परतीच्या वळणावर, सारखे मागे वळूनि पाहणे...
हे शेवटचे म्हणेपर्यंत, परतुनि माघारीच ते फिरणे....
चिमुरी,
पाउल वाटेवरच्या तुझ्या पाउलखुणा
तुझ्या ओंजळीतुन सांडलेली प्राजक्त फुले,
अन सोबतीला प्रत्येक वळनावर तुझ्या आठवणीचे तुकडे,
मी परतावं म्हणतोय, तुझ्यापासुन तुझ्याकडे.
दे हात सुखाचा अन जन्माची
दे हात सुखाचा
अन जन्माची नाती
ये पाऊस होऊन
मी धरणीची माती
मी अपार तृष्णा तू करुणाघन
मी अपार तृष्णा
तू करुणाघन देवा
ये घनांत गर्जत
वर्षाव सुखाचा व्हावा
परतीच्या वळणावर, सारखे मागे
परतीच्या वळणावर,
सारखे मागे वळूनि पाहणे...
हे शेवटचे म्हणेपर्यंत,
परतुनि माघारीच ते फिरणे....
पाऊस मनातला तुला आणि मला
पाऊस मनातला
तुला आणि मला रिजवतो,
अचानक येऊन
दोघान चिंब भिजवतो.
जे. डी. मस्त चारोळी
जे. डी. मस्त चारोळी
चर्चा पराक्रमाची केली न मी
चर्चा पराक्रमाची
केली न मी कदापी
वार्ता पराभवाची
लपवेन ना कदापी !
विशाल .....
विशाल ..... मस्तच
-------------------------------------------------
(फक्त गंमत म्हणून, सादर करतोय -----हलके घ्यावे)
चारशे ओळींची कविता
लिहायची होती मला
काय करू, चार ओळींचा
नियम आडवा आला.
विशाल झकास... UlhasBhide
विशाल झकास...
UlhasBhide मस्त ... आवडली नियमात बसवलेली कविता
उल्हास भिडे, मस्त चारोळी
उल्हास भिडे, मस्त चारोळी
उल्हास भिडेंच्या चारोळीला
उल्हास भिडेंच्या चारोळीला झब्बू -
काव्यातून व्यक्त करताना भावना
पहायचा नसतो नियम
चार ओळी असोत नाहीतर चारशे
वाचणारा कुणीतरी भेटतोच कायम
परतीच्या वळणावर, सारखे मागे
परतीच्या वळणावर, सारखे मागे वळूनि पाहणे...
हे शेवटचे म्हणेपर्यंत, परतुनि माघारीच ते फिरणे....
चिमुरी,
पाउल वाटेवरच्या तुझ्या पाउलखुणा
तुझ्या ओंजळीतुन सांडलेली प्राजक्त फुले,
अन सोबतीला प्रत्येक वळनावर तुझ्या आठवणीचे तुकडे,
मी परतावं म्हणतोय, तुझ्यापासुन तुझ्याकडे.
लले..:फिदी:
ललिता सहीच... मल्ली आवडली
ललिता सहीच...
मल्ली आवडली चारोळी
उल्हासकाका... चारशेंना जे
उल्हासकाका...
चारशेंना जे जमले नाही
ते फ़क्त चारांनी साधलेले
तसेही इथले वातावरण
नव्या (न) कविंनी बाधलेले
विशाल टोमणा मला नव्हता ना???
विशाल
टोमणा मला नव्हता ना???
बहुतेक मला होता...
बहुतेक मला होता...
बहुतेक मला होता.>>> negative
बहुतेक मला होता.>>> negative approach
टोमणा मला नव्हता ना???>>> positive approach
दोन्ही वाक्यात आणि approach मधे कसला भारी विरोधाभास आहे
विश्ल्या .. लले 'बहुतेक' ??
विश्ल्या ..
लले 'बहुतेक' ??
१. वेडा ठरवूनी मज, समाज मोठा
१.
वेडा ठरवूनी मज,
समाज मोठा झाला,
जिंकण्यासाठी लढलो,
यात माझा काय तोटा झाला?
भुर्या पांढर्या ढगांचा शेला
भुर्या पांढर्या ढगांचा
शेला त्याच्यावं टाकला
किती वर आला दीस
त्यात सूर्योबा झाकला..
सर्वांना
सर्वांना धन्यवाद.
ललिता-प्रीति, तुमचा झब्बू मस्तच....
………………………….........................
जे. डी.
चारोळी आवडली
विशाल....... हाताची घडी, तोंडावर बोट ठेऊन बसलेला बाहुला.
नादखुळा ..... छान आशय.
अंजली ...... गोड चारोळी.
MallinathK ….. आशय आवडला.
---------------------------------------------------------
नको नकोत ते वाद,
वादळाचीही चुणुक
चारोळ्यांची वाहू द्यावी
इथे प्रसन्न झुळुक
चारोळी....... काव्य असे
चारोळी.......
काव्य असे जे
ह्रदयी भिडावे
गाली फुलावी
स्मित कळी...
पावसाच पाणी पन्हळीन गळू
पावसाच पाणी
पन्हळीन गळू लागल,
तहान लागली म्हणुन
नदीकडे पळू लागल.
....धन्यवाद मल्लिनाथके,विचार पडला होता की नवीन कविना कुणी वाचतो की नाही.
अकेशि, मस्तच.
अकेशि, मस्तच.
अरे वाह... इथे तर मैफल जमली
अरे वाह... इथे तर मैफल जमली आहे.... मस्तच
माझी पण एक चारोळी
घेऊ नको परीक्षा मज
हार सोसणार नाही
झालो उत्तिर्ण तरी मग
तुझा उरणार नाही..
कवी कुळाचा मानुस मी शब्द माझे
कवी कुळाचा मानुस मी
शब्द माझे बळ आहे,
अचूक शब्द योग्य वेळ
पाठीवरचा वळ आहे.
आयुष्याची रितीच ओंजळ तहान
आयुष्याची रितीच ओंजळ
तहान प्यावी अजून कुठवर?
बरस, बरस तू असशील तेथे
उरशील का रे तरी घोटभर?
धूम्...सुसाट, दुचाकी घाटात
धूम्...सुसाट,
दुचाकी घाटात पळत होती
धडाम्...घाटात्,
दुचाकी दरीत लोळत होती.
धूम्...सुसाट, दुचाकी घाटात
धूम्...सुसाट,
दुचाकी घाटात पळत होती
धडाम्...घाटात्,
दुचाकी दरीत लोळत होती.
अरे वा.. सहीच... अंजली,
अरे वा.. सहीच... अंजली, उल्हास, सत्यजीत मस्त जमल्यात चारोळ्या
२. विरहाचाच का कडेलोट एका
२.
विरहाचाच का कडेलोट
एका चुकेच्या शिक्षेला,
आता पांगल्या दिशाही,
वाळीत टाकूनी विसाव्याला
Pages