पुण्यात झालेले बंगू गटग - २१ मे २०११

Submitted by शैलजा on 18 May, 2011 - 03:31
ठिकाण/पत्ता: 
ऐका, ऐका, ऐका! पुण्यनगरीमध्ये एक ढॅणटॅडॅ बंगू गटग होत आहे होऽऽऽ!!! :) शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला प्राची आणि सत्या आणि डॅफोला भेटण्यासाठी कोण कोण येणार, त्यां सगळ्यांनी फटाफट नावनोंदणी करावी होऽऽऽ!!

भेटायचे ठिकाण: ओकवूड हॉटेल. ओकवूड , भांडारकर रस्त्यावरच, फर्ग्युसन रस्ता गुडलक चौकापाशी मिळतो, तिथे जवळच आहे. तर, तिथे भेटूयात शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला.

सगळ्यांना गटगला यायचे आमंत्रण Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2011 - 08:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता हाती आलेल्या वृत्तानुसार दि. २१ मेला ओकवूड हॉटेलच्या मॅनेजमेंटची तातडीने एक बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीत मायबोलीकरांना होटेलच्या परीसरात फिरकू देऊ नये असे ठरवण्यात आले आहे. Proud

धम्माल, मस्ती, दंगा असा तीन शब्दांत वृत्तांत लिहीता येईल या गटगचा.
बर्‍याच नव्या ओळखी झाल्या. नव्या-जुन्या गप्पाटप्पा झाल्या.
पोरंबाळं धरून जवळ्जवळ २०-२५ जण भेटलो आणि अभूतपूर्व गोंधळ घातला. हाटिलातल्या वेटरलोकांचे चेहरे बघण्यालायक झाले होते. शेवटी 'सव्वासातला कॉन्फरन्स आहे' असे सांगून आम्हांला बाहेर काढण्यात आले. तरी आम्ही हॉटेलबाहेर फोटोसेशन करण्यात १५-२० मिनिटे दंगा घातलाच. Proud
मस्त वाटले. बोलून बोलून आणि हसून तोंड दुखू लागले. Happy

परत पुण्यात फेरी झाली की गटग नक्की. Happy

> मायबोलीकरांना होटेलच्या परीसरात फिरकू देऊ नये असे ठरवण्यात आले आहे. >> Lol
धम्माल, मस्ती, दंगा असा तीन शब्दांत वृत्तांत लिहीता येईल या गटगचा. >> अनुचमोदन अगदी Happy

जीटीजीला आलेले आणि ज्यांना फोटो हवेत, त्यांनी कृपया मला संपर्कातून मेल पाठवल्यास फोटो पाठवण्यात येतील. Happy

Pages