पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी केलेल्या खस्ता कचोरीचे मिश्रण पण चालेल. ते पण एकदम सुके होते. २-३ दिवस रहाते.

http://www.maayboli.com/node/8976

ह्याच मिश्रणात काजू व बेदाणे टाकायचे. मस्त लागते.

PSV, तोंडली उभी कापावी.(एका तोंडल्याचे ४ भाग) नेहमीप्रमाणे फोडणी करुन कापलेली तोंडली त्यात टाकावीत. थोडे परतून ,झाकण ठेवुन एक वाफ आणावी. थोडे पाणी (रस किति पाहिजे त्या प्रमाणात) घालून झाकण ठेवून शिजू द्यावी. शिजत आल्यावर मीठ, गोडा मसाला, गूळ घालून चांगली शिजवावी. कोथींबीर-खोबर(नारळ) वाटून घातल्यास चांगली चव येते व रस घट्ट होण्यास मदत होते. आवडीप्रमाणे दाण्याचे कूट सुध्दा घालावे. त्यानीपण रस घट्ट होतो.

Admin, हे पाककृती मधे कसे घालायचे माहित नाही म्हणून इथे लिहिले आहे. क्षमस्व !

Thanks shugol !! Happy

मुगाची डाळ भिजवून, कोरडी होईपर्यंत परतायची. त्याशिवाय कचोरी टिकणार नाही. तयार मूगाची तळलेली डाळ मिळते, तीदेखील वापरता येईल, आपल्या आवडीप्रमाणे ती मसालेदार करता येईल.

hello,

मला ईथे कोणी बन्गाली पद्धतीचे chicken कसे बनवायचे ते सान्गाल का pls. gravy थोडि दाट असलेली मी एकदा खाल्लेली आहे. पण मला reveipe माहित नाहि. pls help me. घरी पाहुणे येणार आहेत.

shugol, उजव्या हाताला 'नवीन लेखन करा' दुव्यावर जा, तेथे, हितगुज-विषयाप्रमाणे > आहारशास्त्र - पाककृती या दुव्यांवर जा..

मग उजव्या हाताला नवीन पाककृतीचा दुवा आहे, तेथे जाऊन तुमची कृती लिहा.

कॅलिफोर्नियामध्ये एकदा बसिल पेस्टो घातलेला व्हेज पिझ्झा खाल्ला होता, माहित असल्यास प्लीज कुणीतरी टाका ना सविस्तर कृती.

ज्ञाती, मिनोती किंवा मनुस्विनीने टाकली होती त्याची कृती इथे नव्या मायबोलीत. बघ सापडते का.

इथे इन्डो-चायनीज रेस्टॉरन्ट्समधे एक लोटस रूट्सचा आंबट-गोड-तिखट प्रकार करतात. (एडिसनमधलं मिंग, पार्सिपेनीतलं चाँद पॅलेस) त्याची रेसिपी माहीत आहे का कोणाला?

काळ्या वाटाण्याची कोकणी पद्ध्तीने उसळ कशी करतात?इथे विषयवार यादी मधे शोधले पण सापडले नाही.

मटार फ्रीज करण्यासाठी, सोलून निवडून घ्यावेत. मग मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावेत. बाजुला बर्फाचे पाणी तयार ठेवावेत. एका मोठ्या चाळणीत मटार घेऊन, मिनिटभर उकळत्या पाण्यात बुडवावेत. मग लगेच बर्फाच्या पाण्यात टाकावेत. मग नीट निथळून घ्यावेत.
मग एकावेळी लागतील, एवढ्या आकाराची पाकिटे करुन सीलबंद करावीत, व डीप फ्रीज करावीत.

चीज फाँड्यू.
पास्ता विथ चीज सॉस
चीज सँडविच

कोणते चीज त्यावर आहे. पण कोलेस्टेरॉल हाय होइल बरेका!

अ‍ॅडमिन, खालचे सर्च इंजिन आहे त्यात पुर्ण पाकृचे नाव कॉपी पेस्ट केले तरी पाकृ दिसत नाही. काहितरी करा बुवा..

अस्सल मालवणी - काळ्या वाटाण्याचि उसळ - हे करा टाईप खाली आणि बघा येते का पाकृ ते...

यावर एक तात्पुरता उपाय म्हणजे नवी पाकृ पोस्टताना शब्दखुणा मध्येही पाकृचे वर जे नाव दिले असेल तेच परत कॉ.पे. करायचे Happy म्हणजे शोधणा-याला नावावरुन पाकृ चटकन सापडेल. अर्थात व्याकरणाच्या चुका केलेल्या असतील तर मायबोली ते इग्नोर करते का ते माहित नाही Happy

जसे वर 'वाटाण्याचि' लिहिलंय आणि मी जर 'वाटाण्याची' शोधले तर सापडेल का ते माहित नाही.

मला मलाई/बदाम्-पिस्ता कुल्फी करायची आहे साधारण १२ लोकांसाठी. रेसिपी मिळेल का?
इथे सर्च केल्यावर एकच अंबा कुल्फीची रेसिपी सापडली.

लाजो, कुल्फीसाठी एव्हॅपोरेटेड मिल्क वापरले तर चांगले. ते थोडेसेच आटवावे लागते. १२ लोकांसाठी ८ टिन्स पूरतील. चार ते सहा टिन्स भरतील एवढे क्रीम लागेल. दोन टेबलस्पुन कॉर्नफ्लोअर लागेल. बाकि साखर व बादमपिस्ते आवडीप्रमाणे. कुल्फीचे मिश्रण, नेहमीच्या तपमानाला जास्त गोड करावे लागते, तरच थंड झाल्यावर ते गोड लागते.

चीज फाँड्यू. कसं करायचं?

भारतात आहे. चीझ म्हणजे क्युब्स आहेत. चीज सँडविच कसं करायचं?

एक स्वीटन्ड कंडेन्स्ड मिल्कचा डबा, एक एव्हॅपोरेटेड मिल्कचा डबा, एक छोटा डबा कूल व्हिप, एक कार्टन हेवी क्रीम

हे सगळं भारतात कुठे मिळेल? मुम्बईत?. दिनेशदा म्हणतात ती दुध पावडर पण नाही मिळाली मला. :-(..

dairy whitener मिळत :-((

Pages