पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चूक दुरुस्त केली आहे. पण ती दखवून द्यायची पध्दत खटकली. हट्टाने लिहिले हे presumptuous नाही का? असो. विषयान्तर झाल म्हणुन टिका होण्यापूर्वी थाम्बते. >> तुम्ही इथे वरती मेसेज पाहुनही इथेच लिहिलेत. चुका करायच्या आणि सांगितले की राग येतो लोकाना.

चुका करायच्या आणि सांगितले की राग येतो लोकाना. >> सान्गायची तर्हा ? मुख्य उद्धेश ह्या message boards चा काय आहे हो? And how self righteous can you be? Are you infallible? I did not deny that my reply was not in the right place, but accusing me of placing it here adamantly really got to me. So much for hospitality on this site.

मिनोती, तू लिहिलेलं मलाही खटकलं माझा काही संबंध नसताना. एवढी शुल्लक बाब. पण परत एकदा सांगितलं असत नीट तर काहीच हरकत नसते. त्यातून तिने चूक कबूल करून दुरुस्तही केली. मुद्दामून केलं असतं तर दुरुस्त नसतं केलं तिने. थोडक्या थोड्क्यासाठी कशाला वातावरण गढूळ करायचं?

नमस्कार a_sayalee,
तुम्ही दिलेली माहिती योग्य जागी हलवल्याबद्दल धन्यवाद. कृपया राग मानू नका, काही मदत लागल्यास मदत समितीला नि:संकोच विचारा.

धन्यवाद.

बाप रे माझ्या एका विन्न्नति वरुन किति जणाना त्रास? a_saylee ताईचा काहि दोश नाहि. She was only helping me. besides I put the question to ask of recipes for toddlers who is fussy eater but had to give bit more of background. आता पुन्हा मदत मागायला मनात धाकधुकच.....once again sorry

मी एका south indian function ला गेले होते त्यावेळी तिथे रात्री जेवणात एक खिचडीचा प्रकार होता.
मस्त गरगरीत , हिरवा ओला वाटाणा टाकलेला ( वाटाणे भात कसा करतो अगदी तसाच पण नेहमीच्या
भातासारखा सुका नाही , गरगरीत होता ) त्या खिचडीला काय म्हणतात, ती कशी करायची ते सुचवाल का ?

घरात मऊ, पिकलेले पेरु आहेत. ते गिळगिळित गोड पेरु बघुन खायची इच्छा होत नाहीये. किलोभर असतिल. कसे संपवू?
संत्री आणि चिकु पण बरेच आहेत. ते पण संपवायचेत.

पेरुची टॉफी किंवा वड्या करता येतील. चिकूचा गर आटवून ठेवता येईल. संत्र्याचा मोरंबा करता येईल.
त्या भाताला पोंगल, किंवा बिसी बेळे हुळी अन्ना म्हणतात. सगळ्यांच्या कृति इथे असतील.

चिकुचा मिल्कशेक खूप मस्त लागतो. चिकु + दूध + साखर (चिकु गोड असतील तर गरज नाही) + १-२ आईस क्युब्स + १ वेलदोड्याचे दाणे. पण पिऊन झाला की ग्लास आणि तोंड कोमट पाण्याने धुवायचं नाहीतर चिकट होतं Happy

पेरुचा जॅम करता येतो बहुतेक. मी आईला विचारुन सांगते.

चिकूची सालं बिया काढून गर मिक्सरमध्ये बारीक करून त्याला एक उकळी काढ. थंड कर आणि फ्रिजमध्ये टाक. हवा तेव्हा थंड दूधात घालून ब्लेंड करायचा, चिकू मिल्कशेक तयार.

नुसताच की साखर घालुन उकळी काढायची ? मी भारतातुन येताना घेऊन येइन पुढल्यावेळी.

बोर्डी किंवा घोलवडला कोणी ओळखीचे असेल तर तिकडे चिकू पावडर आणि चिकू चिप्स मिळतात ( वाळवलेले ), ते सही लागतात . मी येताना घेऊन आलेय , फ्रीजमध्ये छान राहते दोन्ही . हवे तेव्हा चिकू खाल्ल्याचा आनंद मिळतो . आम्ही सारे खवय्ये मध्ये हे सगळे बनवणार्‍या बाईंनी हे सांगितले होते , ते सहसा त्यांची प्रॉडक्ट्स होलसेलर्स ना विकतात म्हणे .

अल्पना, पेरुचा हलवा करु शकतेस. आहे इथेच रेसीपी. मस्त लागतो. लाल आहेत का पेरु आतून तर मग मस्तच.

घरी खूप अननस आहे. त्याचं काय करता येईल??? थोडा खाजरा आहे त्यामूळे नुसता खाता येत नाहीये.

अननसाचा मुरांबा? - अननसाच्या छोट्या फोडी करुन साखर, दाल्चिनी व वेल्दोडा घालून रटारटा शिजवून घ्यायच्या.

घरात मऊ, पिकलेले पेरु आहेत. ते गिळगिळित गोड पेरु बघुन खायची इच्छा होत नाहीये. किलोभर असतिल. कसे संपवू?
>>>> पेरुची भाजी करता येइल. पिकलेल्या पेरुची भाजी एकदम मस्त लागते.
इथे क्रुती नसेल तर मी टाकीन.

माझ्या एका मंगलोरमधील कलीगनी अननासाची भाजी आणली होती. ती कशी करतात कुणाला माहिती असेल तर लिहा इथे. छान लागली होती.

समप्रमाणात तांदूळ पिठ घालुन डोसे करता येतात नाचणी पिठाचे>>>> आयत्या वेळी करायचे की आधी भिजवून वगैरे ठेवायचे?

आठवडा बाजारात मिळाले म्हणून एक किलो माईनमुळे आणले... लोणचे करण्यासाठी कृती आणि काही टिप्स मिळतील का?

नाचणी पीठ तुपात भाजुन त्यात साखर कोको पावडर घालुन लाडु करायचे छान होतात. लहान मुले आवडीने खातात.

मी मुलाला सकाळी एक पेला दूध ( हळद + थोडस आल ) देते. नेहमी नेहमी तो देखील कंटाळतो.
मी ईथेच मागे वाचलेले ( दिनेशदांनी लिहलेले ) की दूधातून वेगवेगळी सरबते दिली तर चालतील.
द्यायची असल्यास कुठली द्यावी ? माझ्याकडे रोज सिरप आहे.
सकाळी जर दुधातून जर खजूर ( मिक्सरला ग्राईंट करून )दिले तर चालेल का ? नुसतेच खायला मागत नाही.

Pages