Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला दम आलू ची रेसिपी किंवा
मला दम आलू ची रेसिपी किंवा त्याची लिंक कोणी देऊ शकेल का?
दम आलू :
दम आलू : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59995.html?1144170363
धन्यवाद अरुंधती.. लगेच लिंक
धन्यवाद अरुंधती.. लगेच लिंक दिल्याबद्दल. उद्या पॉटलकसाठी करणार आहे.
वडापाव बरोबर किंवा भेळेबरोबर
वडापाव बरोबर किंवा भेळेबरोबर ज्या कमी तिखट तळलेल्या मिरच्या मिळतात त्यांची पाककृती कोणी सांगेल का?
मला चिकन चिलि आणि पेपर चिकन
मला चिकन चिलि आणि पेपर चिकन ची रेसिपी किंवा त्याची लिंक कोणी देऊ शकेल का?
येऊकामी, गुजराथमधे काही
येऊकामी,
गुजराथमधे काही मिरच्या मिळतात त्या मूळातच कमी तिखट असतात. मुंबईतही अशा मिरच्या मिळू शकतात.
बाकीच्या मिरच्या वापरायच्या असतील तर त्यांना ऊभी चिर देऊन त्या कोमट पाण्यात अर्धा तास भिजत ठेवायच्या, आणि मग निथळून, मीठ लावून तेलात परतायच्या.
येऊकामी, हिरव्या मिरच्यांना
येऊकामी,
हिरव्या मिरच्यांना उभी चीर देवुन त्या उकळत्या पाण्यात सोडायच्या व लगेच चाळणीत निथळुन घ्यायच्या..थोड्या तेलात २ मिनिटे परतायच्या वरुन चवीपुरते.मीठ पाण्यात सोडल्याने मिरचीचा तिखटपणा कमी होतो..
कोणी हुलग्याचे शेंगोळे सांगाल
कोणी हुलग्याचे शेंगोळे सांगाल का? हुलग्या एवजी दुसरे काय वापरता येइल?
हुलग्याचे शेंगोळे, इथे आहे.
हुलग्याचे शेंगोळे, इथे आहे. (हुलग्याला कुळीथ हा शब्द वापरला असेल.)
इतर काही धान्य वापरुन ती चव येणार नाही, पण भाजणी + कणीक असा प्रयोग करता येईल.
मला चवळीचे सांडगे मिळाले
मला चवळीचे सांडगे मिळाले आहेत. त्याची भाजी, आमटी कशी करतात कोणाला माहिती आहे का?
अनु३, मॄण्मयीने दिलेली
अनु३, मॄण्मयीने दिलेली वांगं-मूगवडी फ्रायमध्ये मी मूगवड्यांच्या जागी चवळी-वड्या वापरल्या आहेत. मस्त होते ही भाजी.
अगो धन्स,तु चवळी-वड्या भिजवून
अगो धन्स,तु चवळी-वड्या भिजवून घेतल्यास का?
नीट आठवत नाही गं आता अनु३. पण
नीट आठवत नाही गं आता अनु३. पण जेवढं आठवतंय त्यावरुन त्या चपट्या, थोड्या किसेस चॉकलेटसारख्या आकारात असतील ( मुगवड्या पण त्याच आकारात मिळतात.) तर पटकन शिजणार्या असतात. नळाचं गरम कडकडीत पाणी वाटीत घेऊन एक वडी टाकून बघ त्यात. जर ती अगदी पचपचीत झाली तर डायरेक्ट फोडणीत शिजव. किंचितच मऊ होतेय असं वाटलं तरच गरम पाण्यात भिजवून निथळून मग वापर.
ह्म्म्म बघते करुन
ह्म्म्म बघते करुन
मी काल मोड आलेल्या गव्हाचे
मी काल मोड आलेल्या गव्हाचे पीठ आणलेय काहीतरी हेल्दी पदार्थ करू म्हणून. पण आता अजिबातच काही सुचत नाहीय. पराठे सोडून काय करता येईल? गोड पदार्थ नको शक्यतोवर.
प्लीज सुचवा काहीतरी.
मधुरिमा -- उकडपेंडी करता
मधुरिमा -- उकडपेंडी करता येईल, पण तेल बरेच लागते. त्यामुळे कितपत हेल्दी होईल माहित नाही.
उपासाची भेळ म्हणजे नक्की कशी
उपासाची भेळ म्हणजे नक्की कशी करतात?
अंजली- १२ , मी उपासाची भेळ
अंजली- १२ ,
मी उपासाची भेळ अशी करते --- सा. खि. + उपासाची बटाटा भाजी + उ. ची काकडीची कोशिंबीर + बटाट्याचा तिखट चिवडा. सगळं साधारण सारख्या प्रमाणात ( किंवा आवडीप्रमाणे कमीजास्त ). कोशिंबीर सर्वात खाली, मग उरलेले पदार्थ , लिंबू किंवा दही आवडीप्रमणे.
ओह्ह म्हणजे सगळे पदार्थ आधी
ओह्ह म्हणजे सगळे पदार्थ आधी बनवावे लागतील
उपासाची भेळ म्हणजे नक्की कशी
उपासाची भेळ म्हणजे नक्की कशी करतात?
भेळेचा मोह आवरुन शुद्ध उपास ठेवा ना एके दिवशी..

साधना +१
साधना +१
अंजली-१२, मी यात थोडा शॉर्टकट
अंजली-१२,
मी यात थोडा शॉर्टकट मारते - उ. ची ब. भाजी न बनवता सा. खि.च भरपूर बटाटे, भरपूर दाण्याचं कूट, भरपूर मिरची- तूप-जीर्याची फोडणी घालून बनवायची. तसंच का ची को न बनवता नुसतीच कोचवून घालायची. ब. चिवडा विकतचाच. चवीत काही फरक पडत नाही.
रच्याकने, साधनाला अनुमोदन.
मी कुठलाही उपास करत नाही. पण ही भेळ मात्र वर्षात ३-४ वेळा करतेच. साबुदाण्याऐवजी किन्वा ( Quinoa ) वापरुन करुन पाहीली आहे. चांगली लागते.
साखि उरली असेल तर पूर्वी ती
साखि उरली असेल तर पूर्वी ती उन्हात वाळवून घेत व मग तळत. ते ही छान लागायचे. ते ही भेळेत वापरता येइल. माझी यम्मी यम्मी डिश म्हणजे वरीचे तांदूळ एक मूद, त्यावर उपासाची बटाटा काचर्या भाजी अतिशय क्रिस्प करून. ( मावेत. १.४० मिनिट जास्त ठेवायचे. झाकण न ठेवता) यावर दाण्याची आमटी पेरायची एक डाव भर. व काकडी दही कोशिंबीर वाटीत.
वा सगळ्यांचे सजेशन्स मस्तच
वा सगळ्यांचे सजेशन्स मस्तच आहेत.
साधना... अग माझ्याकडे एक उपासाचा मेंबर येणार आहे त्यासाठी विचारलं त्याची बायको नेहमी सा. खि च देते त्याला म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं उपासाचं
तुम्ही त्याला उपाशी ठेवा, जरा
तुम्ही त्याला उपाशी ठेवा, जरा वेगळं
हाँगकॉन्ग मार्केट मधून बांबू
हाँगकॉन्ग मार्केट मधून बांबू शूट्स आणले ताजे..काय करता येइल त्याचे?शाकाहारी सुचवा
@ दिनेशदा: लिंक दिसत
@ दिनेशदा: लिंक दिसत नाहिये....
गव्हाच्या चिकापासून बदामी
गव्हाच्या चिकापासून बदामी हलवा बनवतात. त्याची रेसिपी मिळेल का?
केश्वे, जुन्या मायबोलीत
केश्वे, जुन्या मायबोलीत दिनेशदा आणि मनुस्विनीने बदामी हलव्याची कृती लिहिली आहे.
मंजू, थँक्स मी सर्च केलं तर
मंजू, थँक्स
मी सर्च केलं तर बदाम घातलेला शिरा मिळाला. बधामी असं टाईप करायला हवं होतं.
Pages