईस वर अजानता तसे संस्कार होऊ शकतात.(कोणीही न लादता बंधन येऊ शकते असे वाटते) कारण अनेक लहान मुलं, जी विविध करेक्शन फॅसिलिटीत असतात ती गे होऊ शकतात / असतात. अमेरिका सोडून द्या वाटल्यास इतर देशांत अशा मुलांवर अनेकदा अत्याचार होउन गे होतात पण मुळे गे पण त्यांच्यात नसतो तर परिस्थितीमुळे तेच आवडू लागते.

अश्या विचारांमुळे गे वृत्तीला विरोध नसताना पण त्यांना मुलं असणे ह्याला समहाऊ माझा विरोध म्हणता येनार नाही, पण ते स्विकारायला थोडी अडचण वाटत आहे. (वरील मुद्यांमुळे - चुकीचे असू शकतील)

गे लग्न संस्था आताशा निर्माण झाली आहे, त्यामुळे लग्न असेल तर मुलं का नको हा प्रतिवाद होऊ शकतो, पण मी मानसिक द्वंदाबद्दल लिहितोय.

तुम्हाला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती, वैद्यबुवा, सध्या गे मायनॉरीटीत आहेत.. गे मिरवणूकी निघतात तेंव्हाचे "गे" वागणे त्यांच्या भावना स्पष्ट करते. जेंव्हा गे बहुल होतील तेंव्हा ते आपली जीवनपद्धती अ‍ॅडोप्टेड किंवा जैविक अपत्यावर लादणार नाहीत हे कशावरून?

त्यांना मुले असू नयेत हा मुद्दा नाहीये.. म्हणजे सध्यातरी.. पुढे ह्याबद्दल माझे काय मत होईल.. सांगता येणार नाही.. सध्या तरी मला गे पालकत्व मूलांचा विचार करून खटकतेय.

ही आमच्या स्टेट मधली बरीच गाजलेली केस.
http://www.commonplacebook.com/current_events/politics/a_family_by_cho.shtm
यात गे अ‍ॅडॉप्शनला विरोध करणार्‍या आणि भावंडातील मुलीली दत्तक घेणार्‍या बापाने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. Sad

गे ही काही मुद्दाम ठरवून अंगिकारलेली जीवन पद्धती नव्हे. सेक्शुअल ओरिएंटेशन असे मुद्दाम करायचे म्हणून नाही ठरवता येत. त्यामुळे 'गे' असणे लादण्याचा प्रश्नच येत नाही उलट 'गे' व्यक्तीला 'सरळ' करण्याचे, भिन्नलैंगिकता लादण्याचे प्रयत्न मात्र बरेच आई-बाप करतात. आपले मूल लग्न झाले की 'सुधारेल' या कल्पनेने देशात लग्नही लावुन दिले जाते. अजून एक निरपराध व्यक्ती बळी जाते. Sad

ही मुलाखत कुठल्या देशातील आहे त्यावर समस्येचं स्वरूप ठरू शकेल. भारतात तर अजूनही अ‍ॅक्सेप्ट केलं जात नाही, होणारही नाही असं वाटतं.

जर दोन गे व्यक्ती मुलांना उत्तम संस्कार, स्टॅबिलिटी, भावनिक आधार, सुरक्षितता नवे एन्रिचिन्ग अनुभव देउ शकत असतील तर काय हरकत आहे >>>

वडिल जे संगोपन देउ शकतात तो आणी आइ जे देउ शकते तो यात मुलभुत फरक आहे. त्यात बदल करणे हे अनैर्सगिकच आहे.

केदार माझा गे असण्याला अजोबात विरोध नाहि. मी फक्त त्याला मुर्खपणा म्हणतो आहे. जर फळे , भाज्या खाणे आरोग्याला आणी निसर्गनियमाला अनुसरुन आहे तरी केवळ आवडते म्हणुन माती आणी गवत खाणे यात चांगले काय हे जर समजत नसेल तर त्याला मुर्खपणाच म्हणावे लागेल.

सेक्शुअल ओरिएंटेशन असे मुद्दाम करायचे म्हणून नाही ठरवता येत >>>> चुकिची शास्त्रीय माहिती आहे.

पालक मुलांच्याजीवनात काय टाइपचा इन्फ्लुअन्स आहेत ते महत्त्वाचे. मुले पेरेन्ट चांगला कि वाइट ते बघतात. स्त्री कि पुरुष/ गे कि स्ट्रेट हे त्यांच्या साठी फार महत्त्वाचे नसते. त्यांच्यासमोर वावरताना आपण प्रथम पालक असतो मग एक अ‍ॅडल्ट विथ चॉइसेस. ती प्रायवसी जपता आली तर उत्तम मुले वाढवणे शक्य आहे <<< मामी, हे खरेच.

स्वाती धन्यवाद..

मनुष्य आपल्या बुद्धीचा दुरूपयोग करतोय असा निष्कर्ष याआधी काढावासा वाटत होता. हे आधीचं मत बदलायला ही लिंक भाग पाडतेय...

मुलाखत आणि घटना अमेरिकेत घडली आहे.

भारतात तर अजूनही अ‍ॅक्सेप्ट केलं जात नाही, होणारही नाही असं वाटतं. >>> हो हे आजच्या भारतात. पण पूर्वीच्या भारतात (ज्यात खजुराहो आणि इतर लेणी येतात), त्या संस्कृतीत गे अ‍ॅक्सेप्टेड होते. तसे पुरावे विविध ठिकाणी आढळतात. वात्सायनाने कामसुत्रात एक पूर्ण धडा (म्हणावे का? Happy ) अपौरित्सक ( की औपरिस्तक ) हा गे / लेस्बियन बिहेव्हियरला अर्पण केलेला आहे.

अर्थात काळाच्या प्रभावामुळे जसे नग्न चित्र चालत नाहीत तसेच अ़जून तरी उघड उघड समलिंगी संबंध चालत नाहीत हे मला मान्य आहे. तरी असा कायदा अजुन नाही की समलिंगी संबंध बेकायदेशीर आहे. मध्ये असा कायदा येऊ पाहत होता, पण तो बारगळला असे काहीसे वाचनात आले. आपल्यकडे अनअ‍ॅडर्व्हटाईड व्हर्जन मध्ये हे सर्व चालते. आणि आज उद्यात असे संबंध चालणारा कायदाही येईल हे नक्की.

चांगली चर्चा ..

माझ्या बुद्धीला गे जीवनपद्धती पटत असली तरी मनात कुठेतरी खटकते अजूनही ..

तेव्हा मला दोन्ही बाजूचे मुद्दे थोडेफार पटत आहेत .. मला एव्हढंच वाटतं आणि आधीही म्हंटलंय त्याप्रमाणे गे जीवनपद्धती (in all walks of life, e.g. having kids) अजूनही मायनॉरिटी मध्ये आहे तेव्हा गे जोडप्यांनीं मुलांचा निर्णय घेतला तर त्या मुलांचं जीवन ईतर (मेजॉरिटीत असलेल्या/प्रवाही) मुलांच्यापेक्षा चॅलेंजींग नक्कीच असेल .. तसंच त्या पालकांनांही बाकीच्या पालकांपेक्षा दोन पावलं पुढे जाऊन जास्ती एफर्ट्स घ्यावे लागतील मुलांच्या रोजच्या जीवनमानातले चेलेंजेस कमी करण्यासाठी .. पालकत्व हे असंही कठिणच वाटतं मला तेव्हा हे एक्स्ट्रॉ एफर्ट्स असलेल्या पालक्त्वासाठी कितीजण तयार असतील ही शंका वाटते ..

The kids are alright की अशा काहितरी नावाचा एक मुव्ही बघितला होता इतक्यात .. इंटरेस्टींग होता विषय .. बाकी मुद्दा क्रमांक ३ विषयी काळच सांगू शकेल (किंवा ऑलरेडी कळायला सुरूवात झाली आहे .. सध्या अमेरिकेसारख्या प्रगत देशात पण हळू हळू सगळीकडेच जर गे जीवनपद्धती well-accepted झाली तर ह्यातच उत्तर मिळालं असं मी समजेन) .. असा बदल व्हावा की नाही ह्यावर मला अजूनतरी informed मत बनवता आलेलं नाही ..

छान चाललीये चर्चा. वाचतेय.

मुद्दा केवळ सिंगल/गे पेरेंट्स मुलाच्या भावनिक गरजा पुर्‍या करू शकतील का असा असू शकत नाही. एकतर अशा गरजा पुर्‍या होतात की नाही याला काही मोजमाप नाही. अगदी आई-वडिल असलेल्या कुटुंबातही असे काही निकष असू शकत नाहीत. ते ते मूलच सांगू शकतं की त्याची/तिची भावनिक गरज पूर्ण होऊ शकली आहे की नाही. आणि यातही बायस्ड असण्याचे असंख्य मुद्दे येऊ शकतात.

पण कुटुंबाइतकाच समाजाचाही मुलांच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असतो. समाजाने / मित्रमैत्रिणींनी स्वीकारणे हे मुलां-मुलींच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे असते. हा घटक या चर्चेत अतिशय महत्त्वाचा.

आज सिंगल पेरेंटिंग हे शहरांतून तरी बर्‍याच प्रमाणात सहजमान्य झालं आहे. तसं गे कपल स्वीकारण्याची मानसिकता अजुन तयार झाली नाहीये. ही ट्रान्झिशन फेज आहे आणि अडथळे येतीलच. अजून दहा वर्षांनी कदाचित ही सहज घटना मानली जाईल. तोवर अशा चर्चा घडणे महत्त्वाचे.

@चाणक्य
मी अत्याचारातून समलिंगी संबंधाची सवय लागलेल्या वगैरे लोकांबद्दल म्हणत नाहिये. अगदी नॉर्मल लहानपण गेलेल्या व्यक्तींबद्दल बोलतेय. जेव्हा अशा लोकांना स्वतःलाच हे वेगळेपण जाणवते तेव्हा तेही खूप स्ट्रगल मधून जातात. असे 'वेगळे' असणे हे काही कोणी आपणहून मागायला जात नाही. सुरुवातीला नाकारायचे, मग हळू हळू स्विकारायचे, त्या नंतर कुटूंबातील इतरांना हे कळले तर.. ते कसे वागतील आपल्याशी वगैरे नाना प्रकारच्या काळज्या, समाजात होणारा त्रास वेगळाच. कसे वाटत असेल १५-१६ वर्षाच्या मुलाला जेव्हा त्याच्या 'गे' असण्यामुळे चर्च त्याच्या कुटुंबाला हाकलून देते, जवळचे मित्र सह्ज खांद्याला हात लागला तरी संशयाने अंग आक्रस्तात, प्रत्येक गोष्टीचा संबंध त्याच्या 'गे' असण्याशी जोडला जातो...

आणि गे जीवनपद्धती म्हणजे काही फारसे वेगळे नसते. दोन भिन्नलिंगी व्यक्ती जशा एकत्र रहातात तसेच समलिंगी रहातात. ऑफिसला जातात, टॅक्स भरतात, लॉन-घर याची देखभाल करतात, एकमेकांची आजारपणात काळजी घेतात. माझ्या नवर्‍याचा मित्र 'गे' होता. त्याने त्याच्या पार्टनरला फुलटाईम कॉलेजसाठीही सपोर्ट केला. मित्राचे आई-वडिल समंजस होते. अधुन मधुन सुट्टीला यायचे. मित्र नोकरीमुळे बिझी असेल तर त्याचा पार्टनर त्यांना शॉपिंगला वगैरे न्यायचा. छान फॅमिली होती. Happy

केदार धन्यवाद..

अमेरिकेत घडली असल्याने कमीत कमी भारतात उद्भवणा-या समस्यांना पालक आणि मुलांना तोंड द्यावे लागणार नाही हे निश्चित.

चर्चा वाचली. अगदी खरं सांगायचं तर माझा गोंधळ उडालाय. गे असणं हे सामाजिक नियमांच्या विरूद्ध जाणं आहे. अनैसर्गिक आहे. कदाचित आम्ही परिपूर्ण जोडपं आहोत हे सिद्ध करण्यासाठीही पालकत्वाचा अट्टाहास असू शकतो असं वाटतंय. असं असेल तर पालकत्वाबाबत गांभिर्य तपासून पहावं लागेल.

लेखात दिलेल्या केसचं बिहेवियर काळच सांगू शकेल.

> गे असणं हे सामाजिक नियमांच्या विरूद्ध जाणं आहे.

समाज हा बहुसंख्यतेमुळे ठरतो. हाच समाज चुकीच्या नेत्यांनाही निवडतो. नेहमीच.

> अनैसर्गिक आहे

अनैसर्गिक तर काहीच नसते. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी निसर्गाविरुद्ध जाऊच शकत नाही. वटवाघुळासारखे उडणारे सस्तन प्राणी आहेत, डक बिल्ड प्लॅटीपस सारखे अंडी घालणारे सस्तन प्राणी आहेत. ते सर्व नैसर्गीकच. समलैंगीकतापण.

मुद्दा ३ योग्य नाही. केवळ पालक समलिंगी आहेत म्हणुन मुले तशी होणार नाहीत. मानवाच्या जन्मापासुन समलिंगी लोक आहेत. त्याचप्रमाणे अत्याचारामुळे पण तसे होत नाही (ओरीएंटेशन बदलणे). तसे होते याचे काही स्टॅटीस्टीक्स आहेत?

१. आता हे अमेरिकेबद्दल लिहिलेय, तर तिथे सिंगल अनवेड मदर्स, सिंगल सेपरेटेड पॅरंट्स यांचेही प्रमाण कमी नसावे. त्यांच्या बाबतीत हा प्रश्न येत नाही का? मग गे पॅरंट्सच्याच बाबतीत का यावा?

२. जेव्हा दोन गे पॅरंट्स पूर्ण विचार करून , प्रयत्न करून मूल जन्माला घालतात /अ‍ॅडॉप्ट करतात तेव्हा आपल्या अपत्यावरील संस्कारांच्या बाबतीत ते नक्कीच सजग असतील. इथेच ते समाजात येणार्‍या प्रश्नांना तोंड द्यायलाही मुलांना तयार करतीलच. कारण जगण्यातला तो किती महत्त्वाचा भाग आहे हे त्यांनी स्वतःच अनुभवलेलं असेल.आईने दिलेले संस्कार वेगळे आणि वडिलांनी दिलेले संस्कार वेगळे हा फक्त मानसिकतेचा भाग झाला. दोन गे/लेस्बियन माताही मूल जन्माला घालतात.
३. या लॉजिकने हेटरोसेक्स्युअल पॅरंट्सना गे ओरिएंटेशनचं मूल व्हायला नको, नाही का? गे पॅरंट्सना आपलं मूलही गे व्हावं असं वाटत असेल असं एक गृहीतक या प्रश्नात नाही का? आणि असं होण्याची शक्यता सध्याच्या काळात नाहीच्या बरोबरच आहे.
http://www.bendbulletin.com/article/20110614/NEWS0107/106140403/
Despite legal barriers, adoptions by same-sex couples are rising
(सध्या प्रतिसाद न वाचताच हे लिहिलेय.)
अलीकडेच एक बातमी वाचली. त्यात एका जोडप्याने आपल्या अपत्याची जेंडर आयडेंटिटी(म्हणजे तो गे किंवा हेटरो नव्हे तर मुलगा की मुलगी आहे) हे त्या अपत्यावरच सोडायचे ठरवले आहे. म्हणाजे मुलगा/मुलगी म्हणुन विशिष्ट कपडे/खेळ/वर्तन असे काही नाही. अपत्य या सगळ्या गोष्टी स्वतःच निवडत जाईल. http://www.indianexpress.com/news/couple-raise-genderless-baby-so-it-can...

भरत- नवीनच माहिती. आभारी आहे.

स्वाती आम्बोळे, अश्विनीमामी, आश्चिग, स्वाती २ यांना अनुमोदन.

अश्विनीमामी आणि स्वाती आंबोळे तुमच्या सगळ्या पोस्ट्स आवडल्या.

चाणक्य ' माझा गे असण्याला अजोबात विरोध नाहि. मी फक्त त्याला मुर्खपणा म्हणतो आहे.' या वाक्यात अंतर्विरोध आहे. समलिंगी व्यक्तीकडून सेक्स्युअल अ‍ॅब्युझ झाल्याने, परिस्थितीजन्य (जसे तुरुंगात, सैन्यात) गे असण्याची तात्कालिक स्थिती येऊ शकते. पण यातल्या कशालाही सामोरे न जाताही पूर्णतः नैसर्गिकपणे गे भावना उपजू शकतात. त्या मारून मुटकून्/संस्काराने लादता येत नाहीत किंवा दूरही करता येत नाहीत. फारतर दोन्ही बाबतीत कन्फ्युजनच होईल. असंच कन्फ्युजन/भावनिक प्रश्न विरुद्धलिंगी व्यक्तीकडून लैंगिक शोषण झालेल्या व्यक्तीतही येतात. (बलात्कारित स्त्री, पुरुषाकडून लैंगिक शोषण झालेली मुलगी, प्रौढ स्त्री कडून लैं शो झालेला मुलगा)

पण गे असणे म्हणजे भाजीपाला सोडून माती खाणे हे लॉजिक अजिबात पटले नाही. इट इज नॉट अ मॅटर ऑफ चॉइस.

भरत आणि अश्चिगच्या पोस्टला संपूर्ण अनुमोदन.. छान मांडलेत मुद्दे.
मला ही गे पेरेंटींग मध्ये काहीही प्रॉब्लेम दिसत नाही. काही गे कपल्स मी अगदी जवळून पाहीली आहेत. त्यांच्यातलं अंडरस्टँडीग आणि आयुष्य जगण्याची मूल्य थोडी वेगळी असतात हे माझं ऑब्झर्वेशन.
वर भरत ने दिलेल्या उदाहरणातले पेरेंट्स गे आहेत त्यांनी त्यांच्या अपत्यांना जेंडर प्रेफ्रन्स ची मूभा दिली आहे तशी हेट्रोसेक्शूअल पेरेंट्स देतील का? Uhoh बहुतेक नाही देणार.. उलट चूकून त्यांचे मूल 'वेगळे' निघाले तर दु:खातिरेकाने स्वत:चे बरेवाईट करून घेतील. हेट्रो पेरेंटींग मध्ये समाजाने घालून दिलेल्या मूल्यांना सांभाळण्याचा कल अधिक दिसतो. गे पेरेंटस विचाराने थोडे जास्ती प्रगल्भ आणि ओपन असल्याने त्यांनी अपत्य संगोपन केले तरीही ते उत्तम होऊ शकते हे माझे वैयक्तिक मत...

कुठल्या तरी एका शस्त्रज्ञाने 'गे स्केल' काढले आहे. त्याच्या मते सगळेच पुरुष गे असतात. फक्त हे अ‍ॅट्रॅक्ट व्हायचे प्रमाण १० % ते ९० % असे वेरी होते, त्यानुसार प्रत्य्क्ष आयुष्यात ती व्यक्ती पूर्ण गे असेल का हे ठरते म्हणे.

खरंतर जन्मत: प्रत्येक स्त्री आणि पुरूष हे बाय सेक्शुअल असतात.
पुढे त्यांच्या वाढीनुसार,स्वत:च्या सेक्शूअल प्रेफ्ररन्स व एक्स्पोजर मुळे ते पुढे हेट्रो असे फिक्स होते.

खरंतर जन्मत: प्रत्येक स्त्री आणि पुरूष हे बाय सेक्शुअल असतात.>>> तुला बायक्युरिअस म्हणायचे आहे का? समलैगिकता काही प्रमाणात अनुवांशिक, जीन्सवर अवलंबून असते असे पुरावे आहेत,

नाही मला बायसेक्शुअलच म्हणायचे आहे. फार ४-५ वर्षांपुर्वी मी या बद्दल कोणत्यातरी पुस्तकात वाचलं होतं. पुस्तकाचं नाव नाही आठवत पण आता.

<<वर भरत ने दिलेल्या उदाहरणातले पेरेंट्स गे आहेत त्यांनी त्यांच्या अपत्यांना जेंडर प्रेफ्रन्स ची मूभा दिली आहे तशी हेट्रोसेक्शूअल पेरेंट्स देतील का? बहुतेक नाही देणार.. उलट चूकून त्यांचे मूल 'वेगळे' निघाले तर दु:खातिरेकाने स्वत:चे बरेवाईट करून घेतील>>
दक्षिणा, काहीतरी गोंधळ होतोय. त्या बातमीतले पालक भिन्नलिंगीयच आहेत.
त्यांनी आपल्या अपत्याला तू मुलगा/मुलगी आहेस म्हणून असं नेसायचं , खेळायचं, वागायचं, बोलायचं ही वाक्य ऐकवायची नाहीत असं ठरवलंय. ते मूल स्वतःचा चॉइस स्वतः निवडेल.
मला हे सांगायचे होते की स्त्री किंवा पुरुषाकडून अपेक्षित वर्तन हे संस्कारांचाच भाग असतो. त्यात न बसणार्‍या मुलाल बायल्या किंवा मुलीला टॉम बॉय म्हटले जाते.
इथे सेक्स्युअल ओरिएंटेशनचा(गे/बाय्/स्ट्रेट असण्याचा) संबंध नाही. कदाचित या बातमीचा या विषयाशी संबंध नाही, पण हा शेवटी वर्तनाचा मुद्दा आहे म्हणुन लिहावेसे वाटले.

तुम्ही फक्त जोडपं लिहिलं त्यामुळे मी ते सोयीस्कररित्या गे असं धरून टाकलं..
पण तुम्ही म्हणता तसं बातमीचा या विषयाशी संबंध नाही असं अजिबात नाहिये. उलट या बातमीवरून प्रेरणा घेऊन इतर जोडप्यांनी (especially hetro couples) नी जर का आपल्या मुलांना त्यांची जेंडर आयडेंटिटी व प्रेफ्रन्सेस चूज करू दिले तर, गे पेरेंटींग ही सुसह्य होईल.

उलट या बातमीवरून प्रेरणा घेऊन इतर जोडप्यांनी (especially hetro couples) नी जर का आपल्या मुलांना त्यांची जेंडर आयडेंटिटी व प्रेफ्रन्सेस चूज करू दिले तर, गे पेरेंटींग ही सुसह्य होईल.>> गे पेरेंटींगच कशाला गं माणसाचे नॉरमल जगणेच सुसह्य होइल असे वाटते.
मुलगा आहेस म्हणून हे गुण असलेच पाहिजेत, मुलगी आहेस म्हणजे तिला अश्याच भावना असल्या पाहिजेत. कुठले गुण वरखाली असले तर लोकांना भयानक त्रास व्हायला लागतो, पालकांनीच फर्म स्टँड घेतला तर कदाचित या गोष्टी कमी होतील.

Pages