पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक स्वीटन्ड कंडेन्स्ड मिल्कचा डबा - नेस्ले मिल्कमेड किंवा अमुल मिठाईमेट... एवढेच मिळते इथे.
एक कार्टन हेवी क्रीम - अमुल क्रिम मिळते, त्यालाच हेवी समजायचे Happy
एक एव्हॅपोरेटेड मिल्कचा डबा - एक लिटर दुध आणुन ते पाव लिटर होईपर्यंत गॅसशेजारी उभे राहुन ढवळायचे आणि मग मिक्सर मधुन काढायचे. Happy
मलाही इकडे डेरी व्हाईटनर मिळाले.. मी डेरीत जाऊन चौकशी केली तरी मिळाली नाही दुध पावडर. डेरी व्हाईटनरमध्ये कॉर्न फ्लोर, साखर इइ असते.
एक छोटा डबा कूल व्हिप - अमुल क्रिम व्हिप करायचे.. Happy (हे मात्र नक्की नाही हा.. मी अंदाजपंचे म्हटलेय Happy )

पहिल्या दोन गोष्टी डि मार्ट किंवा इतर तत्सम ठिकाणी सहज मिळतात.

ह्म्म्..आरे नेस्ले अनि अमुल लक्षात नाही आले माझ्या. बाकी नाही मिळत ना..मला वाट्लं मी चुकीच्या ठिकाणी शोधते आहे की काय? Happy

दिनेशदा मुम्बईत कुठे दुध पावडर मिळ्ते का सागां.

निकिता |
अग चांगल्या वाण्याकडे किंवा हाईपर सिटी, स्पेनर्सस, बिग बाजार इ कोणत्याही स्टोअर मध्ये सहज मिळुन जाइल.

कन्डेन्स्ड मिल्क, मिल्कमेड नावाने मिळायचे. मला वाटते आता अमूल चा मिठाई नावाचा टीन आहे. इव्हॅपोरेटेड मिल्क मात्र बहुदा मिळत नाही. कदाचित क्रॉफर्ड मार्केटमधे (पीक मिल्क, किंवा रेनबो नावाने मिळेल. जिथे गल्फ मधली उत्पादने म्हणजे निडो मिल्क पावडर वगैरे मिळते, त्यांच्याकडे ) मिळू शकेल.
त्यांच्याकडेच कूल व्हीप, मिळू शकेल. हेव्ही क्रीम, दादरला, शिवाजी मंदिर कडून सेना भवनकडे जायचा जो रस्ता आहे तिथे मिळू शकेल.
दोन पावाच्या स्लाईस मधे चीज पसरुन चीज सॅन्डविच करतात. त्यात चवीप्रमाणे मिरपुड वा चाट मसाला घालतात. हवे तर ते ग्रील करता येते.

तळण्यासाठीचे वेग़ळे कॉर्नचे चपटे गोल पोहे मिळतात (साधारण मोठ्या किराणा मालाच्या दुकानात ) ते तळून त्याचा चिवडा करतात.

निकिता |
अग चांगल्या वाण्याकडे किंवा हाईपर सिटी, स्पेनर्सस, बिग बाजार इ कोणत्याही स्टोअर मध्ये सहज मिळुन जाइल.

तिथे dairy whitener मिळतं. दुधाची पावडर नाही मिळंत.

परवा माझे ग्रिल सँड्वीच फसले. मी काकडी टोमॅटो च्या चकत्या पण घातल्या. त्यामुळे सॅ.भिजके झाले व
भाज्या अर्धवट शिजल्या. चटणीची व चीज ची चव गेली. लय पचका झाला. आता वेगळे फिलिन्ग तयार करून
मग त्यावर चीज किसून टाकणार आहे. कांदा लसूण, बटाट्याचा कीस, भोपळी मिरची सगळे अमुल बटर मध्ये
परतायचे व मीठ मिरेपूड एक थेम्ब सोया सॉस. हे फिलिन्ग करून वरून किसलेले चीज घालायचे. व ग्रिल करायचे.

चीज पकोडे पण करत येतील. किसून उकड्लेले बटाटे, लसूण कोथिम्बीर इ. घालून मळून घ्यायचे व तळायचे.
किन्वा चीज पराठा. एकेकाळी हे पदार्थ बनवून खात होतो. वखिलवत होतो हे विसरायला झाले आहे. आता ग्रीन टी पीत पीत पार्ले बीबी वरील वर्णने वाचायची Happy

रोहीत बाळ डिजायनर यास मोठा हार्ट अटेक आला. एक आर्टरी ९०% व एक १००% बंद होती. दोन व्हालव
काम करीनासे झालेत. म्हणजे काय त्याची लाइफ स्टाइल असेल बघा. कोलेस्टेरॉल किती हाय असेल.
तो कश्मीरी असल्याने खूप रेड मीट / डेअरी प्रोड्क्ट्स खात असणार. तो फक्त ४२ वर्शाचा आहे म्हणून हळहळ वाट्ते.

अश्विनीमामी |
मि सरळ बारीक चिरलेले टॉम्याटो, कांदा, सिमला मिरची, किसलेल चिज (शक्यतो पिझ्झाच), काळी मिरी पवडर मिठ एकत्र करते (हवा असेल तर उकडलेला किसलेला बटाटा). ब्रेडला दोन बाजुला बटर लावते आणि कच्च्याच सारणाचे सँड्वीच बनवुन टोस्ट करते. हिरव्या चटणी बरोबर आणि सॉसबरोबर मस्त लागत.

अश्विनीमामी |
मि सरळ बारीक चिरलेले टॉम्याटो, कांदा, सिमला मिरची, किसलेल चिज (शक्यतो पिझ्झाच), काळी मिरी पवडर मिठ एकत्र करते (हवा असेल तर उकडलेला किसलेला बटाटा). ब्रेडला दोन बाजुला बटर लावते आणि कच्च्याच सारणाचे सँड्वीच बनवुन टोस्ट करते. हिरव्या चटणी बरोबर आणि सॉसबरोबर मस्त लागत.

Creamed corn चा can आहे. सुप करुन झाले. काहि नविन पदार्थ सुचवा ना.

त्यासाठी, कच्चे प्लॅन्टेन किंवा राजेळी केळी लागतात. (मुंबईत माटूंगा मार्केट मधे मिळतात ) पण ती फार पिकलेली न घेता कचीच घ्यायची असतात. ती सोलून त्याचे पातळ काप काढायचे आणि भर तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. तेल निथळून त्यावर चवीप्रमाणे तिखट मीठ घालायचे. हे पातळ काप काढायला एक खास किसणी पण मिळते.
या सर्वाचे प्रात्यक्षिक, त्या मर्केटसमोरच बघायला मिळेल.

हसरी, फणसाच्या भाजीचे अनेक प्रकार आहेत इथे.
रोहिणी, जरा चपटे रसगुल्ले करुन, ते आडवे कापायचे. ते पूर्ण निथळून, मधे घोटलेले क्रीम पसरायचे. कि झाले मलाई सँडविच !!

रोहिणी, जरा चपटे रसगुल्ले करुन, ते आडवे कापायचे. ते पूर्ण निथळून, मधे घोटलेले क्रीम पसरायचे. कि झाले मलाई सँडविच !!>>>>>>>> पण दिनेशदा,क्रिम कोणतं वापरायचं? कारण ,नेहमी केक साठी जे वापरतो,त्याने दाट मलाई होईल का?

व्हीपींग क्रीम म्हणून एक वेगळे क्रीम मिळते. ते बर्फावर ठेवून फेटायचे असते. तसे फेटल्यावर ते बर्‍यापैकी दाट होते. दूधावरची जाड मलई फेटली तरी चालते. पण फेटताना जास्त फेटू नये, नाहीतर त्याचे लोणी होते.

मलइ सँ हैद्राबादेचा प्रसिद्ध पदार्थ आहे. पण तो केल्या पासून एक दिवसात संपवा म्हणतात. वरील पद्धत बरोबर आहे. त्या क्रीम मध्ये इथे हलका पिवळा रंग टाकतात. किंवा केशर. व रसगुल्ल्याच्या टोप वर एक चांगल्या प्रतीच्या वर्खाचा चौकोन टाकायचा व डार्क केशरी ठिपका द्यायचा. वरून एक चिमूट दुधाचा मसाला
भुरभुरायचा. मध्ये क्रीम लेयर मध्ये पिस्ता व बदाम बारीक काप करून घालता येतात.

इथे लग्न कार्यात ते सॅ. एका मातीच्या डिस्पोसेबल डिश मध्ये सर्व करतात. छोटी बोटीच्या आकाराची डिश.
व वरून क्रीम वगैरे केक डेकोरेशन सारखे पाइपिन्ग करून करतात.
आत रोज कलर हल्का घालून वरून गुलाब पाकळ्या नाहीतर डाळींब दाणे घालतात. आमच्या घराजवळील हलवायाकडे अश्या मस्त डेमो डीशेस बघायला मिळतात. अप्रूव न झालेली डिजाइन्स आपण विकत घेऊ शकतो.

कसला काढा ? अनेकदा लिटरभर पाण्यात दिलेले घटक घालून ते मंदाग्नीवर उकळून पावपट करायचे असते. काही काढे न उकळता, थंड पाण्यात करतात, त्यान फांट असा शब्द आहे.

Pages