पुनश्च पुस्तके

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काय दुसरे विषय नाहीत का?
आहेत की, भरपूर आहेत. पण मला सातत्याने लिहावसं वाटतं पुस्तकांबद्दल. वाचलेल्या, आवडलेल्या पुस्तकांबद्दल लिहायची हौस तर आहेच पण न आवडलेल्या, वाचायची राहून गेलेल्या पुस्तकांबद्दल सुद्धा लिहायचं असतं.

तर आज काही (अजून )न वाचलेल्या पुस्तकांविषयी -
उन्हाळ्यात दर आठवड्याला अन एरवी दर तीन आठवड्यांनी दोन स्थानिक वाचनालयात आलटून पालटून जातो आम्ही. कधी कधी मग इकडची पुस्तके तिकडे परत केली जातात. कधी कधी एकीकडली पुस्तके लवकर परत केली जातात अन दुसरीकडे भरमसाठ दंड भरावा लागतो. प्रामुख्याने मुलांची पुस्तकं आणली अन वाचली जातात. तिथे बसून पुस्तकं वाचून दाखवावी लागतातच.

एका वाचनालयात संध्याकाळी 'स्टोरी अवर' असतो. तात्कालिक एखादा विषय घेऊन त्यावरची दोन -तीन पुस्तकं शाळकरी मुलं छोट्यांना वाचून दाखवतात. एखाद -दोन गाणी असतात. कधी कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाद्वारे गोष्टी सांगतात. हे वाचनालय थोडे दूर आहे, पण मोठे आहे अन तिथे संध्याकाळी स्टोरी अवर असतो त्यामुळे तिथे जाणं होतं.

घराजवळचे जरा लहान आहे पण जवळ आहे म्हणून तिथे जात असतो. तिथली मुलांच्या विभागातली संध्याकाळची ग्रंथपालिका आता चांगली परिचयाची आहे. पुस्तकं देता घेताना त्याविषयी बोलणं होतं. मुलांना कधी स्टिकर, कधी पुस्तकात खूण ठेवायची कार्डं, कधी रंगवायला कागद असं काही बाही देत असते ती.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तिने लेकीला विचारलं 'Are you ready for kindergarten ?' ले़कीने लगेच तिला शाळेबद्दल, बसने जाण्या-येण्याबद्दल, शाळेच्या गणवेषाबद्दल, धाकटा अजूनही डेकेअरमधेच जात असल्याबद्दल सगळं काही सांगितलं. मग तिने मला एक यादी दिली - म्हणाली "बघ यातली तुझी काही राहिली आहेत का? ही एवढी पुस्तकं वाचलेली, माहितीची असली तर तुझ्या लेकीला काही त्रास होणार नाही किंडरगार्टनमधे. "

मी अगदी तोर्‍यात ती १०० पुस्तकांची यादी घेतली अन घरी आले. ' हॅ,१०० काय तिला आतापर्यंत त्यापेक्षा कितीतरी जास्त पुस्तकं वाचून दाखवली असतील मी. घरीच १०० च्या वर पुस्तकं असतील मुलांची !' असं मनाशी घोकत होते.

बरं झालं तिच्या पुढ्यात ती लिस्ट मी वाचली नाही. असा पचका झाला असता ना! त्या १०० पैकी जेमतेम एक चतुर्थांश पुस्तकं आम्ही वाचलेली निघाली. मग आता अगदी कटाक्षाने दरवेळी त्या यादीतली दोन-तीन पुस्तकं आणतोय अन हळूहळू ती पूर्ण करतोय.

मधे एकदा त्या मोठ्या लायब्ररीत गेले तेंव्हा तिथल्या ग्रंथपालिकेने माझ्या हातातली यादी पाहून ती मागून घेतली. मग टेबलाच्या खणातून एक यादी काढून ती अन माझी दोन्ही याद्या बाजू बाजूला धरून वाचून पाहिल्या. मला म्हणाली 'This is excellent list, much better and more comprehensive than ours. Do you mind if I make a copy.' म्हटलं माझी काय हरकत असणार? ही अमक्या लायब्ररी मधल्या डॉटीची आहे, तिला विचारा. हिने लगेच फोन लावला. डॉटीने 'हो' तर म्हटलंच पण यादी इमेल करायचं आश्वासन पण दिलं. तरी या ग्रंथपालिकेने माझ्या यादीची एक प्रत काढून ठेवली.

आता परत गेले तर 'डॉटीस चॉइस' म्हणून ती यादी पण तिथे लावलेली असते.

तर ही ती यादी - ( एकदम १०० पुस्तकांची नावं लिहायला जमणार नाही-जमेल तशी टाकते )
(ठळक टाइपातली पुस्तकं फक्त वाचली होती सुरूवातीला )
Babies
१ Ten, Nine Eight - Molly Bang
Goodnight Moon - Margaret Wise Brown
३ The Very Hungry Caterpillar - Eric Carle
४ Freight Train - Donald Crews

५ Lunch - Denise Fleming
६ Where's Spot - Eric W Hill
Brown Bear, Brown Bear - Eric Carle
८ Chicka Chicka Boom Boom - Bill Martin Jr, John Archambault

९ Who's counting- Nancy Tafuri
१० How Do I Put It On - Shiego Watanabe.

Toddlers
११ On the Day I Was Born -Debbi Chocolate
१२ Good Dog, Carl - Aelxandra Day
१३ Feathers For Lunch -Lois Ehlert
१४ Go Away, Big Green Monster - Ed Emberly
१५ Ask Mr Bear - Marjori Flack
१६ Is Your Mama a Llama - Deborah Guarino
१७ Hush! : A Thai Lullaby - Minfog Ho
१८ Rosie's Walk - Pat Hutchins
१९ Harold and the Purple Crayon -Crocket Johnson
२० Jump, Frog, Jump! - Robert Kalan
२१ The Teddy Bear's Picnic - Jimmy Kennedy
२२ Whose Mouse Are You - Robert Kraus
२३ The Carrot Seeद - Ruth Krauss
२४ Over In The Meadow - John Langstaff
२५ Dim Sum for Every One! - Grace Lin
२६ Little Blue and Little Yellow - Leo Lionni ( स्विम्मी चे लेखक )
२७ Guess How Much I Love You - Sam McBratney
२८ Whose Hat? - Margaret Miller
२९ Shades of Black - Sandra Pickney
३० The Little Engine That Could - Piper Watty
३१ Good Night Gorila - Peggy Rathman
३२
वाचून वाचून खिळखिळं झालंय हे पुस्तक
३३ We're going On a Bear Hunt - Michael Rosen
३४ Cars and Trucks and Things That Go - Richard OsScarry
३५ Lizard's Story - George Shanan
३६ It looked Like Spilt Milk - Charles Shaw
३७ Farmer Duck - Martin Waddell
३८ Mouse Paint - Ellen Walsh
३९ "Hi, Pizzaa Man!", Virginnia Walter
४० Noisy Nora, Rosemary Wells
४१ The Lady with the Alligator Purse - Nadine Wescott
४२ Buzz- Janet Wong
४३ The Napping House - Audrey Wood.

PreSchool
४४ Happy Birthday, Moon - Frank Asch
४५ Animals Should Definitely Not Wear Clothing - Judi Barrett
४६ Madeline - Ludwig Bemelmans
४७ The Mitten - Jan Brett
४८ Stone Soup -Marcia Brown
४९ The Story Of Babar, the Little Elephant - Jean de Brunoff
५० Mr. Grumpy's Outing - John Burlingham
५१ Mike Milligan and His Steam Shovel - Virginia Lee Burton
५२ Mama Zooms -Jane Cowen-Fletcher
५३ The Empty Pot - Demi
५४ Pancakes For Breakfast - Tomie DePaola
५५ Abuela - Arthur Dorros
५६ Are You My Mother - P D Eastman
५७ Corduroy - Don Freeman
५८ Millions of Cat- Wanda Gag
५९ The Three Billy Goats Gruff - Paul Galdone
६० The Girl Who Loved Wild Horses - Paul Goble
६१ All the Colors of the Earth - Sheila Hamanaka
६२ Lilly's Purple Plastic Purse - Kevin Henkes
६३ Bread and Jam For Frances - Russess Hoban
६४ Amazing Grace - Mary Hoffman
६५ Angelina Ballerina - Katherinए Holabird
६६ The Wolf's Chicken Stew - Keiko Kasza
६७ The Snowy Day - Ezra Jack Keats
६८ The Caterpillar and the Polliwog - Eric Kimmel
६९ I Took My Frog To The Library - Eric Kimmel
७० Tacky The Penguin - Helen Lester
७१ I Love You Like Crazy Cakes - Rose Lewis
७२ On Market Street - Anita Lobel
७३ Frog and Toad Are Friends - Arnold Lobel
७४ Frog Goes To Dinner - Mercer Mayer
७५ Make Way for Ducklings- Robert McCloskey
७६ Raven - Gerald McDermott
७७ Goin' Someplace Special- Pat McKissack
७८ Pigs Aplenty, Pigs Galore! David McPhail
७९ Martha Speaks - Susan Meddaugh
८० The Day Jimmy's Boa Ate The Wash -Trinka Noble
८१ If You Give A Mouse A Cookie - Laura Numeroff
८२ The Ant and The Elephant - Bill Peet
८३ The Tale of Peter Rabbit - Beatrix Potter
८४ Martin's Big Words : The Life of Martin Luther King Jr - Doreen
८५ Rappaort
८६ Curious George -H A Rey
८७ The Relatives Came- Cynthia Rylant
८८ Grandfather's Journey - Allen Say
८९ Where the Wild Thing Are - Maurice Sendak
९० The Cat In The Hat - Dr Seusss

९१ Caps for Sale - Esphyr Siobodkina
९२ Imogene's Antlers - David Small
९३ Snapshots from the Wedding - Gary Soto
९४ Sylvester and the Magic Pebble- william Steig
९५ There Was An Old Lady Who Swallowed A Fly
९६ Alexander and The Terrible, Horrible, No Good Very Bad Day - Judit Viorst

९७ Lyly, Lyle Crocodile - Beranard Waber
९८ Seven Blind Mice - Ed Young
९९ Harry, the Dirty Dog - Gene Zion

विषय: 
प्रकार: 

शोनू, काही हरकत नाही. इथे पुस्तकप्रेमी खूप आहेत. तू दिलेली यादी वाचली. ही पुस्तकं गोष्टींची असतील ना.. मग एक सांग आपल्याकडे रामायण, महाभारत, पंचतत्र, बिरबल, चाणक्य ह्यांचा देखील सुरस..बोध घ्यायला हवा अशा कथा आहेत. त्यांची पुस्तकं असतील, ती तू कधी तुझ्या मुलांना वाचून दाखवलीस का?

is Your Mama a Llamaa ह्यातल्या Llamaa चे स्पेलिंग Llama असे पाहिजे.

(आता Llama म्हटले की प्रसिद्ध जगबुडीच आठवते Wink )

--------------
The old man was dreaming of lions

बी
ही सगळी पाच वर्षाच्या आतल्या मुलांसाठीची पुस्तकं आहेत - गोष्टींचीच असणार ना ?

मी भारतातून थोडी फार लहान मुलांची पुस्तकं आणली आहेत. पण त्यातली कुठलीही पाच वर्षाच्या आतल्या मुलांना या वरच्या पुस्तकांइतकी आवडत नाहीत. माझ्या मुलांच्या जन्माआधीदेखील मी माझ्या ओळखीच्या बर्‍याच मुलांना पंचतंत्र, रामायण , महाभारत अशी पुस्तकं आणून दिली आहेत भारतातनं. पण इथल्यासारखी चित्रं, बांधणी, छपाई काहीच नसल्याने ती पुस्तकं इथल्या मुलांना फारशी भावत नाहीत.

अजून तरी माझ्या मुलांना मी जितक्या वेळा काही महाभारतातल्या, रामायणातल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला तितक्या वेळा प्रकरण अंगाशी आलंय.

दशरथ राजा होता तर तो का हंटिंग करत होता? ( त्यांना डिक चेनी ची गोष्ट माहित नाही !) श्रावण बाळाने चांगलं बुलेट प्रूफ टाइप किवा फ्लुरोसंट जॅकेट का घातलं नव्हतं? अर्जुनाने आपल्या कझिन्स ना का मारलं ? यशोदेने कॄष्णाला टाइम आउट न देता उखळाला का बांधलं ? होयसळा राजाने वाघाला का मारलं - वाघ एन्डेंजर्ड स्पीशीज मधे येतो ना? पार्वती बाळाला एकटाच खेळत ठेवून आंघोळीला का गेली ? कोणाचं तरी बेबी म्हणून शंकराने त्याला का मारलं - असा कसा तो देव? अशा प्रश्नांची उत्तरं देता देता जीव मेटाकुटीला येतो बाबा.

शोनू, लिस्ट चांगली आहे. माझ्या मुलाकरता नक्कीच उपयोगी पडेल. त्यातील काही काही पुस्तकं माझ्याकडे आहेतही. माझ्या मुलाचा प्रॉब्लेम हा आहे की ज्या पुस्तकात कार असतात तीच पुस्तकं तो आवडीने हातात घरतो. नाहीतर त्याला गुंतवून ठेवणं महाकठीण जातं मला.
माझ्या लेकीलाही वाचायची खूप आवड आहे. सतत कोणत्या ना कोणत्या चॅप्टर बुकची डिमांड असते. वर बी ने म्हटलेल्यातली पुस्तकं माझ्याकडे आहेत थोड्या फार प्रमाणात. जातक कथा वगैरे. पण ती जेवढी इथल्या पुस्तकांत रमते तेवढी त्यात नाही. समहाऊ, ह्या पुस्तकांशी तिला जास्त कनेक्ट होता येतं.

असा कसा तो देव? अशा प्रश्नांची उत्तरं देता देता जीव मेटाकुटीला येतो बाबा. >> एकदम बरोबर !!! मला वाटते कि भारतीय पुस्तके अजून थोडे मोठे झाल्यावर देण्याच्या योग्यतेची आहेत.

पण इथल्यासारखी चित्रं, बांधणी, छपाई काहीच नसल्याने ती पुस्तकं इथल्या मुलांना फारशी भावत नाहीत. >> अशा प्रकारची देशी पुस्तके पण मिळतात (माझ्याकडे आहेत) पण परत तोच प्रश्न असतो.

पण इथल्यासारखी चित्रं, बांधणी, छपाई काहीच नसल्याने ती पुस्तकं इथल्या मुलांना फारशी भावत नाहीत. >>
अपवाद. गायत्री मंदीरांची वा चिन्मय मिशनची अनेक पुस्तके कार्टून रुपी आहेत. त्यात कृष्ण, गणेश, राम, महाभारत ई कथा व्यवस्तिथ कार्टून रुपाने रंगवुन सांगीतल्या आहेत व परत ती वयानुसार सुध्दा आहेत. तिथे ऐकदा चक्कर मारुन बघ. माझ्याक्डे बरीच आहेत व माझी मुलगी तिच्या शाळेतल्या मित्रांनापण वाचायला देते. (ती पहिलीत आहे.) आणि त्यांची छपाई वैगरे येथील पुस्तकांसारखी आहे.
तिला दोन्ही कडची पुस्तके तेवढीच आवडतात. त्याचे कारण कदाचित फांईन्डीग निमो, लॉयन किंग, ई ई जेवढ्यावेळेस पाहिले तेवढ्याच वेळेस ते रामायन (कार्टुन रुपी, जपान मध्ये केलेली डिव्हीडी) व अनेक मराठी सिड्या जसे महाभारतातील गोष्टी, शिवाजीच्या गोष्टी ई पाहील्या, त्यामूळे ती मारामारी रिलेट करायला अगदी सोपी पडत असावी.
जातक कथा अगदी लहान वयात (०-४) थोड्या अवघड पडु शकतात, त्यामूळे चिन्मय मिशन मध्ये ऐक चक्कर मारून बघा.

केदार
धन्यवाद. आता परत गेले की बघेन चिन्मय मिशन मधे .

शोनू
ती एवढी मोठी यादी टायपत बसण्यापेक्षा तुझ्या लायब्ररीयन कडुन इमेल ने मागव आणि मग कॉपी करुन इथे टाक.
लहान मुलांच्या पुस्तकाबाबतीत मी एवढच बोलु शकते Proud

.

अगदी बरोबर केदार. मी रामकृष्ण मिशन मधे योग शिकवायला जातो आणि तिथे नेहमी चिन्मय मिशनची बालपुस्तकं विक्रिला असतात. ती खूप चित्रमय तर असतातच शिवाय त्यांची अनेक विषयांवरची पुस्तकं आहेत. मलाही ती पुस्तकं वाचायला आवडलीत यातच काय ते ओळखून घ्या.

शोनू, लहान मुलांची पुस्तकं फक्त गोष्टींचीच नसतात म्हणून तसं विचारलं होतं. परवा मी एका २ र्‍या वर्गातील मुलीकडे वेणींवरती पुस्तक पाहिलं. अनेक देशात मुलींच्या वेणींचे अनेक प्रकार असतात. पुस्तकं खूप जाडजुड तर आहेच शिवाय वेणी कशी घालायची तेही खूप चित्रमय सांगितलं आहे. मला ते पुस्तकं आवडलं. ती मुलगी दरवेळी मंडळात दिसते आणि तिची दरवेळी एक वेगळी वेणी असते. फ्रेन्च वेण्या किती सुंदर असतात ना.. चिनी वेण्याही छान असतात पण चिनी वेण्या पाडायला तसे चिनी केस पण हवे असतात Happy

>>>चिनी वेण्या पाडायला
बापरे, हा शब्दप्रयोग पहिल्यांदाच ऐकला मी. घालायला म्हण ना बी.
किमोनो वरची हेअरस्टाईलही खूप छान असते.

सायो, लहान केसांची तिपेडी वेणी पडत नाही असेच तू म्हणशील ना.. म्हणून मी वेण्या पाडायला शब्दप्रयोग वापरला Happy

मलाही ती पुस्तकं वाचायला आवडलीत यातच काय ते ओळखून घ्या.
>>>>

हे अपेक्षितच होतं बी!! (मोठा Light 1 )
--------------
The old man was dreaming of lions

टण्या, आपलं बालपण टिकवून ठेवणं प्रत्येकाला नाही जमत Happy

मलासुद्धा या वरच्या यादीमधली पुस्तकं वाचायला आवडतात हं. गूड नाइट मून मधे जितकी गोष्ट शब्दात आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त चित्रात आहे. खूप मजा येते ते वाचायला.

ते वेण्यांवरचं पुस्तक कुठलं रे ? मला हवंय स्वतःकरता- लेकीला फ्रेंच braid हव्या असतात अन मला फक्त फ्रेंच bread माहिती Proud

मी लहान असताना वाचलेल्या पुस्तकांपैकी भारत-भारतीची आख्खी सिरीज मला खूप प्रभावित करुन गेली. जवळपास शंभर पुस्तकं होती त्यात. राजा शिवाजी, राजा छत्रसाल, लचित बडफूकन ते गांधीजी, टिळक, सावरकर, विवेकानंद इ.इ. अनेक लोकांवर ही पुस्तके होती. साधारण ४०-५० पाने (छोटा आकाराची), पहिली ते चौथी मधली मुले एका बैठकीत वाचून काढतील अशी ती पुस्तके होती.
तसेच इ.३ रीचे इतिहासाचे पुस्तकः थोरांची ओळख

किंवा दुसरं काहीतरी फ्रेंच माहित असेलच तुला Wink
नाही बी, मी म्हणेन की लहान केसांची तिपेडी वेणी घालता येत नाही.

शोनू,
पुस्तकांच्या लीस्ट बद्दल धन्यवाद.
ह्यातली जेमतेम १० - १२ पुस्तके मुलीला वाचुन दाखवली आहेत आता पर्यंत. ती सुद्धा पुस्तकवेडी आहे आता पासुन. आता एक-एक करुन सगळी लायब्ररी मधुन आणली जातील.
- राहुल

रामायण, महाभारत, पंचतंत्र, शेखचिल्ली वगैरे पुस्तकं हवी असल्यास मला कळवा. निषादची पुस्तकं कुणाला वाचायला हवी असतील तर (उत्तर अमेरिकेत) पाठवु शकते. तसंच भारतात राहून आपल्याला टिन्टिन, ऍस्टेरिक्स वगैरे पण माहिती आहेत. (इथे वाढणार्‍या मुलांना नाहीत.) निषादकडे ती पण आहेत. बॉरो करू शकता.

..............
लाडु हाणावे, चकल्या हाणाव्या, कानोला उदरी भरावा I
ओला टॉवेल गावला नाही तर तिलापिया तळून खावा II Proud

दुर्गाबाईंच्या जातक कथा पण खूप छान आहेत आणि गौरी देशपांडेंनी अनुवादीत केलेले अरेबियन नाईट्स पण मनोरंजक आहे. आणि विंदांच्या बालकविता तर केवळ सुरेख आहेत. हे सर्व उत्तम सरस साहित्य तुम्ही तुमच्या मुलांपर्यत पोचवाल अशी अपेक्षा.

आणि शोनू प्रश्न विचारणे चांगली सवय आहे मुलांची... मी इथे इतके प्रश्न विचारुन तुम्हाला सराव झाला नाही प्रश्नांचा याचे मला कोण नवल वाटते आहे..:)

वेणींच्या पुस्तकाचे नाव नक्की काळे ताईंना विचारुन तुला कळवेन. वाट बघ.

थोड्या मोठ्या मुलांसाठी मी फार पूर्वी वाचलेली "आईच्या आठवणी- भाग १ ते ८" मी सुचविन. भारतातील थोर स्त्रियांबद्दल खूप छान गोष्टी आहेत त्यात.

प्राजक्ता

मार्टिन ऑयर (Martin Auer) चे लेखन वाचले आहे का ? त्याचे बहुतेक सर्व लेखन जालावरच उपलब्ध आहे. ते लहान मुलांसाठी आहे की नाही, असल्यास कोणत्या वयोगटासाठी या प्रश्नांची उत्तरे आपली आपणच शोधावीत. मी मार्टिन ऑयर वाचतो.
http://www.martinauer.net/ डाव्या बाजूला इंग्रजी-दुवे आहेत.

    ***
    comfortably numb

    हा नवाच खजिना मिळाला की ! आधी मी वाचते सगळं Happy

    दशरथ राजा होता तर तो का हंटिंग करत होता? ( त्यांना डिक चेनी ची गोष्ट माहित नाही !) श्रावण बाळाने चांगलं बुलेट प्रूफ टाइप किवा फ्लुरोसंट जॅकेट का घातलं नव्हतं? अर्जुनाने आपल्या कझिन्स ना का मारलं ? यशोदेने कॄष्णाला टाइम आउट न देता उखळाला का बांधलं ? होयसळा राजाने वाघाला का मारलं - वाघ एन्डेंजर्ड स्पीशीज मधे येतो ना? पार्वती बाळाला एकटाच खेळत ठेवून आंघोळीला का गेली ? कोणाचं तरी बेबी म्हणून शंकराने त्याला का मारलं - असा कसा तो देव? अशा प्रश्नांची उत्तरं देता देता जीव मेटाकुटीला येतो बाबा.

    Happy Happy

    अनिल अवचटान्चे रुतुरंग का कुठले तरी एक छान पुस्तक आहे... ते पहा... वरचे प्रश्न तरी सोडवायला लागणार नाहीत ....

    बेंजामिन झेफानिया (Benjamin Zephaniah) हा एक ब्रिट कवी. याच्या बर्‍याच कविता त्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यातील बर्‍याच लहान मुलांनीसुद्धा वाचाव्यात अशा आहेत. शिवाय त्याला जगभरातील मुलांनी पाठवलेल्या कवितासुद्धा तिथे आहेत.
    http://www.benjaminzephaniah.com/content/index.php
    आता thanksgiving जवळ येऊन ठेपला आहे, तेव्हा त्याची Talking Turkeys जरूर वाचा. तो ब्रिट असल्याने त्याने ख्रिस्तमसच्या संदर्भात लिहिली आहे एवढेच. मी स्वतः अस्सल मांसाहारी असूनही ती कविता मला भिडली (की मी अस्सल मांसाहारी असल्यानेच भिडली ? ह्म्म... कुंपणाच्या 'त्या' बाजूला काय आहे याची जाणीव 'या' बाजूच्या लोकांना जास्त तीव्र असेल की त्याच बाजूच्या ? ह्म्म्म्म्म्...)

      ***
      अर्धा रिकामा की अर्धा भरलेला
      वाद कशाला घालायचा ?!
      पूर्ण भरलेला मागवायचा.

      Shel Silverstein (e.g. Where the sidewalk ends) यांच्या कविता जरुर वाचा.

      --------------------------------------------------------------
      ... वेद यदि वा न वेद

      aschig!
      मी हेच लिहायला आले होते इथे. Happy 'Where the sidewalk end' च वाचलंय फक्त. मस्त आहे. छोट्यांसाठी आणि मोठ्यांसाठीही.

      Pages