पुण्यात झालेले बंगू गटग - २१ मे २०११

Submitted by शैलजा on 18 May, 2011 - 03:31
ठिकाण/पत्ता: 
ऐका, ऐका, ऐका! पुण्यनगरीमध्ये एक ढॅणटॅडॅ बंगू गटग होत आहे होऽऽऽ!!! :) शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला प्राची आणि सत्या आणि डॅफोला भेटण्यासाठी कोण कोण येणार, त्यां सगळ्यांनी फटाफट नावनोंदणी करावी होऽऽऽ!!

भेटायचे ठिकाण: ओकवूड हॉटेल. ओकवूड , भांडारकर रस्त्यावरच, फर्ग्युसन रस्ता गुडलक चौकापाशी मिळतो, तिथे जवळच आहे. तर, तिथे भेटूयात शनिवारी २१ मे २०११ रोजी संध्याकाळी ०५: ३० ला.

सगळ्यांना गटगला यायचे आमंत्रण Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2011 - 08:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहि पब्लिक Happy वृत्तांत फोटो येवू द्या कसेही कुठेही चालतील Happy

केकचा उरलासुरला तुकडा असला तर तोपण चालेल Sad Proud

केकचा उरलासुरला तुकडा असला तर तोपण चालेल >>>>> श्यामले , 'खादाडी कमीच करा' असं कुणीतरी म्हटलेल Happy
वृत्तांत लिव्हा की जरा अन खातांनाचे फोटो टाकण्यास विसरा Happy

वळसंगीकर नुसतच हसायले कामुन ? बोला कायतर Proud

हायला अथक, आहात काय तुम्ही? तुकडा म्हटल्य हो मी...तेवढा तर खाऊ द्या की Sad Wink

मजा आली काल! बर्‍याच कालखन्डाने गटगला आलो. जुने मायबोलीकर भेटलेच ओपण नवीन ओळखीही झाल्या.

ओकवूड हे एक फ़ालतू हॉटेल आहे. बालगोपाळांचा दंगा सहन न होऊन त्यांनी आम्हाला लवकर कटायला सांगितले. मग वाडेश्वरचा रसता धरला. तिथे मात्रा थोड्या वेळाने शैलजाचा वाढदिवस साजरा करून हळूहळू एकेक मन्डली कटऊ लागली. (बहुदा पैसे कुणी कसे द्यावे किंवा कुणाकडून कसे मागावे याचा विचार निश्चित नव्हता :खीखी)

पण इतर मन्डळीकटल्यावरही आम्ही वाडेश्वरावाल्यांना ओंकारेश्वराचीआठवण काढायला भाग पाडले. सहा जणांमध्ये (अधिक दोन बालके) असंख्य पदार्थ वेगवेगळ्या वेळी मागवून आणि जंगलातून नुकतेच सुटून आल्यासारखे म्यानरलेअसपणे एकाच डिशवर सगळे तुटून पडून फ़ारच गोंधळ निर्माण केला. आजूबाजूच्या ईतर लोकांनी मुरडलेल्या नाकांचा सपशेल अनुल्लेख केला. आणि बर्‍याच उशीरा बाहेर पडलो.

गटग मस्त. बर्‍याच नविन लोकांना भेटलो. नविन चेहरे भेटल्यामुळे थोडा गोंधळलो होतो. Happy चालायचंच. नंतर उमेशच्या कवितासंग्रह प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावली. एकंदरीत धम्माल आली.
केक सहजच म्हणून कापला होता काय? की शैलजाचा बड्डे होता? Wink केक खाऊन झाल्यावर हे विचारायचं म्हणजे ... श्या .. !
पून्हा भेटुयात.

काल अनपे़क्षितपणे ह्या गटगला जाण्याचा योग आला. जास्त वेळ थांबू शकलो नाही. The loss was mine! सर्वांना भेटून आनंद झाला. झक्कींना भेटलो आहे हे कळ्ल्यावर माझा भाव थोडासा वाढल्यासारखा वाटला Happy
धन्यवाद. फोटो केपि कडे पाठवेन.

मस्त झाला गटग. बरेच नवीन मायबोलीकर भेटले. जुन्यांची नव्याने ओळख झाली. मजा आली.

भेटत राहू असेच. Happy

Happy ओकवूड नाव वाचताच मला शंका आली होती की माबोकरांचे हशा- दंगा- आवाजयुक्त गटग तिथे कितपत चालेल म्हणून.... त्यासाठी (म्हणजे हशा दंगा आवाज इ. इ. साठी) जंगली महाराज रोड वरील हॉटेल्स ब्येष्ट! पण अशा तुच्छ अडथळ्यांना मनावर न घेता तुम्ही मंडळींनी मजा केलीतच!! ये हुई ना ब्बात!! Happy

साडेपाचच्या गटगला साडेसहाच्याही नंतर उगवून, अरे जरा बसून घ्या, ऑर्डर देऊयात असं दहादा सांगितलेलं असतानाही त्याकडे दुर्ल़क्ष करुन, रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहून मुलीच्यासाठी दिलेली चॉकलेट्स स्वतःच खात गप्पा मारुन, चहा पिऊन, वर ओकवूडलाच फालतू हॉटेल म्हणणं शो ना हो गिरिराज! की गटग परंपरेला धरुन शोभतं म्हणू? Proud लागलाच तर Light 1 घे! Proud

मला तर खूपच मज्जा आली! Happy

साडेपाचला गटग इच्छुकांना ओकवूडला जमायला सांगितले होते, आणि खरं सांगायचं तर मला वाटलं होतं की बंगलोर बाफवालेच जमतील. मी ओकवूडला पोहोचले तेह्वा तिथे एबाबा आधीच आले होते, पण तेच एबाबा, हे मला तेह्वा ठाऊक नव्हते.

त्याहीआधी, गटगच्या आधी ४ दिवस आधी मी ओकवूडला फोन करुन असं असं छोटं गेटटुगेदर होणार आहे, त्यासाठी तुमच्याकडे सोय होऊ शकेल का, असं विचारलं होतं. त्यांनी भरघोस होकार दिल्यावर तिथे गटग करायचे नक्की केले. दुसरे म्हणजे तोषदादाही मुंबईहून पोहोचणार होते व त्यांना डेक्कन परिसरात पोहोचणे सोयीचे ठरणार होते, ती सोयही पहायची होती. सकाळी मी पुन्हा एकदा ओकवूडला जाऊन गटगसाठीची सोय कन्फर्म केली. साधारण १० ते १५ लोक मी सांगितले होते, तरीही बाफवर आयत्या वेळेस मला जमणार नाहीचे सूर आळवले गेलेच होते आणि आयत्या वेळेस फोनवर १-२ "मला जमणार नाही" चे मेसेजेस पण येऊन पोचले होते.. तेह्वा किती जण येणार, अशी थोडीशी धाकधूक होती खरी!

मी पोचले आणि लगेच प्राची मिहिकाला घेऊन पोचली त्यामुळे हायसे वाटले. एकसे भले दो. हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये बसून माझ्या आणि प्राचीच्या गप्पा सुरु झाल्या आणि तिथे बाजूलाच जे गृहस्थ बसले होते, त्यांनी अचानक विचारले, तुम्ही मायबोलीवर असता का? तेह्वा आम्हांला समजले, की हे एबाबा. त्या दिवशीच पहाटे ते जर्मनीहून पुण्यात पोहोचले होते आणि संध्याकाळच्या गटगला 'वेळेवर' ( गिरिराज, प्लीज नोटच रे Proud )उपस्थित राहिले होते पाहून एकदम सह्ही वाटलं!

साधारण सहा होत आले होते आणि अजूनही लोकांचा पत्ता नव्हता.. आम्ही आता आत रेस्टॉरंटमधे जाऊन बसलो आणि ओळख करुन घ्यायला सुरुवात केली, गप्पा मारता मारता एबाबांनी त्यांना खास घरुन गटगला जा असे सूचनात्मक आदेश मिळाले होते, हे सांगून टाकले आणि मिहिकापुढे चॉकलेटची बॅग उघडून ठेवली. मी काही ही चॉकलेट्स परत नेणार नाही, असंही सांगून टाकलं. मी बाराबाफ आणि पार्ल्यावर असतो, फक्त बोलत नाही, वाचत असतो. कधीकधीच लिहितो म्हणाले. आम्हांला मुळ्ळीसुद्धा आश्चर्य वाटलं नाही! Proud

तितक्यात संपदा आणि सत्या, श्रेयान आणि सान्वीला घेऊन आले आणि श्रेयान आणि मिहिकाची गट्टी जमून त्यांनी रेस्टॉरंटमध्ये कथ्थक, पळापळी वगैरे स्वैर खेळायला सुरुवात केली. वेटर्सच्या बिचकण्याला इथून थोडी थोडी सुरुवात झाली असावी. म्हणता म्हणता, विनय आणि मधुरा आणि त्यांचा मुलगा श्रेयस हे भिडे कुटुंबिय आले. विनयला मी आधी कधी पाहिले नव्हते त्यामुळे, तुम्ही कोण? असं विचारुन झालं. त्याच्या चेहर्‍यावर मी कट्टामालक असून तू मला ओळखत नाहीस असे प्रचंड धक्कादायक भाव उमटले! साजिरा, आशूडी, केपी पोहोचले. जसंजसं मायबोलीकर्स जमत होते, तसंतसं गप्पा, ह्सणं आणि दंगा ह्यांचं प्रमाण वाढता वाढे व्हायला लागलेलं होतं.

हे सर्व सुरु असेतो गिरिराजचा फोन आला, ओकवूड म्हणजे नक्की कुठे? मग त्याला नक्की कुठे यायचं ते सांगितलं. गिरिराज, शीतल आणि उर्जा (लेक) पोहोचले आणि तेवढ्यात प्रसाद, दक्षा, मनोमय (मुलगा) आणि केपीही पोहोचले. सगळ्यांचा नुसता कल्ला सुरु होता! वेटर्सनी कधीच मेन्यू कार्डस आणून दिली होती पण कोणाचेही काहीही खाण्याचे पदार्थ ऑर्डर करण्यात लक्ष नव्हते. ३-४ दा सगळ्यांना आळीपाळीने अरे ऑर्डर करा हे सांगून कोणीच ल़क्ष देत नसल्याने मी शेवटी हा प्रयत्न सोडून दिला आणि साजिरा आणि आशूच्या म्हणण्यानुसार सगळ्यांना चहा आणि एबाबांना कॉफी मागवली.

श्रेयस, मिहिका आणि श्रेयानचा आपापला धुमाकूळ सुरुच होता. एकमेकांमागून पळणे, मध्येच मिहिकाचं कथ्थक, पेपर टिश्शूज आपल्यालाच खेळायला ठेवले आहेत समजून त्यांचे बोळे करुन एकमेकांना मारणे वगैरे सगळं काही यथास्थित सुरु होतं. पालक मंडळी आपाल्या पाल्यांना आवरायचा क्वचित, क्षीण प्रयत्न करत होती. यथासांग दंगा सुरु होता! Happy चॉकलेटची पिशवी बच्चे कंपनी आणि मोठ्यांमधेही मस्तपैकी फिरत होती, आणि लहान मुलांना चॉकलेट दिल्यावर अगं, नको, नको, किती चॉकलेटं खाल्ली तिने/ त्याने म्हणत स्वतः मटकावत होती! मधे मधे फोटोही निघत होते.

साधारण पावणेसातच्या सुमारास एबाबांनी आमचा निरोप घेतला. एवढ्या पहाटेच मोठ्या प्रवासातून येऊन लगेच संध्याकाळी आमची काहीही ओळख नसताना मायबोलीकर ह्या एकाच ओळखीवर ते आम्हांला भेटायला आले. खूप ग्रेट वाटलं! धन्यवाद एबाबा आणि वृंदाताई आणि प्राची. एक केपीला सोडले, तर आम्हां कोणालाच ते आधी भेटले नव्हते वा ओळखत नव्हते. ( गटगचा कल्ला आणि दंगा पाहता, यापुढे ओळख देतील का अशी एक पुसटशी शंकाही आहे! Proud ) एबाबा ह्यांनी ते परदेसाई, अनिलभाई आणि झक्कीकाका ह्यांना ते ओळखतात, असं आवर्जून सांगितलं! का, ते म्हाईत न्हाय! Proud Happy

सूर्यकिरण आणि नितिनचंद्रही जवळ जवळ पावणेसातच्या सुमारास पोहोचले. ते दोघेही आले आणि बाजूच्या एका कोपर्‍यातल्या जागा पकडून शांतपणे बसले होते. होत असलेल्या अव्याहत बडबड, हास्य विनोद वगैरेच्या आवाजाला घाबरुन आणि एकूणच त्या रेस्टॉरंटला आम्ही जी काही कळा आणली होती, ते सर्व एका कोपर्‍यात बसून घाबरुन पहात होते बहुतेक! हळूहळू त्यांनाही माणसांत आणले. Lol कट्टामालकांनीही आमचा निरोप घेतला होता.

सगळ्यात शेवटी सचिन आणि साचि आले. त्यांचे आणि सुकि आणि नितीनचंद्र ह्यांचे चहापाणी होईपर्यंत सव्वासात झाले होते आणि तिथे एक कॉन्फरन्स असल्याने आम्हांला तिथून निघावे लागले. तेथील बिल वगैरे भागवून ( गिरीराज, परत एकदा नोट कर! Proud )हॉटेलच्या बाहेरच दारातच उभे राहून थोडा वेळ परत गप्पा झाल्या. ग्रूप फोटो झाले. नितिनचंद्र ह्यांनीही पुढील गटगला भेटू म्हणून निरोप घेतला.

आता कुठे जायचे? गुड लक की वाडेश्वर? गुडलकमध्ये शिरायला जागा आहे का ह्याची चाचपणी करत होतो, तितक्यात आशूडी आणि साजिरा गुडलकच्या पुढील बाजूने देवानंदचा फोटो शोधत आत घुसून इथे तिथे पाहू लागले. अगदी भटारखान्यातही घुसलो. तो फोटो काही सापडला नाही. मग तो फोटो इथे नव्हताच, तो फोटो दुसर्‍या हॉटेलमध्ये - जिथे आत्ता डेक्कनचा मॉल आहे- दर्शनीच लावला होता, हे मी तिला सांगितले आणि तिथून बाहेर पडलो, ते वाडेश्वरला पोहोचलो. तिथे १० -१५ मिनिटे बाहेर उभे राहून शेवटी जागा मिळाली. दरम्यान तिथे कोणाचेही नाव पुकारले की आमच्याच ग्रूपचे नाव पुकारले आहे, असे गृहीत धरुन आम्ही बसायला पुढे जाऊ पहात होतो. एकदा सत्यजित असा पुकारा झाल्यावर, सत्यजित पुढे होऊन, हो, हो बघा, आमची १० एक माणसं लिहिली आहेत ना? वगैरे अगदी सभ्य साळसूदपणे विचारता झाला Lol त्यावर तेथील अटेंडटने शांतपणे त्याला यादीमधले सत्यजित हे नाव आणि त्यापुढे २ असा लिहिलेला आकडा दाखवला. दुसराच कोणी सत्यजित, बंगू सत्यजितकडे एक "काय माणूस आहे!" टाईप कटाक्ष टाकत आपल्याला मिळालेल्या जागेकडे गेला. आम्हीही आम्ही त्या गावचेच नाही, अशा अविर्भावात टिकून राहिलो.

पुन्हा एकदा बसायला जागा मिळाली. ओकवूडवरुन वाडेश्वरला येताना साजिरा, आशूडी आणि केपी माझ्यासाठी केक घेऊन आले होते. तो केक कापण्याचा कारेक्रमही इथेच पार पडला. पुन्हा एकदा मायबोली आणि मायबोलीकर ह्या ॠणानुबंधाची जाणीव झाली. गटग होईपर्यंत काही मायबोलीकरांना मी भेटलेही नव्हते, ओळखतही नव्हते. आलेल्या मायबोलीकरांपैकी ज्यांना ओळखते, त्या सर्वांशीही माझं रोज बोलणं होत नाही, पण गटगला सर्वजण अगदी खूप वर्षांची मैत्री असल्यासारखे माझा वाढदिवस साजरा करत होते. आणखी काय हवं? सर्वांचे अगदी मनापासून आभार Happy

जवळ जवळ ३५-४० मिनिटं हा दंगा सुरु होता. लोक काय चाललं आहे, हे पहात होते, त्या वाडेश्वरमधल्या इतरांसाठी अनुल्लेखाचं शस्त्र उपसून ठेवलेलं असल्याने हाही कार्यक्रम उत्साहात पार पडला. गिरिराज, प्रसाद, फदी, मी आणि प्राची सोडून इतरांनी केक खाऊन निरोप घेतला, तेह्वा जवळ जवळ ८ वाजले होते. मलाही घरुन लेकीचा फोन आला आणि प्राचीलाही परत जायचे होते, तेह्वा ५ एक मिनिटांत आम्ही दोघीही गिरिराज, प्रसाद, फदी आणि त्यांच्या कुटुंबियांचा निरोप घेऊन निघालो.

बाहेर पडता पडता, मिहिकाने मला उद्याच्या कार्यक्रमाला (त्यांच्या काही घरेलू कार्यक्रमाला ) तू येणार ना मावशी, असे विचारले आणि नकारार्थी उत्तर मिळाल्यावर तिला खूपच वाईट वाटले, ते पाहून मला अगदी भरुनच आले! एवढी एवढी गोड बाळं किती हक्काने जीव लावतात... Happy श्रेयानलाही माझ्यासोबत जेवायला जायचे होते. मिहीका, श्रेयान, पुढच्या वेळी अगदी नक्की. Happy

इतकी सगळी चांगली माणसं भेटतात, निखळ गप्पा, हास्य विनोद ह्यांतून एकमेकांना ओळखतात, एकमेकांशी मैत्री करुन ऋणानुबंध जोपासतात, एकमेकांसाठी प्रसंग पडला तर धावून जातात. अजून काय हवं? सगळी मायबोलीची कृपा. अजून काय? Happy

कालच्या गटगला तोषादादा उशीरा पोचल्याने येऊ शकले नाहीत, ते आज आपल्या कुटुंबियांसकट माझ्या घरी आले होते. विवेकदादाही आले होते. गटगची सांगता आज झाली म्हणायला हरकत नाही.... पुन्हा भेटूयात मंडळी.

अरे वा, आला का वृत्तांत ? मस्तच मजा केलेली दिसतेय. Happy
वाडेश्वर माझं लईच फेवरीट आहे. तुम्ही काय काय खाल्लंत ?
शैलजा तुझे सगळे बड्डे असेच आनंदात जावो. Happy
योग्या का म्हणे टांगारु ?
फोटु कधी येणार ?

मवा, शुभेच्छांसाठी धन्यवाद. वाडेश्वरमधली खादाडीची जबाबदारी गिरिराज, प्रसाद, फदी आणि त्यांच्या कुटुंबियांनी उचलली होती, तेह्वा ते सांगतील Happy
महागुरु, मामी धन्यवाद Happy

धमाल केलीत लोकहो Happy
वृत्तांत भारी शैलजा...मेरा भी एक बड्डे ववी के साथ मनाया था, याद आया...पण मला कप केकच कापायला लावला होता Sad Proud बहुत नाईन्साफी है!

जय हो मायबोली. Happy

सह्हीच!

शैलुतै वाढदिवसाच्या शुभेच्छा!! Happy

गटग आणि वृत्तांत जबरदस्त!! आता फोटु पण पाठवा Happy

सॉरी मी फोनु शकले नाही कारण मी इथेच गटग केले.. माझ्या इथल्या मैत्रिणी जमलो होतो आपापल्या बच्च्यांना आपापल्याच नवर्‍यांकडे ठेऊन मस्त डिनर केलं आणि गप्पा हाणल्या Happy खुप दिवसांनी एंजॉय केलं Happy

नेक्स्ट टाईम नक्की फोनेन Happy

अरे व्वा!! मस्त मजा केली दिसतयं.
आता पुढच्या वेळी बंगळूरात करा पुणे गटग. आम्ही पण येउ.

Pages