साक्षर भारत आणि आपला खारीचा वाटा (सार्वजनिक धागा)

Submitted by वैजयन्ती on 9 May, 2011 - 02:45

मधंतरी माझ्याकडे काम करणार्‍या बाईच्या मुलीच्या शिक्षणासंबधी इथल्याच एका धाग्यावर मी माझ्या अडचणी विचारल्या होत्या. मला अगदी लगेच उत्तरे मिळाली, पण त्याचवेळी असंही लक्षात आलं की कितीतरी लोक इकडे आपला खारीचा वाटा उचलत आहेत. आपण आपले अनुभव / अडचणी आपण शेअर इकडे करुया का?
आपले बरे/वाईट दोन्ही अनुभव लिहूया.
ज्यांना शिकायचय त्यांचीच उदासीनता, त्यामुळे झालेला उत्साहभंग, ज्यावेळी यावर मात करता आली त्यावेळी कशी केली, घरातल्यांची मदत किंवा त्यांची होणारी चिड्चिड, त्यातून निघालेला किंवा न निघालेला मार्ग.. अश्या गोष्टी शेअर करता करता, आपल्याला उत्तरे सुद्धा मिळतील. कमीत कमी एकमेकांना आधार तरी होईल!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना, मिनोती, तुमची बोलणी झाली की मला .कळवा. मी नक्की मदत करीन. येते काही वीकेंड चिकार बिझी आहे त्यामुळे फोन वगैरे जमवणे कठीण आहे. पण तुम्हाला दोघींना जे योग्य वाटेल, सत्पात्री वाटेल अशी मदत मी आनंदाने करीन.

अजून (कोणा)कोणाला रस आहे? एक स्काईप कॉल सेटअप करते त्यानुसार. स्काईप आयडी काढुन ठेवा >>
रैना, मलाही आवडेल नक्कीच ह्यात सहभागी व्हायला.
स्काईप आयडी .... हम्म.. काढते नक्की येत्या एक दोन दिवसात. तुर्तास तुला संपर्कातुन माझा इमेल आयडी कळवते.

रैना,
माझा स्काईप id मेल करते,नेमकी जरा घाइत आहे ठरल्या वेळी,का ते मेल मधे लिहिते,पण मला interest आहे,तेव्हा तिथे नाही भेटले तरी मेल करशील प्लीज?
धन्यवाद

वैजयंतीताई, अकु...छान!
रैना, मलापण आवडेल सहभागी व्हायला. हा धागा मी उशीरा वाचलायं. तर तुमचे काही बोलणे झाले असेल तर मला कळवा. आज इथे वाचून मी बरेचदा स्काईप डाऊन्लोड करून अकाऊंट ओपन करण्याचा प्रयत्न केला. काहीतरी प्रॉब्लेम येतोय. माझा मेल आय डी कळवू का संपर्कातून?

आंतर्जालविषयक कायद्यांबद्दल सचिंत होऊन मी इथले लिखाण उडवले आहे. उगाच मायबोलीवर काही गैर परिणाम होऊ नयेत म्हणून.

रेशिम आमचे बोलणे झाले नाही पण रैना इमेल करणार आहे. तीला तुझा इमेल पत्ता कळवुन ठेव आधी.
झक्की धन्यवाद. नक्की माहित नाही पण मोठ्या संस्था चालवण्याकरता नक्कीच जास्त पैसा लागत असणार, त्यामुळे लोकांना दिलेल्या पैशातले काहि % पैसेच गरजु पर्यंत पोचत असणार असे मला वाटते.

शैलजा, आधी डाऊन्लोड होत नव्हते. आता एकदाचे झालेय तर अकाऊंट ओपन होत नाहिये. आज परत बघते आणि परत एरर येत असेल तर तुल मेल करते.
सावली, धन्स ग. मी रैनाला मेल करते.

झक्की, आमच्या ओळखीचे बरेचजण एकल विद्यालयाला मदत करतात. त्यांचा अनुभव चांगला आहे. दुर्गम भागात एक शिक्षकी शाळा असते. मात्र त्यांचा अभ्यासक्रम तीनच वर्षांचा आहे. म्हणजे पुढील शिक्षणासाठी परत सरकारी शाळा वगैरेची सोय नसेल मुलांचे शिक्षण थांबणार. पण अगदीच काही नाही त्या पेक्षा बरे! त्यांचे उद्दिष्ट शक्य तेवढ्या मुलांना रोजच्या व्यवहारापुरते साक्षर करणे हे आहे.

बर्‍याच दिवसांनी फ़िरकतेय इकडे. गेला आठवडा अगदी धावपळीत गेला. आता वेळ होईल असं वाटतय.
१५/१६ वर्षांपूर्वी जवळच् रहाणार्‍या एका मुलीला थोडी सपोर्टची गरज होती. हुशार मुलगी, पण घरी मुलींनी शिकून काय करायचय असे वातावरण. तिच्या घरच्यांना समजावून सांगून तिला १२ वी नंतर इंजिनिअरिंग अ‍ॅडमिशन, उच्च शिक्षणासाठी असलेल्या स्कॉलरशिप मिळवायला मदत आणि इंजिनीअर होईपर्यंत थोडासा "सगळं व्यवस्थित होईल गं काळजी करू नको " असा धीर देणे इतकाच माझा तिच्या शिक्षणात सहभाग होता. कालच तिने अगदी मुद्दाम माझा फोन नं शोधून फोन केला. आता Tech Mahindra मध्ये नोकरी करते. खूप खुषीत होती.

तिच्या शिक्षणाला आणि लग्नाला कडाडून विरोध करणारे आई, वडील आता तिचा भाऊ सांभाळायला तयार नाही म्हणून तिच्याकडेच असतात. एकूण सगळं छान चाललय. माझा आनंद शेअर करण्यासाठी खास इकडे लिहिलय. असा एक फोन खूप हुरूप देतो.

रच्याकने, engineering admissions साठी मिळालेले गुण व इतर constraints यानुसार कुठे घ्यावी / काय फ़ायदे / तोटे असे counseling मी नेहेमीच हौस म्हणून करते. कुणाला उपयोग होण्यासारखा असेल, तर संपर्क केल्यास मला आवडेल

उत्तम कार्य. मी सुद्धा घरी एखाद्या गरजू मुलीला ठेवून घ्यायला तयार आहे. व शिकवेन सुद्धा. स्वतः नाही जमले तर तिला कोर्स ला घालायला मदत करेन.

आज हा धागा वाचून काढला.

गेली काही वर्षं बालरक्षा, भारत यांना दरवर्षी ४ मुलांच्या शिक्षण, सेफ्टी या हेतूंसाठी पैसे देत होते. परंतु त्यांच्याकडून काहीच फिडबॅक मिळत नाही, त्यामुळे यावर्षी अजून तरी दिले नाहियेत.

आदिवासी पाडे किंवा अतीग्रामिण भागात शाळासुरु होण्यापुर्वी वाटल्या जाणार्‍या साहित्याच्या पुरवठ्याबाबत प्रत्यक्ष सहभाग असतो. नेहमीच्या साहित्याच्या जोडीला वीज नसलेल्या भागात रात्री अभ्यास करण्यासाठी मेणबत्त्याही पुरवतो कारण दिवसा मुलांना त्यांचे पालक मजूरीला पाठवतात व त्यांना अभ्यास करता येत नाही.

बाकी दुसरं काही विशेष करत नाही साक्षरतेच्या प्रसारासाठी.

मी पण खूप काही नाही करू शकलेय आत्तापर्यंत. फक्त कामवाल्यांच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च (पुस्तकं, वह्या आणि नविन काही शिकायचं असेल तर त्या क्लासची फिस) मात्र आवर्जून देते. पूर्वी माझ्याकडे काम करत असलेल्या दोघी बायका यानिमित्ताने अजूनही भेटतात. त्यातल्या एकीच्या मुलीला थोडफार कॉम्प्युटर ऑपरेटिंग शिकवले होते. पण मुळात मला खूप चांगल्या पद्धतीने शिकवता येत नसल्याने (त्याबाबतित पेशंस नाही Sad ) दुसरा कोणताही विषय अजून शिकवून बघितला नाहीये.

याव्यतिरिक्त औरंगाबादला आईच्या ओळखीच्या एका अनाथाश्रमातील एक एक मुलगी मी आणि भावाने दत्तक घेतलिये. त्यांचा वर्षाचा सगळा खर्च करतो. पण त्यांनाही तिथे जावून जास्त वेळ नाही देवू शकलेय मी.
तुमच्यापैकी जे लोक अशा कामांमध्ये स्वतः प्रत्यक्ष सहभागी होतात त्यांचं खरंच खूप कौतूक वाटतं.

<< याव्यतिरिक्त औरंगाबादला आईच्या ओळखीच्या एका अनाथाश्रमातील एक एक मुलगी मी आणि भावाने दत्तक घेतलिये. त्यांचा वर्षाचा सगळा खर्च करतो. >> अल्पना, काही हरकत नसेल तर ह्याबद्दल जरा सविस्तर सांगाल का ?
कारण असंच काहीसं बर्‍याच दिवसांपासून माझ्या मनात घोळतंय. पण ह्याविषयी काहीच माहिती नाही ( म्हणजे असे आश्रम आणखी कुठे आहेत, खर्च देणे ह्यासोबत आपला आणखी काय सहभाग अपेक्षित असतो वगैरे.)

रुणुझुणू, बर्‍याच अनाथाश्रमांमध्ये अशी सोय असते. औरंगाबादला भारतिय समाजसेवा केंद्रामध्ये वर्षाला ठराविक रक्कम एका मुलाच्या शिक्षणासाठी देण्याची सोय आहे . ही रक्कम दरवर्षी बदलत असते. गेल्यावर्षी ३००० रु होते. आता या जुलैमध्ये देणगी देताना यावर्षीची रक्कम कळेल. यामध्ये त्या मुलीचा /मुलाचा शिक्षणाचा खर्च केला जातो व पुरक आहार म्हणून मोड आलेली कडधान्ये वैगरेचा खर्च केला जातो. तुम्ही ज्या मुलांचा खर्च करत आहात त्यांचे प्रगतीपुस्तक दर ३ /६ महिन्यांनी तुम्हाला पाठवले जाते. यात त्यांच्या शारिरीक वाढीबद्दल आणि शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती असते. माझा सहभाग नेहेमी आईकडे पैसे देण्याइतकाच असल्याने मला यापेक्षा जास्त माहिती नाहीये. आईच सगळं बघते खरंतर.

याशिवाय औरंगाबादमधल्याच साकार या संस्थेत आम्ही गेल्यावर्षी मुलाचा वाढदिवसानिमित्त भेट दिली होती. या संस्थेत फक्त लहान बाळंच आहेत. (माझ्या मुलाला आणि पुतण्यांना तिथे मुलांशी खेळायला खूप आवडलं होतं. ) त्यांना लहानमुलांच्या दुध पावडरीचे डब्बे, दुपटी, लंगोट इ सामानाची नेहेमी गरज भासत असते.

यावर्षी आम्ही मुलाच्या वाढदिवसाला दिल्लीत असणार असल्याने मी इथल्या अनाथाश्रमाला भेट देण्यासाठी संस्था शोधत होते. त्यावेळी SOS Children's village (http://www.soscvindia.org/charity/sos_updates/index.php) या संस्थेची माहिती माझ्या एका मित्राने दिली. त्याने स्वतः या संस्थेमध्ये वर्षभर काम केलं आहे. या संस्थेतही अशी मुलांना स्पाँसर करण्याची सोय आहे. पण मी अजून या संस्थेला स्वतः भेट दिली नाहिये.

अल्पना, धन्स गं. पुण्याच्या जवळपास असे आश्रम माहीत आहेत का ? ( संयुक्ताच्या उपक्रमातून सावली सेवा ट्रस्ट माहीत झाला आहे.)

अनाथाश्रम, किंवा मदत करणार्‍या इतर संस्था यांच्यावर लक्ष ठेवायला कुणीतरी स्थानिक माणूस (ज्याचा त्या संस्थेशी काहीही संबंध नाही असा) लागेल. परोपकारी संस्था (अगदी रेड्क्रॉससुध्दा) पैसे वाया घालवण्यात निपूण आहेत. निदान एका मुलाच्या शिक्षणाचा किंवा संगोपनाचा आपण पूर्ण खर्च देतो तर ते त्या मुलाला पोहोचतंय का 'आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय'.. असं चालू आहे यावर निदान लक्ष ठेऊ शकणारं कोणीतरी हवं.
म. ब. आ. करणार्‍या काही लोकांना कदाचित हा उपक्रम आवडेल (ए. फु. स.)

अल्पना आणि अश्विनी, खास कौतुक तुमचे.
परदेसाईंचे 'आंधळं दळतय' हे म्हणणे खरे आहे पण रुपयातले आठ आणे तरी मिळतात, नाहीतर ते सुद्धा नाही मिळणार. Happy
आज माझ्या बाईला विचारलं की हल्ली अभ्यास का नाही करत, तर म्हणे वेळ नाही मिळत आहे. कुठल्यातरी नवीन चालू झालेल्या टी.व्ही. सिरीअल्स पहायच्या असतात म्हणून. दिवसाकाठी एकूण ७ की ८ सिरीअल्स पहाते!! अगदी न चुकता.. क्लास घेतला मग चांगला Proud

आमच्याकडे सध्या सकाळी वेगळाच सीन असतो. आई रोज सकाळी गीतेतील एक अध्याय मोठ्याने म्हणते / वाचते. तर आमच्या बाईंना ते ऐकायचे असते व अर्थ समजून घ्यायचा असतो. मग आई एकेक श्लोक म्हणते व त्याचा अर्थ त्यांना वाचून दाखवते. आता त्यांना वाचता येईल अशी मराठीतील सोपी गीता त्यांना पुस्तकरूपाने भेट द्यायची आहे. कोणते पुस्तक देता येईल (त्यांना जोडाक्षरे वाचणे जरा अवघड जाते) ह्याबद्दल विचार चालू आहे. Happy

मला कळत नाहीये हे कुठे विचारु ते... 'केअर ईंडीया' ही संस्था कशी आहे? कोणाला काही माहीत आहे क? त्या संस्थेचा १ प्रतिनिधी माझ्याकडे नीधीसाठी फॉलॉअप करतोय ..

WHY?

तुम्ही आधी लिहिलेला मेसेज 'अमुक लिंकवर क्लिक करा, इमेल चेक करा तुम्हाला घरी चेक येईल' इत्यादी मजकुर या धाग्याच्या विषयाशी कणभरतरी संबंधित आहे काय?
बर्‍याच ठिकाणी तुम्ही स्पॅम केल्यासारखा तोच तोच मेसेज टाकला आहेत.
अश्या प्रकारच्या साइटसच्या लिंक्स इथे न देणे हे योग्य आहे.
असो मी अ‍ॅडमिनला विनंती केली होती. ते काय ते करतील.

आज इथं सांगायला खूप आनंद होतोय.... या धाग्यात वर उल्लेख केलेल्या, आमच्या हातून जिच्या शिक्षणासाठी योगदान देता आले त्या शिकाऊ विद्यार्थिनीचा हा प्रगतीचा आलेख आहे :

काल ती घरी खास भेटायला आली होती. एम.पी.एम. + डी. एल. एल. झाली, एका मोठ्या कंपनीच्या फॅक्टरीत एच. आर. डिपा. मध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंटचे काम करत आहे. लवकरच प्रमोशनही होईल. दरम्यान कंपनीच्या कामानिमित्त दिल्लीला वर्षभर मजेत राहिली. नोकरी लागण्या अगोदर टाटा जागृती योजने अंतर्गत महिनाभर भारत दर्शन करून आली. आता स्वतःची दुचाकी घेतली आहे व दुचाकी किंवा कंपनीच्या बसमधून रोज ये-जा करते. २००० कामगारांचे पे-रोल + ट्रेनिंग जबाबदारी हाताळते. पगाराच्या पैशांची बचत करून बहिणीच्या लग्नात घरच्यांना हातभार लावला. स्वतःसाठीही बचत करते आहे. आणि मुख्य म्हणजे ती आता वर्षाकाठी एका गरीब मुलीच्या शिक्षणाचा खर्च करते. नुकतेच तिच्या कंपनीतील कामगारांसाठी व कर्मचार्‍यांसाठी प्राणायाम + ध्यानाचा कोर्स आयोजित करण्यासाठी तिने कंपनी व्यवस्थापनाला उद्युक्त केले. या सर्वातून तिला जो आत्मविश्वास मिळालाय तो अतुलनीय आहे. कंपनीने लॅपटॉप दिलाय तो ती सराईतपणे हाताळते. वागण्या-बोलण्यात सफाई आली आहे. आणि त्याचवेळी तिची कष्टाची सवय तिने सोडलेली नाही. आजही ती रोज तिच्या गावी घरी परत गेल्यावर आईवडिलांना घरकामात, स्वैपाक आणि इतर किरकोळ गोष्टींत मदत करत असते. होस्टेलला राहिल्यामुळे स्वावलंबनाची झालेली सवय कायम आहे. आणि स्वतःच्या हिंमतीवर, बळावर पुढे जाण्याची जिद्द. आता तिला एल. एल. बी. करायचे आहे. Happy

Pages