पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

माझ्यासंगे सांगतसे, तेरावे वर्ष सुखाने,
चौदावे हि मजेत जावो, तुम्हास आनंदाने.

येणार्‍या नवीन वर्षाच्या मायबोलीकरांना शुभेच्छा

वा... मस्त ....

दाटुन आलेले आभाळ
अन आस तुझ्या येन्याची
भिजलेल्या मनात सय
तुझ्या माझ्यातील अन्तराची

.

वात्रटिका
कायद्याच्या कचाट्यातून
जरी तो सुटला
वकीलाने त्याच्या मात्र
त्याला साफ धुतला

मला वाट्ल असच काहि तरी लिहाव
मायबोलिच्या य उपक्रमात आपनहि असाव
म्हनुनच मी माझी लेखनी हातात घेत्ली
विचारानची गर्दि या झुळुकेतुन उतरवली.....

कधी- कधी प्रयत्न हे
देवापेक्षाही श्रेष्ठ ठरतात
माणस देवाला मिळवण्यासाठीही
लोक प्रयत्न च करतात....

लोक कवीला कवी म्हणतात,
पुन्हा कवीता हवी म्हणतात,
कवी तरी काय करतो,दाखवन्याशीवाय दुख
पण त्यालाही कवीता नवी म्हणतात....

तेला-दूधाच्या पालथ्या पूरात
वाहून गेले दगड धोंडे -
दुष्काळी पिंपळाला लटकले
नवसाचे जिवंत सापळे !

तुझा परकेपणा छळतो मला
एकटेपणा जाळतो मग मला
समजावतो खुप मी मनाला
तरी तु आठवते क्षणा क्षणाला

ठरवलय मी आता
कायम एकट रहायच
वळून पून्हा कधीच
तूला नाही पहायच

पुढे पुढे जाताना ही
हे वळून पहाणे आहे
तुझ्या आठवणींचे
दुःखद हे गाणे आहे

तू माझी नाहीस तरी
मी फक्त तूझाच आहे
तू सोडून गेलीस आता
राहिला एकच श्वास आहे

...

......

दिवस -रात्र

दिवस -रात्र भारताचे जवान
सीमेवर पहारा देत असतात ,
तोडून बंधने ती जिवलगांची
देशाच्या रक्षणासाठी झटतातं ....!

_______कृष्णा तोंडे
किल्ले धारूर .

ऐक ना
काढ डोळ्यावरील
सखे आवरण काचेचे,
आहे बाकी अजुन
मला थोडेसे डुंबायचे !

©शिवाजी सांगळे, मो. +919545976589

मन माझे
झरझर मेघ बघ आले
मन माझे पाऊस झाले गं,
कोवळ्या दवांच्या त्या
गतस्मृतींनी न्हाउन गेले गं !
©शिवाजी सांगळे, मो.+919545976589

नजर बंद

नजर बंदि आहे
कि तुझी भूल आहे ?
तिरप्या कटाक्षी
दिलेली तु हूल आहे?

©शिवाजी सांगळे, मो.+919545976589

ह्रद्य
अत्तराच्या कुपीहुन आहे
सुंदर ह्रद्याची कुपी
ज्यात आहे प्रियजनांच्याआठवणी
म्हणुनच ह्रद्य धड्कते सुंदर तालांनी

जीवनाचे प्रश्न
जीवनात आलेल्या अडचणीचे
उत्तर शोधा नव्याने
आयुष्य भरून जाईन आनंदाने
सुटत नसतात प्रश्न आत्महत्येने

तू नाहीस
तर कविताही सुचत नाही,

मला कसा खायला उठतो प्रत्येक क्षण,
मग तुला तो का बोचत नाही ?

गळली गेली सारी पाने
वृक्षाला तरी खंत नाही
कारण त्याला माहीत आहे
गळती म्हणजे अंत नाही

कमाल
गाडगेबाबा तुकडोजींच्या
विचारांची कमाल,
त्याच्यांच कमालीतून करुया 
सुंदर स्वच्छतेची धमाल.

       स्वच्छ भारत
घरपरिसर स्वच्छ ठेवून
स्वच्छतेला हातभार लावुया,
स्वच्छ भारत निर्माणचं
स्वप्न साकार करुया.

          चित्र
उघड्यावर शौचास बसणे
लोकहो हे चित्र बरे नाही,
माणूस व कुत्र्यामधे मग
काहीच फरक राहणार नाही.

समाजभान
समाजाचे भान ठेवून
चला जीवन जगू या,
स्वच्छ सुंदर गावासाठी
आपणच पुढे येऊ या.

-सचिन ज.नागरे, मु.पो.किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432

कमाल
गाडगेबाबा तुकडोजींच्या
विचारांची कमाल,
त्याच्यांच कमालीतून करुया 
सुंदर स्वच्छतेची धमाल.

       स्वच्छ भारत
घरपरिसर स्वच्छ ठेवून
स्वच्छतेला हातभार लावुया,
स्वच्छ भारत निर्माणचं
स्वप्न साकार करुया.

          चित्र
उघड्यावर शौचास बसणे
लोकहो हे चित्र बरे नाही,
माणूस व कुत्र्यामधे मग
काहीच फरक राहणार नाही.

समाजभान
समाजाचे भान ठेवून
चला जीवन जगू या,
स्वच्छ सुंदर गावासाठी
आपणच पुढे येऊ या.

-सचिन ज.नागरे, मु.पो.किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432

चारोळी

स्वदेशी

विदेशी कपड्यांना
करुन टाका फस्त
स्वदेशी खादीच
वापरा मस्त.

ग्रामविकास

स्वच्छता नसली की
घर दिसते भकास
प्रत्येक घर स्वच्छ राहिले
तर होईल ग्रामविकास

राजकारण

गावाच्या प्रगतीत दडली
देशाची उन्नती
गावातील राजकारणाने
होते देशाची अधोगती.

पैसा

कुठे काय दडलं आहे
शोधूनही सापडत नाही
पैशाच्या या लोभापायी
माणसाला माणूस कळत नाही.

ग्रामसभा

राजकारण खेळण्यापेक्षा
गाव कचरामुक्त करा,
ग्रामसभेच्या आधाराने
गाव हागणदारी मुक्त करा .

- सचिन ज.नागरे, किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432

Pages