गे पेरेंटस आणि मुलांचे संगोपन

Submitted by केदार on 14 June, 2011 - 09:56

अशातच एक मुलाखत पाहिली, त्यात मुलाखत देणारा गे होता. याला व त्याच्या पार्टनरला दोन मुलं आहेत, जुळी आहेत जी त्याने एका किरायाच्या गर्भाशया मध्ये मध्ये प्रत्येकी एकाचे स्पर्म डोनेट करून जन्माला घातली. (फॅटर्नल जुळी असा नवीन शब्द त्याने योजला)

मला गे व्यक्तींचे स्वातंत्र्य मान्य आहे, त्यामुळे तो गे वगैरे असला तरी कुठलाही सांस्कृतीक त्रास वगैरे मला नाही. रादर जेंव्हा असे विषय निघतात तेंव्हा मी प्रत्येक जण प्रत्येकाचे सेक्स ओरियंटेशन स्वतः ठरवू शकते, त्यांचे स्वातंत्र्य वगैरे असे बोलतो. त्यामुळे गे असणे हा मुद्दा नाही.

मुद्दा असा आहे की

१. ही दोन मुलं जन्माला येताना त्यांना काय माहित की पुढच्या १२-१४ वर्षात अगदी शाळेत सांगताना पासून ते अनेक गोष्टीत जिथे जिथे आईवडिल येतील तिथे आमचे दोन बाबा व एकही आई नाही (गे) असे त्यांना सांगावे लागणार त्याचा नाही म्हणला तरी मानसिक त्रास त्यांना होऊ शकतो.
इथे लोकं म्हणू शकतील की असे कुठे रोज सांगावे लागते, अनुभवावरून सांगतो की मुलं त्यांच्या आईवडिलांबद्दल शाळेत बोलतात. माझी मुलगी मला कित्येकदा तिच्या मित्रांच्या आई वडिलांविषयी सांगते. त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या नाहीतर मानसिक द्वंदाबद्दल मी बोलत आहे.

२. मुलांवर असणारे मातापित्याचे संस्कार ह्या मुलांवर नसतील तुम्ही म्हणाल मग अनाथांचे काय? पण हे अनाथ नाहीत, तर तसेच जन्माला घातलेत.

३. जाणता अजानत्या वयात पेरेंटस गे असल्यामुळे ती पण थोडी फार गे कडे वळल्या जातील का? कारण परत वातावरण. ह्यात मुलांच्या वैयक्तीक चॉईस वर अजानता तसे संस्कार होऊ शकतात.(कोणीही न लादता बंधन येऊ शकते असे वाटते) कारण अनेक लहान मुलं, जी विविध करेक्शन फॅसिलिटीत असतात ती गे होऊ शकतात / असतात. अमेरिका सोडून द्या वाटल्यास इतर देशांत अशा मुलांवर अनेकदा अत्याचार होउन गे होतात पण मुळे गे पण त्यांच्यात नसतो तर परिस्थितीमुळे तेच आवडू लागते.

अश्या विचारांमुळे गे वृत्तीला विरोध नसताना पण त्यांना मुलं असणे ह्याला समहाऊ माझा विरोध म्हणता येनार नाही, पण ते स्विकारायला थोडी अडचण वाटत आहे. (वरील मुद्यांमुळे - चुकीचे असू शकतील)

गे लग्न संस्था आताशा निर्माण झाली आहे, त्यामुळे लग्न असेल तर मुलं का नको हा प्रतिवाद होऊ शकतो, पण मी मानसिक द्वंदाबद्दल लिहितोय.

तुम्हाला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो अमा, इथे एकदा असेंब्ली लाइनवर उभं राहिलं की आईला ब्रेस्ट मिल्क पंप करुन ठेवायला ब्रेक मिळताना मारामार ! केलं तर ते ठेवायला वेगळा फ्रीजही नसतो Sad

गे वृत्तीला विरोध नसताना पण त्यांना मुलं असणे ह्याला समहाऊ माझा विरोध म्हणता येनार नाही, पण ते स्विकारायला थोडी अडचण वाटत आहे. (वरील मुद्यांमुळे - चुकीचे असू शकतील) >>

गे पेरेंटेसचे मुलं गे होतील असे मी अजिबात म्हणत नाही. तर ते पालक फक्त "पुरक" ठरतील एवढेच मांडत आहे.आणि हे पुरक ठरणे म्हणजे परत खर्‍या स्वतंत्र्य वृत्तीच्या आड येणे पण असू शकते का? >>

हे विचार ऑर्वेलियन नाही का वाटत ? गे पालकांची मुलं गे होण्याचं प्रमाण जास्त असू शकेल यालाच काही शात्रीय आधार नाही . शिवाय तुला जर त्या पेरेंट्सने गे असण्याबद्दल आक्षेप नाही तर त्यांच्या मुलांनी गे होण्याने काय बिघडणार आहे.

हेच जर लॉजिक वापरलं तर सर्व कन्हिक्टेड फेलन्सना सुद्धा पेरेंटिंग चा हक्क नाकारायला हवा नै का ? गॅलियन चे राजरत्नम, सत्यम चे राजू यांची मुलं घोटाळे करतील म्हणून त्यांना नोकर्‍याच देऊ नयेत , कसे ?

बायोलॉजिकली ती मूले त्या गे पॅरेंट्स चीच आहेत असे दिसतेय. देवानी/निसर्गानी काही गे, लेस्बियन म्हणून कोणाला अपत्य सुखापासून वंचित ठेवलेले नाही , तिथे आपण कोण हो किन्वा नाही म्हणणार ? तसेही या उदा. तर त्या दोघानी मूले मिळवण्यासाठी जे कष्ट आणि पैसे खर्च केलेले दिसतात त्यावरून त्याना त्या मुलांबद्दल खूप प्रेम,आस्था असल्याचे जाणवतेच. आणि मुलांचे उत्तम भविष्य घडविण्यासाठी ते प्रयत्न करतील असेही वाटते.

--पण ते स्विकारायला थोडी अडचण वाटत आहे -- या बाबतीत म्हणायचे झाले तर , रस्त्यावरचे भिकारी , आणि स्वतःचेच पोट न भरू शकणारे असे अनेक लोक याना ढीगभर मुले होउ नयेत असे मलाही फार वाटते.

रस्त्यावरचे भिकारी , आणि स्वतःचेच पोट न भरू शकणारे असे अनेक लोक याना ढीगभर मुले होउ नयेत >. निषेध. त्यांना उपजीविकेची साधने द्यायला हवीत. सिस्टिम बदलायला हवी. आपल्याला जश्या भावना व इच्छा असतात तश्या त्यांनाही असतात हे लक्षात घ्यायला हवे. आमच्या एशिअन/अफ्रिकन कल्चर्स मध्ये मुलांना रिसोर्स म्हणून बघतात. भीक मागायला जास्तीची लोके असे नव्हे तर भातशेतीची कामे, इतर घरातील/ बारक्या शेत- बागकाम उद्योगातील, पूरक व्यवसायातील कामे खूप मुले करतात. गरीब मुसलमान घरांतील मुले पंक्चर काढणे, टायर बदलणे अशी कामे फार सफाईने करतात. पाकिस्तान इराण इथे गरीब घरांतील मुले काच बाटल्यांच्य फॅक्टर्‍या, कार्पेट बनविणे, अशी फार मेहनतीची कामे करतात. मदुरै जिल्हा भारत इथे ३ वर्षांची लहान मुले पहाटे उठून मोगरा चमेली फुले हारवेस्ट करून आणतात. अफ्रिकेतील मुले धाकट्यांना सांभाळत गुरे राखतात. हे फार चांगले नाही पण त्यांच्या जगण्याच्या धड्पडीला नाक का मुरडायचे? मन मोठे करायला पैसे लागत नाहीत. असो. टू इच हिज ओन.

केदार, काल एक मस्त लेख वाचला तुला नक्की आवडेल. लेखन शैली पण सुरेख आहे. अशी पण फॅमिली असते.

http://www.nytimes.com/2011/06/19/nyregion/an-american-family-mom-sperm-...

आजची परिस्थीती पाहता, ढीगभर मुले कुणालाच होऊ नयेत - पण तो त्यांचा समजुन-सवरुन घेतलेला निर्णय असावा - त्या करता आवश्यक शिक्षण उपलब्ध करुन द्यायला हवा - पुस्तकी शिक्षण त्या करता पुरेसे नाही.

रस्त्यावरचे भिकारी , आणि स्वतःचेच पोट न भरू शकणारे असे अनेक लोक याना ढीगभर मुले होउ नयेत > ढीगभर मुले कुणालाच होऊ नयेत>
बरोबर!
लोकसंख्या आटोक्यात आली तर आपले अनेक प्रश्न सुटणं सोपं जाऊ शकतं..

--आमच्या एशिअन/अफ्रिकन कल्चर्स मध्ये मुलांना रिसोर्स म्हणून बघतात. --
--त्यांच्या जगण्याच्या धड्पडीला नाक का मुरडायचे --
हेच अतिशय वाईट आहे. बालकामगार हा प्रकार खरेच बघवत नाही. मुलांची नव्हे तर त्यान्च्या पालकांची प्रचंड चीड येते. विशेष करून जेव्हा त्यात त्या पालकांचा स्वार्थ उघड उघड दिसून येतो तेव्हा. वरती वर्णन केलेल्या सर्व बालकामगाराचे कौतुक वाटण्याआधी त्यांच्या पालकांची चीड येते.
एक उदा. म्हणुन - आमच्या मोलकरणीने स्वतःच्या ११ वर्षाच्या मुलीला शाळा सोडवून धुण्याभाड्याच्या कामाला लावले. तेव्हाच तिचे २ मुलगे मात्र प्रायव्हेट ईग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होते. आणि नवरा काहीही काम करायचा नाही.

उपजीविकेची साधने द्यायला हवीत -- साधने मर्यादित आहेत हे ही लक्षात घ्यायला हवे.
आपल्याला जश्या भावना व इच्छा असतात तश्या त्यांनाही असतात -- हो, पण म्हणुनच ढीगभर नको म्हणलेय. आपल्यासारख्याना सुद्धा १०-१२ मुले झाली तर आपणही गरीबातच जाउ की. १०-१२ मुलांचे चान्गले पालन पोषण करणे हे आजच्या काळात आपल्यासारख्या मध्यमवर्गीयानाही परवडणारे नाही.

--पण तो त्यांचा समजुन-सवरुन घेतलेला निर्णय असावा ---- बरोबर. पण सर्वाना ती समज येईपर्यत कीती काळ जाईल. आपली लोकसख्या कीती वाढेल, हे प्रश्न आहेतच.

बाकी इथेच थांबू कारण हा या बीबीचा विषय नाही. फक्त एव्हढेच म्हणायचे होते की या जगात काळजी घेणारे, सुरक्षित,समृद्ध बालपण देऊ शकणारे सुजाण पालक काही टक्के भाग्यवान मुलांनाच मिळतात. त्यामुळे जरी गे असले तरी जगातल्या अनेक वंचित मुलांपेक्षा चांगले आयुष्य त्याच्या मुलाना देउ शकतील अशी शक्यता वाटते.

प्रश्न फक्त मुलांना संगोपन देणे ( शिक्षण, आरोग्य इत्यादी) हा नसुन त्यातुन निर्माण होणारे इतर प्रश्न हा आहेच. त्या मुलांचे मानसिक संगोपन कसे असेल ह्यावर कोणी काहि बोलताना दिसत नाहि.

<त्या मुलांचे मानसिक संगोपन कसे असेल ह्यावर कोणी काहि बोलताना दिसत नाहि>
नाही लिहिलंय? मुलांवरील संस्कारांसंबंधीच्या पोस्ट्स बहुसंख्येने आहेत.

तुम्हाला यापेक्षा वेगळं काही मानसिक संगोपन अभिप्रेत आहे का?

इथे सगळ्यांनी सगळेच मुद्दे व्यवस्थित मांडले आहेत, सर्वात आशादायक वाटलेली गोष्ट म्हणजे पुर्वी ह्याच विषयावर दुसर्‍या कुठल्या तरी बाफवर अशास्त्रीय वाटणार्‍या पोष्टींचे प्रमाण इथे मात्र ९०% ने कमी झालेले दिसले .जर ही वेबसाइट समाजाचे perfect mini model आहे असे मानले तर ह्या वेगाने झालेला बदल निश्चितच सुखावह आहे.
फक्त माझे एक मत मांडायला आवडेल मुद्दा क्र. १ बद्दल,
सगलीच जबाबदारी गे पालकांची कशी ? तुमचे मुल जेव्हा दुसर्‍यांच्या पालकांविषयी बोलते तेव्हा काय योग्य काय अयोग्य हे तुम्ही त्याला सम्जावने ही तुमचीपण जबाबदारी नाही का? आजकाल पुण्यात ३५ ते ४० वयोगटातल्या पालकाम्चे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. त्यांची शाळेत जाणारी मुले असतात,त्याम्च्याविषयी घरी काही gossip लहान मुले करत असतील तर मला तो gossiping करणार्‍या मुलांच्या पालकाम्चा पराभव वाटतो.
माझ्या लहानपणी ग्रामीण भागतुन आलेल्या विद्यार्थ्यांच्या मराठी उच्चांवर आमचे थोडेसे गुंड टोळके negative comment करायचो.बर ती group activityअसल्यामुले मजा वाटायची, त्या मुलांना काय मान्सिक त्रास होत असेल हे आमच्या गावीही नसायचे.सुदैवाने एकदा माझ्या मातोश्रीनी ती टिंगल टवाळी ऐकली आणि व्यवस्थित झापले. त्यानंतर तो प्रकार आपोआप बंद झाला.

गेल्या रविवारच्या न्युयॉर्क टाइम्समधील हा लेख तुम्ही कोणी वाचला का?
http://www.nytimes.com/2011/07/17/nyregion/bound-in-a-gay-union-by-a-sta...
गे ही काही मुद्दाम ठरवून अंगिकारलेली जीवन पद्धती नव्हे. सेक्शुअल ओरिएंटेशन असे मुद्दाम करायचे म्हणून नाही ठरवता येत. ह्या भ्रमातून बाहेर पडायला हा लेख मदत करेल.
मला तरी वाटत की ह्या घडीला अमेरिकेत गे असणं ही केवळ क्रेझ किंवा फॅड आहे. चार लोकं करतात त्यापेक्षा काहीतरी वेगळ करायचं. बस्स!! मग त्याचे परिणाम काय होतील? आणि होणार्या परिणामांची जबाबदारी कोणाची ? ह्याचा विचार कोणीही करताना दिसत नाही.
आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यापायी बिचार्या लहान मुलांची फरपट होते आहे.
अमेरिकेत child abuse घडू नये म्हणून खबरदारी घेतली जाते. शाळेत मुलांना पढवल जातं आणि सख्ख्या आई-बापांना मुलांना रागवायची चोरी होते. पण "सो-कॉल्ड" गे पालकांच्यामुळे निर्माण होणार्या समस्यांकडे सगळेजण काणाडोळा का करत आहेत?
अमेरिकेत रहाणार्या भारतीयांनी तरी ह्या क्रेझला बळी पडू नये एवढीच अपेक्षा करू शकतो आपण.

१. गे ही काही मुद्दाम ठरवून अंगिकारलेली जीवन पद्धती नव्हे. सेक्शुअल ओरिएंटेशन असे मुद्दाम करायचे म्हणून नाही ठरवता येत. ह्या भ्रमातून बाहेर पडायला हा लेख मदत करेल.
२.मला तरी वाटत की ह्या घडीला अमेरिकेत गे असणं ही केवळ क्रेझ किंवा फॅड आहे. चार लोकं करतात त्यापेक्षा काहीतरी वेगळ करायचं.

या वरच्या दोन वाक्यांची संगती लागत नाही. Happy

सोहा,

तुमच्या पोस्टसमधे विसंगती जाणवते आहे. पुन्हा सांगाल का तुम्हाला काय म्हणायचे आहे ते?

चिनुक्सला अनुमोदन.

> सख्ख्या आई-बापांना मुलांना रागवायची चोरी होते
हा पुर्णपणे स्वतंत्र मुद्दा आहे. मुलांना समजावणे वेगळे आणि त्यांचे ब्रेनवॉशींग करणे वेगळे. त्यांना सर्व काही आत्मसात करायला शिकवा, दूरगामी (वाटणारे) विचार करायला शिकवा, स्वतः निर्णय घ्यायला शिकवा. व त्या निर्णयांचा आदर करायला शिका ...

मला असं म्हणायचयं की गे असणं ही ठरवून अंगिकारलेली जीवनपद्धती ही असू शकते. निदान काही जोडप्यांच्या बाबतीत. काहीवेळेला अशाप्रकारचं सेक्शुअल ओरिएंटेशन खरोखरच नैसर्गिक असू शकतं.
पण अनेकदा ते केवळ फॅडही असू शकते. तू तो लेख वाचलास तर मी काय सांगू इच्छिते ते अधिक स्पष्ट होईल.

गे असणं ही ठरवून अंगिकारलेली जीवनपद्धती ही असू शकते >> या बाबतीत संपूर्णपणे माझं मत हे आहे, की ज्या अर्थी असं काहीतरी नविन ते अंगिकारलं जातं (जे करायला प्रचंड धाडस लागतं) त्याअर्थी ती व्यक्ती प्रगल्भ असेल, तिचे विचार क्लिअर असतील... तसं असलं की बास... जीवन सुकर होईल.. मग अंगिकारलेली जीवनपद्धती असूदे नाहीतर नैसर्गिक... नीधपच्या भाषेत सांगायचं झालं तर, बेसिक मध्ये राडे नसले की युद्ध जिंकलंच म्हणायचं.

फॅड म्हणून अशी जीवनपद्धती अंगिकारणारे लोक उघडपणे हे करूच शकत नाहीत, जे असतं ते सगळं चोरून... आणि चोरून केल्यामुळे त्यात गे पेरेंटींग वगैरे भानगडी उद्भवतच नाहीत.

Exactly ! इथेच तर सगळी गोची आहे. तो लेख वाचून मला तरी असं वाटलं की त्यात उदाहरण दिलेल्या स्त्रीचे विचार फारसे स्पष्ट नसावे.
४ वर्ष एका स्त्रीबरोबर संसार केल्यावर ती तिच्यापासून विभक्त झाली आणि एका पुरुषाबरोबर राहू लागली. त्या दोघांना एक मुलगा पण झाला.
ह्याचा अर्थ नैसर्गिक उर्मीमुळे ती लेस्बियन झालेली नाही. ती जीवनपद्धती स्वीकारण्यामागचे विचारही ठाम नाहीत.
नविन जीवनपध्दती अंगिकारायला धाडस लागतचं. पण मग अनेक लोक केवळ स्टंट म्हणून अश्या गोष्टी करायला जातात. अनेकदा ती स्वीकारण्यामागचे विचार्/कारण स्पष्ट नसतात आणि त्याच्या परिणामांचाही नीट विचार केलेला नसतो. केवळ काहीतरी वेगळ्/ग्लॅमरस म्हणून ती जीवनपध्ध्ती स्वीकारलेली असते.
ह्यालाच मी फॅड म्हणते.
आणि प्रत्येक वेळेस फॅड ह्या कॅटेगरीत मोडणार्या गोष्टी चोरून केल्या जातात असं मुळीच नाही. अमेरिकेसारख्या व्यक्तीस्वातंत्र्य असलेल्या देशात तर अजिबातच नाही.

४ वर्ष एका स्त्रीबरोबर संसार केल्यावर ती तिच्यापासून विभक्त झाली आणि एका पुरुषाबरोबर राहू लागली. त्या दोघांना एक मुलगा पण झाला. ह्याचा अर्थ नैसर्गिक उर्मीमुळे ती लेस्बियन झालेली नाही. ती जीवनपद्धती स्वीकारण्यामागचे विचारही ठाम नाहीत. पण मग अनेक लोक केवळ स्टंट म्हणून अश्या गोष्टी करायला जातात. केवळ काहीतरी वेगळ्/ग्लॅमरस म्हणून ती जीवनपध्ध्ती स्वीकारलेली असते. ह्यालाच मी फॅड म्हणते. <<<
तुम्हाला बायसेक्शुअल हा शब्द माहितीये का? तुमच्या उदाहरणातली व्यक्ती आपल्याला नक्की काय हवंय, हे की ते असं शोधत असलेली असू शकते. इतकं ढोबळपणे फॅडचं लेबल कसं काय लावता येईल?
माझी एक रूममेट होती बाय. तिची खूप तडफड झाली होती आपण बाय आहोत ही गोष्ट स्वीकारताना. हे नाही तर ते हे त्यामानाने बरंच सोपं असतं असं म्हणायची ती.

असो. विषयांतर झाले क्षमस्व.

अगदी हेच लिहायला आले होते. सोहा, लिंक वाचली नाही अजून, पण हे इतक्या सहज फॅड म्हणून डिस्मिस करू नका.
फ्रॉइडने एक थिअरी 'सर्व मानवजात जन्मतः बायसेक्शुअलच असते' अशीही मांडली होती. आपले आचारविचार बरेचदा 'कंडिशनिंग'मुळे तसे असतात. ज्यांच्या नैसर्गिक उर्मी कंडिशनिंगला दाद न देण्याइतक्या प्रबळ होतात, त्यांना केवळ फॅड या लेबलखाली नाकारून कसं चालेल?

सोहाने, दक्षिणाने जे लिहिलंय त्यात थोडेफार तथ्य आहे. सगळेच 'फॅड' वाले नसतात. पण असे 'प्रयोग' करुन बघणारे असतातच.

आपले आचारविचार बरेचदा 'कंडिशनिंग'मुळे तसे असतात. >>. आचार विचार एकवेळ ठिक.
आपण एकीकडे म्हणतो ती नैसर्गिक उर्मी आणि व परत जन्मतः बाय असतो हे पटत नाही. (फ्रॉईडने म्हणले असले तरी) आणि उर्मी म्हणाल्यावर कंडिशनीगं कसेही असले तरी ती वर येणारच. कोणाचे बाय, कोणाचे स्ट्रेट तर कोणाचे गे. प्रत्येक गे बाय नसतो.

बाय असने हे नॅचरल असू शकते तसेच केवळ कुतूहल म्हणून असा प्रयोग करून बघनारे खूप असतात हे नाकारता येत नाही. तोच तो पणा कंटाळवाना म्हणून अनेक फेटीश इ इ जसे असतात तसेच हे प्रयोग वाले असतात.

केदार, या टेन्डन्सीज कमीअधिक प्रमाणात सर्वांच्यात असतात - अशी थिअरी आहे. आता तुमचा 'कल' आणि कंडिशनिंग जुळलं तर प्रश्नच नाही, ज्यांचा नाही जुळत / जे न जुळणार्‍या मायनॉरिटीमधे असतात, त्यांच्याबद्दल बोलतो आहोत ना आपण?

आता तुमचा 'कल' आणि कंडिशनिंग जुळलं तर प्रश्नच नाही >> स्वाती, मुळात उर्मी / ओढ ही नैसर्गिक असते व काही प्रमाणात लादलेली. (जेल मध्ये वगैरे) कंडिशनिंग म्हणजे काय? तर कळत्या न कळत्या वयात केलेले / झालेले संस्कार. इथे "स्त्री पुरूषाचा समागम" हे कंडिशनींग होऊ शकत नाही कारण गे पेरेंटसना अपत्य होऊ शकत नाही, स्ट्रेटना होते ही निसर्गाची प्रक्रिया आहे आणि ती हजारो वर्षे लोकांनी अंगिकारली ह्याला कंडिशनींग कसे म्हणता येईल?

दुसरा मुद्दा असा की गे "ओपनली गे " बहुतकरून कंडिशनींग आणि गें कडे पाहिल्याजाणार्‍या वेगळ्या दृष्टी मुळे होत नाहीत. पण गे हा कायम गे असतो, त्याला तसे मित्र मैत्रीनी मिळतात. (पार्टनर म्हणू ) असे मी म्हणत आहे.

अश्या प्रयोग करून बघणार्या लोकांनी, स्वतःच गोंधळलेल्या लोकांनी पेरेंटिंगच्या वाटेला का जावं ?
जी नविन जीवनपद्धती तुम्ही स्वीकारयला निघालायत त्याबद्दल तुमच्याच मनात गोंधळ असेल तर तुमचं लहान मुल तर किती गोंधळून जाईल?
केदार ने पहिल्या पोस्ट मधे म्हटलं आहे तेच परत मांडते.
मुलाला पुढच्या १२-१४ वर्षात अगदी शाळेत सांगताना पासून ते अनेक गोष्टीत जिथे जिथे आईवडिल येतील तिथे आमचे दोन बाबा व एकही आई नाही (गे) असे त्यांना सांगावे लागणार त्याचा नाही म्हणला तरी मानसिक त्रास त्यांना होऊ शकतो.
असा त्रास मुलाला झाला तर त्याच्या मागे ठामपणे उभं रहाण्यासाठी मुळात तुमचे विचार ठाम हवे.

गे पॅरेन्ट्स ना मुले असण्यात मला तरी काहीच गैर वाटत नाही !

एकाच्या ऐवजी २ वडील असल्याने काही फारसा फरक पडणार नाही ...हां आई नसल्याचा थोडा...(खरतर ....फार) परिणाम होईल ...पण कित्येक मुले आईशिवायही मुले मोठी होतातच की... त्यावर थोडीच बंदी आहे .?

बाकी मला एक प्रश्न नेहमी पडतो .की समाजाने एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यात का ढवळाढवळ करावी ?
गे असणं . नसणं...लेस्बियन असणं नसंणं... ...त्यांन्ना अपत्य असणं..नसंणं... २ असणं १० असणं ....हे फारच वैयक्तित प्रश्ण आहेत ...
समाजाने (आणि धर्मानेही) फक्त लिव्हिंग रुम पर्यंतच जावे ....किचन ...बेडरुम मधे जावु नये Happy

सोहा,
'नविन जीवनपध्दती' म्हणजे काय? काही अत्यंत वैयक्तिक गोष्टी / preferences सोडले तर बाकी जीवन पध्दती नॉर्मल असते. खाणं, पिणं, मित्र मैत्रिणी, नोकरी, आवड निवड सगळं काही इतर अनेक 'नॉर्मल' लोकांप्रमाणेच असते. अजून आपल्याकडे या मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो याची आकडेवारी / डेटा उपलब्ध नाहीये. घरात दोन आया आहेत की दोन वडिल आहेत यावर त्यांचा 'नैसर्गिक कल' अवलंबून असेल असं वाटत नाही. फारतर अशी जीवन पद्धत स्वीकारायला सोपं जात असेल. काही वर्षांनंतर गे पालकांनी वाढवलेली मुलं कितपत नॉर्मल असतात ते कळेलच. आणि हा आकडा इतर आकड्यांपेक्षा वरचा असला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. अब्युसिव्ह आईवडिलांपेक्षा गे पालकांकडे मुलं वाढलेली चांगलं नाही का?

> फ्रॉईडने म्हणले असले तरी

यापेक्षा फ्रॉईडचे अनेक विचार पाहता, त्याने म्हंटले आहे म्हणजेच तथ्य नसावे असे म्हंटले तरी चालेल Happy

अश्या प्रयोग करून बघणार्या लोकांनी, स्वतःच गोंधळलेल्या लोकांनी पेरेंटिंगच्या वाटेला का जावं ? <<
रस्त्यावरच्या भिकार्‍यांनाही मन आणि भावना आहेत म्हणून मुलं व्हायचा अधिकार आहे. मग भले ते मुलांना आयुष्यात भिक मागणे यापलिकडे संस्कार देऊ शकणार नसतील. मग गे पेरेंटसनी काय घोडं मारलंय?
तसं म्हणायचं तर सगळे हिटरोसेक्शुअल्स पार सुलझे हुए आणि अजिबात गोंधळ नसलेले थोडीच असतात? केवळ त्यांना मूल होऊ शकतं म्हणून त्यांना परवानगी का पेरेंटिंगची?

>>> जी नविन जीवनपद्धती तुम्ही स्वीकारयला निघालायत त्याबद्दल तुमच्याच मनात गोंधळ असेल तर तुमचं लहान मुल तर किती गोंधळून जाईल?<<<
गे पेरेंटिंग किंवा गे मॅरेजेस मधे असलेल्यांपेक्षा बाहेरून बघणार्‍यांचाच गोंधळ अधिक असतो असं मला वाटतं. कारण गे लोकांची जीवनपद्धती ही बाकी जीवनपद्धतीपेक्षा एकदम वेगळी असल्याचे मी तरी बघितले नाहीये. जीवनपद्धती ही लैंगिक कल यापेक्षा आर्थिक स्थिती, व्यवसाय, स्वभाव, शिक्षण यावर जास्त अवलंबून असते हो.

समाजाने (आणि धर्मानेही) फक्त लिव्हिंग रुम पर्यंतच जावे ....किचन ...बेडरुम मधे जावु नये <<<

अब्युसिव्ह आईवडिलांपेक्षा गे पालकांकडे मुलं वाढलेली चांगलं नाही का? <<<

दोन्हीला अगदी अगदी.

Pages