पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुचिरा मध्ये पण एक वाटी आहे. पण त्यात स्टील च्या गाळणीला आतून मैद्याच्या पट्ट्या लावायला सांगितले आहे.

मी टोमॅटो ग्रेव्हीमधली सोपी पनीर माखनवालाची रेसिपी परवा पाहिली होती ती आता सर्च मधे जाऊनही मिळत नाहीये. (सर्च मधे एक जुनी रेसिपी मिळाली याच नावाची जी मला नको आहे). कुठे मिळेल सांगता येईल कां अर्जन्ट?

ओह अगं मी ते पनीर माखनवाला असं पूर्ण सर्च देऊन शोधत होते. पनीर माखनी नावाने आहे. थॅन्क्स गं. संध्याकाळी मारे करायचा प्लॅन केला होता आणि मिळेचना त्यामुळे पॅनिक झाले आता दुसर्‍या भाज्या जाऊन आणाव्या लागतात की काय म्हणून Proud

नाही वातड नाही झाले. काठी कबाब बघते.
दिनेश एक शंका, चपाती रोल करता येते तसे कुलचे रोल करता येतिल का काठी कबाबासाठी?
मी चक्क कुलचे वापरुन छोटे छोटे पिझ्झा करावेत की काय असा विचार करत होते. Happy

हो तसे रोल करता येतील, पण ते कितपत कडक आणि लवचिक आहेत ते बघून, (नाहितर कुर्‍हाडीने तोडावे लागतील !!! )
पिझ्झा करण्यापूर्वी पण एक करुन तो कितपत कुरकुरीत होतोत, ते बघूनच ....

नंदीनी, आजपर्यंत माईनमूळ्याचे लोणचे आयतेच खाल्ले. ते साफ करण्यासाठी नक्कीच काहीतरी प्रोसेस आहे, कारण ते कडू असतात. कुणी गुजराथी बाई ओळखीची असेल तर तिला, गरमरनु अथाणू कसे करायचे ते विचारता येईल. छुंद्यासाठी कैर्‍याना हळद मिठ लावून, जे पाणी निथळून घेतात त्यातही, माईनमूळे (आणि ओली मिरी, ओली बडीशेप, आंबे हळद व आले घालून मूरवतात. )

दिनेशदा. आईच्या एका मैत्रीणीला विचारून मागच्या आठवड्यात घातले पण लोणचे... अप्रतिम लागतय..
माईनमुळे तासून तासून स्वच्छ करावे लागतात. तीन चार तास त्यातच गेले. नंतर फिंगर चिप्स सारखे तुकडे केले.

नंतर कैरीच्या लोणच्यासारखेच लोणचे घातले. Happy

कोणाला छोट्या कचोरी कशी बनवतात ते माहित आहे का ? शिवाय मला फरसाण पण बनवायची क्रुती पाहिजे आहे.

हसरी, मिल्कशेक बनवताना दुध + आईस्क्रिम (ऑप्शनल) + फ्लेवर्ड सिरप + साखर (ऑप्शनल) + ब्लेंड करायच. हव असेल तर बर्फ घालायचा. मला कॅरॅमल, व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर्स आवदतात. दुकानत चॉकलेट, बनाना, मिक्स्ड फ्रुट असेही फ्लेवर्स मिळतात. केशर सिरप घालुनही छान होतो मिल्कशेक.

याच बीबीवर की इतर कुठे नक्की आठ्वत नाही पण दिनेशदांनी भुक वाढीसाठी साठी एक पेय सांगितले होते, आल्याचे काही तरी होते, वयस्कर लोकांसाठीचे, डायबिटीस व इतर आजाराने त्रस्त असलेल्यांना काहींना भुक लागत नाही असाच काहीसा कोणीतरी प्रश्न विचारला होता त्यावर दिनेशदांनी ते पेय/औषध सांगितले होते. ते घरी पण करता येते नी विकतही मिळते अस म्हटल होत. दिनेशदा सांगाल का पुन्हा किंवा कोणी ती योग्य लिंक देइल का?
माझ्या साबांना डायबिटीसचा खुप त्रास आहे नी बरेच दिवस झाले त्यांची भुक फारच कमी झालीय, अन्न काहीच खात नाहीत नुसत्या पेयावर असतात - दुध, ज्युस, पेज यावरच. सगळ्या टेस्ट झाल्यात, सगळ काही नॉर्मल आहे, फक्त खाण नसल्यामुळे त्यांची शुगर अपडाऊन होत राहाते, वीकनेस खुपच प्रंमाणात आहे, जाग्यावरच असतात पडुन, चालण फिरणही जवळजवळ बंदच झाले आहे. सगळे भुकवाढीची सगळी टॉनिक्स देऊन झाली काहीच फरक नाही.
ही पोस्ट चुकीच्या ठीकाणी विचारली गेली असल्यास क्षमस्व......

शिल्पा,
एक कप आल्याचा पाणी न घालता काढलेला रस + तेवढाच लिंबाचा रस त्यात चवीपुरते सैंधव आणि पादेलोण (हे दोन्ही वाण्याकडे मिळतात ) असे ते पाचक असते. पाणी घातले नसेल तर सहज टिकते. बाजारातही तयार मिळते. हे एखादा चहाचा चमचा प्यायचे (मीठाबाबत सल्ला घ्यावा, चालत नसेल तर कमी घालावे वा घालू नये )
माधुमेहिनी डॉक्टरांक्दून, एकदा दिवसाचा आहार लिहून घ्यावा. त्यानुसार आहार घेत रहावा. एखादा पदार्थ जास्त घेतला तर दुसरा कमी करावा. व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. सकाळचे (बूट घालून ) फिरणे, योग्य होईल. एकाचवेळी भूक लागत नसेल, तर दोन दोन तासानी, थोडे थोडे खात रहावे.

बाजारात त्याना चालेल असा बराच खाऊ उपलब्ध आहे (चिवडा, चिप्स, लाह्या, बिस्किटे वगैरे पण तथाकथित शुगरलेस मिठाई मात्र नको ) तो घरी आणला, तर येता जाता खाल्ला जातो.

धन्यवाद दिनेशदा, नक्की करुन बघेन मी. तुम्ही सांगितलेले सगळे पदार्थ देऊन पाहीले पण त्या काहीच खायला बघत नाहीत. डॉ. ने ही सगळ खायला सांगितले आहे (गोड सोडुन). खायची इच्छाच होत नाहीत म्हणतात. म्हणुन आता हा एक उपाय करुन पाहीन.

अ‍ॅडमिन, हा बीबी साफ करण्याची प्रचंड गरज आहे. मला नाही वाटत कोणीही ७८ पाने मागे जाऊन कृती शोधेल. आणि त्यामुळे 'इथे पूर्वी लिहीलं होतं...' या प्रकारचे मेसेज आणि त्यावरची, बर्‍याच वेळा पुन्हा तीच कृती देणारी उत्तरे वाढताहेत.

शोध व्यवस्था कितीही चांगली असली तरी ती वापरायची कशी हे बर्‍याच वेळा माहिती नसते किंवा कृतींच्या नावामुळे फरक पडू शकतो. उदा. इथेच वर आहे की 'पनीर माखनवाला' शोधले पण मिळाले नाही कारण ती कृती 'पनीर माखनी' आहे.

कृपया बघाल का ?

हसरी, स्ट्रॉबेरी/ब्लुबेरी+केळ्+दुध, वाटल्यास साखर, हे मस्त काँबो आहे. नुसतच रोज सिरप घालुन पण मस्त लागतं. हे मिक्सरमधुन फिरवताना, पाहिजे असल्यास बर्फ घालायचा.

मला पण असेच वाटतेय. सर्च नीट वापरले जात नाही. किंवा तश्या सूचना नाहीत या पानावर. कि वर्ड्स चा वापर पण बहुदा केला जात नाही.

सर्च कसे वापरायचे तेच माहित नाही. मी 'आंब्याचा केक' म्हणुन शोधले पण शीर्षक 'आंब्याचा केक' असे असुनही तो केक सापडला नाही. शेवटी पाकृ ची सगळी पाने उलटत बसले Sad

indexing चं वेगळं पान करता येईल का? वेगळा tab त्यासाठी ठेवून ? कधी कधी "search" बरोबरच "browse" करण्याची पण गरज असते. जुन्या मायबोली वरील "folders structure" मी पाकक्रूतीं (??) साठी खुप मिस करते.
Drupal चे एक रेसिपी module पण आहे. मला ते बरे वाटत आहे. ते integrate करता येईल का ?
http://drupal.org/project/recipe

मधुरा,

'अवलोकन' शेजारी 'विषयवार यादी' म्हणून एक टॅब आहे बघ. त्यावर क्लीक केलेस तर जुन्या मायबोलीप्रमाणे पाककृतींची विषयवार यादी व folders आढळतील.

मधुरा,
वर अंजली यांनी लिहल्याप्रमाणे ही सुविधा आधिच आहे. तुम्हाला टॅब सापडली नसेल तर या ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊन पहा. http://www.maayboli.com/node/2548

याच ग्रूपमधे नाही तर सगळ्याच ग्रूपमधे अशी विषयवार यादी उपलब्ध आहे.

गॅटोरेड काय असते? लहान मुलाना दिले तर चालते का? मी आज एक ऑरेन्ज गॅटोरेड ची बाट्ली आणली आहे. टॅन्ग सारखेच आहे का? का मिरिन्डा सारखे? सील उघड्ले नाही अजून.

मुगाच्या डाळीच्या कचोर्‍या करताना मूग डाळ शिजवायची कशी?किती पाणी घालून कारण सारण कोरडे हवे ना,मला साठवणीसाठी करायच्या आहेत १०-१५ दिवस टिकतात का?

Pages