Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राम, १७ तारखेला आम्हाला 'बधाई
राम, १७ तारखेला आम्हाला 'बधाई हो बधाई' हे उत्तर असलेले कोडं टाकण्याची संधी मिळो ही शुभेच्छा !
नुतन, स्प्लिट बनाना घे
नुतन, स्प्लिट बनाना घे हिसकावून त्या गुगुकडून आणि दहा रम बॉल्स त्याच्या डोक्यावर मार. >>> गुगु स्वप्नाने म्हट्ल्याप्रमाणे स्प्लिट बनाना मी घेतलय आणी :दहा रम बॉल्स तुझ्या डोक्यावर मारणारी बाहुली :
पहिल्यांदाच कोड्याचे उत्तर अचुक दिले आता यापुढे प्रयत्न करते
पहिल्यांदाच कोड्याचे उत्तर
पहिल्यांदाच कोड्याचे उत्तर अचुक दिले आता यापुढे प्रयत्न करते >>>>>नुतन, या बाफवर स्वागत आणि पुढिल कोड्यांसाठे खुप खुप शुभेच्छा!!!!!!
रामभाऊ, १७ ला भरपूर पेढे घेऊनच या
८४: अरे देवा सगळे स्मिता
८४:
अरे देवा सगळे स्मिता पाटीलची गाणी शोधतायत
जा चुडैल जा
दिल्ली बेली
गुगु नाही. असे काहिसे प्रकरण
गुगु नाही. असे काहिसे प्रकरण घरातल्या नवीन पिढीमुळे कानावर आदळत असते पण ते 'गाणे' या प्रकारात मोडते असे मला वाटत नाही
स्वप्ना ते ५ क्लू ५:२९:५९
स्वप्ना ते ५ क्लू ५:२९:५९ वाजता देणार आहेस का?
अरे मला वाटल प्रतिक बब्बर आहे
अरे मला वाटल प्रतिक बब्बर आहे दिल्ली बेली मधे आणि तु तसा क्लु दिला असशिल
राम, दहावीचं आहे का कोणी
राम, दहावीचं आहे का कोणी घरात? निकालासाठी शुभेच्छा! पेढे घेऊनच या १७ ला.
माधव, क्लू दिला तर गाणंच सांगावं लागेल. पण तरी एक देतेच - चोर.
मला आता पुढचे दोन दिवस
मला आता पुढचे दोन दिवस दहावीचा निकाल हातात येइस्तोपर्यंत काहीच सुचणार नाही .. :(त्यामुळे मी एकदम १७ तारखेला संध्याकाळी इथे डोकावतो तोपर्यंत हजारी पार करा .. >>>> अरेरे, आता आपल्या धाग्यात काही राम राहिला नाही.
कुठे गेले सगळे? दृपाल आला की
कुठे गेले सगळे? दृपाल आला की काय परत?
कोडं ८३:
मिटींगला उशीर होतोय म्हणून गुगु गडबडीत नाश्ता न करताच घरातून निघतो. त्यात त्याला घराजवळ टॅक्सी मिळत नाही. हात केला तरी ३-४ टॅक्सीवाले बघून न बघितल्यासारखं करून पुढे निघून जातात. गुगु शिव्यांची लाखोली वहातो पण करतो काय? त्यात एप्रिलचा महिना, रणरणतं उन्ह, घामाच्या धारा लागलेल्या, घशाला कोरड पडलेली,पोटात कावळे कोकलताहेत. मग एकदम त्याला आदल्या रात्री टीव्हीवर पाहिलेला 'हायवे ऑन माय प्लेट' चा पंजाबवरचा एपिसोड आठवतो. त्यातली ती पांढरीशुभ्र, दाट, मलईदार, थंडगार लस्सी आत्ता इथे मिळाली तर काय बहार येईल असा विचार करून तो एक गाणं म्हणायला लागतो. सांगा ते गाणं....
क्लू - चोर
उत्तरः दिल पुकारे आरे आरे आरे ("ज्वेल थीफ" मधलं)
ऊगाच रात्री भुताची स्वप्नं
ऊगाच रात्री भुताची स्वप्नं नको पडायला म्हणून उत्तर सांगून टाकतो.
८४: मांत्रिक जादूटोणा करतोय. एका विशिष्ट भुताला तो बोलावतो मग जायला सांगतो. चेटकीणीला मात्र जराही फिरकू नकोस असा दम भरतो
उत्तरः आ रे मुंजे जा रे मुंजे विच्चे टल्लम टलिया
चित्रपटः वारिस चित्रपटात स्मिताची भुमिका होती. चित्रपट आपटला असला तरी गाणे सुंदर आहे आणि तेवढेच सुंदर आहेत आशाचे अस्खलीत पंजाबी उच्चार. मी लिहिले आहेत ते शब्द बरेचसे त्या उच्चारांच्या जवळ पोहचतात.
सही!!!!!!! स्वप्ना आता सांगतो
सही!!!!!!!
स्वप्ना
आता सांगतो मला मुळात ताक हा प्रकार आवडत नसल्याने लस्सी अजिबात आवडत नाही. त्यामुळे हे फारच मोठ 'स्वप्न-रंजन' आहे
गुगु, मला तरी कुठे केळं
गुगु, मला तरी कुठे केळं आवडतंय?
वाह रे आरे, अर्र्र स्वप्ना !
वाह रे आरे, अर्र्र स्वप्ना !
मी सगळी ज्वेलथीफची गाणी आठवली होती मनात पण मला आरेचा रस्ता मात्र सापडला नाही.
>>वारिस चित्रपटात स्मिताची
>>वारिस चित्रपटात स्मिताची भुमिका होती
काय भयाण पिक्चर होता तो. त्यात ती तिचा नवरा मरतो त्यानंतर घराण्याला वारस पाहिजे म्हणून आपल्या धाकट्या बहिणीचं लग्न (अमृता सिंग) आपल्या सासर्याबरोबर (कुलभूषण खरबंदा) लावून देते. त्या बहिणीच्या मुलाच्या बारशाच्या वेळचं गाणं आहे हे बहुतेक. त्यात पुन्हा आपला नवराच आपल्या बहिणीच्या पोटी जन्म घेऊन आलाय असं तिला वाटतं. ह्या गाण्यात त्या बाळाला उद्देशून तिची 'तेरा मेरा क्या क्या नाता, सजनी, भाभी, मौसी, माता' अशी एक ओळ आहे. मला नेहमी तो स्कॉलरशीपच्या पेपरात असायचा तसा नात्यांवरचा प्रश्न वाटत आलाय.
माधव, कोडं मात्र झक्कास!
वारिस साठी रेखाने स्मिताचे
वारिस साठी रेखाने स्मिताचे डबिंग केले होते ना?
आरे लै झ्याक स्वप्ना. जुग जुग
आरे लै झ्याक स्वप्ना. जुग जुग जियो!
कयामत से कयामत तक च्या बी
कयामत से कयामत तक च्या बी साईडला असल्यामुळे वारीसची गाणीही फेमस झालेली. त्यामुळे तो थोडा चालला.
चित्रपट आपटला असला तरी गाणे
चित्रपट आपटला असला तरी गाणे सुंदर आहेत>>>>अगदी अगदी.
८५. एका माणसाला सतत
८५.
एका माणसाला सतत पाल्पिटेशन्स होत असतात. पण त्याने बरेचवेळा सांगूनही कोणीही आजूबाजूचे त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत. तर तो कोणतं गाणं म्हणेल?
८६ सुनीता विल्यम्सने
८६ सुनीता विल्यम्सने अंतराळातून आपल्या नवर्याशी व्हिडिओ चॅट करताना कोणतं गाणं म्हटलं असेल?
फार म्हणजे फारच सोपं आहे.
भरतजी, ८६: आज मै उपर, आसमां
भरतजी, ८६:
आज मै उपर, आसमां निचे
आज मै आगे, जमाना है पिछे??
भरत, ८६ : आजकल पाव जमीपर नही
भरत, ८६ :
आजकल पाव जमीपर नही पडते मेरे
बोलो देखा है तुमने मुझे उडते हुए?
८५. आजूबाजूचे त्याच्या
८५.
आजूबाजूचे त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत >>>>
यावरून एक गाणं सुचलंय
(यावेळीही चुकलेलंच असणार म्हणा, तरी देखील ..... )
जाऊँ कहाँ बता ऐ दिल
दुनिया बडी है संगदिल
नाही भिडे. ८५. एका माणसाला
नाही भिडे.
८५.
एका माणसाला सतत पाल्पिटेशन्स होत असतात. पण त्याने बरेचवेळा सांगूनही कोणीही आजूबाजूचे त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत. तर तो कोणतं गाणं म्हणेल?
>>> उत्तर :
हाले दिल हमारा, जाने ना बेवफा ये जमाना, जमाना .........
८६: दमभर जो उधर मुह फेरे ओ
८६: दमभर जो उधर मुह फेरे ओ चंदा, मै उनसे प्यार कर लूंगी, बाते हजार कर लूंगी? ह्या गाण्यावर आधी एक कोडं आलंय त्यामुळे हे कदाचित नसावं
८५ : उत्तर चुकणार याचा अचूक
८५ : उत्तर चुकणार याचा अचूक अंदाज होताच मला
असो .....
चुकांचे अचूक अंदाज तरी बांधता येतात मला
.... हेही नसे थोडके
धन्यवाद मामी कोडं ८७: "अजून
धन्यवाद मामी
कोडं ८७:
"अजून किती चालायचं आहे? माझे पाय जाम दुखताहेत. मी बसतो थोडा वेळ" अमोल जाहिर करतो. त्याच्याबरोबरचे सगळे मित्र-मैत्रिणी थांबतात.
"अरे असं काय करतोस? आता तर फक्त अर्धा तास झालाय चढायला सुरुवात करून" शशी म्हणतो.
"तर काय? दिवस मावळेपर्यंत पोचायचं आहे आपल्याला मुक्कामी" तारा म्हणते.
"ह्या अमोलचं वजन ना ते सगळं जंक फूड खाऊन खाऊन वाढलंय. अस्साच चालवूया त्याला दर विकेन्डला म्हणजे चांगला बारीक होईल" तिची जुळी बहिण धारा अमोलला चिडवत म्हणते.
"तुम्ही काहीही म्हणा. मी ढिम्म हलणार नाहिये इथून पुढची १५ मिनिटं तरी" अमोल आरामात झाडाला टेकत म्हणतो.
"मग आम्ही काय करायचं?" त्याची बहिण सरिता विचारते.
"तुम्ही जा की पुढे. मी येतो मागून." अमोल म्हणतो.
"हॅ, म्हणे येतो मागून. आम्ही गेलो की तू झोपशील इथे कुंभकर्णासारखा. ते काही नाही. मी थांबतो रे ह्याच्याबरोबर, आणि ह्याला हाकत घेऊन येतो १० मिनिटांत. तुम्ही चौघे निघा पुढे." नील म्हणतो.
पण चांगला अर्धा तास झाला तरी अमोल उठायचं चिन्ह दिसत नाही. शेवटी वैतागून नील एक हिंदी गाणं म्हणतो....ओळखा.
८७. असं काही गाणं आहे
८७.
असं काही गाणं आहे का?
अपनी आंखो खोलकर देखो...... तुम्हे बुला रहे है चांद, तारे, नदिया की धारा?
आठवतेय्..आठवतेय.....
आज ऑफिसचं नेट कनेक्शन सॉल्लीड
आज ऑफिसचं नेट कनेक्शन सॉल्लीड बोंबललंय. त्यामुळे निदान १ पर्यंत तरी मी उत्तर टाकणार नाही. खूप वेळ आहे. तोपर्यंत कोणाला तरी नक्कीच सुचणार उत्तर.
Pages