पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

विशाल ..... मस्तच
-------------------------------------------------
(फक्त गंमत म्हणून, सादर करतोय -----हलके घ्यावे)

चारशे ओळींची कविता
लिहायची होती मला
काय करू, चार ओळींचा
नियम आडवा आला.

उल्हास भिडेंच्या चारोळीला झब्बू -

काव्यातून व्यक्त करताना भावना
पहायचा नसतो नियम
चार ओळी असोत नाहीतर चारशे
वाचणारा कुणीतरी भेटतोच कायम Proud

परतीच्या वळणावर, सारखे मागे वळूनि पाहणे...
हे शेवटचे म्हणेपर्यंत, परतुनि माघारीच ते फिरणे....

चिमुरी,

पाउल वाटेवरच्या तुझ्या पाउलखुणा
तुझ्या ओंजळीतुन सांडलेली प्राजक्त फुले,
अन सोबतीला प्रत्येक वळनावर तुझ्या आठवणीचे तुकडे,
मी परतावं म्हणतोय, तुझ्यापासुन तुझ्याकडे.

लले..:फिदी:

उल्हासकाका...

चारशेंना जे जमले नाही
ते फ़क्त चारांनी साधलेले
तसेही इथले वातावरण
नव्या (न) कविंनी बाधलेले Wink

बहुतेक मला होता.>>> negative approach

टोमणा मला नव्हता ना???>>> positive approach

दोन्ही वाक्यात आणि approach मधे कसला भारी विरोधाभास आहे Happy

सर्वांना धन्यवाद.
ललिता-प्रीति, तुमचा झब्बू मस्तच.... Happy
………………………….........................
जे. डी.
चारोळी आवडली

विशाल....... हाताची घडी, तोंडावर बोट ठेऊन बसलेला बाहुला.

नादखुळा ..... छान आशय.

अंजली ...... गोड चारोळी.

MallinathK ….. आशय आवडला.
---------------------------------------------------------

नको नकोत ते वाद,
वादळाचीही चुणुक
चारोळ्यांची वाहू द्यावी
इथे प्रसन्न झुळुक

पावसाच पाणी
पन्हळीन गळू लागल,
तहान लागली म्हणुन
नदीकडे पळू लागल.
....धन्यवाद मल्लिनाथके,विचार पडला होता की नवीन कविना कुणी वाचतो की नाही.

अरे वाह... इथे तर मैफल जमली आहे.... मस्तच

माझी पण एक चारोळी Happy

घेऊ नको परीक्षा मज
हार सोसणार नाही
झालो उत्तिर्ण तरी मग
तुझा उरणार नाही..

२.
विरहाचाच का कडेलोट
एका चुकेच्या शिक्षेला,
आता पांगल्या दिशाही,
वाळीत टाकूनी विसाव्याला

Pages