पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरी मिल्क मावा पावडर आहे. त्याचे काय करता येईल ? बर्फी किंवा अजुन काही ऑप्शन्स आहेत का? गुलाबजाम नकोत.

बस्के !
इकडे मलई बर्फी ची पाककृती आहे त्या मध्ये तू मिल्क मावा पावडर वापरू शकतेस.
मी हि बर्फी दीप ची मिल्क मावा पावडर वापरून केली होती. छान झाली होती. आणि सोपी पण आहे करायला.
http://www.maayboli.com/node/6425

ओह.. ती तर आहेच फेमस रेसीपी. पण कन्डेन्स्ड मिल्क नाहीये. तरी येईल का करता? तो थ्रेड वाचते परत.

मावा पावडर जराश्या दुधातच मळुन, कुकरमधे घट्ट झाकणाच्या डब्यात ठेउन १०-१२ मी ऊकडव. मस्त खवा तयार होतो. खव्याच्या पोळ्या कर छान.

काढ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.
सर्दीसाठी अळशी, कांदा, तूळशीची पाने, तर खोकल्यासाठी अढूळश्याची पिकलेली पाने, प्राजक्ताची पाने, आले वगैरे उकळतात.
तापाला पण आले आणि तूळशीचा काढा देतात. बाजारात हे बहुतेक काढे तयार उपलब्ध आहेत.

नमस्कार Happy

इथे सिंडरेला च्या भाकरी रेसिपी बद्दल कुणाकुणाच्या विपु Proud वाचल. कुणी लिंक देऊ शकेल काय प्लिज? Happy

इथे सिंडरेला च्या भाकरी रेसिपी बद्दल कुणाकुणाच्या विपु फिदीफिदी वाचल. कुणी लिंक देऊ शकेल काय प्लिज? स्मित<<<<<<<

लाजो ह्या तिनी दिलेल्या टिप्स. आणि ते तिनी युक्ती सांगा मधे लिहिलय

---------------------------------------------------------------------------------------------------------

आईने भाकरीसाठी दिलेल्या टिप्स इथे एक-दोघींना उपयोगी पडल्या म्हणून इथे देते आहे:
प्लॅन A : ज्वारी अथवा बाजरीचं पीठ कोमट पाण्यात भिजवायचं. एका भाकरीचा गोळा घेऊन त्याला पाण्याचा हात लावत भरपूर मळायचं (माकाचुच्या भितीने मी अगदी मनगटाला रग लागेतो मळते डोळा मारा). मग ताटात कोरडं पीठ घ्यायचं आणि पीठाच्याच हाताने हलके हलके गोल फिरवत भाकरी थापायची. भाकरी थापताना भेगा पडल्या तर पीठ नीट मळलं गेलं नाही असं समजायचं. अजिबात गोल फिरत नसेल आणि हाताला चिकटत असेल तर पीठ सैल आहे. मग त्यात अजून थोडं कोरडं पीठ घालुन मळुन घ्यावं लागेल. भाकरी थापुन झाली की उचटण्याने/पिझा सर्वरने कडा हलके उचलत हातावर घ्यायची. ज्या बाजूस पीठ जास्त ती बाजू वर येइल अशा बेताने भाकरी तव्यावर टाकणे (ह्याला शॉर्टकट म्हणजे सरळ ताट उलटं करुन भाकरी हातावर घ्यायची. ताटातलं पीठ सांडुन रहाडा होतो. पण आधीच एक कागद खाली पसरुन ठेवायचा). वरुन पाण्याचा हात फिरवायचा. एक बाजू चांगली भाजली गेली की आच वाढवून दुसरी बाजू भाजायची. इलेक्ट्रिक स्टोव्ह असेल तर दुसरी बाजू भाजताना तवा काढून पापड भाजायची जाळी ठेवायची. तवा चांगला तापला असेल तर नुसत्या तव्यावर भाजून सुद्धा छान फुलते भाकरी. अगदीच नाही तर पापुद्रा तर येतोच.

प्लॅन B : भाकरी अजिबात थापली जात नाहीये असं वाटलं की पीठ चांगलं मळुन थालिपीठासारखं तव्यावर थोडं तेल लावुन थापायची आणि एक बाजु झाकण घालुन तर एक बाजु तशीच भाजुन घ्यायची.
______________________________________________________________________

सिंडरेला, मी करुन पाहीली तु दिलेल्या पद्धतीनी. पण भाकरी भाजल्यवर ज्या बाजुने पाणी लावतो, ती बाजु पाहील्यावर दुष्काळ ग्रस्त जमीनीची आठवण झाली. मा.का. चु,? हा प्रश्न मा. का.चु. मधेही टाकते आहे. पण ईथेच वरील चर्चा सुरु असल्यामुळे ईथेही घालते आहे.

पीठ मळलं गेलं नसेल नीट. पीठ जुनं असेल. ह्यातलं काहीतरी. मला नका विचारु यार, मी आईने सांगितलं तशी भाकरी करते. सुदैवाने बिघडली नाही कधी. (झीने बहुतेक गूळपोळी वाचली नाही :फिदी:)

स्प्रिन्ग रोल जर सारण भरून तयार करून न तळता फ्रीझर मधे ठेवले आणि आयत्या वेळी तळले तर चालतील /टिकतील का? ते फ्रीझर मधे साठवून ठेवताना ची काही विषेश युक्ती आहे का?म्हणजे हवाबन्द डबा/फॉईल/झिप लॉक ई.

नमस्कार माबोकरी लोकहो!

मदत हवी आहे! Happy

एका लेखात मी "खांतोळी" नावाच्या पदार्थाबद्दल उल्लेख केला आणि ओळखीच्या काही माबोकर्‍यांनी "कृयोजाटा"(पाककृती योग्य जागी टाका....) चा गजर केला. एखाद्या सडाफटिंग माणसाला हे जमण्याचा काहीही संबंध नाही हे जाणुन ते लोक फुल्ल मस्करी करतायत.. (ते असुदे, ) आता ही कृती घरी फोन करुन विचारणं वगैरे शक्य आहे, पण इथे इतका चांगला बा.फ. असताना ते कशाला? म्हणुन म्हटलं आवाहन करुन बघुया....

(पण एकंदर फारच कमी लोकांना माहिती दिसतोय हा... )
......तर आहे का कोण विडा उचलायला तयार? Happy
......मदत.... Happy

आ. न.
ऋयाम:)

रच्याकः - माझ्या मते, "शिर्‍याची वडी" असंही म्हणता येईल खांतोळीला..
सर्व(ह सायलेंट) करताना त्यावर खोबरं 'भुरभुरवतात....' Happy मदत!!!

'शिर्‍याची वडी'??? म्हणजे तुला खांडवी म्हणायचय का ऋयाम? खांडवीची रेसिपी असेल इथे कुठेतरी, नाहीतर जुन्या माबो वर मिळेल.

खांटोळ्या = सांजा करुन त्याच्या वड्या करणे + त्यावर सुके खोबरे कीस करुन टाकणे..

मानलं तुम्ह तिघांना Happy लग्गेच उत्तर!! धन्यवाद~~

'खांडवी' पण म्हणतात होय त्याला?
आमच्या इथे (कोल्हापूरला) 'खांतोळी'!

(आता लायकी काढणार ते मित्र.... :अओ:) चालायचंच.... Happy

आभारी आहे.
- ऋयाम.

हाय,

यंदाच्या देशवारीत कॅफे कॉफी डे मधे 'श्रिखंड टार्ट' खल्ला. छान होता.

कुणाला माहित आहे का कसा करायचा?

खांडवी नावाने जे दिलेय त्यालाच आमच्याकडे खांटोळी म्हणतात. खुप रुचकर लागते खांटोळी (बरेच दिवसांत खाल्ली नाही, आता करुन खायलाच हवी)

बाजरीच्या पिठात, गाजराचा किस व तीळ, किंवा पालक व आले, किंवा लाल भोपळा व मिरची, असे घालून तिखट घारगे करता येतात. भिजवताना थोडे दही घालायचे. कृति असणार इथे.

मला मक्याच्या पिठाच्या पण काही रेसेपी असतिल सांगा. मकई की रोटी अन साग साठी पिठ आणलं होतं. साग-रोटी, नुसत्या मेथी घातलेल्या रोट्या वैगरे करुन झालंयं बर्‍याचदा. आता सिझन पण संपत आला मकई की रोटीचा. अजुन २ किलो पिठ आहे.
राजस्थानी लोक त्याच्या ढोकल्या का काही तरी करतात असं ऐकलयं, पण चव, पद्धत काहीच माहिती नाहीये.
काहीच नाही सुचलं, तर धपाटे, ठेपले, थालिपिठ करताना थोडे थोडे वापरेन.

अगं आपण करतो तश्याच, आपण पांढरे तीळ घालतो पिठात, ते लोक बडीशेप भाजून घालतात. माझ्या मते बाकी पाकृ तशीच.

Pages