पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

@ विशाल कुलकर्णी

"तो परत आलाय"
असं म्हणतोय तर खरं
"मला खात्री आहे" म्हणा
हा लवकर आला तरच
Light 1

सरकारीकामे..अंगावर काटा येतो
सरकारची कामे..अंगावरच येतात
महागाई..भ्रष्टाचार..काय काय सांगणार
यादी मोठी आहे चांगलीच लांबणार

भर दुपारी .........पोरगी
सावली.............रुसली
वडाखाली..........आणि थोबाडीत
धावली..............बसली

चं.गो.----------.विभाग्रज
(संकलित्).........(स्वयंचलित)

गावच्या घरानी
ओलावा मायेचा,
पाणावालेल्या डोळ्यांमधे
मायेच्या सायेचा.

केव्हातरी दुपारी हलकेच पेंग आली
वर्गातली मुले ती कॉपी करून गेली.

*****************

पुरे जाहली तीच विराणी
गाणी आता जीर्ण पुराणी
आता गाऊ मुक्त सुरांनी
मंगल गाणी दंगल गाणी

Happy

प्रत्येक भेट प्रत्येक क्षण
आठवून कविता केली
विरहातही मी निष्ठेने
एक का होईना, ओळ लिहिली

विज्ञानाने केली म्हणे
निसर्गावर मात,
एकदा भूमी कंपली,आणि
झाली सर्व वाताहात.

मंदार,
विरहातही जे कविता लिहीतात,
असेनाका फक्त एकच ओळ.
जगने सुसह्य होते त्यांचे,
होत नाही विरहात घोळ.

घर म्हणजे पारायण
''संसार ''नावाच्या ग्रंथाच,
घर म्हणजे देवालय
''माणुसकी'' नावाच्या देवाचं.

Pages