पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बांबू शूट्स कच्चे बांबूचे कोंब ( जांभळट रंगाचे ) आहेत की, ते साफ करून चिरुन मिठात घातलेले आहेत ?

साफ केलेले असतील तर मुगा मोळो मधे घालता येतील - मसाला घालायच्या आधी , किंवा पातळ काप असतील तर त्यांना हळद तिखट किंचित हिंग, मीठ लावून रव्यात घोळवून तव्यावर थोड्या तेलात परतून काप करता येतील.

हे कुठं विचारू समजत नाहीये म्हणून इथे विचारते.
मुंबईत ऑलस्पाइस कुठे मिळेल?
हायपरसिटी आणि फूड बझार दोन्ही ट्राय करून झालेय. तिथे नाहीये.
ऑलस्पाइसची पानं वापरतात ना?
कुणाकडे रोप किंवा बिया आहेत का देता येतील अश्या?

नी>>
लोखंडवाला सर्कलला पण आहे.

मला उंधियोची रेसेपी हवी आहे.
वरच्या र्सच मध्ये मिळाली, पण अजुन कोणी एक्सप्लेन करुन सांगेल का? उदा भाज्यांच प्रमाण वगैरे?

रीमा,
मी गेल्याच आठवड्यात ऊंधियो केला होता. भाज्यांचे खास प्रमाण असे काही नाही, आवडत्या भाज्या जास्त घ्यायच्या. तरीपण एक नमुना म्हणून.
सुरती पापडी (दाणेवाली आणि बिन दाणेवाली ) अर्धा किलो, वांगी व कंद (कोनफळ) प्रत्येकी पाव किलो, केळी २/३, (मी बटाटे वापरत नाहि, वापरले तर पाव किलो ), एक मेथीची जुडी, एक नारळ, ओल्या लसणीच्या अगदी ७/८ लसणाच्या असतात त्या ३ जुड्या (त्यातली मूळे टाकावी लागतात) ७/८ हिरव्या मिरच्या, एक कोथिंबीरीची जुडी, एक मोठे लिंबू अशा भाज्या लागतात.
मी मेथीचे गोळे न तळता भाजीतच शिजवतो (भाजी कूकरमधे शिजवतो,) घट्ट गोळे वळले तर फुटत नाहीत, आणि कूकरमधे व्यवस्थित शिजतात.

मला पूर्वी इथे कोणीतरी वेगळ्या पद्धतीने केलेल्या पोह्यांची रेसेपी दिली होती ती हवी आहे. मटार, दाणे, मसाला, आलं(बहुतेक) घालून.. आत्ता सापडत नाहीये.. आणि contents पण आठवत नाहीयेत..

नाही मंजूडी .. त्यात हरबरा डाळ आणि मक्याचे दाणे नक्कीच नव्हते.. भरपूर मटार आणि दाणे होते.. पण सर्च केल्यावर मिळत नाहीये रेसिपी... बहुतेक मिनोतीची होती का.. त्यांनी delete केली असेल तर नाही सापडणार Sad

दिनेशदा धन्यवाद!
खरतर मी फायनली उंधियो बनवला. गेला शनीवारी सुट्टी असल्याने आणि आई व सासुबाईच्या ईच्छेपोटी.
जुन्या मायबोलीवर वेगवेगळ्या टिप्स मिळाल्या. ऑफिस ग्रांटरोडलाच असल्याने भाजीगल्लीत भाजी पण मस्तच मिळाली. वाटण पण तुम्ही सांगितल्या प्रमाणेच केल फक्त त्यात ३ चमचे बडीशेप, २ चमचे ओवा, ३ चमचे धणे आणि २ चमचे जीर वाटुन घातल. धडाधड उंधियो संपला पण. Happy

मला लेकीला देण्यासाठी (शक्यतो डब्यात देण्यासाठी) वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता आणि सॅन्डविच यांच्या कॄती हव्या आहेत. मी मला चिज सॅन्डविच नाहीतर काकडी-टॉमॅटो असले १-२ प्रकारच माहित आहेत. आणि पास्ता काहीतरी करुन देते निट कृती माहित नाही आता तिला काहि वेगळ हव आहे...
आठवड्यात १दा अस काहितरी डब्यात हव असत. दोन्हीचे ४-४ प्रकार जरी कुणी सुचवु शकत असल तरी चालेल.
आधीच धन्यवाद

अनु३, माझ्या लेकासाठी मी हे देते.
१) बटर-जॅम सँडविच
२) बटर- जिरे-खोबरे-तिखट अशी चटणी लावून सँडविच
३) ऑम्लेट-चीज सँडविच, एग मायो सँडविच
४) चिकन मेयॉनिज सँडविच(चिकन उकडून त्याचे थ्रेडस करायचे, त्यात थोडे मेयॉनिज, १ चमचा मध, थोडी मिरपूड आणि आवडत असेल तर अगदी थोडा मस्टर्ड सॉस घालून ब्रेडच्या मधे घालणे)

पास्ता

१)टोमॅटो पास्ता: ऑलिव्ह ऑईल मधे कॅन्ड टोमॅटो, १ चमचा केचप, मीट मिरपूड, हवी ती ह्र्ब्स घालायची. आवडीचा पास्ता उकडून घालायचा.
२) वरील सॉस मधे २ चमचे क्रीम घातले तरी छान लागते.
३)वरील सॉस मधे स्वीट कॉर्न, उकडलेले मटार दाणे, उकडलेली ब्रोकोली हे पण चांगले लागते.
४)साधा व्हाईट सॉस पास्ता. सॉस थोडा पातळ ठेवायचा म्हणजे गार झाला तरी चांगला लागतो.
५)पास्ता प्रमाणेच व्हेज हक्का नूडल्स पण चांगल्या लागतात डब्यात.

धन्यवाद एम्बी, मी वरती लिहायला विसरले की आम्ही व्हेजिटेरीयन आहोत. (अंड वैगरे पण नाही खात.) सॅन्डविच मध्ये अजुन काही माहिती असतील तर दे ना..

रॅप्स ट्राय करू शकतेस.
क्रीम चीज, मायो, बारीक चिरलेल्या भाज्या घालून घट्ट गुंडाळून त्याचे छोटे तुकडे करून.
गोड आवडत असेल तर क्रीमचीज, पातळ अ‍ॅपल किंवा पीचेस चे स्लाइसेस आणि मध
चक्क्यात मीठ मीरपूड आणि किसून पाणी काढलेली काकडी हे पण चांगले लागते.
उकडलेला बटाटा, मीठ, तिखट, क्रीम चीज हे पण चांगले लागते. पण हेल्दी वाटत नाही.
अजून काही आठवले तर सांगेन. इथे लहान मुलांचा डबा/खाऊ असा काही तरी बीबी आहे त्यावर पण पास्त आणि सअँडविच शिवाय कल्पना मिळतील.

ह्म्म्म तु दिलेले पर्याय ट्राय करुन बघते. पास्ता आणि सॅन्ड्विच शिवायचे बरेच पदार्थ माहिती आहेत आणी तेच देते. त्या बीबी वर पण वाचले आहेत. सध्या लेक असल काहितरी कधितरी दे म्ह्णते त्यामुळे १-२ आठवड्यातुन १ दा ह्यातल काहितरी द्यायचा विचार आहे.

मागे कुणी तरि रोटिसरी चिकन आणल्यावर ते वापरुन नविन काय करता येइल याबद्दल विचारले होते...
मी त्याचे विविध प्रकार करते....Bone काढुन टाकते बोनलेस घेते . त्याचे सॅन्डविच ... कधी चायनिज डिशेश्...Fried राईस्, sauted, ...तर कधि ग्रीन चिकन (पालक, हिरवी मिरचि, आले+ लसुण वापरुन) , तर कधी तेलात कांदा लांब चिरुन टाकुन त्यावर आले+लसुण पेस्ट ,चिलि sauce, रोटिसरी चिकन चे तुकडे, मिठ टाकते ....असे प्रकार करते. माझी एक मैत्रिण ऱोटिसरि बोन सकट वापरुण रस्सा करते. तिचे म्हणणे असे कि त्याला छान Rosted chicken ची चव येते...चिकन Rosted असते म्हणूण. मी कधि Try केले नाहि. पफ पेस्ट्रि मधे हि वापरता येइल. असे बरेच प्रकार होत्तात.

अनु३ -- माझ्या काही standard पास्ता रेसिपीज
१. पेस्तो पास्ता -- पेस्तो ची रेसिपी कुठेहि मिळेल तुला. तो भरपुर करुन फ्रिज मधे ठेवते मी. नंतर रोटिनी टाईपच्या पास्ता मधे नुस्ता कालवायचा पेस्तो. माझी पेस्तोची रेसिपी: २ कप बेझिल, २-३ लसुण पाकळ्या, पाऊण कप वॉलनट्स, १ कप पार्मेजान चीज. सगळं फुड प्रोसेसर मधुन काढायचं. ते फिरत असतानाच त्यात ऑल्मोस्ट १/३-१/२ कप ऑऑ टाकायचं. भरपुर पेस्तो तयार होतो. हा सॅन्ड्विच मधे पण चटणी ऐवजी लावता येतो.

२. तेल तापवुन त्यात लसुण टाकायचा. फार लाल होउ द्यायचा नाही. त्यात विकतच्या टॉमॅटोजची कॅन ओतायची (ताजे कापलेले पण चालतील). झाकण घालून टॉमॅटो शिजु द्ययचे. अगदी गळले की त्यात italian dried herbs\fresh basil\other fresh herb यातला काहीतरी एक घालायचं. त्यात cream cheese\mascarpone cheese\readymade alfredo sauce यातलं एक काहितरी घालायचं. मग मीठ व पास्ता घालून वरुन कुठ्लही श्रेडेड चीज घालून खायच. हा सॉस पण तयार करून फ्रिज मधे ठेवता येतो. तसच करताना त्यात पालक \ ब्रॉकोली बारिक चिरून अशी हाताशी असेल ती भाजी घालता येते.

फुड नेट्वर्कच्या साईट वर भरपुर रेसिपीज सापडतील व्हेजी पास्ताच्या

सानुली धन्स गं... Happy
रोज पराठे,पोळीभाजी पुरी असल काय देतिस डब्यात ह्या प्रश्नांनी कंटाळले होते.
इडली, पावभाजी असे प्रकार पण दिले तरी अजुन काहितरी वेगळ दे हे संपतच न्हवत मग तिला विचारल काय देऊ डब्यात तर १ डे पास्ता आणि मग ४ डेज तुला हव ते अस सांगण्यात आल.. Uhoh

Pages