सखुबत्ता (फोटोसकट)

Submitted by अल्पना on 15 April, 2011 - 01:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६ मध्यम आकाराच्या घट्ट कैर्‍या (लोणच्याच्या कैर्‍या), अर्धी वाटी तिळाचं कुट, अर्धी वाटी लोनचे मसाला, अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ, मीठ,फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहर्‍या, हिंग

क्रमवार पाककृती: 

कैर्‍यांची सालं काढून पातळ काचर्‍या कराव्यात. सोलाण्याने काचर्‍या केल्या तरी चालेल. तीळ भाजून त्याचे अर्धी वाटी कुट घ्यावे. कुटाइअतकाच कैरी लोणचे मसाला (बेडेकर, प्रविण किंवा इतर आपल्या आवडीप्रमाणे) घ्यावा. अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ किसून घ्यावा. गुळाचं प्रमाण अंदाजेचं चवीप्रमाणे ठरवा. कैर्‍यांच्या काचर्‍या, तिळाचं कुट, लोणचे मसाला, मीठ आणि गुळ एकत्र करावं. त्यात हिंग- मोहरीची फोडणी थंड करून घालावी.

DSC00077.jpg

वाढणी/प्रमाण: 
तुम्ही लोणच्याप्रमाणे खाता कि भाजीप्रमाणे यावर अवलंबून.
अधिक टिपा: 

या दिवसात केला तर सखुबत्ता जास्त नाही टिकणार पण लोणच्याचा सिझनमध्ये (मे-जुनमध्ये) केलेला सखुबत्ता ६-७ महिने टिकू शकतो. कदाचित त्यापेक्षा जास्त पण टिकेल पण तेवढा उरतच नाही. जास्त टिकण्याच्या दृष्टीने करायचा असल्यास तिळाच्या कुटाचं प्रमाण जरा कमी करावं लागेल.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी मधे २ चमचे तेल लिहिलयं , मी तेवढचं घेतलं पण फोटो सारखं तेल दिसत नाहीये लोणच्यात , चमचा मोठा घ्यायचा का Wink

मंजूताई >> तिकडची म्हणजे नेमकी कुठली?
टाकते पाकॄ ..

प्रचिती कदम >> सेम पिंच Lol

अल्पना इतक्या छान पाकॄ साठी धन्यवाद.. घरी सर्वांना खुप आवडला हा प्रकार. Happy

आज मी पण बनविला पण तुमच्यासारख्या पातळ नाही झाला. बरं फ्रिजबाहेरच ठेवायचा ना? तेल कमी असल्यामुळे बाहेर टिकेल ना? एकतर परातभर केलाय, खराब झाला तर जीवाला लागेल Happy

Pages