पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

" अरे पाखरा, हे झाड तर वठत चाललंय
अन् तू काडया काय आणतोयस चोचीतून ? "
पाखरु गहिवरुन म्हणालं, " घरटं माझ्यासाठी नाही रे,
झाडाला बरं वाटावं म्हणून !! "

गुलमोहराची एक फांदी
जरा जास्तच बाजूला वाढली
वेगळेपणा वगैरे ठीक आहे,
पण केवढी एकटी पडली !!

वेगळेपणा नी एकटेपणा
निवड झाडाला करायची होती,
एकटी फांदी ग्रीष्मात पुन्हा
रक्तवर्णाने बहरायची होती!

मनाच्या अडगळीतुन तुला शोधलं
तर त्यावर धुळीचे थर!
पण झटकायचे धाडस होईना
वादळ उठलं तर ?

ऐकणारं कोणी असेल तर,
चारोळी लिहिण्यात मजा आहे.
बंद वहीमध्ये पडून राहणं,
चारोळीलाच सजा आहे.

निशीगंध फुलावा ह्र्दयी मोहक,
दरवळ त्याचा विहरावा.
विहंग विहरत मनमोराचा,
त्या निशीगंधा फुलवावा.

झगमगती सुर्याची किरणे,
सायंकाळी रुसुन बसली.
सोडून जाणे सवंगड्यांना,
कल्पनाच ही ना रुचली.

सर तुमचा चारोळी साठी-
सोडुन जाणे सवंगड्यांना
हि कल्पनाच हिरमुस्णारी
किरणे असो वा व्यक्ती
ती ह्रुदयाशी सलणारी.

आपणास चारोळी आवडली.धन्यवाद.मायबोलीचे अनेक आभार.

मनाच्या अडगळीतुन तुला शोधलं
तर त्यावर धुळीचे थर!
पण झटकायचे धाडस होईना
वादळ उठलं तर ?
>>>
वा वा!

काही प्रश्नांची उत्तरं
न मिळण्यातही गंमत असते
रंगविहिन वर्तमानातही
गत-क्षणांनी रंगत असते

कितीदा बहरावं पुन्हा पुन्हा,
आता सुकलेल्या पानांचाच भार
पाचोळ्याचं नशिब आपलं,
अन वादळांचा तोच थरार ..

तुझं लाजणं भिनवी वारं,
उधाणलेल्या भरतीचं.
आणी पहाणं आवेगानं,
हसणं माझ्या प्रीतिचं.

थेंब दवाचे जाणुन तॄष्णा,
बसले ओठांवरी कळीच्या,
उमलण्याची तहान तिजला,
लक्षात न आले त्यांच्या.

कितीदा बहरावं पुन्हा पुन्हा,
आता सुकलेल्या पानांचाच भार
पाचोळ्याचं नशिब आपलं,
अन वादळांचा तोच थरार ..
>>>
सुक्या Happy बेहतरीन !

कविता कुठायत हल्ली?

छान Happy

मोहक गाणं असे लाजणं,
स्वर तयाचा कोमल ग.
हिंडोलाच्या हिंदोळ्यातून,
त्रिताल फुलवी क्षणात ग.

तुला सारखं बघत राहुन,
डोळ्यांत भरून घ्यावं वाटतं.
डोळे पूर्ण भरले तरी,
तुला त्याचं काहीच नसतं

मनसोक्त तूपात घोळ घोळ घोळले
बेसनाचे लाडू बाई इतके काही हसले
म्हटलं, बाबांनो जरा सावरुन बसा ना..
म्हणतात यंदा असेच रहायचे ठरवले...! Uhoh

चिमूरे Happy

Pages